< प्रेषि. 13 >
1 १ अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते, ते पुढीलप्रमाणेः बर्णबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, मनाएन (जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला होता) आणि शौल.
Na igreja de Antioquia havia os seguintes profetas e mestres: Barnabé, Simeão, chamado “o Negro”, Lúcio de Cirene, Manaém (amigo de infância de Herodes, o tetrarca) e Saulo.
2 २ ही सर्व माणसे परमेश्वराची आराधना करीत व उपवास करीत असता, पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौलाला ह्यांना ज्या कामासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करा.”
Enquanto eles estavam adorando o Senhor e jejuando, o Espírito Santo disse: “Separem Barnabé e Saulo para que façam o trabalho para o qual eu os chamei.”
3 ३ म्हणून मंडळीने उपवास व प्रार्थना केल्या, त्यांनी बर्णबा व शौल यांच्या डोक्यांवर हात ठेवून प्रार्थना केली, मग त्यांना पाठवून दिले.
Depois que eles jejuaram, oraram e colocaram as suas mãos sobre eles para abençoá-los, eles enviaram Barnabé e Saulo para a sua missão.
4 ४ पवित्र आत्म्याच्याद्वारे बर्णबा व शौल यांना पाठविण्यात आले, ते सलुकीयात गेले, नंतर तेथून समुद्रमार्गे कुप्र बेटावर गेले.
Então, Barnabé e Saulo, orientados pelo Espírito Santo, foram para Selêucia. De lá, eles partiram de barco para a ilha de Chipre.
5 ५ ते जेव्हा सलमी शहरात आले, तेव्हा त्यांनी देवाचे वचनाची यहूदी लोकांच्या सभास्थानात घोषणा केली मार्क म्हटलेला योहान हाही त्यांच्या मदतीला होता.
Chegando na cidade de Salamina, eles anunciaram a palavra de Deus nas sinagogas judaicas. João estava com eles como auxiliar.
6 ६ ते संपूर्ण बेट पार करून पफे शहरास गेले, पफे येथे त्यांना एक यहूदी मनुष्य भेटला, तो जादूच्या करामती करीत असे, त्याचे नाव बर्येशू होते, तो खोटा संदेष्टा होता.
Eles viajaram por toda a ilha e finalmente chegaram a Pafos. Lá, encontraram um mágico judeu, um falso profeta, chamado Barjesus.
7 ७ बर्येशू नेहमी सिर्ग्य पौल याच्या निकट राहण्याचा प्रयत्न करायचा, सिर्ग्य पौल राज्यपाल होता व तो हुशार होता, त्याने बर्णबा व शौल यांना आपणाकडे बोलावले, त्यास त्यांच्याकडून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दाखवली.
Ele era amigo do governador Sérgio Paulo, um homem inteligente. Sérgio Paulo convidou Barnabé e Saulo para visitá-lo, pois ele queria ouvir a palavra de Deus.
8 ८ परंतु अलीम “जादूगार” (त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे) हा बर्णबा व शौल यांच्याविरुद्ध होता, राज्यपालाने विश्वास ठेवू नये म्हणून अलीमने त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.
Mas, o mágico Elimas (este é o nome dele em grego) era contra os apóstolos e tentou evitar que o governador cresse em Deus.
9 ९ पण शौल, ज्याला पौलहि म्हणत, तो पवित्र आत्म्याने भरला होता, पौलाने त्याच्याकडे रोखून पाहिले व म्हणाला.
Então, Saulo, também chamado Paulo, cheio do Espírito Santo, olhou direto para Elimas e disse:
10 १० “सैतानाच्या पुत्रा तू दुष्टाईने व खोटेपणाने भरलेला आहेस, अवघ्या नीतिमानाच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय?
“Você está repleto de mentiras e de tudo o que é mau. Filho do diabo!, inimigo de tudo o que é justo!, você nunca desistirá de torcer os verdadeiros ensinamentos do Senhor?
11 ११ तर आता पाहा, प्रभूचा हात तुझ्यावर आहे, तू आंधळा होशील व काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही,” मग लागलेच अलीमावर धुके व अंधार पडला आणि तो आपल्याला कोणी हाती धरून चालवावे म्हणून इकडेतिकडे फिरुन मनुष्यांचा शोध करू लागला.
