< प्रेषि. 10 >

1 कर्नेल्य नावाचा मनुष्य कैसरीयामध्ये राहत होता, तो इटलीक नावाच्या पलटणीत शताधिपती होता.
ไกสริยานคร อิตาลิยาขฺยไสนฺยานฺตรฺคต: กรฺณีลิยนามา เสนาปติราสีตฺ
2 कर्नेल्य हा भक्तीमान असून आपल्या कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा होता; तो गोरगरिबांना पुष्कळसा दानधर्म करीत असे आणि तो नेहमी देवाची प्रार्थना करीत असे.
ส สปริวาโร ภกฺต อีศฺวรปรายณศฺจาสีตฺ; โลเกโภฺย พหูนิ ทานาทีนิ ทตฺวา นิรนฺตรมฺ อีศฺวเร ปฺรารฺถยาญฺจเกฺรฯ
3 एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, कर्नेल्याला दृष्टांत झाला, त्याने तो स्पष्टपणे पाहिला, त्या दृष्टांतांत देवाचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्यास म्हणाला, “कर्नेल्या!”
เอกทา ตฺฤตียปฺรหรเวลายำ ส ทฺฤษฺฏวานฺ อีศฺวรไสฺยโก ทูต: สปฺรกาศํ ตตฺสมีปมฺ อาคตฺย กถิตวานฺ, เห กรฺณีลิยฯ
4 कर्नेल्य देवदूताकडे पाहून भयभीत होऊन आणि म्हणाला. “काय आहे, प्रभू?” देवदूत कर्नेल्याला म्हणाला, “देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, ज्या गोष्टी तू गरीबांना दिल्या आहेत, त्या देवाने पाहिल्या आहेत देवाला तुझी आठवण आहे.”
กินฺตุ ส ตํ ทฺฤษฺฏฺวา ภีโต'กถยตฺ, เห ปฺรโภ กึ? ตทา ตมวทตฺ ตว ปฺรารฺถนา ทานาทิ จ สากฺษิสฺวรูปํ ภูเตฺวศฺวรสฺย โคจรมภวตฺฯ
5 तू यापो गावी माणसे पाठीव आणि शिमोन नावाच्या मनुष्यास घेऊ नये, शिमोनाला पेत्र असे सुद्धा म्हणतात.
อิทานีํ ยาโผนครํ ปฺรติ โลกานฺ เปฺรษฺย สมุทฺรตีเร ศิโมนฺนามฺนศฺจรฺมฺมการสฺย คฺฤเห ปฺรวาสการี ปิตรนามฺนา วิขฺยาโต ย: ศิโมนฺ ตมฺ อาหฺวายย;
6 तो शिमोन नावाच्या चांभाराच्या घरी राहत आहे त्याचे घर समुद्रकिनारी आहे.
ตสฺมาตฺ ตฺวยา ยทฺยตฺ กรฺตฺตวฺยํ ตตฺตตฺ ส วทิษฺยติฯ
7 कर्नेल्याशी बोलणे झाल्यावर देवदूत निघून गेला नंतर कर्नेल्याने त्याचे दोन विश्वासू नोकर व एका धर्मशील शिपायाला बोलावून घेतले.
อิตฺยุปทิศฺย ทูเต ปฺรสฺถิเต สติ กรฺณีลิย: สฺวคฺฤหสฺถานำ ทาสานำ เทฺวา ชเนา นิตฺยํ สฺวสงฺคินำ ไสนฺยานามฺ เอกำ ภกฺตเสนาญฺจาหูย
8 कर्नेल्याने या तिघांना घडलेले सर्वकाही सांगितले आणि त्यांना यापोला पाठवले.
สกลเมตํ วฺฤตฺตานฺตํ วิชฺญาปฺย ยาโผนครํ ตานฺ ปฺราหิโณตฺฯ
9 दुसऱ्या दिवशीही माणसे यापो गावाजवळ आली, ती दुपारची वेळ होती, त्याचवेळी प्रार्थना करावयास पेत्र गच्चीवर गेला.
ปรสฺมินฺ ทิเน เต ยาตฺรำ กฺฤตฺวา ยทา นครสฺย สมีป อุปาติษฺฐนฺ, ตทา ปิตโร ทฺวิตียปฺรหรเวลายำ ปฺรารฺถยิตุํ คฺฤหปฺฤษฺฐมฺ อาโรหตฺฯ
10 १० पेत्राला भूक लागली होती, त्यास काही खावेसे वाटले, ते पेत्रासाठी जेवणाची तयारी करीत असता पेत्राला तंद्री लागली.
