< प्रेषि. 27 >
1 १ जेव्हा आम्ही समुद्रमार्गे इटलीला जाण्याचे ठरवले तेव्हा पौल व इतर काही कैद्यांना युल्य नावाच्या शताधिपतीच्या हाती सोपविण्यात आले, युल्य हा अगस्तस सेनेचा एक अधिकारी होता.
Amikor pedig eldöntötték, hogy mi Itáliába hajózzunk, átadták mind Pált, mind néhány más foglyot egy Juliusz nevű századosnak a császári seregből.
2 २ अद्रमुत्तिय येथील एका जहाजातून आम्ही जाणार होतो, हे जहाज आशियाच्या किनाऱ्यावरील बंदरे घेत पुढे जाणार होते, आम्ही या जहाजातून प्रवासास निघालो, तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीका येथे राहणारा अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता.
Beszálltunk hát egy Adramittiumból való hajóba, és az Ázsia mentén fekvő helyeket akarva behajózni, elindultunk. Velünk tartott a macedóniai Arisztárkhosz, aki Thesszalonikából való.
3 ३ दुसऱ्या दिवशी आम्ही सिदोन नगराला पोहचलो, युल्य पौलाशी फार चांगला वागला, पौलाच्या मित्रांना त्याची काळजी घेता यावी म्हणून त्याने मोकळीक दिली.
Másnap megérkeztünk Szidónba. Juliusz emberséggel bánt Pállal, megengedte, hogy barátaihoz elmenjen, és azok gondoskodjanak róla.
4 ४ तेथून आम्ही समुद्रमार्गे पुढे निघालो आणि कुप्रच्या किनाऱ्याकिनाऱ्याने निघालो कारण वारा समोरचा होता.
Onnan elindulva Ciprus alatt eveztünk el, mivel ellenszél volt.
5 ५ किलकिया व पंफुलिया प्रांताजवळच्या समुद्राला पार करून लुक्या प्रांतातील मुर्या बंदरात पोहचलो.
A Cilicia és Pamfília mellett levő tengeren átevezve eljutottunk a líciai Mirába.
6 ६ तेथे शताधिपतीला इटलीला जाणारे आलेक्सांद्रीयाचे एक जहाज आढळले, त्याने आम्हास त्या जहजात बसविले.
Mivel ott a százados egy Itáliába menő alexandriai hajót talált, abba szállított be minket.
7 ७ आम्ही बरेच दिवस हळूहळू प्रवास करीत होतो, कनिदा शहरापर्यंत येण्यासाठी आम्हास फार कष्ट पडले कारण वारा तोंडचा होता, आम्हास पुढे जाता येईना, म्हणून आम्ही क्रेताच्या दक्षिणेकडून सलमोन शहराच्याच्या समोरच्या बाजूस गेलो.
Több napon át azonban lassan hajóztunk, és nehezen érkeztünk el Knidosz elé. Mivel nem engedett bennünket odajutni a szél, elhajóztunk Kréta alatt, Szalmóné mellett,
8 ८ यापुढे आमचे जहाज क्रेत बेटाच्या किनाऱ्याने मोठ्या अडचणीतून सुरक्षित बंदर येथे पोहोचले, तेथे जवळच लसया नगर होते.
és nagy üggyel-bajjal elhajózva mellette, eljutottunk egy helyre, melyet Szépkikötőknek neveznek, melyhez közel volt Lázea városa.
9 ९ बराच वेळ वाया गेला होता आणि पुढील प्रवास करणे बरेच अवघड झाले होते, कारण एव्हाना यहूद्यांच्या उपासाचा काळही निघून गेला होता, तेव्हा पौलाने त्यांना सावधानतेचा इशारा दिला, पौल म्हणाला,
Mivel pedig sok idő múlt el és a hajózás már veszedelmes volt, mivel a böjt is elmúlt már, Pál intette őket:
10 १० “पुरुषांनो, मला वाटते, आपल्या प्रवासात जहाजातील मालाला आणि जहाजालाच नव्हे तर आपल्या जीवालाही धोका होईल.”
„Férfiak, látom, hogy nemcsak a teherre és a hajóra, hanem a mi életünkre nézve is veszélyes lesz ez a hajózás.“
11 ११ परंतु पौलाच्या मताशी जहाजाचा कप्तान व मालक सहमत झाले नाहीत, उलट जहाजाच्या कप्तानाच्या व मालकाच्या बोलण्यावरच शताधिपतीचा जास्त विश्वास होता.