Escute! A mão do Senhor está sobre você e o deixará cego. Você não verá o sol por algum tempo.” Imediatamente, névoa e escuridão cobriram os olhos de Elimas e ele precisou encontrar alguém que o guiasse pela mão.
12 १२ तेव्हा जे झाले ते पाहून राज्यपालाने विश्वास ठेवला, प्रभूच्या शिक्षणाने तो चकित झाला.
Quando o governador viu o que havia acontecido, ele creu em Deus e ficou completamente maravilhado com os ensinamentos sobre o Senhor.
13 १३ पौल व जे त्याचे मित्र त्याच्याबरोबर होते ते पफेकडून समुद्रमार्गे निघाले, ते पंफुलियातील पिर्गा गावी आले, परंतु योहान त्यांना सोडून परत यरूशलेमे शहरास गेला.
Então, Paulo e os que estavam com ele navegaram da cidade de Pafos para Perge, na região da Panfília. Enquanto isso, João os deixou e voltou para Jerusalém.
14 १४ पौल व त्याच्या मित्रांनी त्यांचा प्रवास पुढे चालू ठेवला, पिर्गापासून पुढे ते पिसिदीयांतील अंत्युखियास गेले आणि शब्बाथ दिवशी ते सभास्थानात गेले आणि तेथे बसले.
Eles passaram por Perge e continuaram até Antioquia da Pisídia. No sábado, eles entraram na sinagoga e se sentaram.
15 १५ तेव्हा नियमशास्त्र आणि संदेष्टयांच्या लेखाचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्णबाला निरोप पाठविला, “बंधुनो, येथील लोकांस काही मदत होईल असे काही बोधवचने सांगा.”
Após a leitura da Lei e do livro dos Profetas, os líderes da sinagoga mandaram dizer-lhes: “Irmãos, por favor, compartilhem com o povo quaisquer palavras de encorajamento que possam ter.”
16 १६ पौल उभा राहिला आणि आपला हात उंचावून म्हणाला, “अहो इस्राएल लोकांनो व देवाचे भय धरणाऱ्यांनो, ऐका.
Paulo se levantou, fez um sinal com a mão, para pedir a atenção dos que lá estavam, e começou a falar: “Homens de Israel e todos os não-judeus que temem a Deus, ouçam-me!
17 १७ या इस्राएल लोकांच्या देवाने आपल्या वाडवडिलांची निवड केली आणि ते ज्या काळात मिसरमध्ये परकी म्हणून राहत होते, त्या काळात देवाने त्यांना अगणित केले आणि उभारलेल्या बाहूने त्यांना तेथून बाहेर आणले.
O Deus do povo de Israel escolheu nossos antepassados e deu ao nosso povo prosperidade durante a sua permanência no Egito. Depois, com o seu grande poder, ele os tirou do Egito e,
18 १८ आणि देवाने अरण्यातील चाळीस वर्षात त्यांना सहनशीलता दाखविली.
no deserto, aguentou aquela gente durante quarenta anos.
19 १९ देवाने कनानच्या प्रदेशातील सात राष्ट्रांना नाश केला, देवाने त्यांच्या जमिनी त्याच्या लोकांस दिल्या.
Após ter destruído sete nações que viviam na região de Canaã, Deus dividiu essa terra e deu-a como herança aos israelitas. Tudo isso levou cerca de quatrocentos e cinquenta anos.
20 २० हे सर्व साधारणपणे चारशेपन्नास वर्षात घडले, त्यानंतर देवाने शमुवेल संदेष्ट्यापर्यंत आपल्या लोकांस न्यायाधीश नेमून दिले.
Então, Deus lhes deu juízes para serem seus líderes até o tempo do profeta Samuel.
21 २१ मग लोकांनी राजाची मागणी केली, देवाने त्यांना किशाचा पुत्र शौल याला दिले, शौल हा बन्यामिनाच्या वंशातील होता, तो चाळीस वर्षापर्यंत राजा होता.
A partir daí, as pessoas pediram um rei, e Deus lhes deu Saul, filho de Quis, da tribo de Benjamim. Saul governou por quarenta anos.
