< प्रेषि. 21 >
1 १ त्यांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही समुद्रमार्गे निघालो आणि सरळ प्रवास करीत कोस बेटास आलो, दुसऱ्या दिवशी आम्ही रुद बेटास गेलो, तेथून आम्ही पातरा शहरास गेलो.
When at least we had torn ourselves away, and had set sail, we ran a straight course to Cos, and next day to Rhodes, and from there to Patara.
2 २ तेथे फेनीकेला जाणारे जहाज आम्हास आढळले, तेव्हा आम्ही जहाजात बसून पुढे निघालो.
And when we had found a ship bound for Phoenicia, we went aboard and set sail.
3 ३ तेव्हा कुप्र आमच्या नजरेत आले, परंतु ते डाव्या अंगाला टाकून आम्ही सरळ सिरीया प्रांताला रवाना झालो व सोर येथे उतरलो, कारण तेथे जहाजातील माल उतरावयाचा होता.
After sighting Cyprus and leaving it on the left hand, we sailed for Syria, and put in at Tyre; for there the ship was to unload her cargo.
4 ४ तेथे येशूचे काही शिष्य आम्हास आढळले आणि आम्ही त्यांच्याबरोबर सात दिवस राहिलो, पवित्र आत्म्याच्या सूचनेवरून त्यांनी पौलाला असे सांगितले की, त्याने यरूशलेम शहरास जाऊ नये.
We looked up the local disciples and remained there seven days; and these disciples kept telling Paul, through the Spirit, that he should not set foot in Jerusalem.
5 ५ आमच्या भेटीचे दिवस संपत आल्यावर आम्ही तेथून निघून आमचा पुढील प्रवास परत सुरू केला, त्यावेळी तेथील बंधुजन आपल्या पत्नी, मुलांच्याबरोबर आमच्यासह शहराबाहेर आले व तेथील समुद्रकिनाऱ्यावर आम्ही गुडघे टेकले व प्रार्थना केली.
When, however, our time was up, we left and started on our journey; and all of them, with wives and children, were escorting us on our way until we were out of the city; then, kneeling down on the beach, we prayed,
6 ६ मग एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही जहाजात बसलो व ते लोक आपापल्या घरी गेले.
and said good-bye, and went on board the ship, while they returned home again.
7 ७ सोरापासून आम्ही आमचा प्रवास सुरू केला व पोलेमा येथे उतरलो आणि तेथील बंधुजनांना भेटलो, त्यांच्याबरोबर एक दिवस राहिलो.
And when we had finished the voyage from Tyre, we reached Ptolemais, and greeted the brothers and stayed with them one day.
8 ८ आणि दुसऱ्या दिवशी निघून आम्ही कैसरीयास आलो व सुवार्तिक फिलिप्प याच्या घरी जाऊन राहिलो, तो निवडलेल्या सात सेवकांपैकी एक होता.
On the morrow we started for Caesarea, where we went into the house of Philip, the evangelist, who was one of the seven, and stayed with him.
9 ९ त्यास चार मुली होत्या, त्यांची लग्ने झालेली नव्हती, या मुलींना देवाच्या गोष्टी सांगण्याचे दान होते.
Now Philip had four unmarried daughters who prophesied,
10 १० त्या बंधूच्या बरोबर बरेच दिवस राहिल्यावर अगब नावाचा संदेष्टा यहूदीयाहून तेथे आला.
and while we remained there many days, a prophet named Agabus came down from Judea.
11 ११ त्याने आमची भेट घेऊन पौलाच्या कमरेचा पट्टा मागून घेतला, त्याने स्वतःचे हात व पाय बांधले आणि तो म्हणाला, “पवित्र आत्मा असे म्हणतो; हा पट्टा ज्या मनुष्याच्या कमरेचा आहे, त्यास यरूशलेम शहरातील यहूदी लोक असेच बांधतील व परराष्ट्रीयांच्या हाती देतील.”
