< प्रेषि. 26 >
1 १ अग्रिप्पा पौलाला म्हणाला, “तुला तुझी बाजू मांडायला परवानगी आहे.” यावर पौलाने आपला हात उंच करून आपल्या बचावाचे भाषण सुरू केले.
Agrippa Paulnyi mintoku, “No atuv atubogv lvkwng lo minsu tvka nam dwa jidukunv.” Vbvrinamv Paul laakv iyinla okv atubongv mvngging sula vbv mintoku:
2 २ अग्रिप्पा महाराज, मी स्वतःला धन्य समजतो कारण यहूद्यांनी आपल्यासमोर माझ्याविरुद्ध केलेल्या आरोपांचा बचाव करण्याची संधी आज मिळाली.
“Dvbv Agrippa! ngo silu atubongv gamdak nvgobv mvngsudunv ho ngo atuv noogv kaagialo mvngging sula Jius vdwgv nga gungnying lwknam lokv,
3 ३ विशेषत, यहूदी चालीरीति आणि प्रश्न इत्यादी गोष्टींची आपणांला चांगल्या प्रकारे माहिती असल्याने तर हे जास्तच खरे म्हणावे लागेल, तेव्हा आपण माझे बोलणे धीराने ऐकून घ्यावे अशी मी विनंती करतो.
no Jius mvnwng gv ridungsingdung nga jvjvbv chirungdo okv yalungyachung nga. Ngo nam lvbu doonv, vbvrikunamv, nga tapvbv tvvriato.
4 ४ मी माझे जीवन तरुणपणापासून माझ्या प्रांतात व यरूशलेम शहरात कशा रीतिने जगत आलो हे सर्व यहूदी लोकांस चांगले माहीत आहे.
“Jius mvnwng ngv chinto oguaingbv ngo singpvdw yaapa rilo gv singcha nama. Bunu chinto oguaingbv ngoogv singyisingcha nga singcha pvkudw atubogv diringmooku lo okv Jerusalem loku.
5 ५ ते मला बऱ्याच काळापासून ओळखतात आणि त्यांची इच्छा असेल तर मी एक परूशी म्हणजे आमच्या यहूदी धर्माच्या एका कट्टर गटाचा सभासद या नात्याने कसा जगत आलो याविषयी ते साक्ष देऊ शकतील.
Bunu chinbwng nyadu, um bunu vdwv mvnggv ila milare, ngo ho atuk lokv achialvbv riming gvvdu ngonugv kumnam Parisis dormo nga.
6 ६ आता देवाने आमच्या पुर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरता मी उभा आहे;
Okv vjak ngo si dootola gwngkw dunv ogulvgavbolo ngonugv abuapa vdwa milv nama ngo mvngtinla—
7 ७ ते वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे बारा वंश देवाची सेवा रात्रंदिवस एकाग्रतेने करीत आहेत, महाराज, तीच आशा बाळगल्याबद्दल माझ्यावर यहूद्यांनी आरोप ठेवला आहे.
alv rungnv hoka vringgola anyi haalung gv ngonugv nyi vdwv paare vla mvngtinto, bunugv Pwknvyarnvnyi ariumarubv kumnam lokv. Okv si ogulvgavbolo so mvngtin kolo, ho Dvbv Agrippa, nga Jius vdwv ho rinyingriru nyato.
8 ८ देव मरण पावलेल्यांना परत उठवितो, असे तुमच्यापैकी कित्येकांना विश्वास ठेवण्यास अयोग्य का वाटावे.
Ogubv nonu mvnwng ngv sum mvngjwngmanv gobv ridunv Pwknvyarnv sinam lokv turdu kunv vla?
9 ९ नासरेथच्या येशूच्या नावाविरुद्ध जे जे काही करता येईल ते ते मी करावे असे मलादेखील वाटत होते.
“Ngooka achialvbv mvngtoku ngo ogumvnwng nga gungnying milwk torungto Jisu Najaretnyi.
10 १० आणि नक्की हेच मी यरूशलेम शहरात केले, कारण मुख्य याजकांकडून मला तसा अधिकार मिळाला होता, म्हणून मी देवाच्या अनेक संतांना तुरुंगात टाकले आणि हे जे संतगण जिवे मारले गेले, त्यांच्याविरुद्ध मी माझे मत नोंदविले.
Vkvlvgabv Jerusalem lo ngo ritoku. Ngo Nyibu butv gvlo paatoku gwlwk am okv Pwknvyarnv gv nyi vdwa awgo patwk lo tumlwkto: okv vdwlo bunua mvki pvkudw ngooka mvnglwk minggvto.
11 ११ अनेक सभास्थानात मी त्यांना शिक्षा केली आणि देवाविरुद्ध जबरीने वाईट भाषण करायला लावण्याचा मी प्रयत्न केला, या लोकांवरील माझा राग इतक्या पराकोटीला गेला होता की, मी त्यांचा छळ करण्याकरता इतर शहरांमध्ये देखील जात असे.