เอตสฺมินฺ สมเย กฺษุธารฺตฺต: สนฺ กิญฺจิทฺ โภกฺตุมฺ ไอจฺฉตฺ กินฺตุ เตษามฺ อนฺนาสาทนสมเย ส มูรฺจฺฉิต: สนฺนปตตฺฯ
11 ११ आणि आपल्यासमोर आकाश उघडले असून मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेली एक चादर पृथ्वीवर उतरत आहे असा दृष्टांत त्यास झाला.
ตโต เมฆทฺวารํ มุกฺตํ จตุรฺภิ: โกไณ รฺลมฺพิตํ พฺฤหทฺวสฺตฺรมิว กิญฺจน ภาชนมฺ อากาศาตฺ ปฺฤถิวีมฺ อวาโรหตีติ ทฺฤษฺฏวานฺฯ
12 १२ त्यामध्ये पृथ्वीवरील सर्वप्रकारचे चालणारे, सरपटणारे, आकाशात उडणारे पक्षी होते.
ตนฺมเธฺย นานปฺรการา คฺรามฺยวนฺยปศว: เขจโรโรคามิปฺรภฺฤตโย ชนฺตวศฺจาสนฺฯ
13 १३ नंतर एक वाणी पेत्राने ऐकली, “पेत्रा, ऊठ; यापैकी कोणताही प्राणी मारून खा.”
อนนฺตรํ เห ปิตร อุตฺถาย หตฺวา ภุํกฺษฺว ตมฺปฺรตียํ คคณียา วาณี ชาตาฯ
14 १४ पण पेत्र म्हणाला, “मी तसे कधीच करणार नाही, प्रभू जे अशुद्ध व अपवित्र आहे असे कोणतेही अन्न मी कधी खाल्लेले नाही.”
ตทา ปิตร: ปฺรตฺยวทตฺ, เห ปฺรโภ อีทฺฤศํ มา ภวตุ, อหมฺ เอตตฺ กาลํ ยาวตฺ นิษิทฺธมฺ อศุจิ วา ทฺรวฺยํ กิญฺจิทปิ น ภุกฺตวานฺฯ
15 १५ पण ती वाणी त्यास पुन्हा म्हणाली, “देवाने या गोष्टी शुद्ध केल्या आहेत, त्यांना अशुद्ध म्हणू नकोस.”
ตต: ปุนรปิ ตาทฺฤศี วิหยสียา วาณี ชาตา ยทฺ อีศฺวร: ศุจิ กฺฤตวานฺ ตตฺ ตฺวํ นิษิทฺธํ น ชานีหิฯ
16 १६ असे तीन वेळा घडले; मग ते पात्र आकाशात वर घेतले गेले.
อิตฺถํ ตฺริ: สติ ตตฺ ปาตฺรํ ปุนรากฺฤษฺฏํ อากาศมฺ อคจฺฉตฺฯ
17 १७ पेत्र भयचकित होऊन या दृष्टांताचा अर्थ काय असावा याविषयी विचार करू लागला, ज्या लोकांस कर्नेल्याने पाठवले होते, त्यांना शिमोनाचे घर सापडले ते दाराजवळ उभे होते.
ตต: ปรํ ยทฺ ทรฺศนํ ปฺราปฺตวานฺ ตสฺย โก ภาว อิตฺยตฺร ปิตโร มนสา สนฺเทคฺธิ, เอตสฺมินฺ สมเย กรฺณีลิยสฺย เต เปฺรษิตา มนุษฺยา ทฺวารสฺย สนฺนิธาวุปสฺถาย,
18 १८ त्यांनी विचारले, “शिमोन पेत्र येथेच राहतो काय?”
ศิโมโน คฺฤหมนฺวิจฺฉนฺต: สมฺปฺฤฉฺยาหูย กถิตวนฺต: ปิตรนามฺนา วิขฺยาโต ย: ศิโมนฺ ส กิมตฺร ปฺรวสติ?
19 १९ पेत्र या दृष्टांताविषयीच विचार करत असतांना, आत्मा त्यास म्हणाला, “ऐक, तीन माणसे तुला शोधीत आहेत.