He came to us, and taking Paul’s girdle, he bound his own feet and hands, saying, "Thus says the Holy Spirit, ‘so will the Jews at Jerusalem bind the owner of this girdle, and deliver him into the hands of the Gentiles.’"
12 १२ आम्ही व तेथील सर्वांनी ते शब्द ऐकले, तेव्हा आम्ही व इतर लोकांनी पौलाला कळकळीची विनंती केली की, त्याने यरूशलेम शहरास जाऊ नये.
As soon as we heard these words, both we and those who were standing near entreated Paul not to go up to Jerusalem.
13 १३ पण पौल म्हणाला, “तुम्ही हे काय करीत आहा, असे रडून तुम्ही माझे मन खचवीत आहात काय? मी फक्त बांधून घेण्यासाठी नव्हे तर प्रभू येशूच्या नावासाठी यरूशलेम शहरामध्ये मरायलादेखील तयार आहे.”
"What do you mean by thus breaking my heart with your grief?" answered Paul. "For I am ready not to be bound only, but also to die at Jerusalem, for the name of the Lord Jesus."
14 १४ यरूशलेम शहरापासून दूर राहण्यासाठी आम्ही त्याचे मन वळवू शकलो नाही, म्हणून आम्ही त्यास विनंती करायची सोडली आणि म्हटले, “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो.”
And when he would not be persuaded, we ceased, saying, "The will of the Lord be done."
15 १५ त्यानंतर आम्ही तयार झालो आणि यरूशलेमे शहरास निघालो.
A few days after this we took up our luggage and went up to Jerusalem.
16 १६ कैसरीया येथील येशूचे काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि आम्हास म्नासोन नावाच्या व्यक्तीकडे घेऊन गेले, कारण त्याच्याकडेच आम्ही राहणार होतो, तो कुप्रचा असून सुरुवातीच्या काळात प्रथम शिष्य झालेल्यांपैकी एक होता.
And some of the disciples from Caesarea accompanied us. They led us to the house of Mnason, a Cypriote, a disciple of long standing, with whom we were to lodge.
17 १७ आम्ही जेव्हा यरूशलेम शहरास पोहचलो, तेव्हा तेथील बंधुजनांनी मोठ्या आनंदाने आमचे स्वागत केले.
At length we reached Jerusalem, and the brothers there received us gladly.
18 १८ दुसऱ्या दिवशी पौल आमच्यासह याकोबाला भेटायला आला, तेव्हा सर्व वडीलजन हजर होते.
On the following day we went with Paul to call on James, and all the elders were present.
19 १९ पौल त्यांना भेटला, नंतर त्याच्या हातून देवाने परराष्ट्रीय लोकात कशीकशी सेवा करून घेतली, याविषयी क्रमवार सविस्तर माहिती सांगितली.
After saluting them Paul rehearsed, one by one, the things that God had done among the Gentiles by his ministry.
20 २० जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी देवाचा गौरव केला आणि ते त्यास म्हणाले, “बंधू, तू पाहशील की हजारो यहूदी विश्वास ठेवणारे झालेत, पण त्यांना असे वाटते की, मोशेचे नियम पाळणे फार महत्त्वाचे आहे.
And they, when they heard it, glorified God, and said to him. "You see, brother, how many thousands there are among the Jews, of those who have believed, and they are all zealous for the Law.
21 २१ या यहूदी लोकांनी तुझ्याविषयी ऐकले आहे की, जे यहूदी इतर देशात राहतात त्यांना तू मोशेचे नियम पाळू नका असे सांगतोस, तसेच आपल्या मुलांची सुंता करू नका असे सांगतो व आपल्या चालीरीती पाळू नका असे सांगतो.
"Now what they have been told about you, again and again, is that you teach all the Jews who are among the Gentiles, to forsake Moses, and not to circumcise their children, nor to follow the old customs.