Achialv dwgo ngo bunua mvritririt motoku Jius kumkunaamlo okv bunua atugv mvngjwng am mvngnwng madubv gwngkwto. Ngo ho achialvbv haachi toku bunua ngo nyebumooku pamtv loka vngtoku bunua mvdwmvku dubv.
12 १२ एकदा दिमिष्क शहराला जाण्यासाठी मुख्य याजकांनी मला अधिकार व परवानगी दिली तेव्हा महाराज.
“Ngo sikv lvkwng bv ho Nyibu Butv gv orto jinam lokv okv Damaskas bv tujupkunam gv lvkobv vngtoku.
13 १३ वाटेत भर दुपारच्या वेळी मी माझ्या व माझ्यासमवेत असणाऱ्यांच्या भोवती स्वर्गीय प्रकाश फाकलेला पाहिला, तो प्रकाश सूर्यापेक्षाही जास्त प्रखर होता.
Ho Dvbv Agrippa nga, ho lamtv alulvpa hoka, ngo loung go kaapato doonyi loung aka hongya nvgo, nyidokolo lokv nga hongyumto okv nga lvkobv vnggvnv nyi vdwaka.
14 १४ आम्ही सर्व खाली जमिनीवर पडलो आणि इब्री भाषेत माझ्याशी बोलताना एक वाणी मी ऐकली, ती वाणी म्हणाली, “शौला, शौला, माझा छळ तू का करतोस? अणकुचीदार काठीवर लाथ मारणे तुला हानिकारक आहे.”
Ngonu mvnwng ngv gipv toku kvdwlo, okv ngo tvvpa toku adugo nga Hebru gaambv minvgo, ‘Sol, Sol! no nga ogubv mvdwkmvku doonv? No atubongv achi dubv mvkur sudu noogv mvnam lokv, Svv hvpu ngv soonv atugv singkio nga dusunv aingbv.’
15 १५ आणि मी म्हणालो, ‘प्रभू, तू कोण आहेस?’ प्रभूने उत्तर दिले, “मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस.
‘No yvvla Ahtu?’ Ngo tvvka toku. Okv Ahtu mirwk sito, ‘Ngo Jisu, ho noogv mvdwmvku kunam.
16 १६ आता ऊठ आणि उभा राहा! या कारणांसाठी मी तुला दर्शन दिले आहे तुला सेवक म्हणून नेमावे व जे काही तुला दाखविले व जे दाखवीन त्याचा साक्षीदार म्हणून तुला नेमावे.
Vbvritola godung lakuk okv noogv lvpa lokv dakto. Ngo noogv dooku si aapvnv nam ngoogv pakbu gobv mvdubv. No kvvbi ngaka mimpa laka ogugo kaapvdw silu ngokvlo okv ngo nam ogugo kaatam rikudw aarinv dw lo.
17 १७ या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन.
Ngo nam ringriare Israel gv nyi vdwlokv okv Jentail lokv, ngo bunu gvlo nam vngmure.
18 १८ मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारांतून निघून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.”
No bunugv nyik am nyikpo molaka okv kanvparum lokv pualo limu lakuka okv Uyudvbv gv gwlwk lokv Pwknvyarnv gvloku, vkvlvgabv bunugv nga mvngjwng lokv bunugv rimur am mvngnga jiriku okv Pwknvyarnv gv darkunam nyi vdwa lvkobv bunugv dookudakku am naarwk siriku.’
19 १९ यासाठी, अग्रिप्पा महाराज मला जो स्वर्गीय दृष्टांत झाला, त्याचा मी आज्ञाभंग केला नाही.
“Dvbv Agrippa, ngo nyidomooku nyikrw kaanama tvvmabv rimato.
20 २० उलट पहिल्यांदा दिमिष्कातील आणि नंतर यरूशलेम शहरातील, यहूदीया प्रांतातील सर्व आणि परराष्ट्रीय लोकांससुद्धा प्रभूच्या वचनाची साक्ष दिली, त्यांनी पश्चात्ताप करावा, देवाकडे वळावे आणि पश्चात्तापाला साजेल अशी कामे करावी असे मी त्यांना सांगितले.
Ahtua Damaskas lo okv Jerusalem lo okv Judia mvnwng lokv, okv Jentail vdwlo ngo tamsarto bunu mvnwng nga bunugv rimur lokv mvngdin dokubv okv Pwknvyarnv lo aakur dukubv okv ogugo ripvdw um kaatam riku bunu mvngdin pvku vla.
21 २१ या कारणांमुळे मी परमेश्वराच्या भवनात असताना काही यहूदी लोकांनी मला धरले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
Si svkvlvkwngbv Jius vdwv nga naatungto vdwlo ngo Pwknvyarnvnaam lo doori lo okv bunu nga mvki dubv gwngnyato.
22 २२ परंतु देवाने मला मदत केली म्हणून मी आज येथे उभा राहून समाजातील लहानथोरांना साक्ष देत आहे, जे काही पुढे होणार होते, त्याविषयी संदेष्ट्यांनी व मोशेने जे सांगितले त्यापेक्षा दुसरे मी सांगत नाही.
