< प्रेषि. 11 >

1 यहूदी नसलेल्या लोकांनीसुद्धा देवाच्या वचनाचा स्वीकार केला आहे हे यहूदीया प्रांतातील प्रेषितांनी व बंधूनी ऐकले.
Die Apostel und die Brüder in Judäa hörten, daß auch die Heiden das Wort Gottes angenommen hätten.
2 पण जेव्हा पेत्र यरूशलेम शहरास आला, तेव्हा सुंता झालेला यहूदी विश्वासी गट त्याच्यावर टिका करू लागले.
Und als Petrus hinauf nach Jerusalem kam, stritten die aus der Beschneidung mit ihm und sagten:
3 ते म्हणाले, “जे सुंता न झालेले व परराष्ट्रीय आहेत अशा विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या घरी तुम्ही गेला, एवढेच नव्हे तर तुम्ही त्यांच्यासह जेवणही केले.”
Du bist zu Männern eingegangen, welche die Vorhaut haben, und hast gegessen mit ihnen.
4 म्हणून पेत्राने त्यांना सर्व घटना सविस्तर स्पष्ट करून सांगितल्या.
Petrus aber hob an und berichtete ihnen den Verlauf der Dinge also:
5 पेत्र म्हणाला, मी यापो शहरात प्रार्थना करीत असताना मला तंद्री लागल्यासारखे झाले व मी एक दृष्टांत पाहिला की, मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेली एक चादर माझ्यापर्यंत आली.
Ich war in der Stadt Joppe im Gebet und sah in einer Entzückung ein Gesicht: ein Gefäß wie ein großes Linnentuch kam vom Himmel herab und ward an vier Enden niedergelassen und kam bis zu mir,
6 मी त्याच्याकडे न्याहाळून पाहून विचार करीत होतो, मी त्यामध्ये पृथ्वीवरील चार पायाचे प्राणी, जंगली पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशात उडणारे पक्षी मी त्यामध्ये पाहिले.
Ich sah darauf hin, ward gewahr, und sah vierfüßige Tiere der Erde und Gewild und Kriechtiere und Gevögel des Himmels.
7 एक वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली, “पेत्रा, ऊठ, मारून खा!”
Da hörte ich eine Stimme zu mir sprechen: Stehe auf, Petrus, schlachte und iß!
8 पण मी म्हणालो, “प्रभू, मी असे कधीही करणार नाही, मी अपवित्र किंवा अशुद्ध असे कधीच खाल्ले नाही.”
Ich sprach aber: Nimmermehr, Herr, denn noch nie ist Gemeines oder Unreines in meinen Mund gekommen.
9 आकाशातून त्या वाणीने पुन्हा उत्तर दिले, “देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत, त्यांना अशुद्ध म्हणू नकोस.”
Zum zweitenmal aber kam eine Stimme vom Himmel: Was Gott rein gemacht, das mache du nicht gemein.
10 १० असे तीन वेळा घडले, मग ते सर्व पुन्हा वर आकाशात घेतले गेले.
Dies geschah zu drei Malen; und alles ward wieder in den Himmel hinaufgezogen.
11 ११ इतक्यात पाहा, तीन माणसे ज्या घरामध्ये आम्ही होतो त्यापुढे कैसरीयाहून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहिली.
Und siehe, zur selben Stunde standen drei Männer vor dem Hause, darin ich war. Sie waren von Cäsarea an mich abgesandt.
12 १२ आत्म्याने मला कोणत्याही प्रकारचा संशय न धरिता त्यांच्याबरोबर जाण्यास सांगितले, हे सहा बंधू जे येथे आहेत, तेही माझ्याबरोबर होते, आम्ही कर्नेल्याच्या घरी गेलो.
Der Geist aber hieß mich ohne Bedenken mit ihnen gehen; es kamen aber mit mir auch die sechs Brüder da, und wir traten in das Haus des Mannes.
13 १३ कर्नेल्याने आपल्या घरात देवदूत उभा असलेला कसा दिसला हे आम्हास सांगितले, देवदूत कर्नेल्याला म्हणाला, “काही माणसे यापोस पाठव, शिमोन पेत्राला बोलावून घे.
Und er sagte uns an, wie er einen Engel in seinem Hause stehen sah, und derselbe zu ihm sprach: Sende nach Joppe und rufe Simon, mit dem Zunamen Petrus, zu dir,
14 १४ तो तुझ्याशी बोलेल, तो ज्या गोष्टी तुला सांगेल, त्यामुळे तुझे व तुझ्या कुटुंबाचे तारण होईल.”
Der wird Worte zu dir reden, durch die du mit deinem ganzen Haus wirst selig werden.
15 १५ त्यानंतर मी माझ्या भाषणाला सुरुवात केली, सुरुवातीला ज्याप्रमाणे पवित्र आत्मा आपल्यावर आला तसाच तो त्यांच्यावरही आला.
Als ich nun anfing zu reden, fiel der Heilige Geist auf sie, wie auch auf uns am Anfang.
16 १६ तेव्हा मला प्रभूचे शब्द आठवले, प्रभू म्हणाला होता, “योहान लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करीत असे हे खरे, पण तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.”
Da gedachte ich an das Wort des Herrn, das Er sprach: Johannes hat mit Wasser getauft, ihr aber sollt mit dem Heiligen Geiste getauft werden.
17 १७ आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांस तसे त्यांसही देवाने सारखेच दान दिले, मग देवाला अडविणारा असा मी कोण?
So nun Gott ihnen die gleiche Gabe verlieh, wie auch uns, die an den Herrn Jesus Christus glaubten, wie hätte ich vermocht, Gott zu wehren?
