< प्रेषि. 13 >

1 अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते, ते पुढीलप्रमाणेः बर्णबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, मनाएन (जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला होता) आणि शौल.
Були ж у церкві, що була в Антиохиї, деякі пророки та вчителі: Варнава та Симеон, званий Нигером, та Лукий Киринейський, та Манаіл, зрощений з Іродом четверовластником, та Савло.
2 ही सर्व माणसे परमेश्वराची आराधना करीत व उपवास करीत असता, पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौलाला ह्यांना ज्या कामासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करा.”
Як же служили Господеві та постили, рече Дух сьвятий: Відлучіть мені Варнаву та Савла на діло, до котрого покликав я їх.
3 म्हणून मंडळीने उपवास व प्रार्थना केल्या, त्यांनी बर्णबा व शौल यांच्या डोक्यांवर हात ठेवून प्रार्थना केली, मग त्यांना पाठवून दिले.
Тоді вони, попостивши та помолившись і положивши руки на них, відпустили їх.
4 पवित्र आत्म्याच्याद्वारे बर्णबा व शौल यांना पाठविण्यात आले, ते सलुकीयात गेले, नंतर तेथून समुद्रमार्गे कुप्र बेटावर गेले.
Вони ж, послані від Духа сьвятого, прийшли у Селевкию, а звідтіля відплили в Кипр.
5 ते जेव्हा सलमी शहरात आले, तेव्हा त्यांनी देवाचे वचनाची यहूदी लोकांच्या सभास्थानात घोषणा केली मार्क म्हटलेला योहान हाही त्यांच्या मदतीला होता.
І, бувши в Саламинї, проповідували слово Боже по школах Жидівських, мали ж і Йоана за слугу.
6 ते संपूर्ण बेट पार करून पफे शहरास गेले, पफे येथे त्यांना एक यहूदी मनुष्य भेटला, तो जादूच्या करामती करीत असे, त्याचे नाव बर्येशू होते, तो खोटा संदेष्टा होता.
Пройшовши ж остров аж до Пафи, знайшли одного чарівника, Жидівського лжепророка, на ймя Вар-Ісуса,
7 बर्येशू नेहमी सिर्ग्य पौल याच्या निकट राहण्याचा प्रयत्न करायचा, सिर्ग्य पौल राज्यपाल होता व तो हुशार होता, त्याने बर्णबा व शौल यांना आपणाकडे बोलावले, त्यास त्यांच्याकडून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दाखवली.
котрий був у старости Сергія Павла, чоловіка розумного. Сей, покликавши Варнаву та Савла, бажав слухати слово Боже.
8 परंतु अलीम “जादूगार” (त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे) हा बर्णबा व शौल यांच्याविरुद्ध होता, राज्यपालाने विश्वास ठेवू नये म्हणून अलीमने त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.
Противив ся ж їм Єлима чарівник (так бо перекладаєть ся імя його), шукаючи одвернути старосту од віри.
9 पण शौल, ज्याला पौलहि म्हणत, तो पवित्र आत्म्याने भरला होता, पौलाने त्याच्याकडे रोखून पाहिले व म्हणाला.
Савло ж, - (він же) й Павел, сповнившись сьвятим Духом, і подивившись на него,
10 १० “सैतानाच्या पुत्रा तू दुष्टाईने व खोटेपणाने भरलेला आहेस, अवघ्या नीतिमानाच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय?
сказав: Ой ти, повний усякого підступу і всякого зла, сину дияволів, вороже всякої правди! чи (нїколи) не перестанеш розвертати праві дороги Господні?
11 ११ तर आता पाहा, प्रभूचा हात तुझ्यावर आहे, तू आंधळा होशील व काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही,” मग लागलेच अलीमावर धुके व अंधार पडला आणि तो आपल्याला कोणी हाती धरून चालवावे म्हणून इकडेतिकडे फिरुन मनुष्यांचा शोध करू लागला.
Оце ж рука Господня на тебе, й будеш слїпий, і не бачити меш сонця до часу. І зараз обняв його туман і темрява й слоняючись (мацяючи) шукав, хто б його провів за руку.
12 १२ तेव्हा जे झाले ते पाहून राज्यपालाने विश्वास ठेवला, प्रभूच्या शिक्षणाने तो चकित झाला.
Тодї видївши староста, що сталось, увірував, дивуючись наукою Господньою.
13 १३ पौल व जे त्याचे मित्र त्याच्याबरोबर होते ते पफेकडून समुद्रमार्गे निघाले, ते पंफुलियातील पिर्गा गावी आले, परंतु योहान त्यांना सोडून परत यरूशलेमे शहरास गेला.
Пустивши ся ж із Пафи ті, що круг Павла, прийшли в Пергию Панфилську; Йоан же, відлучившись від них, вернувсь у Єрусалим.