22 २२ मग आता काय केले पाहिजे? तू येथे आला आहेस हे त्यांना नक्की कळेल.
"What then ought to be done? They will certainly hear that you are come.
23 २३ तेव्हा आता आम्ही सांगतो तसे कर; आमच्यातील चार लोकांनी नवस केला आहे.
"So do this that we tell you.
24 २४ त्या चौघांना घे व स्वतःचे त्यांच्यासह शुद्धीकरण करून घे, त्या चौघांना त्यांच्या डोक्याचे मुंडण करता यावे म्हणून त्यांचा खर्च तू कर, मग सर्वांना हे समजेल की, त्यांनी जे काही तुझ्याबद्दल ऐकले आहे ते खरे नाही, उलट तू नियमशास्त्राचे पालन करतोस हे दिसेल.
"We have four men here under a vow; associate yourself with them, purify yourself with them, and pay their expenses so that they may have their heads shaved; then every one will know that there is no truth in the rumors that they have heard about you; but that you yourself walk orderly obeying the law.
25 २५ जे परराष्ट्रीय विश्वास ठेवणारे आहेत त्यांना आम्ही पत्र लिहिले आहे, ते असे, मूर्तीला वाहिलेले अन्न त्यांनी खाऊ नये, रक्त अगर गुदमरून मारलेले प्राणी त्यांनी खाऊ व जारकर्म करू नये.”
"As for the Gentile believers, we wrote giving judgment that they should abstain from anything sacrificed to an idol, from blood, from what is strangled, and from fornication."
26 २६ मग पौलानेच त्या चार लोकांस आपल्याबरोबर घेतले, दुसऱ्या दिवशी शुद्धीकरणाच्या विधीमध्ये तो सहभागी झाला, मग तो परमेश्वराच्या भवनात गेला, शुद्धीकरणाचे दिवस केव्हा संपतील हे जाहीर केले, शेवटच्या दिवशी प्रत्येकासाठी अर्पण देण्यात येईल.
Then Paul took the men, and after purifying himself with them next day, went into the temple to declare the fulfilment of the days of purification, until the offering was offered for every one of them.
27 २७ सात दिवस जवळ जवळ संपत आले होते, परंतु आशियातील काही यहूदी लोकांनी पौलाला परमेश्वराच्या भवनात पाहिले, त्यांनी लोकांस भडकाविले व पौलाला धरले.
But when the seven days were almost over, the Asiatic Jews caught sight of him in the temple, and began to stir up all the crowd, and laid hands on him, shouting.
28 २८ ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “इस्राएलाच्या लोकांनो, मदत करा! हाच तो मनुष्य आहे, जो सर्व लोकांस सगळीकडे आपल्या लोकांविरुद्ध आपल्या नियमांविरुद्ध व या जागेबद्दल शिकवीत आहे आणि आता त्याने ग्रीक लोकांस देखील परमेश्वराच्या भवनात आणले आहे आणि ही पवित्र जागा विटाळविली आहे.”
"Men of Israel, help! This is the man who goes everywhere preaching to everybody against the people, and the Law, and this place. And he has actually brought Gentiles even into the temple, and has desecrated the holy place."
29 २९ ते असे म्हणाले, कारण इफिसच्या त्रफिमला त्यांनी पौलाबरोबर यरूशलेम शहरातील पाहिले होते, त्रफिम यहूदी नव्हता, तो ग्रीक होता, लोकांस वाटले, पौलानेच त्यास परमेश्वराच्या भवनात नेले आहे.
(For they had formerly seen Trophimus, the Ephesian, with him in the city, and supposed that Paul had brought him into the temple.)
30 ३० सर्व शहर खवळून उठले, सगळे लोक धावू लागले, त्यांनी पौलाला पकडले व परमेश्वराच्या भवनातून बाहेर ओढून काढले, लगेच दरवाजे बंद करण्यात आली.
The whole city was thrown into uproar. The mob surged together, seized Paul, and began to drag him outside the temple. Whereupon the doors were at once shut.
