< ३ योहा. 1 >
1 १ प्रिय गायस ह्यास, तुझ्यावर खरी प्रीती करणारा वडील ह्याजकडून.
The Elder vnto the beloued Gaius, whom I loue in the trueth.
2 २ प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे, अशी मी प्रार्थना करतो.
Beloued, I wish chiefly that thou prosperedst and faredst well as thy soule prospereth.
3 ३ कारण तू सत्याने चालतोस अशी तुझ्याविषययी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली, त्यावरून मला अत्यानंद झाला.
For I reioyced greatly when the brethren came, and testified of the trueth that is in thee, how thou walkest in the trueth.
4 ४ माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्या कशानेही होत नाही.
I haue no greater ioy then these, that is, to heare that my sonnes walke in veritie.
5 ५ प्रिय बंधू, अनोळखी बंधुजनांसाठी जे काही तू करतोस ते विश्वासूपणाने करतोस.
Beloued, thou doest faithfully, whatsoeuer thou doest to the brethren, and to strangers,
6 ६ त्यांनी तू दाखविलेल्या प्रीतीविषयी मंडळीसमोर साक्ष दिली, देवाला आवडेल त्या रीतीने तू त्यांना वाटेस लावशील तर बरे करशील.
Which bare witnesse of thy loue before the Churches. Whom if thou bringest on their iourney as it beseemeth according to God, thou shalt doe well,
7 ७ कारण ते परराष्ट्रीय लोकांपासून काहीएक न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडले आहेत.
Because that for his Names sake they went forth, and tooke nothing of the Gentiles.
8 ८ म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामधे त्यांचे सहकारी होऊ.
We therefore ought to receiue such, that we might be helpers to the trueth.
9 ९ मी मंडळीला काही लिहिले, पण दियत्रेफस ज्याला त्यांचा पुढारी व्हायचे आहे व तो आमचा स्वीकार करीत नाही.
I wrote vnto the Church: but Diotrephes which loueth to haue the preeminence among them, receiueth vs not.
10 १० या कारणामुळे जेव्हा मी येतो तेव्हा तो जो करीत आहे ते दाखवून देईन. तो वाईट शब्दांनी खोटेपणाने माझ्याविरुद्ध बोलत आहे व एवढ्यावरच तो समाधान मानीत नाही, तर त्यामध्ये भर म्हणून बंधूंचा तो स्वीकार करत नाहीच उलट मंडळीतील जे लोक त्यांचा स्वीकार करू इच्छितात त्यांना अडथळा करतो आणि त्यांना मंडळीबाहेर घालवितो!
Wherefore if I come, I will call to your remembrance his deedes which he doeth, pratling against vs with malicious wordes, and not therewith content, neither he himselfe receiueth the brethren, but forbiddeth them that woulde, and thrusteth them out of the Church.
11 ११ माझ्या प्रिय मित्रा, जे चांगले आहे त्याचे अनुकरण कर. वाईटाचे करू नको. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही.
Beloued, follow not that which is euill, but that which is good: he that doeth well, is of God: but he that doeth euill, hath not seene God.
12 १२ प्रत्येकजण देमेत्रियाविषयी चांगली साक्ष देतात व स्वतः खरेपणानेही चांगली साक्ष दिली आहे. आम्हीदेखील त्याच्याविषयी तसेच म्हणतो आणि तुम्हास माहीत आहे की, आमची साक्ष खरी आहे.
Demetrius hath good report of al men, and of the trueth it selfe: yea, and wee our selues beare recorde, and ye know that our record is true.
13 १३ मला तुला पुष्कळ गोष्टी लिहावयाच्या आहेत पण मला शाई व लेखणीने तुला लिहावे असे वाटत नाही.
I haue many things to write: but I will not with yncke and pen write vnto thee:
14 १४ त्याऐवजी, तुला लवकर भेटण्याची मला आशा आहे. मग आपल्याला समोरासमोर बोलता येईल. तुझ्याबरोबर शांती असो. तुझे मित्र तुला सलाम सांगतात. तेथील सर्व मित्रांना नावाने आमचा सलाम सांग.
For I trust I shall shortly see thee, and we shall speake mouth to mouth. Peace be with thee. The friends salute thee. Greete the friends by name.