< प्रेषि. 15 >
1 १ तेव्हा काही जणानी यहूदीयाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की, मोशेने लावून दिलेल्या नियमाप्रमाणे तुमची सुंता झाल्याशिवाय तुमचे तारण होणे शक्य नाही.
ยิหูทาเทศาตฺ กิยนฺโต ชนา อาคตฺย ภฺราตฺฤคณมิตฺถํ ศิกฺษิตวนฺโต มูสาวฺยวสฺถยา ยทิ ยุษฺมากํ ตฺวกฺเฉโท น ภวติ ตรฺหิ ยูยํ ปริตฺราณํ ปฺราปฺตุํ น ศกฺษฺยถฯ
2 २ तेव्हा पौल व बर्णबा ह्यांचा त्यांच्याशी बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरविण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी व त्यांच्यापैकी इतर लोकांनी या वादाविषयी यरूशलेम शहरामधील प्रेषित व वडील ह्यांच्याकडे जावे.
เปาลพรฺณพฺเพา ไต: สห พหูนฺ วิจารานฺ วิวาทำศฺจ กฺฤตวนฺเตา, ตโต มณฺฑลียโนกา เอตสฺยา: กถายาสฺตตฺตฺวํ ชฺญาตุํ ยิรูศาลมฺนครสฺถานฺ เปฺรริตานฺ ปฺราจีนำศฺจ ปฺรติ เปาลพรฺณพฺพาปฺรภฺฤตีนฺ กติปยชนานฺ เปฺรษยิตุํ นิศฺจยํ กฺฤตวนฺต: ฯ
3 ३ मग मंडळीने त्यांना पाठवल्यावर ते फेनीके व शोमरोन या शहरामधून गेले आणि परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले.
เต มณฺฑลฺยา เปฺรริตา: สนฺต: ไผณีกีโศมิโรนฺเทศาภฺยำ คตฺวา ภินฺนเทศียานำ มน: ปริวรฺตฺตนสฺย วารฺตฺตยา ภฺราตฺฤณำ ปรมาหฺลาทมฺ อชนยนฺฯ
4 ४ नंतर ते यरूशलेम शहरास आल्यावर तेथील मंडळी, प्रेषित व वडील ह्यांनी त्यांचे आगतस्वागत केले, तेव्हा आपण देवाच्या सहवासांत असतांना त्याने जे जे केले ते त्यांनी सांगितले.
ยิรูศาลมฺยุปสฺถาย เปฺรริตคเณน โลกปฺราจีนคเณน สมาเชน จ สมุปคฺฤหีตา: สนฺต: ไสฺวรีศฺวโร ยานิ กรฺมฺมาณิ กฺฤตวานฺ เตษำ สรฺวฺววฺฤตฺตานฺตานฺ เตษำ สมกฺษมฺ อกถยนฺฯ
5 ५ तरीही परूशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे असे म्हणाले, त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळावयाची त्यांना आज्ञा केलीच पाहीजे.
กินฺตุ วิศฺวาสิน: กิยนฺต: ผิรูศิมตคฺราหิโณ โลกา อุตฺถาย กถาเมตำ กถิตวนฺโต ภินฺนเทศียานำ ตฺวกฺเฉทํ กรฺตฺตุํ มูสาวฺยวสฺถำ ปาลยิตุญฺจ สมาเทษฺฏวฺยมฺฯ
6 ६ मग प्रेषित व वडीलवर्ग या प्रकरणाचा विचार करावयास जमले.
ตต: เปฺรริตา โลกปฺราจีนาศฺจ ตสฺย วิเวจนำ กรฺตฺตุํ สภายำ สฺถิตวนฺต: ฯ
7 ७ तेव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला बंधुजनहो, तुम्हास ठाऊक आहे की, माझ्या तोडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीचा दिवसांपासून तुम्हामध्ये देवाने माझी निवड केली.
