< प्रेषि. 19 >
1 १ तेव्हा असे झाले की, अपुल्लो करिंथ येथे असताना पौल निरनिराळ्या भागातून प्रवास करीत इफिस येथे आला, तेथे त्यास काही शिष्य आढळले.
亚波罗在哥林多期间,保罗从内陆抵达以弗所,在那里找到了若干信徒。
2 २ पौलाने त्यांना विचारले, “जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला, तेव्हा तुम्हास पवित्र आत्मा मिळाला काय?” ते अनुयायी त्यास म्हणाले, “पवित्र आत्मा आहे हे सुद्धा आम्ही ऐकलेले नाही.”
他问他们说:“当你们信了上帝的时候,是否领取了圣灵?”他们说:“没有,我们甚至都没听说过圣灵这件事情。”
3 ३ तो म्हणाला, “मग कसला बाप्तिस्मा तुम्ही घेतला?” ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा.”
保罗问:“那么你们接受的是何种施洗?” 他们说:“是约翰的施洗。”
4 ४ पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा पश्चात्तापाचा होता, त्याने लोकांस सांगितले की, त्यानंतर जो येत आहे, त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा, तो येणारा म्हणजे येशू होय.”
保罗说:“约翰提供的是悔改施洗,他告诉众人应该相信在他之后到来的那个人,也就是他们应该相信耶稣。”
5 ५ जेव्हा त्यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला.
众人听罢,便以主耶稣之名进行受洗。
6 ६ आणि जेव्हा पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले, तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले व भविष्य सांगू लागले.
保罗为他们按手,圣灵就便降临在他们身上,他们开始用不同的语言说话,还可以进行预言。
7 ७ या गटात सर्व मिळून बारा पुरूष होते.
这些人总计大约十二人。
8 ८ पौल यहूदी सभास्थानात जात असे व तीन महिने धैर्याने बोलत असे, देवाच्या राज्याविषयी चर्चा करीत व यहूदी लोकांचे मन वळवीत असे.
在三个月的时间内,保罗一直都在会堂里向那里的人大胆宣讲,与他们进行讨论,努力说服他们相信上帝之国。
9 ९ परंतु त्यांच्यातील काही कठीण मनाचे झाले व त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला आणि ख्रिस्ताच्या मार्गाविषयी वाईट बोलले, मग पौल त्यांच्यातून निघून गेला व शिष्यांनाही त्यांच्यातून वेगळे केले आणि तुरन्नाच्या शाळेत दररोज त्यांच्याशी चर्चा केली.
但有些人始终顽固不化,拒绝接受他的宣讲,还在众人面前毁谤道。所以保罗放弃了他们,离开了会堂,将信徒们也一并带走。之后,他每天都在推喇奴讲堂与大家进行讨论。
10 १० हे असे दोन वर्षे चालले, याचा परिणाम असा झाला की, आशियात राहत असलेल्या सर्व यहूदी व ग्रीक लोकांपर्यंत प्रभू येशूचे वचन पोहोचले.
就这样过了两年,所有亚西亚省的居民,无论犹太人或希腊人,都听到了主的道。
11 ११ देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडविले.
上帝通过保罗显化很多不同寻常的神迹。
12 १२ पौलाच्या शरीरावरून रुमाल आणि कपडेही आणून काही, लोक या गोष्टी आजारी लोकांवर ठेवत असत, जेव्हा ते असे करीत तेव्हा आजारी लोक बरे होत आणि दुष्ट आत्मे त्यांना सोडून जात.
甚至有人会拿走保罗曾经触碰的手帕或围巾,去医治病患和赶走邪灵。
13 १३ काही यहूदी सुद्धा सगळीकडे प्रवास करीत असत व लोकांमधून दुष्ट आत्मे घालवीत असत, ते दुष्ट आत्म्याने पछाडलेल्या व्यक्तीमधून प्रभू येशूच्या नावाने ते आत्मे घालवीत असत.
几个犹太人打着耶稣的名号四处驱鬼,向身上附着之人说:“我以保罗所言耶稣之名,命令你们出来。”
14 १४ ते म्हणत, “पौल ज्या येशूच्या नावाने घोषणा करतो त्या नावाने मी तुला आज्ञा करतो,” स्किवा नावाच्या यहूदी मुख्य याजकाचे सात पुत्र असे करीत होते.
一位名叫士基瓦的犹太人司长,他的七个儿子都在做这件事,一个是犹太人,一个是大祭司。
15 १५ परंतु एकदा एक दुष्ट आत्मा त्यांना म्हणाला, “मी येशूला ओळखतो, पौल मला माहीत आहे, पण तुम्ही कोण आहात?”