ยทา ปิตรสฺตทฺทรฺศนสฺย ภาวํ มนสานฺโทลยติ ตทาตฺมา ตมวทตฺ, ปศฺย ตฺรโย ชนาสฺตฺวำ มฺฤคยนฺเตฯ
20 २० ऊठ आणि पायऱ्या उतरून खाली जा, कारण मीच त्यांना पाठवले आहे, काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा.”
ตฺวมฺ อุตฺถายาวรุหฺย นิ: สนฺเทหํ ไต: สห คจฺฉ มไยว เต เปฺรษิตา: ฯ
21 २१ मग पेत्र खाली त्या मनुष्यांकडे गेला, तो म्हणाला, “तुम्ही ज्याचा शोध करीत आहात तो मीच आहे, तुम्ही येथे का आलात?”
ตสฺมาตฺ ปิตโร'วรุหฺย กรฺณีลิยเปฺรริตโลกานำ นิกฏมาคตฺย กถิตวานฺ ปศฺยต ยูยํ ยํ มฺฤคยเธฺว ส ชโนหํ, ยูยํ กินฺนิมิตฺตมฺ อาคตา: ?
22 २२ ती माणसे म्हणाली, “एका पवित्र देवदूताने तुम्हास आमंत्रित करण्याविषयी कर्नेल्याला सांगितले होते कर्नेल्य हा शताधिपती आहे, तो नीतिमान मनुष्य आहे तो देवाची उपासना करतो, सर्व यहूदी लोक त्याचा आदर करतात, तुम्हास घरी बोलावून तुमचे शब्द ऐकावेत असे देवदूताने त्यास सांगितले आहे.”
ตตเสฺต ปฺรตฺยวทนฺ กรฺณีลิยนามา ศุทฺธสตฺตฺว อีศฺวรปรายโณ ยิหูทียเทศสฺถานำ สรฺเวฺวษำ สนฺนิเธา สุขฺยาตฺยาปนฺน เอก: เสนาปติ รฺนิชคฺฤหํ ตฺวามาหูย เนตุํ ตฺวตฺต: กถา โศฺรตุญฺจ ปวิตฺรทูเตน สมาทิษฺฏ: ฯ
23 २३ पेत्राने त्यांना आत बोलावून घेतले व रात्रभर मुक्काम करण्यास सांगितले, दुसऱ्या दिवशी पेत्र तयार झाला व त्या तीन मनुष्याबरोबर गेला, यापो येथील काही बंधूही पेत्राबरोबर गेले.
ตทา ปิตรสฺตานภฺยนฺตรํ นีตฺวา เตษามาติถฺยํ กฺฤตวานฺ, ปเร'หนิ ไต: สารฺทฺธํ ยาตฺรามกโรตฺ, ยาโผนิวาสินำ ภฺราตฺฤณำ กิยนฺโต ชนาศฺจ เตน สห คตา: ฯ
24 २४ दुसऱ्या दिवशी पेत्र कैसरीया शहरात आला, कर्नेल्य त्याची वाट पाहत होता, त्याने आपले जवळचे मित्र व नातेवाईक यांनाही आपल्या घरी जमा केले होते.
ปรสฺมินฺ ทิวเส ไกสริยานครมธฺยปฺรเวศสมเย กรฺณีลิโย ชฺญาติพนฺธูนฺ อาหูยานีย ตานฺ อเปกฺษฺย สฺถิต: ฯ
25 २५ जेव्हा पेत्र आत गेला, तेव्हा कर्नेल्य त्यास भेटला, कर्नेल्याने पेत्राच्या पाया पडून आदराने त्यास नमन केले.
ปิตเร คฺฤห อุปสฺถิเต กรฺณีลิยสฺตํ สากฺษาตฺกฺฤตฺย จรณโย: ปติตฺวา ปฺราณมตฺฯ
26 २६ पण पेत्र म्हणाला, “उभा राहा, मी तुझ्यासारखाच मनुष्य आहे.”
ปิตรสฺตมุตฺถาปฺย กถิตวานฺ, อุตฺติษฺฐาหมปิ มานุษ: ฯ
27 २७ पेत्र त्याच्याशी बोलत घरात गेला आणि आतमध्ये बरेच लोक जमलेले त्याने पाहिले.