พหุวิจาเรษุ ชาตษุ ปิตร อุตฺถาย กถิตวานฺ, เห ภฺราตโร ยถา ภินฺนเทศียโลกา มม มุขาตฺ สุสํวาทํ ศฺรุตฺวา วิศฺวสนฺติ ตทรฺถํ พหุทินาตฺ ปูรฺวฺวมฺ อีศฺวโรสฺมากํ มเธฺย มำ วฺฤตฺวา นิยุกฺตวานฺฯ
8 ८ आणि हृदये जाणणाऱ्या देवाने जसा आपणास तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली.
อนฺตรฺยฺยามีศฺวโร ยถาสฺมภฺยํ ตถา ภินฺนเทศีเยภฺย: ปวิตฺรมาตฺมานํ ปฺรทาย วิศฺวาเสน เตษามฺ อนฺต: กรณานิ ปวิตฺราณิ กฺฤตฺวา
9 ९ त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही.
เตษามฺ อสฺมากญฺจ มเธฺย กิมปิ วิเศษํ น สฺถาปยิตฺวา ตานธิ สฺวยํ ปฺรมาณํ ทตฺตวานฺ อิติ ยูยํ ชานีถฯ
10 १० असे असतांना जे जोखड आपले पूर्वज व आपण वाहावयास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालू तुम्ही देवाची परीक्षा का पाहता?
อเตอวาสฺมากํ ปูรฺวฺวปุรุษา วยญฺจ สฺวยํ ยทฺยุคสฺย ภารํ โสฒุํ น ศกฺตา: สมฺปฺรติ ตํ ศิษฺยคณสฺย สฺกนฺเธษุ นฺยสิตุํ กุต อีศฺวรสฺย ปรีกฺษำ กริษฺยถ?
11 ११ तर मग त्यांच्याप्रमाणेच आपले तारण प्रभू येशूच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे.
ปฺรโภ รฺยีศุขฺรีษฺฏสฺยานุคฺรเหณ เต ยถา วยมปิ ตถา ปริตฺราณํ ปฺราปฺตุมฺ อาศำ กุรฺมฺม: ฯ
12 १२ तेव्हा सर्व लोक गप्प राहीले आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या द्वारे देवाने परराष्ट्रीयामध्ये जी चिन्हे व अद्भूते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले.
อนนฺตรํ พรฺณพฺพาเปาลาภฺยามฺ อีศฺวโร ภินฺนเทศียานำ มเธฺย ยทฺยทฺ อาศฺจรฺยฺยมฺ อทฺภุตญฺจ กรฺมฺม กฺฤตวานฺ ตทฺวฺฤตฺตานฺตํ เตา สฺวมุขาภฺยามฺ อวรฺณยตำ สภาสฺถา: สรฺเวฺว นีรวา: สนฺต: ศฺรุตวนฺต: ฯ
13 १३ मग त्यांचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला; बंधुजनहो, माझे ऐका.
ตโย: กถายำ สมาปฺตายำ สตฺยำ ยากูพฺ กถยิตุมฺ อารพฺธวานฺ
14 १४ परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली, हे शिमोनाने सांगितले आहे;
เห ภฺราตโร มม กถายามฺ มโน นิธตฺตฯ อีศฺวร: สฺวนามารฺถํ ภินฺนเทศียโลกานามฺ มธฺยาทฺ เอกํ โลกสํฆํ คฺรหีตุํ มตึ กฺฤตฺวา เยน ปฺรกาเรณ ปฺรถมํ ตานฺ ปฺรติ กฺฤปาวเลกนํ กฺฤตวานฺ ตํ ศิโมนฺ วรฺณิตวานฺฯ
15 १५ आणि ह्याच्याशी संदेष्ट्यांच्या उक्तीचाही मेळ बसतो, असा शास्त्रलेख आहे की,
ภวิษฺยทฺวาทิภิรุกฺตานิ ยานิ วากฺยานิ ไต: สารฺทฺธมฺ เอตไสฺยกฺยํ ภวติ ยถา ลิขิตมาเสฺตฯ
16 १६ ह्यानंतर मी परत येईन व दावीदाचा पडलेला मंडप पुन्हा उभारीन; आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन,
สรฺเวฺวษำ กรฺมฺมณำ ยสฺตุ สาธก: ปรเมศฺวร: ฯ ส เอเวทํ วเททฺวากฺยํ เศษา: สกลมานวา: ฯ ภินฺนเทศียโลกาศฺจ ยาวนฺโต มม นามต: ฯ ภวนฺติ หิ สุวิขฺยาตาเสฺต ยถา ปรเมศิตุ: ฯ
17 १७ ह्यासाठी की, शेष राहिलेल्या मनुष्यांनी व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा.