14 १४ पौल व त्याच्या मित्रांनी त्यांचा प्रवास पुढे चालू ठेवला, पिर्गापासून पुढे ते पिसिदीयांतील अंत्युखियास गेले आणि शब्बाथ दिवशी ते सभास्थानात गेले आणि तेथे बसले.
Вони ж, перейшовши з Пергиї, прибули в Антиохию Писидийську, і ввійшовши в школу субітнього дня, посідали.
15 १५ तेव्हा नियमशास्त्र आणि संदेष्टयांच्या लेखाचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्णबाला निरोप पाठविला, “बंधुनो, येथील लोकांस काही मदत होईल असे काही बोधवचने सांगा.”
Як же прочитано з закону та пророків, післала старшина шкільна до них, говорячи: Мужі брати, коли маєте слово утїшення до людей, то промовте.
16 १६ पौल उभा राहिला आणि आपला हात उंचावून म्हणाला, “अहो इस्राएल लोकांनो व देवाचे भय धरणाऱ्यांनो, ऐका.
Вставши ж Павел і повівши рукою, рече: Мужі Ізраїлські і богобоязливі, слухайте:
17 १७ या इस्राएल लोकांच्या देवाने आपल्या वाडवडिलांची निवड केली आणि ते ज्या काळात मिसरमध्ये परकी म्हणून राहत होते, त्या काळात देवाने त्यांना अगणित केले आणि उभारलेल्या बाहूने त्यांना तेथून बाहेर आणले.
Бог народу Ізраїлського вибрав отців наших, і підняв угору народ, як був він захожим у землї Єгипецькій, і рамям високим вивів їх з неї.
18 १८ आणि देवाने अरण्यातील चाळीस वर्षात त्यांना सहनशीलता दाखविली.
І до сорока літ годував їх у пустині.
19 १९ देवाने कनानच्या प्रदेशातील सात राष्ट्रांना नाश केला, देवाने त्यांच्या जमिनी त्याच्या लोकांस दिल्या.
А зруйнувавши, сїм народів у землї Канаанській, попаював їм землю їх.
20 २० हे सर्व साधारणपणे चारशेपन्नास वर्षात घडले, त्यानंतर देवाने शमुवेल संदेष्ट्यापर्यंत आपल्या लोकांस न्यायाधीश नेमून दिले.
А після сього лїт з чотириста й пятьдесять давав (їм) суддів до Самуїла пророка.
21 २१ मग लोकांनी राजाची मागणी केली, देवाने त्यांना किशाचा पुत्र शौल याला दिले, शौल हा बन्यामिनाच्या वंशातील होता, तो चाळीस वर्षापर्यंत राजा होता.
А потім забажали вони царя, і дав їм Бог Саула, сина Кисового, чоловіка з роду Веняминового, на сорок лїт.
22 २२ नंतर देवाने शौलाला काढून टाकले, देवाने दावीदाला त्यांचा राजा केले, दावीदाविषयी देव असे बोलला इशायाचा पुत्र, दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझी सर्व इच्छा पूर्ण करील.
А відсунувши його, підняв їм Давида за царя, котрому сьвідкуючи, рече: Знайшов я Давида сина Єссеєвого, чоловіка по серцю моєму, котрий вчинить усю волю мою.
23 २३ याच दाविदाच्या वंशजातून देवाने इस्राएल लोकांचा तारणारा आणिला, तो वंशज येशू आहे, देवाने हे करण्याचे अभिवचन दिले होते.
Із його ж насіння підняв Бог по обітуванню Ізраїлеві Спаситедя Ісуса,
24 २४ येशू येण्यापूर्वी सर्व इस्राएली लोकांस योहानाने उपदेश केला, त्यांच्या अंतःकरणात बदल व्हावा म्हणून योहानाने लोकांस सांगितले की, त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे.
перед котрого приходом проповідував Йоан хрещеннє покаяння всьому народові Ізраїлевому.
25 २५ जेव्हा योहान आपले काम संपवत होता, तेव्हा तो म्हणाला, ‘मी कोण आहे असे तुम्हास वाटते? मी ख्रिस्त नाही, तो नंतर येत आहे, त्याच्या वहाणांचे बंद सोडण्याची सुद्धा माझी लायकी नाही.’
Сповнивши ж Йоан путь свій, рече: Хто я, думаєте ви? Се не я. А ось іде за мною, котрому я недостоєн обувє ніг розвязати.
26 २६ माझ्या बंधुनो, अब्राहामच्या कुटुंबातील पुत्रांनो आणि तुम्ही यहूदी नसलेले पण खऱ्या देवाची उपासना करणारे, ऐका! या तारणाची बातमी आम्हास सांगितली गेली.
Мужі брати, синове роду Авраамового, і всі богобоязливі між вами, вам слово спасення сього послано.