ตทา กรฺณีลิเยน สากมฺ อาลปนฺ คฺฤหํ ปฺราวิศตฺ ตนฺมเธฺย จ พหุโลกานำ สมาคมํ ทฺฤษฺฏฺวา ตานฺ อวทตฺ,
28 २८ पेत्र त्या लोकांस म्हणाला, “तुम्ही हे जाणता की, यहूदी मनुष्याने इतर विदेशी लोकांच्या घरी जाणे किंवा त्यांच्याशी संबंध ठेवणे हे यहूदी नियमाला धरुन नाही, पण देवाने मला दाखविले आहे की, मी इतर मनुष्यमात्राला अशुद्ध किंवा अपवित्र मानू नये.
อนฺยชาตียโลไก: มหาลปนํ วา เตษำ คฺฤหมเธฺย ปฺรเวศนํ ยิหูทียานำ นิษิทฺธมฺ อสฺตีติ ยูยมฺ อวคจฺฉถ; กินฺตุ กมปิ มานุษมฺ อวฺยวหารฺยฺยมฺ อศุจึ วา ชฺญาตุํ มม โนจิตมฺ อิติ ปรเมศฺวโร มำ ชฺญาปิตวานฺฯ
29 २९ याच कारणासाठी जेव्हा हे लोक मला बोलावण्यास आले, तेव्हा मी त्यांच्याशी वाद घातला नाही, आता, कृपाकरून मला सांगा, तुम्ही मला येथे का बोलावले?”
อิติ เหโตราหฺวานศฺรวณมาตฺราตฺ กาญฺจนาปตฺติมฺ อกฺฤตฺวา ยุษฺมากํ สมีปมฺ อาคโตสฺมิ; ปฺฤจฺฉามิ ยูยํ กินฺนิมิตฺตํ มามฺ อาหูยต?
30 ३० कर्नेल्य म्हणाला, “चार दिवसांपूर्वी, माझ्या घरांमध्ये मी प्रार्थना करीत होतो, बरोबर याच वेळेला म्हणजे दुपारचे तीन वाजता मी प्रार्थना करीत होतो, अचानक एक मनुष्य माझ्यासमोर उभा राहिला, त्याने लखलखीत, चमकदार कपडे घातले होते.”
ตทา กรฺณีลิย: กถิตวานฺ, อทฺย จตฺวาริ ทินานิ ชาตานิ เอตาวเทฺวลำ ยาวทฺ อหมฺ อนาหาร อาสนฺ ตตสฺตฺฤตียปฺรหเร สติ คฺฤเห ปฺรารฺถนสมเย เตโชมยวสฺตฺรภฺฤทฺ เอโก ชโน มม สมกฺษํ ติษฺฐนฺ เอตำ กถามฺ อกถยตฺ,
31 ३१ तो मनुष्य म्हणाला, “कर्नेल्या देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, गरीब लोकांस ज्या वस्तू तू दिल्या आहेत ते देवाने पाहिले आहे, देव तुझी आठवण करतो.
เห กรฺณีลิย ตฺวทียา ปฺรารฺถนา อีศฺวรสฺย กรฺณโคจรีภูตา ตว ทานาทิ จ สากฺษิสฺวรูปํ ภูตฺวา ตสฺย ทฺฤษฺฏิโคจรมภวตฺฯ
32 ३२ म्हणून यापो या शहरी काही माणसे पाठव व शिमोन पेत्राला बोलावून घे, पेत्र हा शिमोन चांभाराच्या घरी राहत आहे आणि त्याचे घर समुद्राच्या जवळ आहे.
อโต ยาโผนครํ ปฺรติ โลกานฺ ปฺรหิตฺย ตตฺร สมุทฺรตีเร ศิโมนฺนามฺน: กสฺยจิจฺจรฺมฺมการสฺย คฺฤเห ปฺรวาสการี ปิตรนามฺนา วิขฺยาโต ย: ศิโมนฺ ตมาหูยย; ตต: ส อาคตฺย ตฺวามฺ อุปเทกฺษฺยติฯ
33 ३३ तेव्हा मी लागलीच तुम्हास निरोप पाठविला, तुम्ही येथे आलात ही तुमची मोठी कृपा आहे, तेव्हा आम्हास जे काही सांगण्याची आज्ञा प्रभूने तुम्हास दिली आहे, ते ऐकण्यासाठी आम्ही सर्व आता येथे देवासमोर जमलेले आहोत.”