ตตฺวํ สมฺยกฺ สมีหนฺเต ตนฺนิมิตฺตมหํ กิลฯ ปราวฺฤตฺย สมาคตฺย ทายูท: ปติตํ ปุน: ฯ ทูษฺยมุตฺถาปยิษฺยามิ ตทียํ สรฺวฺววสฺตุ จฯ ปติตํ ปุนรุถาปฺย สชฺชยิษฺยามิ สรฺวฺวถา๚
18 १८ हे जे त्यास युगादीपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो. (aiōn )
อา ปฺรถมาทฺ อีศฺวร: สฺวียานิ สรฺวฺวกรฺมฺมาณิ ชานาติฯ (aiōn )
19 १९ तेव्हा माझे तर मत असे आहे की, जे परराष्ट्रीयांतून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये;
อเตอว มม นิเวทนมิทํ ภินฺนเทศียโลกานำ มเธฺย เย ชนา อีศฺวรํ ปฺรติ ปราวรฺตฺตนฺต เตษามุปริ อนฺยํ กมปิ ภารํ น นฺยสฺย
20 २० तर त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तीचे अमगंळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्याच्यापासून तुम्ही अलिप्त असा.
เทวตาปฺรสาทาศุจิภกฺษฺยํ วฺยภิจารกรฺมฺม กณฺฐสมฺปีฑนมาริตปฺราณิภกฺษฺยํ รกฺตภกฺษฺยญฺจ เอตานิ ปริตฺยกฺตุํ ลิขาม: ฯ
21 २१ कारण प्राचीन काळापासून प्रत्येक शब्बाथ दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरांत आहेत.
ยต: ปูรฺวฺวกาลโต มูสาวฺยวสฺถาปฺรจาริโณ โลกา นคเร นคเร สนฺติ ปฺรติวิศฺรามวารญฺจ ภชนภวเน ตสฺยา: ปาโฐ ภวติฯ
22 २२ तेव्हा पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणातून निवडलेली माणसे म्हणजे बंधुजनांतील प्रमुख बर्शब्बा म्हटलेला यहूदा व सीला ह्यांना अंत्युखियास पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील ह्यांना वाटले.
ตต: ปรํ เปฺรริตคโณ โลกปฺราจีนคณ: สรฺวฺวา มณฺฑลี จ เสฺวษำ มเธฺย พรฺศพฺพา นามฺนา วิขฺยาโต มโนนีเตา กฺฤตฺวา เปาลพรฺณพฺพาภฺยำ สารฺทฺธมฺ อานฺติยขิยานครํ ปฺรติ เปฺรษณมฺ อุจิตํ พุทฺธฺวา ตาภฺยำ ปตฺรํ ไปฺรษยนฺฯ
23 २३ त्यांच्या हाती त्यांनी असे लिहून पाठवलेः “अंत्युखिया, सिरीया व किलकिया येथील परराष्ट्रीयांतले बंधुजन ह्यांना प्रेषित व वडीलवर्ग या बंधुजनांचा सलाम.
ตสฺมินฺ ปเตฺร ลิขิตมึท, อานฺติยขิยา-สุริยา-กิลิกิยาเทศสฺถภินฺนเทศียภฺราตฺฤคณาย เปฺรริตคณสฺย โลกปฺราจีนคณสฺย ภฺราตฺฤคณสฺย จ นมสฺการ: ฯ
24 २४ आमच्यापैकी काहींना जाऊन आपल्या बोलण्याने तुमचे जीव घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे; पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते.
