< २ तीम. 2 >
1 १ माझ्या मुला तू ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान हो.
Tvou silou, můj synu, ať je Kristova moc.
2 २ माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमोर ऐकल्यास त्या घे व इतरांना शिकविण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांस सोपवून दे.
Co jsi se naučil ode mne, předávej spolehlivým a schopným lidem, kteří budou šířit pravdu dál.
3 ३ ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस.
Jako řádný bojovník Ježíše Krista ochotně snášej nepohodlí a útrapy.
4 ४ सैनिकाचे काम करणारा कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही. यासाठी की त्यास आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे.
Kdo stojí v boji, nemá čas na soukromé záležitosti, nechce-li upadnout v nelibost u velitele.
5 ५ जर कोणी मल्ल युद्ध करतो, तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्यास मुकुट मिळत नाही.
I sportovec musí dodržovat pravidla, nemá-li být diskvalifikován.
6 ६ कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे.
Pracuj pilně jako rolník, který sklidí úrodu jen tehdy, když ji zaléval svým potem.
7 ७ जे मी बोलतो ते समजून घे, कारण प्रभू तुला या सर्व गोष्टींची समज देईल.
Přemýšlej, co tím chci říci. Pán ti jistě pomůže zaujmout ke všemu správný postoj.
8 ८ माझ्या सुवार्तेप्रमाणे जो मरण पावलेल्यातून उठविलेला दाविदाच्या वंशातला येशू ख्रिस्त, याची आठवण कर.
Nikdy nezapomeň, že Ježíš Kristus jako člověk pochází z královského Davidova rodu. Zároveň však svým zmrtvýchvstáním dokázal, že je Bohem.
9 ९ कारण त्या सुवार्तेमुळे मी दुःख सहन करत आहे, येथपर्यंत की गुन्हेगाराप्रमाणे साखळदंडानी मला बांधण्यात आले, पण देवाचे वचन बांधले गेले नाही.
Jenom proto, že jsem tyto velké pravdy hlásal, jsem teď přikován ve vězení jako nějaký zločinec. Ale Boží slovo nikdo neuváže na řetěz jako mne.
10 १० ह्यामुळे देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्वकाही धीराने सोशीत आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व सर्वकाळचे गौरव प्राप्त व्हावे. (aiōnios )
A tak to s radostí snáším pro ty, kterým chce Bůh dát záchranu a věčnou slávu v Kristu Ježíši. (aiōnios )
11 ११ हे वचन विश्वसनीय आहे की, जर आम्ही त्याच्यासह मरण पावलो, तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू
Utěšuje mne vědomí, že trpět a zemřít pro Krista znamená taky žít s ním na věčnosti,
12 १२ जर आम्ही दुःख सहन केले तर आम्ही त्याच्याबरोबर राज्यसुद्धा करू जर आम्ही त्यास नाकारले, तर तोसुध्दा आम्हास नाकारील
a kdo vydrží s ním všechna utrpení zde, bude s ním jednou vládnout. Kdo se ho však tady zřekne, toho se zřekne i on.
13 १३ जरी आम्ही अविश्वासू आहोत तरी तो अजूनही विश्वासू आहे कारण तो स्वतःला नाकारु शकत नाही.
Ale i když my zklameme jeho důvěru, on nám věrně stojí po boku, protože neumí být nevěrný.
14 १४ लोकांस या गोष्टीची आठवण करून देत राहा. देवासमोर त्यांना निक्षून ताकीद दे की, शब्दयुद्ध करू नका. असे भांडण कोणत्याही फायद्याचे नाही. जे कोणाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारण होते.
Připomínej to vždycky znovu a v Boží autoritě umlčuj hádky o slovíčka; nepřispívají k ničemu, leda ke zmatku u posluchačů.
15 १५ तू सत्याचे वचन योग्य रीतीने सांगणारा असा आणि जे काम करतोस त्यामध्ये लाज वाटण्यासारखे काहीही कारण नसलेला देवास स्वीकृत असा कामकरी होण्याचा प्रयत्न कर.
Snaž se být užitečným Božím pracovníkem, Boží pravdy hlásej čistě a jasně, abys mohl své dílo odevzdat bez obav, že propadne.
16 १६ पण अमंगळपणाचा रिकामा वादविवाद टाळ कारण तो लोकांस देवापासून अधिकाधिक दूर नेतो.
Vyhýbej se lidem, kteří si libují v planých diskusích a tím odvádějí od Boha.
17 १७ आणि अशाप्रकारे वादविवाद करणाऱ्यांची शिकवण कर्करोगासारखी पसरते. या लोकांमध्ये हूमनाय आणि फिलेत आहेत,
Jejich bludy působí zhoubně jako rakovina. Patří k nim i Hymenaios a Filétos,
18 १८ ते सत्यापासून दूर गेले आहेत. पुनरुत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करीतात.
kteří řadu křesťanů pomátli učením, že vzkříšení mrtvých už nastalo.
19 १९ तथापि देवाने घातलेला पाया स्थिर राहीला आहे, त्यास हा शिक्का आहे की, “प्रभू जे त्याचे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर रहावे.”
Ale Boží pravda stojí pevně jako skála, kterou nic neotřese, jako základní kámen, na němž je napsáno: „Bůh zná ty, kdo mu patří“a „Kdo vyznává Boha, odvrať se od bezbožností“.
20 २० मोठ्या घरात केवळ सोन्याचांदीची भांडी असतात असे नाही तर लाकूड व माती यापासून बनवलेलीही असतात. काही सन्मानास व काही अवमानास नेमलेली असतात.
V zámožných domácnostech bývá zlaté a stříbrné nádobí pro slavnostní příležitosti; dřevěné a hliněné se užívá jen v kuchyni nebo na odpadky.
21 २१ म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, मालकाला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल.
Když si s těmi bludaři nezadáš, zůstaneš vzácnou nádobou, kterou bude sám Kristus moci použít pro své vznešené účely.
22 २२ पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती आणि शांती यांच्यामागे लाग.
Buď na stráži před nebezpečími, která obkličují mladého člověka. Pěstuj v sobě víru a lásku ve společenství s těmi, kdo Pána milují z čistého srdce.
23 २३ परंतु मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविवादापासून दूर राहा कारण तुला माहीत आहे की, त्यामुळे भांडणे निर्माण होतात.
Znovu ti připomínám, nepouštěj se do takových debat, které lidi jen rozeštvávají.
24 २४ देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी सौम्यतेने वागावे, तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे.
Kristův služebník se nesmí hádat; musí být taktní a trpělivě
25 २५ जे त्यास विरोध करतात, त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरेपण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चात्ताप करण्याची बुद्धी देईल.
poučovat toho, kdo se mýlí. Když ti někdo odporuje, zůstaň přesto vlídný;
26 २६ आणि सैतानाने आपल्या इच्छेप्रमाणे पकडून नेलेले त्याच्या फासातून सुटून शुद्धीवर येतील.
možná, že ho tím s Boží pomocí snáze přesvědčíš o jeho omylu a on unikne z ďábelské léčky.