< प्रेषि. 14 >
1 १ पौल व बर्णबा इकुन्या शहरात गेले, ते तेथील यहूदी सभास्थानात गेले, तेथील लोकांशी ते बोलले, पौल व बर्णबा अशा रीतीने बोलले की, पुष्कळ यहूदी लोकांनी व ग्रीक लोकांनी त्यांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला.
Стало ся ж в Їкониї, увійшли вони вкупі в Жидівську школу, і промовляли так, що увірувало велике множество і Жидів і Єленян.
2 २ परंतु काही यहूदी लोकांनी विश्वास ठेवला नाही, त्यांनी परराष्ट्रीय लोकांची मने भडकाविली आणि बंधुजनांविषयीची मने वाईट केली.
Невірні ж Жиди підіймали й озлобляди душі поган на братів.
3 ३ म्हणून पौल व बर्णबाने त्याठिकाणी बरेच दिवस मुक्काम केला आणि परमेश्वराच्या बलाने येशूविषयी धैर्याने सांगत राहीले, पौल व बर्णबाने देवाच्या कृपेविषयी साक्ष दिला, परमेश्वराने त्यांना पौल व बर्णबाला चमत्कार व अद्भूते कृत्ये करण्यास मदत करून ते जे काही सांगत होते ते खरे ठरवले.
Доволї ж часу пробували вони, одважно промовляючи про Господа, що сьвідкував словом благодати своєї, і давав, щоб ознаки та чудеса робились руками їх.
4 ४ परंतु शहरातील काही लोकांस यहूदी लोकांची मते पटली, दुसऱ्या लोकांस प्रेषित पौल व बर्णबाचे म्हणणे पटले, त्यामुळे शहरात दोन तट पडले.
Та розділилась громада городська, і одні були з Жидами, а другі з апостолами.
5 ५ काही परराष्ट्रीय लोक, काही यहूदी लोक व त्यांचे पुढारी यांनी पौल व बर्णबाला बांधले व इजा करण्याचा प्रयत्न केला, त्यांना पौल व बर्णबा यांना दगडमार करून मारावयाचे होते.
Як же підняв ся заколот поган та Жидів з князями їх, щоб зневажати і покаменувати їх,
6 ६ पौल व बर्णबा यांना जेव्हा त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले, ते लुस्र व दर्बे या लुकवनिया देशाच्या नगरात गेले आणि त्या शहरांच्या सभोवतालच्या परिसरात गेले.
вони довідавшись, повтікали в городи Ликаонські, Листру та Дервию, і в околицю,
7 ७ आणि तेथे त्यांनी सुवार्ता सांगितली.
і там благовіствували.
8 ८ लुस्र येथे एक मनुष्य होता त्याचे पाय अधू होते तो जन्मतःच पांगळा जन्मला होता व कधीच चालला नव्हता.
А один чоловік у Листрі сидів невдужавши ногами, кривий бувши від утроби матери своєї, котрий ніколи не ходив.
9 ९ पौल भाषण करीत असताना हा मनुष्य ऐकत होता, पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्यास आपण बरे होऊ असा त्या मनुष्याचा विश्वास आहे असे पाहून.
Сей слухав, як Павел говорив; а той подививсь на него і, постерігши, що має віру, щоб одужати,
10 १० मोठ्याने म्हणाला, “तुझ्या पायांवर नीट उभा राहा!” तेव्हा त्या मनुष्याने उडी मारली आणि चालू लागला.
рече голосом великим: Стань просто на ноги твої. І підскочив і ходив.
11 ११ पौलाने केलेले लोकांनी जेव्हा पाहिले, तेव्हा ते आपल्या लुकवनिया भाषेत ओरडले, ते म्हणाल, “देव मनुष्यांच्या रूपाने आमच्यात उतरले आहेत.”
Народ же, видївши, що зробив Павел, підняв голос свій, говорячи по ликаонськи: Боги, уподобившись людям, зійшли до нас.
12 १२ लोकांनी बर्णबाला ज्यूपितर म्हटले व पौलाला मर्क्युरी म्हटले, कारण पौल मुख्य बोलणारा होता.
Назвали ж Варнаву Зевесом, а Павла Гермесом; бо він був проводирем слова.
13 १३ ज्यूपितरचे मंदिर जवळ होते, या मंदिराचा पुजारी काही बैल व फुले घेऊन वेशीजवळ आला, पुजारी व लोकांस पौल व बर्णबा यांची उपासाना करण्यासाठी त्यांच्यापुढे बळी द्यावयाचा होता.
Жерець же (ідола) Зевеса, що був перед городом їх, привівши воли з вінками до воріт, хотів зробити посьвят разом з народом.
14 १४ परंतु ते काय करीत आहेत, हे जेव्हा प्रेषित पौल व बर्णबा यांना समजले तेव्हा त्यांनी आपले कपडे फाडले व लोकांच्या गर्दीत शिरले आणि मोठ्याने म्हणाले.