De a százados inkább hitt a kormányosnak és a hajótulajdonosnak, mint annak, amit Pál mondott.
12 १२ परंतु हे सुरक्षित म्हंटलेले बंदर हिवाळ्यात मुक्काम करायला सोईचे नव्हते, म्हणून बहुमताने पुढे निघावे असे ठरले आणि फेनिकेला जाण्याचा प्रयत्न करावा आणि शक्य झाले तर तेथेच हिवाळा घालवावा असे ठरले.
Mivel pedig az a kikötő telelésre nem volt alkalmas, a többség azt határozta, hogy hajózzanak el onnan is, hátha valami módon eljutnak Főnixbe, Kréta kikötőjébe, mely délnyugat és északnyugat felé néz, ahol áttelelhetnének.
13 १३ तेव्हा दक्षिणेकडून मंद वारे वाहू लागले, तेव्हा ते नांगर उचलून क्रेताच्या किनाऱ्याकिनाऱ्याने तारू हाकारीत जाऊ लागले, जहाजावरच्या लोकांस वाटू लागले की, अशाच प्रकारचे वारे आम्हास पाहिजे होते व तसेच ते वाहत आहे.
Mivel pedig déli szél kezdett lassan fújni, azt gondolták, hogy feltett szándékuknak uraivá lettek, elindultak s Kréta közelében hajóztak el.
14 १४ परंतु लवकरच क्रेत बेटावरून ‘ईशान्येचे’ म्हंटलेले वादळी वारे वाहू लागले.
Nem sokára azonban viharos szélvész csapott le oda, amelyet észak-keleti szélnek neveznek.
15 १५ आणि जहाज वादळी वाऱ्यात सापडले व त्यास पुढे जाता येईना, तेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न सोडून आम्ही वाऱ्याने जहाज भरकटू दिले.
Mikor pedig az a hajót magával ragadta, és nem bírt a széllel szembe menni, nekieresztve sodortattunk tovább.
16 १६ मग कौदा नावाच्या लहानशा बेटाच्या किनाऱ्याकिनाऱ्याने आम्ही जाऊ लागलो, मग थोड्या खटपटीनंतर जीवन रक्षक होडीवर उचलून घेतली.
Mikor pedig egy kis sziget alá futottunk, melyet Klaudának hívnak, alig bírtuk hatalmunkba keríteni a csónakot.
17 १७ जीवन रक्षक होडी आत घेतल्यावर लोकांनी जहाज दोरखंडाने आवळून बांधले, जहाज वाळू असलेल्या सूर्ती नावाच्या उथळ जागी आदळेल या भीतीने त्यांनी शीड खाली काढले, तेव्हा वाऱ्याने ते भरकटू लागले.
Miután ezt felvonták, védőintézkedéseket tettek: alul átkötözték a hajót, és mivel féltek, hogy zátonyra bukkannak, leeresztették a vitorlát, és úgy sodródtak tovább.
18 १८ जोरदार वादळी वाऱ्याचे तडाखे खावे लागल्याने लोकांनी दुसऱ्या दिवशी जहाजावरील सामान बाहेर टाकून दिले.
Amikor pedig a szélvész nagyon hányt-vetett bennünket, másnap a hajóterhet kidobálták.
19 १९ तिसऱ्या दिवशी जहाजाची काही सामग्री त्यांनी आपल्या हातांनी बाहेर काढून टाकली.
Harmadnap tulajdon kezeinkkel szórtuk ki a hajó felszerelését.
20 २० बरेच दिवस आम्हास सूर्य किंवा तारे दिसले नाहीत, वादळ फारच भयंकर होते, आम्ही आमच्या तरण्याची सर्व आशा सोडून दिली, आम्ही मरणार असे आम्हास वाटू लागले.
Amikor pedig több napon át sem nap, sem csillagok nem látszottak, és nem kis vihar szorongatott, életben maradásunk minden reménysége elveszett.
21 २१ बराच काळपर्यंत लोकांस उपवास घडल्यावर, मग पौल त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, “गुहस्थांनो, क्रेतावरून मुक्काम हलवू नका, हा माझा सल्ला तुम्ही ऐकायला पाहिजे होता, म्हणजे हा त्रास व ही हानी तुम्हास टाळता आली असती.”
Amikor pedig már hosszú ideje nem ettek, akkor Pál felállt közöttük, és ezt mondta: „Az lett volna a jó, ó férfiak, hogy engedelmeskedve nekem, nem indultunk volna el Krétából, és elkerültük volna ezt a bajt és kárt.