31 ३१ ते त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करीत असतानाच रोमी सैन्याच्या सरदाराकडे बातमी गेली की, सगळ्या यरूशलेम शहरात सगळीकडे गोंधळ उडालेला आहे.
While they were attempting to kill him, news came to the tribune commander of the garrison that all Jerusalem was in an uproar.
32 ३२ ताबडतोब त्याने काही शिपाई व काही शताधिपती घेतले व तो यहूदी जेथे पौलाला मारीत होते, तेथे धावत गेला, जेव्हा यहूदी लोकांनी रोमी सरदाराला व सैन्याला पाहिले तेव्हा त्यांनी पौलाला मारण्याचे थांबविले.
At once he took soldiers and centurions, and rushed down upon them. When they saw the tribune and the troops, they left off beating Paul.
33 ३३ मग सरदार पौलाकडे आला व त्यास अटक केली व त्यास साखळ्यांनी बांधण्याची आज्ञा दिली, मग सरदाराने पौल कोण आहे व त्याने काय केले आहे याविषयी विचारले.
Then the tribune came up and seized him, and ordered that he be bound with two chains. "Who is he?" he began asking, "and what has he done?"
34 ३४ गर्दीतून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येऊ लागले, गोंधळामुळे व ओरडण्यामुळे सरदारला सत्य काय आहे हे जाणून घेता येईना, म्हणून सरदाराने शिपायांना हुकूम दिला की, पौलाला इमारतीत घेऊन जावे.
Some among the crowd kept shouting one thing, some another; and when the tribune could not learn the facts because of the uproar, he ordered Paul into the barracks.
35 ३५ जेव्हा पौल इमारतीच्या पायऱ्यांजवळ आला तेव्हा शिपायांना त्यास उचलून आत न्यावे लागले.
When was going up the steps, he had to be carried by the soldiers, because of the violence of the mob,
36 ३६ कारण जमाव हिंसक बनत चालला होता, जमाव त्याच्यामागे चालला होता व ओरडत होता, “त्याला जिवे मारा.”
for the whole mass of the people were following him, shouting, "Away with him!"
37 ३७ शिपाई पौलाला इमारतीत घेऊन जाणार इतक्यात पौल सरदाराला म्हणाला, “मी काही बोलू शकतो काय?” तो सरदार म्हणाला, “तुला ग्रीक बोलता येते काय?
Just as he was about to be taken into the barracks, Paul said to the tribune, "May I speak to you?"
38 ३८ मग मला वाटते, तो मनुष्य तू नाहीस, मला वाटले ज्या मिसरी मजुराने काही दिवसांपूर्वी बंड करून सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तोच तू आहेस, त्या मिसरी मनुष्यांने चार हजार दहशतवाद्यांना अरण्यात नेले.”
"Do you know Greek?" said the tribune; "Are you not, then, the Egyptian who in days gone by stirred up to sedition, and let into the wilderness the four thousand cutthroats?"
39 ३९ पौल म्हणाला, “किलकिया प्रांतातील तार्सस नगरात राहणारा मी एक यहूदी आहे, मी एका महत्त्वाच्या शहराचा नागरिक आहे, मी तुम्हास विनवितो, मला लोकांशी बोलू द्या.”
"I am a Jew," answered Paul, "a native of Tarsus in Cilicia, a citizen of no mean city. And I pray you, give me permission to speak to the people."
40 ४० जेव्हा सरदाराने त्यास बोलण्याची परवानगी दिली तेव्हा तो पायऱ्यांवर उभा राहिला आणि आपल्या हाताने त्याने लोकांस शांत राहण्यास सांगितले, जेव्हा सगळीकडे शांतता पसरली तेव्हा पौल इब्री भाषेत बोलू लागला.
So when he had given leave, Paul stood on the stairs, beckoning with his hands to the people. There came a great hush, and he spoke to them as follows, in Hebrew.