Почувши ж апостоли Варнава та Павел, роздерли одежу свою, і вбігли, покликуючи, між народ,
15 १५ लोकांनो, या गोष्टी तुम्ही का करीत आहात? आम्ही देव नाही! तुम्हास जशा भावना आहेत, तशाच आम्हासही आहेत! आम्ही तुम्हास सुवार्ता सांगायला आलो, आम्ही तुम्हास हे सांगत आहोत की या व्यर्थ गोष्टींपासून तुम्ही तुमचे मन वळवावे, खऱ्या जिवंत देवाकडे आपले मन लावावे, त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व जे काही आहे ते निर्माण केले.
і глаголали: Мужі, на що се робите? Ми такі ж люде, як ви; благовіствуемо вам, щоб від сих дурниць навернулись до Бога живого, що сотворив небо, і землю, і море, і все, що є в них.
16 १६ भूतकाळात, देवाने सर्व राष्ट्रांना त्यांना जसे पाहिजे तसे वागू दिले.
Він у минувші часи попустив усім поганам ходити дорогами їх.
17 १७ परंतु देवाने अशा गोष्टी केल्या, की त्याद्वारे तो खरा आहे हे सिद्ध व्हावे, तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतो, तो तुम्हास आकाशातून पाऊस देतो, योग्यवेळी तो तुम्हास चांगले पीक देतो, तो तुम्हास भरपूर अन्न देतो व तो तुमची अंतःकरणे आनंदाने भरतो.
Тільки ж не оставляв себе без сьвідчення, роблячи добро: даючи дощі з неба й пори вроджайні, та сповняючи їжею й радощами серця наші.
18 १८ पौल व बर्णबाने या गोष्टी लोकांस सांगितल्या व मोठ्या प्रयासाने आपणास यज्ञ अर्पिण्यापासून त्याना परावृत्त केले.
се говорячи, ледве впинили народ, щоб не приносили їм посьвяту.
19 १९ नंतर अंत्युखिया व इकुन्या येथील काही यहूदी लोक तेथे आले, त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली आणि पौलाला दगडमार केला, त्यामध्ये पौल मरण पावला असे समजून त्यांनी त्यास ओढत नेऊन नगराबाहेर टाकले.
Прийшли ж з Антиохиї та Їкониї Жиди, і наустивши народ, і вкаменувавши Павла, виволїкли геть з города, думаючи, що він умер.
20 २० पण शिष्य पौलाभोवती जमा झाल्यावर पौल उठून परत शहरात गेला व दुसऱ्या दिवशी बर्णबाबरोबर तो दर्बे शहरास गेले.
Як же обступили його ученики, уставши ввійшов у город, а назавтра вийшов з Варнавою в Дервию.
21 २१ आणि त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून अनेक लोकांस शिष्य केले, त्यानंतर ते लुस्र, इकुन्या आणि अंत्युखिया नगरांना परत आले.
І благовіствувавши городу сьому, і навчивши многих, вернулись вони в Листру, і Іконию, і Антиохию,
22 २२ आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले, त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ रहावे म्हणून उत्तेजन दिले, ते म्हणाले, “अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.”
укріпляючи душі учеників, благаючи пробувати у вірі, і що многими муками треба нам увійти в царство Боже.
23 २३ पौल व बर्णबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनांची नेमणूक केली, त्यांनी या वडिलांसाठी उपवास आणि प्रार्थना केल्या, प्रभू येशूवर विश्वास असलेले असे सर्व वडीलजन होते म्हणून पौलाने व बर्णबाने त्यांना प्रभूच्या हाती सोपवले.
Рукоположивши ж їм пресвитерів по церквах і помолившись з постом, передали їх Господеві, в котрого увірували.
24 २४ पौल आणि बर्णबा पिसिदिया प्रदेशातून गेले नंतर ते पंफुलिया येथे आले.
І, перейшовши Писидию, прийшли в Памфилию.
25 २५ त्यांनी पिर्गा शहरात देवाचा संदेश दिला नंतर ते अत्तलिया शहरात गेले.
А глаголавши в Пергиї слово, прийшли в Аталию,
26 २६ नंतर तेथून पुढे पौल व बर्णबा सिरीया प्रांतातील अंत्युखियात समुद्रमार्गे गेले, जे काम त्यांनी पूर्ण केले होते त्याची सुरुवात त्यांनी देवाच्या कृपेने अंत्युखियापासूनच केली होती.
а з відсіля поплили в Антиохию, звідкіля були передані благодаті Божій на дїло, котре сповнили.
27 २७ ते जेव्हा तेथे पोहोचले, तेव्हा त्यांनी मंडळीला एकत्र बोलावले आणि देवाने त्यांच्याबाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांना सांगितल्या तसेच दुसऱ्या देशातील परराष्ट्रीय लोकांमध्ये देवाने विश्वासाचे द्वार कसे उघडले ते सांगितले.
Прибувши ж та зібравши церкву, оповідали все, що зробив Бог з ними, і як Він відчинив поганам двері віри.
28 २८ नंतर ते विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर तेथे बरेच दिवस राहिले.
Пробували ж там час немалий з учениками.