วิเศษโต'สฺมากมฺ อาชฺญามฺ อปฺราปฺยาปิ กิยนฺโต ชนา อสฺมากํ มธฺยาทฺ คตฺวา ตฺวกฺเฉโท มูสาวฺยวสฺถา จ ปาลยิตวฺยาวิติ ยุษฺมานฺ ศิกฺษยิตฺวา ยุษฺมากํ มนสามไสฺถรฺยฺยํ กฺฤตฺวา ยุษฺมานฺ สสนฺเทหานฺ อกุรฺวฺวนฺ เอตำ กถำ วยมฺ อศฺฤนฺมฯ
25 २५ म्हणून आमचे एकमत झाल्यावर आम्हास हे योग्य वाटले की,
ตตฺการณาทฺ วยมฺ เอกมนฺตฺรณา: สนฺต: สภายำ สฺถิตฺวา ปฺรโภ รฺยีศุขฺรีษฺฏสฺย นามนิมิตฺตํ มฺฤตฺยุมุขคตาภฺยามสฺมากํ
26 २६ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरिता जीवावर उदार झालेले आपले प्रिय बंधू बर्णबा व पौल ह्यांच्याबरोबर काही निवडलेले माणसे तुम्हाकडे पाठवावी.
ปฺริยพรฺณพฺพาเปาลาภฺยำ สารฺทฺธํ มโนนีตโลกานำ เกษาญฺจิทฺ ยุษฺมากํ สนฺนิเธา เปฺรษณมฺ อุจิตํ พุทฺธวนฺต: ฯ
27 २७ ह्याकरिता यहूदा व सीला ह्यांना आम्ही पाठवले आहे ते स्वतः या गोष्टी तुम्हास तोंडी सांगतील.
อโต ยิหูทาสีเลา ยุษฺมานฺ ปฺรติ เปฺรษิตวนฺต: , เอตโย รฺมุขาภฺยำ สรฺวฺวำ กถำ ชฺญาสฺยถฯ
28 २८ कारण पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टीशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हास योग्य वाटले:
เทวตาปฺรสาทภกฺษฺยํ รกฺตภกฺษฺยํ คลปีฑนมาริตปฺราณิภกฺษฺยํ วฺยภิจารกรฺมฺม เจมานิ สรฺวฺวาณิ ยุษฺมาภิสฺตฺยาชฺยานิ; เอตตฺปฺรโยชนียาชฺญาวฺยติเรเกน ยุษฺมากมฺ อุปริ ภารมนฺยํ น นฺยสิตุํ ปวิตฺรสฺยาตฺมโน'สฺมากญฺจ อุจิตชฺญานมฺ อภวตฺฯ
29 २९ त्या म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी; ह्यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल, क्षेमकुशल असो.”
อเตอว เตภฺย: สรฺเวฺวภฺย: เสฺวษุ รกฺษิเตษุ ยูยํ ภทฺรํ กรฺมฺม กริษฺยถฯ ยุษฺมากํ มงฺคลํ ภูยาตฺฯ
30 ३० त्यांना पाठवून दिल्यावर ते अंत्युखियास गेले आणि त्यांनी सर्व मंडळीला जमवून ते पत्र सादर केले.
เต วิสฺฤษฺฏา: สนฺต อานฺติยขิยานคร อุปสฺถาย โลกนิวหํ สํคฺฤหฺย ปตฺรมฺ อททนฺฯ
31 ३१ त्यातला बोध वाचून त्यांना आनंद झाला.
ตตเสฺต ตตฺปตฺรํ ปฐิตฺวา สานฺตฺวนำ ปฺราปฺย สานนฺทา อภวนฺฯ
32 ३२ यहूदा व सीला हे स्वतः संदेष्टे होते, म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले.
ยิหูทาสีเลา จ สฺวยํ ปฺรจารเกา ภูตฺวา ภฺราตฺฤคณํ นาโนปทิศฺย ตานฺ สุสฺถิรานฺ อกุรุตามฺฯ
33 ३३ तेथे ते काही दिवस राहील्यावर ज्यांनी त्यांना पाठवले होते त्यांच्याकडे जाण्यास बंधुजनांनी त्यांना शांतीने पाठवून दिले.
