< ३ योहा. 1 >

1 प्रिय गायस ह्यास, तुझ्यावर खरी प्रीती करणारा वडील ह्याजकडून.
Starejšimi Gaju ljubljenemu, katerega jaz ljubim v resnici.
2 प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे, अशी मी प्रार्थना करतो.
Ljubljeni, v vsem želim, da se ti naj dobro godi in bodeš zdrav, kakor se dobro godi duši tvoji.
3 कारण तू सत्याने चालतोस अशी तुझ्याविषययी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली, त्यावरून मला अत्यानंद झाला.
Kajti veselil sem se močno, ko so prišli bratje in so pričali za resnico tvojo, kakor ti živiš v resnici.
4 माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्या कशानेही होत नाही.
Večjega veselja nimam od tega, da čujem, da otroci moji živé v resnici.
5 प्रिय बंधू, अनोळखी बंधुजनांसाठी जे काही तू करतोस ते विश्वासूपणाने करतोस.
Ljubljeni, zvesto ravnaš v tem, kar delaš za brate in za tujce,
6 त्यांनी तू दाखविलेल्या प्रीतीविषयी मंडळीसमोर साक्ष दिली, देवाला आवडेल त्या रीतीने तू त्यांना वाटेस लावशील तर बरे करशील.
Kateri so pričali za ljubezen tvojo pred občino; in dobro bodeš storil, če jih spremljaš kakor je vredno Boga.
7 कारण ते परराष्ट्रीय लोकांपासून काहीएक न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडले आहेत.
Kajti zaradi imena njegovega zo izšli, ničesa ne jemajoč od poganov;
8 म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामधे त्यांचे सहकारी होऊ.
Mi torej smo dolžni sprejemati take, da postanemo sodelalci resnici.
9 मी मंडळीला काही लिहिले, पण दियत्रेफस ज्याला त्यांचा पुढारी व्हायचे आहे व तो आमचा स्वीकार करीत नाही.
Pisal sem občini; ali Dijotrefej, ki hoče prvakovati med njimi, nas ne sprejme.
10 १० या कारणामुळे जेव्हा मी येतो तेव्हा तो जो करीत आहे ते दाखवून देईन. तो वाईट शब्दांनी खोटेपणाने माझ्याविरुद्ध बोलत आहे व एवढ्यावरच तो समाधान मानीत नाही, तर त्यामध्ये भर म्हणून बंधूंचा तो स्वीकार करत नाहीच उलट मंडळीतील जे लोक त्यांचा स्वीकार करू इच्छितात त्यांना अडथळा करतो आणि त्यांना मंडळीबाहेर घालवितो!
Zato, če pridem, opomnim ga del njegovih, ki jih dela, s hudobnimi besedami blebetajoč zoper nas; in ne zadovoljen s tem, ne samo sam ne sprejema bratov, temuč tudi njim, ki hočejo, brani in jih iz občine meče.
11 ११ माझ्या प्रिय मित्रा, जे चांगले आहे त्याचे अनुकरण कर. वाईटाचे करू नको. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही.
Ljubljeni, ne posnemaj slabega, nego dobro. Kdor dobro dela, je iz Boga; kdor pa slabo dela, ni videl Boga.
12 १२ प्रत्येकजण देमेत्रियाविषयी चांगली साक्ष देतात व स्वतः खरेपणानेही चांगली साक्ष दिली आहे. आम्हीदेखील त्याच्याविषयी तसेच म्हणतो आणि तुम्हास माहीत आहे की, आमची साक्ष खरी आहे.
Demetriju so pričali vsi in sama resnica; in tudi mi pričamo, in veste, da je pričanje naše resnično.
13 १३ मला तुला पुष्कळ गोष्टी लिहावयाच्या आहेत पण मला शाई व लेखणीने तुला लिहावे असे वाटत नाही.
Mnogo sem imel pisati, ali nočem ti pisati s črnilom in peresom;
14 १४ त्याऐवजी, तुला लवकर भेटण्याची मला आशा आहे. मग आपल्याला समोरासमोर बोलता येईल. तुझ्याबरोबर शांती असो. तुझे मित्र तुला सलाम सांगतात. तेथील सर्व मित्रांना नावाने आमचा सलाम सांग.
Upam pa videti te skoraj, in govorila bodeva iz ust do ust. Mir ti! Pozdravljajo te prijatelji. Pozdravi prijatelje po imenu.

< ३ योहा. 1 >