< प्रेषि. 11 >
1 १ यहूदी नसलेल्या लोकांनीसुद्धा देवाच्या वचनाचा स्वीकार केला आहे हे यहूदीया प्रांतातील प्रेषितांनी व बंधूनी ऐकले.
And the apostles and the brothers who are in Judea heard that the nations also received the word of God,
2 २ पण जेव्हा पेत्र यरूशलेम शहरास आला, तेव्हा सुंता झालेला यहूदी विश्वासी गट त्याच्यावर टिका करू लागले.
and when Peter came up to Jerusalem, those of circumcision were contending with him,
3 ३ ते म्हणाले, “जे सुंता न झालेले व परराष्ट्रीय आहेत अशा विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या घरी तुम्ही गेला, एवढेच नव्हे तर तुम्ही त्यांच्यासह जेवणही केले.”
saying, “You went in to uncircumcised men, and ate with them!”
4 ४ म्हणून पेत्राने त्यांना सर्व घटना सविस्तर स्पष्ट करून सांगितल्या.
And Peter having begun, set [it] forth to them in order, saying,
5 ५ पेत्र म्हणाला, मी यापो शहरात प्रार्थना करीत असताना मला तंद्री लागल्यासारखे झाले व मी एक दृष्टांत पाहिला की, मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेली एक चादर माझ्यापर्यंत आली.
“I was in the city of Joppa praying, and I saw in a trance a vision, a certain vessel coming down, as a great sheet by four corners being let down out of Heaven, and it came to me;
6 ६ मी त्याच्याकडे न्याहाळून पाहून विचार करीत होतो, मी त्यामध्ये पृथ्वीवरील चार पायाचे प्राणी, जंगली पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशात उडणारे पक्षी मी त्यामध्ये पाहिले.
at which having looked steadfastly, I was considering, and I saw the four-footed beasts of the earth, and the wild beasts, and the creeping things, and the birds of the sky;
7 ७ एक वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली, “पेत्रा, ऊठ, मारून खा!”
and I heard a voice saying to me, Having risen, Peter, slay and eat;
8 ८ पण मी म्हणालो, “प्रभू, मी असे कधीही करणार नाही, मी अपवित्र किंवा अशुद्ध असे कधीच खाल्ले नाही.”
and I said, Not so, Lord, because anything common or unclean has at no time entered into my mouth;
9 ९ आकाशातून त्या वाणीने पुन्हा उत्तर दिले, “देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत, त्यांना अशुद्ध म्हणू नकोस.”
and a voice answered me a second time out of Heaven, What God cleansed, you do not declare common.
10 १० असे तीन वेळा घडले, मग ते सर्व पुन्हा वर आकाशात घेतले गेले.
And this happened three times, and again was all drawn up to Heaven,
11 ११ इतक्यात पाहा, तीन माणसे ज्या घरामध्ये आम्ही होतो त्यापुढे कैसरीयाहून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहिली.
and behold, immediately, three men stood at the house in which I was, having been sent from Caesarea to me,
12 १२ आत्म्याने मला कोणत्याही प्रकारचा संशय न धरिता त्यांच्याबरोबर जाण्यास सांगितले, हे सहा बंधू जे येथे आहेत, तेही माझ्याबरोबर होते, आम्ही कर्नेल्याच्या घरी गेलो.
and the Spirit said to me to go with them, doubting nothing, and these six brothers also went with me, and we entered into the house of the man,
13 १३ कर्नेल्याने आपल्या घरात देवदूत उभा असलेला कसा दिसला हे आम्हास सांगितले, देवदूत कर्नेल्याला म्हणाला, “काही माणसे यापोस पाठव, शिमोन पेत्राला बोलावून घे.
he also declared to us how he saw the messenger standing in his house, and saying to him, Send men to Joppa, and call for Simon, who is surnamed Peter,
14 १४ तो तुझ्याशी बोलेल, तो ज्या गोष्टी तुला सांगेल, त्यामुळे तुझे व तुझ्या कुटुंबाचे तारण होईल.”
who will speak sayings by which you will be saved, you and all your house.
15 १५ त्यानंतर मी माझ्या भाषणाला सुरुवात केली, सुरुवातीला ज्याप्रमाणे पवित्र आत्मा आपल्यावर आला तसाच तो त्यांच्यावरही आला.
And in my beginning to speak, the Holy Spirit fell on them, even as also on us in the beginning,
16 १६ तेव्हा मला प्रभूचे शब्द आठवले, प्रभू म्हणाला होता, “योहान लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करीत असे हे खरे, पण तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.”
and I remembered the saying of the LORD, how He said, John indeed immersed in water, but you will be immersed in the Holy Spirit;
17 १७ आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांस तसे त्यांसही देवाने सारखेच दान दिले, मग देवाला अडविणारा असा मी कोण?
if then God gave to them the equal gift as also to us, having believed on the Lord Jesus Christ, I—how was I able to withstand God?”
18 १८ जेव्हा त्यांनी या गोष्टी ऐकल्या, तेव्हा ते शांत राहिले, त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले, “तर मग देवाने परराष्ट्रीयांसही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे.”
