< प्रेषि. 3 >

1 पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस दुपारच्या तीन वाजता वर परमेश्वराच्या भवनात जात होते.
U Petro nu Yohana bhabhalaga hushibhanza apuute, yahali saa tisa.
2 आणि जन्मापासून पांगळा असा एक मनुष्य होता, भवनाच्या सुंदर नावाच्या दाराजवळ भवनात जाणाऱ्याकडे भीक मागण्यास दररोज त्यास कोणीतरी नेऊन ठेवत असत.
Umuntu umo alinanchisi manama afume shapipwe, bhahanyemulaga shila lisiku bhabhehaga mundyango ugweshibhanza, gwagwahitwaga gwinza, aje abhalabhaje abhantu bhabhahwinjila mushibhanza.
3 पेत्र व योहान हे परमेश्वराच्या भवनात जात आहेत, असे पाहून त्याने त्यांच्याकडे भीक मागितली.
Nawabhalola aPetro nu Yohana bhazubhula aje bhinjile mushibhanza, wabhalaabha esadaka.
4 तेव्हा पेत्र, योहानाबरोबर त्यास निरखून पाहत, म्हणाला, “आमच्याकडे पाह.”
U Petro nu Yohana bhamwenya hu maso bhaga,”tenye ate.”
5 तेव्हा त्यांच्यापासून काही मिळेल, अशी आशा धरून त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले.
Ula unanjisu manama wabhenya, wasubhila apelwe ahantu hahonti afume hwabhene.
6 आणि पेत्र म्हणाला, “रूपे व सोने माझ्याजवळ काहीच नाही; पण जे माझ्याजवळ आहे. ते मी तुला देतो, नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने उठून चालू लाग.”
Umwene uPetro waga ane sendi ne, “hela wala edhahabu, lelo hendi naho hehupela. Hwitawa elya Yesu Kilisiti wa Nazareti, emelela.”
7 आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्यास उठवले: तेव्हा लागलेच त्याची पावले व त्याचे घोटे यांत बळ आले.
U Petro wakhata ukhono ulilo wabhusya, amafugamo gakwe gapata ikhone.
8 आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला, आणि तो चालत व उड्या मारत व देवाची स्तुती करत त्याच्याबरोबर परमेश्वराच्या भवनात गेला.
Umuntu ula wimilila najende na rusherushe winjila mushibhanza nu Petro nu Yohana ohu ajenda yuyo ohu ahulumba Ungulubhi.
9 आणि सर्व लोकांनी त्यास चालताना व देवाची स्तुती करताना पाहिल.
Abhantu bhonti nabhalola ajenda bhalumba Ungulubhi.
10 १० आणि जो भवनाच्या सुंदर दाराजवळ भीक मागण्यासाठी बसत असे; तो हाच आहे असे त्यांनी त्यास ओळखले तेव्हा त्यास जे झाले होते त्यावरून ते आश्चर्याने व विस्मयाने व्याप्त झाले.
Bhamanya huje yayula yalinanjisu manama yalabhaga esadaka pandyango gweshibhanza; abhantu bhahaswiga embombo Ungulubhi zyabhombile hwa muntu ula.
11 ११ तेव्हा तो पेत्राला व योहानाला धरून राहिला असता, सर्व लोक फार आश्चर्य करीत शलमोनाचा द्वारमंडप म्हटलेल्या ठिकाणी, त्याच्याकडे धावत आले.
Abhantu nabhalola umuntu ula abhomiliye aPetro nu Yohana, bhashimbila muukumbi wawahetelwe wa Sulemani, bhahaswijile tee.
12 १२ हे पाहून पेत्राने त्या लोकांस उत्तर दिले, तो म्हणाला, “अहो इस्राएल मनुष्यांनो, यावरुन तुम्ही आश्चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालायला लावले आहे, असे समजून आम्हाकडे का न्याहाळून पाहता?
U Petro nawalola isho, wabhabhu ula abhantu bha Israeli, yeenu muswiga? Nantele mutenya ate aje ate tetimwemelesizye umuntu unu hwi khone lyetu?”
13 १३ अब्राहामाचा, इसहाकाचा, व याकोबाचा देव, आमच्या पूर्वजांचा देव, याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे. त्यास तुम्ही मरणास सोपवून दिले, व पिलाताने त्यास सोडून देण्याचे ठरवले असताही त्यास तुम्ही त्याच्यासमक्ष नाकारले.
Ungulubhi wa Ibulahimu, Ungulubhi wa Isaka, nuwa Yakobo, Ungulubhi wa Yise bhetu, amwemeshe utumishi wakwe uYesu. Unu amwe mwahakhanile hwa Pilato, nantele uPilato, ahanzaga huleshele wene.
14 १४ तुम्ही तर जो पवित्र व नीतिमान त्यास नाकारले, आणि घातक मनुष्य आम्हास द्यावा असे मागितले.
Mwahakhene Umfinjile wa Ngulubhi umuntu Umwinza, mwahamwanza abhigulile unyambuda aleshelwe wene.