22 २२ नंतर देवाने शौलाला काढून टाकले, देवाने दावीदाला त्यांचा राजा केले, दावीदाविषयी देव असे बोलला इशायाचा पुत्र, दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझी सर्व इच्छा पूर्ण करील.
Depois, Deus rejeitou Saul e fez de Davi o novo rei. Deus aprovou Davi, dizendo: ‘Encontrei em Davi, filho de Jessé, um homem que está de acordo com o meu coração. Ele fará tudo o que eu quero.’
23 २३ याच दाविदाच्या वंशजातून देवाने इस्राएल लोकांचा तारणारा आणिला, तो वंशज येशू आहे, देवाने हे करण्याचे अभिवचन दिले होते.
Jesus é descendente de Davi. Ele é o Salvador que Deus prometeu ao povo de Israel.
24 २४ येशू येण्यापूर्वी सर्व इस्राएली लोकांस योहानाने उपदेश केला, त्यांच्या अंतःकरणात बदल व्हावा म्हणून योहानाने लोकांस सांगितले की, त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे.
Antes de Jesus vir, João anunciou o batismo de arrependimento para todo o povo de Israel.
25 २५ जेव्हा योहान आपले काम संपवत होता, तेव्हा तो म्हणाला, ‘मी कोण आहे असे तुम्हास वाटते? मी ख्रिस्त नाही, तो नंतर येत आहे, त्याच्या वहाणांचे बंद सोडण्याची सुद्धा माझी लायकी नाही.’
Quando João já estava quase terminando a sua missão, ele disse: ‘Quem vocês acham que eu sou? Eu não sou aquele que vocês procuram. Mas, depois de mim, virá aquele cujas sandálias eu nem mesmo sou digno de desamarrar.’
26 २६ माझ्या बंधुनो, अब्राहामच्या कुटुंबातील पुत्रांनो आणि तुम्ही यहूदी नसलेले पण खऱ्या देवाची उपासना करणारे, ऐका! या तारणाची बातमी आम्हास सांगितली गेली.
Meus irmãos, descendentes de Abraão, e também vocês não-judeus, que são tementes a Deus: a mensagem desta salvação foi enviada para nós!
27 २७ यरूशलेम शहरामध्ये राहतात ते यहूदी व त्यांचे अधिकारी यांनी त्यास ओळखले नाही, येशू हा तारणारा होता, येशूविषयी जे शब्द संदेष्ट्यानी लिहिले ते यहूदी लोकांसाठी प्रत्येक शब्बाथाच्या वारी वाचले गेले, परंतु त्यांना ते समजले नाही, यहूदी लोकांनी येशूला दोषी ठरवल्याने त्यांनी ते भविष्यावाद्यांचे शब्द खरे ठरवले.
O povo que vive em Israel e os seus líderes não reconheceram Jesus e nem compreenderam as palavras dos profetas, que são lidas todos os sábados. Na verdade, eles cumpriram as profecias, ao condenar Jesus.
28 २८ येशूने का मरावे याचे खरे कारण ते शोधू शकले नाहीत, पण त्यांनी पिलाताला सांगितले की त्यास जिवे मारावे.
Mesmo que eles não tenham conseguido encontrar qualquer prova para condená-lo, ainda assim, eles pediram para que Pilatos o matasse.
29 २९ शास्त्रामध्ये येशूच्याबद्दल या गोष्टी लिहिल्या होत्या की, जे वाईट ते त्याच्याबाबतीत घडणारे होते, ते सर्व या यहूदी लोकांनी येशूला केले, मग त्यांनी येशूला वधस्तंभावरुन खाली घेतले व त्यास कबरेत ठेवले.
Depois que fizeram tudo como estava previsto nas Sagradas Escrituras, tiraram Jesus da cruz e o puseram em um túmulo.
30 ३० पण देवाने त्यास मरणातून उठवले.
Mas, Deus o ressuscitou dos mortos,
31 ३१ यानंतर, पुष्कळ दिवसांपर्यंत जे त्याच्याबरोबर होते, त्यांना गालील प्रांतापासून यरूशलेम शहरापर्यंत येशूने दर्शन दिले, ते लोक आता त्याचे साक्षीदार म्हणून लोकांसमोर आहेत.
e ele apareceu durante muitos dias para as pessoas que o tinham seguido da Galileia até Jerusalém. Esses seguidores agora são testemunhas que falam sobre Jesus para todos.