Vbvritola sibv riri alu lo Pwknvyarnv nga ridur toku, okv Vkvlvkwngbv ngo si daktola mvnwng nga kaatam doonv jvjv nga, kai dvlo okv miang dvlo. Ngoogv ogugo mimpvdw lvyin akindu nyijwk am okv Moses gv minamv rirung duku:
23 २३ त्यानुसार देवाचा अभिषिक्त जो ख्रिस्त तो दुःखसहन करील आणि मरण पावलेल्यातून उठविला जाणाऱ्यांत तो पाहिला असेल, यहूदी लोकांस तसेच परराष्ट्रीयांनाही देव प्रकाशाची घोषणा करील.
Kristo ho hinching rungre okv atukchochuk bv hv sinam lokv turkur riku, dupwng riku loung gv turnama Jius okv Jentail vdwlo.”
24 २४ पौल आपल्या बचावासंबंधी बोलत असताना फेस्त त्यास मोठ्याने म्हणाला, “पौला, तू वेडा आहेस, जास्त ज्ञानामुळे तुला वेड लागले आहे.”
Paul atubongv sibv miring sitoku, Pestas ninyia gokto, “No siru dooku, Paul! Noogv kaibv chinamv nam siru mopvku!”
25 २५ पौलाने उत्तर दिले, “फेस्त महाराज, मी वेडा नाही; तर ज्या गोष्टी खऱ्या आहेत आणि अगदी योग्य आहेत, त्यांच्याविषयीच मी बोलत आहे.
Paul mirwk sitoku, “Ngo siruma, noogv kairungnv! ngo jvjvrungbv mindunv.
26 २६ येथे हजर असलेल्या महाराजांना याविषयी चांगली माहिती आहे आणि यामुळे मी त्यांच्याशी उघडपणाने बोलू शकतो, त्याच्या ध्यानातून काही सुटले नसेल, असे मला खात्रीने वाटते, मी हे म्हणतो, कारण ही गोष्ट एखाद्या कानाकोपऱ्यात झाली नाही.
Dvbv Agrippa! ngo nam mvngrw alvbv milare, ogulvgavbolo no so lvkwngbv chindu ngo mvngrungdo no bunu mvnwng nga chimpv kunvpv, ogulvgavbolo si chvnyung baarwnglo rinam kaama.
27 २७ अग्रिप्पा महाराज, संदेष्ट्यानी जे लिहिले त्यावर तुमचा विश्वास आहे काय? तुमचा त्यावर विश्वास आहे.” हे मला नक्की माहीत आहे.
Dvbv Agrippa, no nyijwk nga mvngjwng dunvre? Ngo chindo no mvngjwngdu!”
28 २८ यावर अग्रिप्पा म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात ख्रिस्ती होण्यासाठी तू माझे मन वळवू शकशील असे तुला वाटते काय?”
Agrippa Paulnyi minto, “Soogv dw achuklo no nga kristan mvdubv mvngdunvre?”
29 २९ पौलाने उत्तर दिले, “थोड्या वेळात म्हणा अगर जास्त वेळात म्हणा, मी जसा आहे तसे केवळ तुम्हीच नव्हे तर आज जे जे येथे बसून माझे बोलणे ऐकत आहेत त्या सर्वांनी माझ्यासारखे या साखळदंडाखेरीज, विश्वास ठेवणारे व्हावे, अशी माझी देवाला नम्र विनंती आहे.”
“Dw v achuk jvka vmalo awjvka,” Paul mirwksito, “Ngoogv Pwknvyarnvnyi kumdunv si no okv mvnwng ngv yvvbunudw ngam silu tvvria dunv ngo jvbv—riming gvvre, rvngja mvngchik ka gvvmare!”
30 ३० यानंतर राजा, बर्णीका, राज्यपाल आणि त्यांच्याबरोबर इतर जे तेथे बसले होते, ते सर्व उठले.
Vbvrinamv Dvbv, gobunor, Barnis, okv kvvbi mvnwng vka dakrap toku,
31 ३१ ते न्यायालयातून बाहेर पडल्यावर एकमेकांशी बोलत होते, ते म्हणाले, “ज्यामुळे तुरुंगवास किंवा मरणदंड द्यावा असे काहीही या मनुष्याने केले नाही.”
okv vngrokochingbv bunu ajinanying am mimisitoku, “So nyi angv sum ninyia mvki dubv vmalo patwk lo tumdubv ogu rinam jego kaama.”
32 ३२ अग्रिप्पा फेस्ताला म्हणाला, “या मनुष्याने कैसराकडे न्याय मागितला नसता, तर त्यास सोडून देता आले असते.”
Okv Agrippa Pestasnyi minto, “So nyi sum topu pvkunvpv vdwlo hv Dvbvyachok am dinchi rungbv lvbu manv guilo.”