但有一天当他们驱魔时,邪灵却回答到:“我认识耶稣,也认识保罗,但你们是谁?”
16 १६ मग ज्याला दुष्ट आत्मा लागला होता त्या मनुष्याने त्यांच्यावर उडी मारली, त्याने त्यांच्यावर सरशी केली व त्यांना पराभूत केले, तेव्हा ते दोघे उघडे व जखमी होऊन घरातून पळाले.
邪灵附体那人扑到他们身上将其制服,一番痛殴后,他们赤裸着身体从那房子逃了出来,满身是伤。
17 १७ इफिस येथे राहणाऱ्या सर्व यहूदी व ग्रीक लोकांस हे समजले, तेव्हा सर्वांना भीती वाटली आणि लोक प्रभू येशूच्या नावाचा अधिकच आदर करू लागले.
所有住在以弗所的犹太人和希腊人都知道此事,纷纷表示敬畏,主耶稣之名获得了广泛尊重。
18 १८ पुष्कळसे विश्वास ठेवणारे पापकबुली देऊ लागले व ज्या वाईट गोष्टी त्यांनी केल्या होत्या, त्या सांगू लागले.
也有许多信主之人前来忏悔他们的罪,公开坦诚他们曾经做过的恶行。
19 १९ काही विश्वास ठेवणाऱ्यांनी जादूची कामे केली होती, या विश्वास ठेवणाऱ्यांनी आपली सर्व जादूची पुस्तके लोकांसमोर आणली आणि जाळली, त्या पुस्तकांची किंमत पन्नास हजार चांदीच्या नाण्यांइतकी भरली.
其中有许多曾经施行巫术之人,把他们关于巫术的书堆在一起当众烧掉。他们估算了一下书价,总计五万银币。
20 २० अशा रीतीने प्रभूच्या वचनाचा दूरवर प्रसार झाला व ते फार परिणामकारक ठरले.
通过这种方式,主的道日益强大,广为传播。
21 २१ या गोष्टी घडल्यानंतर पौलाला पवित्र आत्म्याने सुचवले की, मासेदोनिया व अखया या प्रांतांतून प्रवास करीत पुढे यरूशलेम शहरास जायचे आहे, तो म्हणाला, “मी तेथे गेल्यांनतर मला रोम शहरही पाहिलेच पाहिजे.”
在这之后,保罗决定穿过马其顿和亚该亚去往耶路撒冷。他说:“我到了那边以后,必须去罗马看看。”
22 २२ म्हणून त्याचे दोन मदतनीस तीमथ्य व एरास्त यांना त्याने मासेदोनियाला पाठवून दिले आणि त्याने आणखी काही काळ आशियात घालविला.
他派了两名帮手提摩太和以拉都两人去马其顿,自己则暂时留在亚西亚省。
23 २३ याकाळामध्ये ‘त्या मार्गाविषयी’ मोठा गोंधळ उडाला.
就在这期间,发生了很多关于道的骚乱,
24 २४ देमेत्रिय नावाचा एक मनुष्य होता, तो सोनार होता, तो अर्तमी देवीचे देव्हारे बनवीत असे, जे कारागीर होते त्यांना यामुळे खूप पैसे मिळत.
有一位名叫低米丢的银匠,以制造亚底米女神的小银龛为生,这门手艺给他这样的工匠带来了不少生意。
25 २५ त्या सर्वांना व या धंद्याशी संबंध असलेल्या सर्वांना त्याने एकत्र केले आणि तो म्हणाला, लोकहो, तुम्हास माहीत आहे की, या धंद्यापासून आपल्याला चांगला पैसा मिळतो.
他把同行和相似行业的工人们聚起来,说:“工友们,你们知道,我们就是靠这门生意赚钱。
26 २६ पण पाहा तो पौल नावाचा मनुष्य काय करीत आहे तो काय म्हणत आहे ते ऐका! पौलाने पुष्कळ लोकांस प्रभावित केले आहे व बदलले आहे, त्याने हे इफिसमध्ये व सगळ्या आशियामध्ये केले आहे, तो म्हणतो, मनुष्यांच्या हातून बनवलेले देव खरे देव नाहीत.
毫无疑问,通过你们看见和听见的事情,你们也应该意识到这个叫保罗的人,不仅在以弗所、还几乎在整个亚西亚游说和误导众人,说人类所制造的都不是上帝的创造。
27 २७ ह्यामुळे या आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे; इतकेच नव्हे तर ज्या महादेवी अर्तमीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहूना जगसुद्धा करते तिचे देऊळ निरुपयोगी ठरण्याचा व तिचे स्वतःचे महत्त्व नष्ट होण्याचा धोका आहे.