18 १८ जेव्हा त्यांनी या गोष्टी ऐकल्या, तेव्हा ते शांत राहिले, त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले, “तर मग देवाने परराष्ट्रीयांसही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे.”
Als sie diese Worte hörten, gaben sie sich zufrieden, lobten Gott und sprachen: So hat denn Gott auch den Heiden die Buße zum Leben gegeben.
19 १९ स्तेफन मारला गेल्यानंतरच्या काळात जो छळ झाला, त्यामुळे विश्वास ठेवणारे यरूशलेम शहरापासून दूर ठिकाणी फेनीके प्रांत, कुप्र बेट व अंत्युखिया शहरापर्यंत पांगले गेले, विश्वास ठेवणाऱ्यांनी या ठिकाणी फक्त यहूदी लोकांसच सुवार्ता सांगितली.
Die nun, welche sich zerstreut hatten wegen der Verfolgung, die sich über Stephanus erhob, zogen umher bis Phönizien, Zypern und Antiochia, und trugen niemand, als Juden, das Wort vor.
20 २० यातील काही विश्वास ठेवणारे कुप्र व कुरेने येथे राहणारे होते, जेव्हा हे लोक अंत्युखियात आले, तेव्हा त्यांनी या ग्रीक लोकांस येशूविषयीची सुवार्ता सांगितली.
Es waren aber etliche unter ihnen, Männer aus Zypern und Cyrene, die nach Antiochia kamen und auch zu den Griechen redeten und die Heilsbotschaft vom Herrn Jesus verkündeten.
21 २१ प्रभू विश्वास ठेवणाऱ्यांना मदत करीत होता आणि बऱ्याच मोठ्या गटाने विश्वास ठेवला व ते प्रभूला अनुसरू लागले.
Und die Hand des Herrn war mit ihnen, und eine große Zahl ward gläubig und bekehrte sich zum Herrn.
22 २२ याविषयीची बातमी यरूशलेम शहरातील विश्वास ठेवणाऱ्या मंडळीच्या कानावर आली, म्हणून यरूशलेम शहरातील विश्वास ठेवणाऱ्यांनी बर्णबाला अंत्युखियाला पाठवले.
Es kam aber die Rede davon der Gemeinde in Jerusalem zu Ohren, und sie sandten Barnabas ab, daß er bis nach Antiochien zöge.
23 २३ बर्णबा चांगला मनुष्य होता, तो पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्णपणे भरलेला होता, जेव्हा बर्णबा अंत्युखियाला गेला, तेव्हा त्याने पाहिले की, देवाने या लोकांवर खूप कृपा केली आहे, त्यामुळे बर्णबाला खूप आनंद झाला, अंत्युखियातील सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने उत्तेजन दिले, त्याने त्यांना सांगितले, कधीही तुमचा विश्वास गमावू नका, नेहमी प्रभूची आज्ञा अंतःकरणापासून पाळा.
Als er dahin kam und die Gnade Gottes sah, ward er erfreut, und ermahnte alle, mit Festigkeit des Herzens beim Herrn zu verharren.
24 २४ तो चागंला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता; तेव्हा प्रभूला पुष्कळजण मिळाले.
Denn er war ein wackerer Mann und voll Heiligen Geistes und Glaubens, und eine große Menge ward dem Herrn zugetan.
25 २५ जेव्हा बर्णबा तार्सास गेला तेव्हा तो शौलाचा शोध घेत होता.
Von da ging er aus gen Tarsus, um Saul aufzusuchen; und da er ihn gefunden, führte er ihn gen Antiochia.
26 २६ जेव्हा बर्णबाने त्यास शोधले तेव्हा त्याने शौलाला आपल्यासह अंत्युखियाला आणले, शौलाने व बर्णबाने वर्षभर तेथे मंडळीत राहून पुष्कळ लोकांस शिकवले, अंत्युखियामध्ये येशूच्या अनुयायांना ‘ख्रिस्ती’ हे नाव पहिल्यांदा मिळाले.
Ein ganzes Jahr blieben sie mit der Gemeinde zusammen, lehrten viel Volk, und brachten es dahin, daß die Jünger in Antiochia zuerst Christen genannt wurden.
27 २७ याच काळात काही संदेष्टे यरूशलेम शहराहून अंत्युखियास आले.
In selbigen Tagen aber kamen Propheten von Jerusalem herab nach Antiochien.
28 २८ यांच्यापैकी एकाचे नाव अगब होते, अंत्युखियात तो उभा राहिला आणि बोलू लागला, पवित्र आत्म्याच्या साहाय्याने तो म्हणाला, फार वाईट काळ सर्व पृथ्वीवर येत आहे, लोकांस खायला अन्न मिळणार नाही, क्लौदिया राजा राज्य करीत होता तेव्हा त्याच्या काळात हे घडले.
Einer von ihnen, mit Namen Agabus, trat auf und deutete durch den Geist, daß über alles Land eine große Teuerung kommen würde, die auch eintrat unter Claudius.
29 २९ विश्वास ठेवणाऱ्यांनी ठरवले की, यहूदीया येथील आपल्या बंधू व भगिनींना जास्तीत जास्त मदत पाठविण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक शिष्याने जास्तीत जास्त मदत पाठवण्याचे ठरवले.
Von den Jüngern aber beschloß ein jeder, je nach seinem Vermögen eine Unterstützung zu senden den Brüdern, die in Judäa wohnten;
30 ३० त्यांनी पैसे गोळा करून बर्णबा व शौल यांच्याकडे दिले, मग बर्णबा व शौल यांनी ते पैसे यहूदीयातील वडीलजनांकडे पाठवून दिले.
Was sie auch taten, indem sie solche durch Barnabas und Saulus absendeten.

< प्रेषि. 11 >