< २ थेस्स. 1 >
1 १ देव आमचा पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या ठायी असलेल्या थेस्सलनीका शहरातील मंडळीला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडूनः
Павел, та Силуан, та Тимотей церкві Солунській у Бозї, Отцї нашому, і Господі Ісусї Христї:
2 २ देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तुम्हास कृपा व शांती असो.
Благодать вам і впокій од Бога, Отця вашого, і Господа Ісуса Христа.
3 ३ बंधूनो, आम्ही सर्वदा तुम्हाविषयी देवाची उपकारस्तुती केली पाहिजे आणि हे योग्यच आहे कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकांची एकमेकांवरील प्रीती विपुल होत आहे;
Дякувати мусимо Богу завсїди за вас, браттє, яко ж воно й достойно, бо вельми росте віра ваша, і множить ся любов кожного з усіх вас один до одного;
4 ४ ह्यावरून तुमच्या सर्व छळांत व तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखविता त्याबद्दल देवाच्या मंडळ्यांतून आम्ही स्वतः तुमचा अभिमान बाळगतो.
так що ми самі хвалимось вами по церквах Божих за терпіннє ваше і віру у всіх гоненнях ваших і в горю, що приймаєте,
5 ५ ते देवाच्या योग्य न्यायाचे प्रमाण आहे; तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोशीत आहात त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे.
в доказ праведного суду Божого, щоб удостоїтись вам царства Божого, ради котрого й страждаєте.
6 ६ तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची संकटाने परतफेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे,
Бо ж праведно в Бога, віддати горе тим, що завдають вам горя,
7 ७ म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान देवदूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल.
а вам горюючим, одраду з нами в одкриттю Господа Ісуса з неба з ангелами сили,
8 ८ तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.
в огні поломяному даючи відомщеннє тим, що не знають Бога і не корять ся благовістю Господа нашого Ісуса Христа.
9 ९ तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यांत येऊन सर्वकाळचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल. (aiōnios )
Вони приймуть муку, погибель вічну від лиця Господнього і від слави потуги Його, (aiōnios )
10 १० आपल्या पवित्रजनांच्या ठायी गौरव मिळावे म्हणून आणि त्यादिवशी पवित्रजनांच्या ठायी आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे.
як прийде прославити ся у сьвятих своїх і дивним бути у всїх віруючих (бо ввірувано сьвідкуванню нашому між вами) в той день.
11 ११ याकरिता तर आम्ही तुम्हासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की, आपल्या देवाने तुम्हास झालेल्या या पाचारणास योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे;
Того й молимо ся всякого часу за вас, щоб сподобив вас поклику Бог ваш, і сповнив усяке благоводеннє благости і діло віри в силї,
12 १२ ह्यासाठी की, आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने आपला प्रभू येशू ह्याच्या नावाला तुमच्या ठायी व तुम्हास त्याच्याठायी, गौरव मिळावे.
щоб прославилось імя Господа яашого Ісуса Христа в вас, а ви в Ньому, по благодатї Бога нашого і Господа Ісуса Христа.