22 २२ पण आता तुम्ही धीर धरावा अशी माझी विनंती आहे, कारण तुमच्यापैकी एकाच्याही जीवाला धोका पोहोंचणार नाही, आपले जहाज मात्र गमवावे लागेल.
Én azonban mostanra nézve is intelek benneteket, hogy jó reménységben legyetek, mert egy lélek sem vész el közületek, csak a hajó.
23 २३ मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची उपासना मी करतो, त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहीला.
Mert ma éjjel mellém állt az Istennek az angyala, akié vagyok, akinek szolgálok is,
24 २४ आणि तो दूत म्हणाला, “पौला भिऊ नको! तुला कैसरापुढे उभे राहिलेच पाहिजे, तुझ्याबरोबर प्रवास करणारे सर्व लोक देवाने त्याच्या दयेने तुला दिले आहेत.
és ezt mondta: Ne félj Pál, neked a császár elé kell állnod. És íme az Isten ajándékba adta neked mindazokat, akik veled hajóznak.
25 २५ तेव्हा गृहस्थांनो, तुम्ही सर्व धीर धरा! कारण मला जसे देवाने सांगितले, अगदी तसे होणार असा मला विश्वास आहे.
Ezért jó reménységben legyetek, férfiak! Mert hiszek az Istennek, hogy úgy lesz, amint nekem megmondta.
26 २६ परंतु आपणास एखाद्या बेटावर उतरून थांबावे लागले.”
Egy szigetre kell kivetődnünk.“
27 २७ चौदाव्या रात्री आमचे जहाज अद्रिया समुद्रातून चालले होते, तेव्हा खलाशांनी जहाज एखाद्या भूमीजवळ पोहोचले असावे असा अंदाज केला.
Amikor pedig eljött a tizennegyedik éjszaka, amióta az Adrián hányódtunk, éjféltájban észrevették a hajósok, hogy valami szárazföldhöz közeledünk.
28 २८ त्यांनी पाण्याची खोली मोजली तेव्हा ती चाळीस मीटर भरली, आणखी काही वेळाने त्यांनी परत एकदा समुद्राची खोली मोजली तेव्हा ती तीस मीटर भरली.
Lebocsátották a vízmérő ónt, és húsz ölnyinek találták. Majd egy kissé tovább menve ismét lebocsátották a vízmérő ónt, és tizenöt ölnyinek találták.
29 २९ ओबडधोबड खडकाळ जागेवर आपले जहाज आदळेल अशी भीती वाटल्याने त्यांनी चार नांगर जहाजाच्या मागील बाजूने टाकले आणि दिवस उजाडण्याची प्रार्थना करीत वाट पाहू लागले.
Mivel féltek, hogy szirtes helyekre vetődhetnek, a hajónak hátulsó részéből négy vasmacskát vetettek ki, s alig várták, hogy nappal legyen.
30 ३० खलाशांनी जहाजातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांनी जहाजाच्या पुढील भागातून नांगर टाकल्याचे भासवून जीवन रक्षक होड्या समुद्रात टाकल्या.
A hajósok pedig amikor el akartak menekülni a hajóból, a csónakot lebocsátották a tengerre, színlelve, mintha a hajó orrából vasmacskákat akarnának leereszteni.
31 ३१ परंतु पौल शताधिपतीला व इतर शिपायांना म्हणाला, “जर हे लोक जहाजात राहणार नाहीत, तर तुम्ही वाचणार नाही.”
Pál azonban ezt mondta a századosnak és a vitézeknek: „Ha ezek nem maradnak a hajóban, akkor ti sem menekülhettek meg.“
32 ३२ यावर शिपायांनी जीवन रक्षक होड्यांचे दोर कापून टाकले आणि त्याखाली पाण्यात पडू दिल्या.
Ekkor a katonák elvágták a csónak köteleit, és hagyták hogy kiessen.
33 ३३ पहाट होण्याअगोदर पौलाने त्या सर्वांना काहीतरी खाण्याचा आग्रह केला, तो म्हणाला, “आज चौदावा दिवस आहे, तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात पण खाणेपिणे काही केले नाही, अन्नाचा कणही खाल्ला नाही.
Addig pedig, amíg nappal nem lett, Pál bíztatta mindnyájukat, hogy egyenek, és ezt mondva: „Ma tizennegyedik napja, amióta étlen várakoztok, és semmit sem vettetek magatokhoz.