And they, having heard these things, were silent, and were glorifying God, saying, “Then, indeed, God also gave conversion to life to the nations.”
19 १९ स्तेफन मारला गेल्यानंतरच्या काळात जो छळ झाला, त्यामुळे विश्वास ठेवणारे यरूशलेम शहरापासून दूर ठिकाणी फेनीके प्रांत, कुप्र बेट व अंत्युखिया शहरापर्यंत पांगले गेले, विश्वास ठेवणाऱ्यांनी या ठिकाणी फक्त यहूदी लोकांसच सुवार्ता सांगितली.
Those, indeed, therefore, having been scattered abroad, from the tribulation that came after Stephen, went through to Phoenicia, and Cyprus, and Antioch, speaking the word to none except to Jews only;
20 २० यातील काही विश्वास ठेवणारे कुप्र व कुरेने येथे राहणारे होते, जेव्हा हे लोक अंत्युखियात आले, तेव्हा त्यांनी या ग्रीक लोकांस येशूविषयीची सुवार्ता सांगितली.
and there were certain of them, men of Cyprus and Cyrene, who having entered into Antioch, were speaking to the Hellenists, proclaiming good news—the Lord Jesus,
21 २१ प्रभू विश्वास ठेवणाऱ्यांना मदत करीत होता आणि बऱ्याच मोठ्या गटाने विश्वास ठेवला व ते प्रभूला अनुसरू लागले.
and the hand of the LORD was with them, a great number also, having believed, turned to the LORD.
22 २२ याविषयीची बातमी यरूशलेम शहरातील विश्वास ठेवणाऱ्या मंडळीच्या कानावर आली, म्हणून यरूशलेम शहरातील विश्वास ठेवणाऱ्यांनी बर्णबाला अंत्युखियाला पाठवले.
And the account was heard in the ears of the assembly that [is] in Jerusalem concerning them, and they sent forth Barnabas to go through to Antioch,
23 २३ बर्णबा चांगला मनुष्य होता, तो पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्णपणे भरलेला होता, जेव्हा बर्णबा अंत्युखियाला गेला, तेव्हा त्याने पाहिले की, देवाने या लोकांवर खूप कृपा केली आहे, त्यामुळे बर्णबाला खूप आनंद झाला, अंत्युखियातील सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने उत्तेजन दिले, त्याने त्यांना सांगितले, कधीही तुमचा विश्वास गमावू नका, नेहमी प्रभूची आज्ञा अंतःकरणापासून पाळा.
who, having come, and having seen the grace of God, was glad, and was exhorting all with purpose of heart to cleave to the LORD,
24 २४ तो चागंला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता; तेव्हा प्रभूला पुष्कळजण मिळाले.
because he was a good man, and full of the Holy Spirit, and of faith, and a great multitude was added to the LORD.
25 २५ जेव्हा बर्णबा तार्सास गेला तेव्हा तो शौलाचा शोध घेत होता.
And Barnabas went forth to Tarsus, to seek for Saul,
26 २६ जेव्हा बर्णबाने त्यास शोधले तेव्हा त्याने शौलाला आपल्यासह अंत्युखियाला आणले, शौलाने व बर्णबाने वर्षभर तेथे मंडळीत राहून पुष्कळ लोकांस शिकवले, अंत्युखियामध्ये येशूच्या अनुयायांना ‘ख्रिस्ती’ हे नाव पहिल्यांदा मिळाले.
and having found him, he brought him to Antioch, and it came to pass that they assembled together a whole year in the assembly, and taught a great multitude, and the disciples were first called Christians in Antioch.
27 २७ याच काळात काही संदेष्टे यरूशलेम शहराहून अंत्युखियास आले.
And in those days there came from Jerusalem prophets to Antioch,
28 २८ यांच्यापैकी एकाचे नाव अगब होते, अंत्युखियात तो उभा राहिला आणि बोलू लागला, पवित्र आत्म्याच्या साहाय्याने तो म्हणाला, फार वाईट काळ सर्व पृथ्वीवर येत आहे, लोकांस खायला अन्न मिळणार नाही, क्लौदिया राजा राज्य करीत होता तेव्हा त्याच्या काळात हे घडले.
and one of them, by name Agabus, having stood up, signified through the Spirit a great scarcity is about to be throughout all the world—which also came to pass in the time of Claudius Caesar—
29 २९ विश्वास ठेवणाऱ्यांनी ठरवले की, यहूदीया येथील आपल्या बंधू व भगिनींना जास्तीत जास्त मदत पाठविण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक शिष्याने जास्तीत जास्त मदत पाठवण्याचे ठरवले.
and the disciples, according as anyone was prospering, determined each of them to send for ministry to the brothers dwelling in Judea,
30 ३० त्यांनी पैसे गोळा करून बर्णबा व शौल यांच्याकडे दिले, मग बर्णबा व शौल यांनी ते पैसे यहूदीयातील वडीलजनांकडे पाठवून दिले.
which also they did, having sent to the elders by the hand of Barnabas and Saul.