32 ३२ आम्ही तुम्हास देवाने जे अभिवचन आमच्या वाडवडिलांना दिले त्याविषयी सुवार्ता सांगतो.
Nós estamos aqui para trazer a vocês as boas novas da promessa que Deus fez aos nossos antepassados.
33 ३३ आम्ही त्यांची लेकरे आहोत आणि देवाने हे अभिवचन आमच्या बाबतीत खरे करून दाखविले, देवाने हे येशूला मरणातून पुन्हा उठविण्याद्वारे केले, आम्ही याविषयी स्तोत्रसंहितेमध्येसुद्धा वाचतोः ‘तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे.’
Promessa que ele cumpriu para nós, seus filhos, ao ressuscitar Jesus. Como está escrito no Salmo número dois: ‘Você é o meu Filho; hoje eu me tornei o seu Pai.’
34 ३४ शिवाय त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून त्याने त्यास मरणातून उठवले, याविषयी त्याने असे सांगितले आहे की, ‘दाविदाला देण्यात आलेली पवित्र व निश्चित आशीर्वाद तुम्हास देईन.’
Deus o ressuscitou, para que ele nunca mais morresse, como indicou ao dizer: ‘Eu cumprirei em favor de vocês as santas e fiéis promessas feitas a Davi.’
35 ३५ म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतोः ‘तू तुझ्या पवित्र पुरुषाला कबरेत कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.’
E, em outro salmo também é dito: ‘Não permitirá que o seu Santo apodreça no túmulo.’
36 ३६ कारण दावीद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून मरण पावला, आपल्या वाडवडिलांशेजारी त्यास पुरले आणि कबरेत त्याचे शरीर कुजले.
Mas Davi morreu, após ter feito o que Deus queria. Ele foi, então, sepultado com os seus antepassados, e o seu corpo se decompôs.
37 ३७ पण ज्याला देवाने मरणातून पुन्हा उठवले, त्यास कुजण्याचा अनुभव आला नाही.
Porém, aquele que Deus ressuscitou não experimentou a decadência do corpo.
38 ३८ बंधुनो, आम्ही जी घोषणा करीत आहोत ते तुम्ही समजून घेतले पाहिजेः या एकाकडूनच तुमच्या पापांची क्षमा तुम्हास मिळू शकते.
Meus irmãos, quero que entendam que nós estamos lhes dizendo que, por intermédio desse homem, podemos encontrar o perdão para os nossos pecados.
39 ३९ मोशेचे नियमशास्त्र तुम्हास तुमच्या पापांपासून मुक्त करणार नाही, पण प्रत्येक व्यक्ती जी त्याच्यावर विश्वास ठेवते, ती त्याच्याद्वारे त्या सर्वांविषयी न्यायी ठरविली जाते.
Ele torna os que creem nele moralmente justos, libertando-os de tudo que é errado. E isso é feito de uma maneira que nem mesmo a lei de Moisés conseguiria.
40 ४० संदेष्टयांनी सांगितलेल्या काही गोष्टी घडतील, सावध राहा! या गोष्टी तुमच्याबाबत होऊ नयेत म्हणून जपा.
Tenham cuidado para que não aconteça com vocês o que os profetas disseram:
41 ४१ अहो धिक्कार करणाऱ्यांनो, पाहा, आश्चर्य करा व नाहीसे व्हा, कारण तुमच्या काळामध्ये मी एक कार्य करतो, ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही कोणी ते स्पष्ट करून सांगितले तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही.”
‘Vocês, que desprezam a Deus, olhem com espanto e morram! Pois eu farei coisas que vocês nunca acreditariam ser possível, mesmo se alguém lhes dissesse!’”
42 ४२ जेव्हा पौल व बर्णबा जाऊ लागले, तेव्हा लोक म्हणाले की, पुढील शब्बाथाच्या दिवशी परत या आणि आम्हास याविषयी अधिक सांगा.
Quando Paulo e Barnabé estavam saindo da sinagoga, as pessoas pediram que eles voltassem novamente no sábado seguinte, para lhes falar mais sobre essas coisas.