34 ३४ तुम्ही थोडे तरी खा, कारण तुमचा टिकाव लागण्यासाठी तुम्ही खाणे जरुरीचे आहे, तुम्ही खावे अशी मी तुम्हास विनंती करतो, तुमच्यापैकी कोणाच्या केसासही धक्का लागणार नाही.”
Ezért intelek benneteket, hogy egyetek, mert ez a ti javatokra szolgál. Mert közületek senkinek sem esik le egyetlen hajszál sem a fejéről.“
35 ३५ असे बोलल्यानंतर पौलाने भाकर घेतली आणि सर्वांच्या समक्ष देवाचे उपकार मानले, ती भाकर मोडून तो खाऊ लागला.
Mikor pedig ezeket mondta, kezébe vette a kenyeret, hálát adott Istennek mindnyájuk előtt és megtörve, enni kezdett.
36 ३६ ते पाहून त्या सर्वांना धीर आला आणि ते जेवले.
Erre felbátorodtak mindnyájan, és szintén vettek magukhoz táplálékot.
37 ३७ आम्ही सर्व मिळून जहाजात दोनशे शहात्तर लोक होतो.
A hajóban lélekszám szerint összesen kétszázhetvenhatan voltak.
38 ३८ त्या सर्वांनी पुरेसे खाल्ल्या प्याल्यानंतर धान्य समुद्रात टाकून दिले आणि जहाजातील भार कमी केला.
Miután pedig megelégedtek az eledellel, a hajót megkönnyebbítették, a gabonát kiszórták a tengerbe.
39 ३९ दिवस उजाडल्यावर त्यांना भूभागाची ओळख पटली नाही, परंतु तेथे किनारा असलेल्या उपसागरासारखी ती जागा दिसून आली, म्हणून शक्य झाल्यास तेथील किनाऱ्याला जहाज लावण्याचे त्यांनी ठरवले.
Amikor pedig megvirradt, a szárazföldet nem ismerték fel, hanem egy öblöt vettek észre, amelynek sima partja volt, és elhatározták, hogy kihajtják rá a hajót, ha bírják.
40 ४० म्हणून त्यांनी नांगर कापले आणि समुद्रात पडू दिले, त्याचबरोबर सुकाणूंच्या दोऱ्या एकत्र केल्या, नंतर त्यांनी जहाजाच्या पुढच्या भागाचे शीड वारा भरावे म्हणून उभे केले आणि जहाज किनाऱ्याला आणले.
A vasmacskákat körös-körül elvagdalták, és a tengerben hagyták, egyszersmind eloldották a kormányrudak köteleit, és felvonva a nagy vitorlát a szélfúvás felé, igyekeztek a part felé haladni.
41 ४१ परंतु दोन समुद्रांमधील वर आलेल्या वाळूच्या ढिगावर जहाज जोराने आदळले, तेव्हा जहाजाची पुढची बाजू वाळूमध्ये रुतून बसली आणि गलबताचा मागचा भाग लाटांच्या तडाख्यामुळे तुटू लागला.
Amikor azonban egy zátonyos helyre találtak, ráhajtották a hajót. Az első része ugyan megakadt és mozdíthatatlanul maradt, a hátulsó része azonban szakadozott a hullámok ereje miatt.
42 ४२ तेव्हा शिपायांनी कैद्यांना मारण्याचे ठरवले, यासाठी की त्यांच्यातील कोणी पोहोत जाऊन पळू नये.
A katonáknak pedig az volt a szándékuk, hogy a foglyokat vágják le, hogy senki el ne szaladhasson, miután kiúszott.
43 ४३ परंतु शताधिपतीला पौलाला वाचवायचे होते म्हणून त्याने शिपायांना तो विचार सोडून देण्यास सांगितले आणि ज्यांना पोहता येत असेल त्यांनी जहाजातून उड्या टाकून किनाऱ्याला जावे अशी आज्ञा केली.
De a százados meg akarta tartani Pált, megtiltotta nekik e szándékot és megparancsolta, hogy akik úszni tudnak, először azok ugorjanak a tengerbe, és meneküljenek ki a szárazföldre,
44 ४४ बाकीच्या लोकांनी फळ्यांच्या अगर जहाजाच्या तुटलेल्या लाकडांच्या आधारे भूमी गाठावी असे सांगितले, अशा रीतीने जहाजातील सर्वजण सुखरुपपणे भूमीवर पोहोचले.
a többiek pedig ki deszkákon, ki a hajó egyéb darabjain. Így történt, hogy mindnyájan szerencsésen kimenekültek a szárazföldre.