อิติ การณาตฺ ตตฺกฺษณาตฺ ตว นิกเฏ โลกานฺ เปฺรษิตวานฺ, ตฺวมาคตวานฺ อิติ ภทฺรํ กฺฤตวานฺฯ อีศฺวโร ยานฺยาขฺยานานิ กถยิตุมฺ อาทิศตฺ ตานิ โศฺรตุํ วยํ สรฺเวฺว สามฺปฺรตมฺ อีศฺวรสฺย สากฺษาทฺ อุปสฺถิตา: สฺม: ฯ
34 ३४ पेत्राने बोलायला सुरुवात केली मला आता हे खरोखर समजले आहे की, “देवाला प्रत्येक मनुष्य सारखाच आहे.
ตทา ปิตร อิมำ กถำ กถยิตุมฺ อารพฺธวานฺ, อีศฺวโร มนุษฺยาณามฺ อปกฺษปาตี สนฺ
35 ३५ प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भक्ती करतो आणि योग्य ते करतो, त्यास देव स्वीकारतो, व्यक्ती कोणत्या देशाची आहे, हे महत्त्वाचे नाही.
ยสฺย กสฺยจิทฺ เทศสฺย โย โลกาสฺตสฺมาทฺภีตฺวา สตฺกรฺมฺม กโรติ ส ตสฺย คฺราโหฺย ภวติ, เอตสฺย นิศฺจยมฺ อุปลพฺธวานหมฺฯ
36 ३६ देव इस्राएली लोकांशी बोलला, देवाने त्यांना सुवार्ता पाठविली की, येशू ख्रिस्ताद्वारे शांती जगात आली आहे, येशू सर्वांचा प्रभू आहे.
สรฺเวฺวษำ ปฺรภุ โรฺย ยีศุขฺรีษฺฏเสฺตน อีศฺวร อิสฺราเยลฺวํศานำ นิกเฏ สุสํวาทํ เปฺรษฺย สมฺเมลนสฺย ยํ สํวาทํ ปฺราจารยตฺ ตํ สํวาทํ ยูยํ ศฺรุตวนฺต: ฯ
37 ३७ सगळ्या यहूदीया प्रांतात काय घडले हे तुम्हा सर्वांना माहीत आहे, त्याची सुरुवात योहानाने लोकांस बाप्तिस्म्याविषयी गालील प्रांतात जो संदेश दिला, त्याने झाली.
ยโต โยหนา มชฺชเน ปฺรจาริเต สติ ส คาลีลเทศมารภฺย สมสฺตยิหูทียเทศํ วฺยาปฺโนตฺ;
38 ३८ नासरेथच्या येशूविषयी तुम्हास माहिती आहे, देवाने त्यास पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला, येशू सगळीकडे लोकांसाठी चांगल्या गोष्टी करीत गेला, जे लोक दुष्ट आत्म्याने पछाडले होते त्यांना येशूने बरे केले, कारण देव त्याच्याबरोबर होता.
ผลต อีศฺวเรณ ปวิเตฺรณาตฺมนา ศกฺตฺยา จาภิษิกฺโต นาสรตียยีศุ: สฺถาเน สฺถาเน ภฺรมนฺ สุกฺริยำ กุรฺวฺวนฺ ไศตานา กฺลิษฺฏานฺ สรฺวฺวโลกานฺ สฺวสฺถานฺ อกโรตฺ, ยต อีศฺวรสฺตสฺย สหาย อาสีตฺ;
39 ३९ येशूने संपूर्ण यहूदीया प्रांतात आणि यरूशलेम शहरात जे जे केले त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, पण येशूला मारण्यात आले, लाकडाच्या वधस्तंभावर त्यांनी त्यास टांगून मारले.
วยญฺจ ยิหูทียเทเศ ยิรูศาลมฺนคเร จ เตน กฺฤตานำ สรฺเวฺวษำ กรฺมฺมณำ สากฺษิโณ ภวาม: ฯ โลกาสฺตํ กฺรุเศ วิทฺธฺวา หตวนฺต: ,
40 ४० परंतु देवाने तिसऱ्या दिवशी त्यास जिवंत केले देवाने येशूला लोकांस स्पष्ट पाहू दिले.
กินฺตุ ตฺฤตียทิวเส อีศฺวรสฺตมุตฺถาปฺย สปฺรกาศมฺ อทรฺศยตฺฯ
41 ४१ परंतु सर्वच माणासांनी येशूला पाहिले नाही, देवाने त्यांना अगोदरच साक्षीदार म्हणून निवडले होते, त्यांनीच त्यास पाहिले, ते साक्षीदार आम्ही आहोत येशू मरणातून उठविला गेल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर अन्नपाणी सेवन केले.