อิตฺถํ เตา ตตฺร ไต: สากํ กติปยทินานิ ยาปยิตฺวา ปศฺจาตฺ เปฺรริตานำ สมีเป ปฺรตฺยาคมนารฺถํ เตษำ สนฺนิเธ: กลฺยาเณน วิสฺฤษฺฏาวภวตำฯ
34 ३४ परंतु सिलाला तेथे आणखी रहावयास बरे वाटले.
กินฺตุ สีลสฺตตฺร สฺถาตุํ วาญฺฉิตวานฺฯ
35 ३५ आणि पौल व बर्णबा इतर पुष्कळ जणांबरोबर प्रभूचे वचन शिकवीत व सुवार्तेची घोषणा करीत अंत्युखियास राहीले.
อปรํ เปาลพรฺณพฺเพา พหว: ศิษฺยาศฺจ โลกานฺ อุปทิศฺย ปฺรโภ: สุสํวาทํ ปฺรจารยนฺต อานฺติยขิยายำ กาลํ ยาปิตวนฺต: ฯ
36 ३६ मग काही दिवसानंतर पौलाने बर्णबाला म्हणले “ज्या ज्या नगरात आपण प्रभूच्या वचनांची घोषणा केली तेथे पुन्हा जाऊन बंधुजनांना भेटून ते कसे आहेत हे पाहू या.”
กติปยทิเนษุ คเตษุ เปาโล พรฺณพฺพามฺ อวทตฺ อาคจฺฉาวำ เยษุ นคเรษฺวีศฺวรสฺย สุสํวาทํ ปฺรจาริตวนฺเตา ตานิ สรฺวฺวนคราณิ ปุนรฺคตฺวา ภฺราตร: กีทฺฤศา: สนฺตีติ ทฺรษฺฏุํ ตานฺ สากฺษาตฺ กุรฺวฺว: ฯ
37 ३७ बर्णबाची इच्छा होती की, ज्याला मार्क म्हणत त्या योहानाला बरोबर घ्यावे.
เตน มารฺกนามฺนา วิขฺยาตํ โยหนํ สงฺคินํ กรฺตฺตุํ พรฺณพฺพา มติมกโรตฺ,
38 ३८ परंतु पौलाला वाटले की, पंफुलियाहून जो आपणाला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम करावयास आला नाही त्यास सोबतील घेणे योग्य नाही.
กินฺตุ ส ปูรฺวฺวํ ตาภฺยำ สห การฺยฺยารฺถํ น คตฺวา ปามฺผูลิยาเทเศ เตา ตฺยกฺตวานฺ ตตฺการณาตฺ เปาลสฺตํ สงฺคินํ กรฺตฺตุมฺ อนุจิตํ ชฺญาตวานฺฯ
39 ३९ ह्यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्णबा मार्काला घेऊन तारवात बसून कुप्रास गेला;
อิตฺถํ ตโยรติศยวิโรธโสฺยปสฺถิตตฺวาตฺ เตา ปรสฺปรํ ปฺฤถคภวตำ ตโต พรฺณพฺพา มารฺกํ คฺฤหีตฺวา โปเตน กุโปฺรปทฺวีปํ คตวานฺ;
40 ४० पौलाने सीलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्यास प्रभूच्या कृपेवर सोपविल्यावर तो तेथून निघाला.
กินฺตุ เปาล: สีลํ มโนนีตํ กฺฤตฺวา ภฺราตฺฤภิรีศฺวรานุคฺรเห สมรฺปิต: สนฺ ปฺรสฺถาย
41 ४१ आणि मंडळयाना स्थैर्य देत सिरीया व किलिकिया ह्यामधुन गेला.
สุริยากิลิกิยาเทศาภฺยำ มณฺฑลี: สฺถิรีกุรฺวฺวนฺ อคจฺฉตฺฯ