43 ४३ सभास्थानातील बैठक संपल्यावर अनेक यहूदी लोक आणि यहूदी मतानुसारी चालणारे इतर धार्मिक लोक पौल व बर्णबा यांच्यामागे गेले, पौल व बर्णबा यांनी त्या लोकांस देवाच्या कृपेत टिकून राहण्यास कळकळीची विनंती केली.
Depois da reunião na sinagoga, muitos judeus e pessoas convertidas ao judaísmo seguiram Paulo e Barnabé, que falavam com eles, encorajando-os a continuarem firmes na graça de Deus.
44 ४४ पुढील शब्बाथवारी शहरातील जवळ जवळ सर्व लोक परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी एकत्र जमले.
No sábado seguinte, quase toda a cidade se reuniu para ouvi-los falar sobre a palavra de Deus.
45 ४५ यहूदी लोकांनी त्या सर्वांना तेथे पाहिले, त्यामुळे यहूदी लोकांस मत्सर वाटू लागला, तेही काही फार वाईट गोष्टी बोलले आणि जे पौल बोलला त्याविरुद्ध वाद उपस्थित केला.
No entanto, quando os judeus viram a multidão que estava lá reunida, ficaram com muita inveja e, então, começaram a dizer o contrário do que Paulo dizia e o insultaram.
46 ४६ पण पौल व बर्णबा फार धैर्याने बोलले, ते म्हणाले, “देवाचे वचन तुम्हा यहूद्यांना प्रथम आम्हास सांगितलेच पाहिजे, पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात, तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेत आहात व अनंतकाळचे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहात! म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशांतील परराष्ट्रीय लोकांकडे जाऊ. (aiōnios )
Então, cheios de coragem, Paulo e Barnabé disseram: “Nós precisávamos anunciar a palavra de Deus primeiro a vocês. Mas, já que a rejeitam, vocês mesmos estão decidindo que não são dignos da vida eterna e, por isso, iremos anunciar a mensagem de Deus para os não-judeus. (aiōnios )
47 ४७ प्रभूने आम्हास आज्ञा दिली आहे की, ‘परराष्ट्रीयांसाठी मी तुम्हास प्रकाश असे केले यासाठी की, तुम्ही पृथ्वीवरील सर्व लोकांस तारणाचा मार्ग दाखवू शकाल.’
Isso é o que o Senhor nos disse: ‘Eu fiz de você uma luz para os não judeus e, por meio de você, a salvação será levada para todos os cantos do mundo.’”
48 ४८ जेव्हा यहूदी नसलेल्यांनी पौलाला असे बोलताना ऐकले तेव्हा ते फार आनंदित झाले, परमेश्वराच्या वचनाला त्यांनी गौरव दिले आणि त्या लोकांपैकी पुष्कळांनी वचनावर विश्वास ठेवला, कारण ते अनंतकाळच्या जीवनासाठी निवडले गेले होते. (aiōnios )
Quando os não-judeus ouviram o que os apóstolos disseram, eles ficaram muito felizes e começaram a louvar a palavra do Senhor. E, todos os que foram escolhidos para ter a vida eterna creram em Deus. (aiōnios )
49 ४९ आणि परमेश्वराचा संदेश संपूर्ण देशात सांगितला गेला.”
Assim, a mensagem de Deus se espalhou por toda a região.
50 ५० तेव्हा यहूदी लोकांनी शहरातील काही धार्मिक स्त्रिया व पुढारी यांना भडकावून दिले, त्या लोकांनी पौल व बर्णबा यांच्याविरुद्ध अनेक वाईट गोष्टी केल्या आणि त्यांना शहराबाहेर घालवून दिले.
Mas, os judeus incitaram as mulheres religiosas importantes e os líderes da cidade para que perseguissem Paulo e Barnabé. Eles conseguiram que os dois fossem expulsos daquelas terras.
51 ५१ मग पौल व बर्णबा यांनी आपल्या पायाची धूळ झटकली व ते इकुन्या शहराला गेले.
Os apóstolos tiraram até o pó de suas sandálias, como um sinal de protesto contra eles, e se dirigiram para a cidade de Icônio.
52 ५२ इकडे येशूचे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.
E os cristãos de Antioquia da Pisídia transbordavam de alegria e eram cheios do Espírito Santo.