สรฺวฺวโลกานำ นิกฏ อิติ น หิ, กินฺตุ ตสฺมินฺ ศฺมศานาทุตฺถิเต สติ เตน สารฺทฺธํ โภชนํ ปานญฺจ กฺฤตวนฺต เอตาทฺฤศา อีศฺวรสฺย มโนนีตา: สากฺษิโณ เย วยมฺ อสฺมากํ นิกเฏ ตมทรฺศยตฺฯ
42 ४२ येशूने आम्हास ‘लोकांस उपदेश करायला सांगितले, जिवंतांचा आणि मरण पावलेल्यांचा न्याय करण्यासाठी देवाने त्यास आपल्याला आहे’ हे सांगण्यासाठी त्याने आम्हास आज्ञा केली.
ชีวิตมฺฤโตภยโลกานำ วิจารํ กรฺตฺตุมฺ อีศฺวโร ยํ นิยุกฺตวานฺ ส เอว ส ชน: , อิมำ กถำ ปฺรจารยิตุํ ตสฺมินฺ ปฺรมาณํ ทาตุญฺจ โส'สฺมานฺ อาชฺญาปยตฺฯ
43 ४३ जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, त्यास क्षमा केली जाईल, येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तीच्या पापांची क्षमा करील, सर्व संदेष्टे हे खरे आहे असे म्हणतात.”
ยสฺตสฺมินฺ วิศฺวสิติ ส ตสฺย นามฺนา ปาปานฺมุกฺโต ภวิษฺยติ ตสฺมินฺ สรฺเวฺว ภวิษฺยทฺวาทิโนปิ เอตาทฺฤศํ สากฺษฺยํ ททติฯ
44 ४४ पेत्र हे बोलत असतानाच त्याचे बोलणे ऐकत बसलेल्या सर्व लोकांवर पवित्र आत्मा उतरला.
ปิตรไสฺยตตฺกถากถนกาเล สรฺเวฺวษำ โศฺรตฺฤณามุปริ ปวิตฺร อาตฺมาวาโรหตฺฯ
45 ४५ यहूदी सुंता झालेले विश्वास ठेवणारे जे पेत्राबरोबर आले होते, ते चकित झाले, यहूदी नसलेल्या लोकांवरसुद्धा पवित्र आत्माच्या दानाचा वर्षाव झाला आहे, यामुळे ते चकित झाले.
ตต: ปิตเรณ สารฺทฺธมฺ อาคตาสฺตฺวกฺเฉทิโน วิศฺวาสิโน โลกา อนฺยเทศีเยภฺย: ปวิตฺร อาตฺมนิ ทตฺเต สติ
46 ४६ आणि यहूदी नसलेल्या लोकांस निरनिराळ्या भाषा बोलताना आणि देवाची स्तुती करताना यहूदी लोकांनी ऐकले.
เต นานาชาตียภาษาภิ: กถำ กถยนฺต อีศฺวรํ ปฺรศํสนฺติ, อิติ ทฺฤษฺฏฺวา ศฺรุตฺวา จ วิสฺมยมฺ อาปทฺยนฺตฯ
47 ४७ मग पेत्र म्हणाला, “या लोकांस पाण्याने बाप्तिस्मा देण्यास आपण नकार देऊ शकत नाही, ज्याप्रमाणे आम्हास मिळाला, त्याचप्रमाणे त्यांनाही पवित्र आत्मा मिळाला आहे.”
ตทา ปิตร: กถิตวานฺ, วยมิว เย ปวิตฺรมฺ อาตฺมานํ ปฺราปฺตาเสฺตษำ ชลมชฺชนํ กึ โกปิ นิเษทฺธุํ ศกฺโนติ?
48 ४८ म्हणून पेत्राने कर्नेल्य, त्याचे नातेवाईक आणि मित्र यांना येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा देण्याची आज्ञा केली, मग पेत्राने आणखी काही दिवस त्यांच्याबरोबर रहावे अशी त्या लोकांनी त्यास विनंती केली.
ตต: ปฺรโภ รฺนามฺนา มชฺชิตา ภวเตติ ตานาชฺญาปยตฺฯ อนนฺตรํ เต ไสฺว: สารฺทฺธํ กติปยทินานิ สฺถาตุํ ปฺรารฺถยนฺตฯ

< प्रेषि. 10 >