27 २७ यरूशलेम शहरामध्ये राहतात ते यहूदी व त्यांचे अधिकारी यांनी त्यास ओळखले नाही, येशू हा तारणारा होता, येशूविषयी जे शब्द संदेष्ट्यानी लिहिले ते यहूदी लोकांसाठी प्रत्येक शब्बाथाच्या वारी वाचले गेले, परंतु त्यांना ते समजले नाही, यहूदी लोकांनी येशूला दोषी ठरवल्याने त्यांनी ते भविष्यावाद्यांचे शब्द खरे ठरवले.
Ті бо, що жили в Єрусалимі, і князї їх, не зрозумівши сього і голосів пророчих, читаних що - суботи, сповнили їх, осудивши Його,
28 २८ येशूने का मरावे याचे खरे कारण ते शोधू शकले नाहीत, पण त्यांनी पिलाताला सांगितले की त्यास जिवे मारावे.
і, не знайшовши нїякої вини смерти, просили Пилата убити Його.
29 २९ शास्त्रामध्ये येशूच्याबद्दल या गोष्टी लिहिल्या होत्या की, जे वाईट ते त्याच्याबाबतीत घडणारे होते, ते सर्व या यहूदी लोकांनी येशूला केले, मग त्यांनी येशूला वधस्तंभावरुन खाली घेतले व त्यास कबरेत ठेवले.
Як же скінчилось усе, що пре Него писано, знявши з дерева, положили у гробі;
30 ३० पण देवाने त्यास मरणातून उठवले.
Бог же воскресив Його з мертвих,
31 ३१ यानंतर, पुष्कळ दिवसांपर्यंत जे त्याच्याबरोबर होते, त्यांना गालील प्रांतापासून यरूशलेम शहरापर्यंत येशूने दर्शन दिले, ते लोक आता त्याचे साक्षीदार म्हणून लोकांसमोर आहेत.
Многі днї являв ся Він тим, що поприходили з Ним з Галилеї в Єрусалим; вони сьвідки Його перед людьми.
32 ३२ आम्ही तुम्हास देवाने जे अभिवचन आमच्या वाडवडिलांना दिले त्याविषयी सुवार्ता सांगतो.
А ми вам благовіствуємо обітуваннє, дане отцям,
33 ३३ आम्ही त्यांची लेकरे आहोत आणि देवाने हे अभिवचन आमच्या बाबतीत खरे करून दाखविले, देवाने हे येशूला मरणातून पुन्हा उठविण्याद्वारे केले, आम्ही याविषयी स्तोत्रसंहितेमध्येसुद्धा वाचतोः ‘तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे.’
що його Бог сповнив нам, дітям їх, піднявши Ісуса, як і в другій псальмі написано: Син мій єси Ти; я сьогодні родив Тебе.
34 ३४ शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून त्याने त्यास मरणातून उठवले, याविषयी त्याने असे सांगितले आहे की, ‘दाविदाला देण्यात आलेली पवित्र व निश्चित आशीर्वाद तुम्हास देईन.’
А що воскресив Його з мертвих, так, що більш не вернеть ся на зотлїннє, то так глаголав: дам вам сьвятий Давидів завіт.
35 ३५ म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतोः ‘तू तुझ्या पवित्र पुरुषाला कबरेत कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.’
Тим і в иншій (псальмі) глаголе: Не даси Сьвятому твоєму видїти зотлїння.
36 ३६ कारण दावीद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून मरण पावला, आपल्या वाडवडिलांशेजारी त्यास पुरले आणि कबरेत त्याचे शरीर कुजले.
Давид бо, послуживши своєму родові, Божою волею уснув, і положено його до батьків його, і ввидїв зотлїннє;
37 ३७ पण ज्याला देवाने मरणातून पुन्हा उठवले, त्यास कुजण्याचा अनुभव आला नाही.
Той же, що Його Бог підняв, не видїв зотлїння.
38 ३८ बंधुनो, आम्ही जी घोषणा करीत आहोत ते तुम्ही समजून घेतले पाहिजेः या एकाकडूनच तुमच्या पापांची क्षमा तुम्हास मिळू शकते.
Відоме ж нехай буде вам, мужі к брати, що через Него вам прощеннє гріхів проповідуєть ся;
39 ३९ मोशेचे नियमशास्त्र तुम्हास तुमच्या पापांपासून मुक्त करणार नाही, पण प्रत्येक व्यक्ती जी त्याच्यावर विश्वास ठेवते, ती त्याच्याद्वारे त्या सर्वांविषयी न्यायी ठरविली जाते.
і від чого не могли ви у законі: , Мойсейовім справдити ся, у Тому всякий віруючий оправдуєть ся.
40 ४० संदेष्टयांनी सांगितलेल्या काही गोष्टी घडतील, सावध राहा! या गोष्टी तुमच्याबाबत होऊ नयेत म्हणून जपा.