15 १५ आणि जीवनाच्या अधिपतीला तुम्ही जिवे मारले; त्यास देवाने मरण पावलेल्यामधून उठवले याचे आम्ही साक्षी आहोत.
Amwe mwabudile umwene uwi womi, lelo Ungulubhi azyusya afume hwabhafwe - Ate tili bhaketi bhakwe.
16 १६ आणि त्याच्या नावाने त्याच्या नावावरील विश्वासाकडून ज्याला तुम्ही पाहता, व ओळखता त्या या मनुष्यास शक्तीमान केले आहे. आणि, त्याच्याद्वारे प्राप्त झालेल्या विश्वासानेच तुम्ही सर्वांच्यादेखत याला हे पूर्ण आरोग्य दिले आहे.
Eshi, ulweteho hwitawa lya Yesu, unu lwalupiye ikhone elyajendele umuntu unu yamuhulola na kujua, alifanywa kuwa na nguvu. Imani ambayo inapitia kwa Yesu imempa yeye afya hii kamilifu, mbele yenu ninyi nyote.
17 १७ तर आता भावांनो, मी जाणतो की अज्ञानाने तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही हे केले आहे,
Eshi, Bhaholo, bhane elola mwabhombile esho hunongwa yelema, atubhalongozi bhenyu shabhabhombile.
18 १८ परंतु आपल्या ख्रिस्ताने दुःखे सोसावी, म्हणून देवाने आपल्या सर्व संदेष्ट्याच्या तोंडाने जे पूर्वी कळवले होते, ते याप्रमाणे पूर्ण केले आहे.
Lelo enongwa zya yanjile Ungulubhi ashilile akuwe bhakwe aje uYesu ailabha zibhombishe eshi.
19 १९ तर तुमची पापे पुसून टाकली जावी, म्हणून पश्चात्ताप करा, व फिरा अशासाठी की विसाव्याचे समय प्रभूच्या समक्षतेपासून यावे;
Eshi mulabhe na galushe, nke mbibhi zyenyu zyepe nkazyenze ensiku ezya sungwe naseshelele nayenza umwene uYesu;
20 २० आणि तुमच्याकरिता पूर्वी नेमलेला, ख्रिस्त येशू याला त्याने पाठवावे.
Aitumwa uYesu yasalulwe nu Ngulubhi hulimwe.
21 २१ सर्व गोष्टींची सुस्थिती पुनःस्थापित होण्याच्या काळांपर्यंत स्वर्गात त्यास राहणे अवश्य आहे, त्या काळाविषयी युगाच्या आरंभापासून देवाने आपल्या पवित्र संदेष्ट्याच्या तोंडून सांगितले आहे. (aiōn g165)
Umwene yayuyo emwanya lazima zimwejelele mpaka evintu vyonti navyaigaluha, vyayanjile Ungulubhi ashilile akuwe bhakwe afinjile. (aiōn g165)
22 २२ मोशेने तर सांगितले की, ‘प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या भावांमधून उठवील. तो जे काही तुम्हास सांगेल ते सर्व त्याचे ऐका.’
Lyoli uMusa ayanjile, 'Huje Ugosi Ungulubhi aja aihubhiha ukuwe neshi ane afume hwa holo bhenyu. Mwaihumwonvwelezya shila hantu haibhabhuula amwe.
23 २३ आणि असे होईल की जो कोणी जीव त्या संदेष्ट्याचे ऐकणार नाही तो लोकांमधून अगदी नष्ट केला जाईल.
Ihaibha aje shila muntu yasagaa ihutejelezya okuwe uyo aibhengwa ayepe pabhamwabho.'
24 २४ आणखी, शमुवेलापासून जे संदेष्ट्याच्या परंपरेने झाले, जितके बोलत आले, त्या सर्वानी या दिवसाविषयी कळवले.
Lyoli, akuwe bhonti ahwandile hwa Samueli na bhaala bhabhapyanie pamwene bhatangazizye naziyanje ensiku ezi.
25 २५ तुम्ही संदेष्ट्याचे मुले आहात आणि तुझ्या संततीद्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील, असे अब्राहामाशी बोलून, ‘देवाने तुमच्या पूर्वजांशी जो करार केला त्या कराराची तुम्ही मुले आहा.’
Amwe mulibhana bhakuwe neilagano Ungulubhi lyalagine na gogolo bhetu abhemande neshi shayayanjile nu Ibrahimu, 'Aje abhana bhe mpapo yaho abhantu bhonti bha munsi bhaisaiwa.'
26 २६ देवाने आपला सेवक येशू याला उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले, यासाठी की, त्याने तुमच्यातील प्रत्येकाला तुमच्या दुष्कर्मापासून फिरण्याने तुम्हास आशीर्वाद द्यावा.”
Ungulubhi pa wamwimiha uYesu waleta hulimwe nasoti huje abhasaye amwe nkamwagaluha nahuzileshe embibhi zyenyu.”

< प्रेषि. 3 >