这不仅导致我们这一行可能会受人鄙视,就连伟大女神亚底米的庙也会遭人摒弃,亚西亚和普天下所敬拜的女神将失去其威严。”
28 २८ जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार रागावले आणि मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “इफिसकरांची अर्तमी थोर आहे.”
这话掀起了众人的怒火,他们高喊到:“以弗所人的亚底米,伟大的神!”
29 २९ शहरातील लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि लोकांनी गायस व अरीस्तार्ख या पौलाबरोबर सोबती म्हणून प्रवास करणाऱ्या मासेदोनियाच्या रहिवाश्यांना पकडून नाट्यगृहात नेले.
全城陷入大骚动,他们捉住了与保罗同行的马其顿人该犹和亚里达古,一起冲进了剧场。
30 ३० पौल लोकांच्या पुढे जाऊ इच्छीत होता पण येशूचे अनुयायी त्यास असे करू देईनात.
保罗想去直面暴徒,但其他信徒不让他这么做。
31 ३१ पौलाचे काही मित्र जे प्रांताधिकारी होते, त्यांनी निरोप पाठवून त्याने नाट्यगृहात जाऊ नये अशी कळकळीची विनंती केली.
保罗有几名省长官的朋友,也捎来口信,叮嘱他不要去剧场那里。
32 ३२ एकत्र जमलेल्या जमावातून काही लोक एक घोषणा करू लागले तर दुसरे लोक इतर घोषणा करू लागले, त्यामुळे सगळा जमाव अगदी गोंधळून गेला आणि त्यातील पुष्कळ जणांना माहीत नव्हते की, आपण या न्याय भवनात एकत्र का आलोत.
但暴徒们并不知道聚集的原因,如一群无头苍蝇一般,口中胡乱喊叫着。
33 ३३ यहूदी लोकांनी आलेक्सांद्र नावाच्या एका मनुष्यास ढकलीत नेऊन सर्वांच्या समोर उभे केले, तो आपल्या हातांनी खुणावून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागला.
人群中的犹太人把亚历山大推到前面,他做了个让大家安静的手势,想要解释给众人听。
34 ३४ पण जेव्हा लोकांस समजले की, तो एक यहूदी आहे, तेव्हा जवळ जवळ दोन तास सातत्याने ते एका आवाजात ओरडत राहिले, “इफिसकरांची अर्तमी देवी थोर आहे.”
众人认出他是犹太人,便异口同声高喊:“以弗所人的亚底米,伟大的神!”足足喊了两个小时。
35 ३५ शहराचा लेखनिक लोकांस शांत करीत म्हणाला, “इफिसच्या लोकांनो, थोर अर्तमी देवीचे व स्वर्गातून पडलेल्या पवित्र दगडाचे इफिस हे रक्षणकर्ते आहे, हे ज्याला माहीत नाही असा एकतरी मनुष्य जगात आहे काय?
后来书记官设法安抚了民众。他说:“以弗所人呐!你们的城是看守伟大亚底米的神庙,也看守来自天堂的神像。这一点谁不知道呢?
36 ३६ ज्याअर्थी या गोष्टी नाकारता येत नाहीत त्याअर्थी तुम्ही शांत राहिलेच पाहिजे, उतावळेपणा करू नये.
这些都是不可辩驳的事实,你们应当保持平静,不可冲动行事。
37 ३७ तुम्ही या दोघांना येथे घेऊन आलात, वस्तुतः त्यांनी मंदिरातील कशाचीही चोरी केली नाही किंवा आपल्या देवीची निंदा केलेली नाही.
你们抓到这里的两个人,既没有打劫庙宇,也没有亵渎我们的女神。
38 ३८ जर देमेत्रिय व त्याच्याबरोबर असलेल्या कारागिरांच्या काही तक्रारी असतील, तर त्यासाठी न्यायालये उघडी आहेत, तेथे ते एकमेकांवर आरोप करू शकतात.
如果低米丢和其他工匠想要控告谁,完全可以去找总督或提交法庭,可以在那里提交诉状。
39 ३९ परंतु जर तुम्हास एखाद्या गोष्टीची चौकशी करायची असेल तर नियमित सभेत त्यासंबंधी विचार केला जाईल.
如果还有其他问题,就应该进行合法的集会予以解决。
40 ४० आज येथे जे काही घडलेले आहे, त्याबद्दल योग्य ते कारण आपणांस सांगता येणार नाही, त्यामुळे आपणच ही दंगल सुरू केली असा आरोप आपल्यावर केला जाण्याची भीती आहे.”
今天的骚乱毫无来由,我们实在无法评判,事实上,我们甚至可能需要为这件事情负责。”
41 ४१ असे सांगून झाल्यानंतर त्याने जमावाला जाण्यास सांगितले.
说罢这番话,他就让暴徒们散去了。