Гледїть же, щоб не прийшло на вас те, що сказано в пророків:
41 ४१ अहो धिक्कार करणाऱ्यांनो, पाहा, आश्चर्य करा व नाहीसे व्हा, कारण तुमच्या काळामध्ये मी एक कार्य करतो, ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही कोणी ते स्पष्ट करून सांगितले तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही.”
Дивіть ся, гордівники, та дивуйтесь, та й пощезайте, бо дїло роблю я в днї ваші, діло, котрому не увірили б, коли б хто розказував вам.
42 ४२ जेव्हा पौल व बर्णबा जाऊ लागले, तेव्हा लोक म्हणाले की, पुढील शब्बाथाच्या दिवशी परत या आणि आम्हास याविषयी अधिक सांगा.
Як же виходили вони з школи, просили їх погане, щоб і другої суботи говорили слова сї.
43 ४३ सभास्थानातील बैठक संपल्यावर अनेक यहूदी लोक आणि यहूदी मतानुसारी चालणारे इतर धार्मिक लोक पौल व बर्णबा यांच्यामागे गेले, पौल व बर्णबा यांनी त्या लोकांस देवाच्या कृपेत टिकून राहण्यास कळकळीची विनंती केली.
Як же розійшлась школа, тоді многі з Жидів і побожних нововірцїв ішли слїдом за Павлом та Варнавою, котрі, розмовляючи з ними, напоминали їх, щоб пробували в благодатї Божій.
44 ४४ पुढील शब्बाथवारी शहरातील जवळ जवळ सर्व लोक परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी एकत्र जमले.
А другої суботи мало не ввесь город зібрав ся слухати слово Боже.
45 ४५ यहूदी लोकांनी त्या सर्वांना तेथे पाहिले, त्यामुळे यहूदी लोकांस मत्सर वाटू लागला, तेही काही फार वाईट गोष्टी बोलले आणि जे पौल बोलला त्याविरुद्ध वाद उपस्थित केला.
Видївши ж Жиди народ, сповнились завистю, і перечили речам Павла та хулили.
46 ४६ पण पौल व बर्णबा फार धैर्याने बोलले, ते म्हणाले, “देवाचे वचन तुम्हा यहूद्यांना प्रथम आम्हास सांगितलेच पाहिजे, पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात, तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेत आहात व अनंतकाळचे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहात! म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशांतील परराष्ट्रीय लोकांकडे जाऊ. (aiōnios g166)
Озвавшись Павел та Варнава, сказали сьміливо: До вас треба було перше промовити слово Боже; коли ж відкинули ви його і вважаєте себе за недостойних життя вічнього, то ось обертаємось до поган. (aiōnios g166)
47 ४७ प्रभूने आम्हास आज्ञा दिली आहे की, ‘परराष्ट्रीयांसाठी मी तुम्हास प्रकाश असे केले यासाठी की, तुम्ही पृथ्वीवरील सर्व लोकांस तारणाचा मार्ग दाखवू शकाल.’
Так бо заповів нам Господь: Я поставив тебе сьвітлом поганам, щоб був ти на спасеннє до краю землї.
48 ४८ जेव्हा यहूदी नसलेल्यांनी पौलाला असे बोलताना ऐकले तेव्हा ते फार आनंदित झाले, परमेश्वराच्या वचनाला त्यांनी गौरव दिले आणि त्या लोकांपैकी पुष्कळांनी वचनावर विश्वास ठेवला, कारण ते अनंतकाळच्या जीवनासाठी निवडले गेले होते. (aiōnios g166)
Слухаючи ж погане, зраділи, і прославляли слово Господнє, і увірували, скільки було їх призначено до вічнього життя. (aiōnios g166)
49 ४९ आणि परमेश्वराचा संदेश संपूर्ण देशात सांगितला गेला.”
Розносило ся ж слово Боже по всій тій сторонї.
50 ५० तेव्हा यहूदी लोकांनी शहरातील काही धार्मिक स्त्रिया व पुढारी यांना भडकावून दिले, त्या लोकांनी पौल व बर्णबा यांच्याविरुद्ध अनेक वाईट गोष्टी केल्या आणि त्यांना शहराबाहेर घालवून दिले.
Жиди ж наустили побожних та І поважних жінок і перших у городі, і підняли гоненнє на Павла та Варнаву, та й вигнали їх із гряниць своїх.
51 ५१ मग पौल व बर्णबा यांनी आपल्या पायाची धूळ झटकली व ते इकुन्या शहराला गेले.
Вони ж обтрусивши порох од ніг своїх на них, пійшли в Іконию.
52 ५२ इकडे येशूचे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.
Ученики ж сповнились радощами та сьвятим Духом.

< प्रेषि. 13 >