< २ थेस्स. 3 >
1 १ शेवटी बंधूनो, आता इतकेच सांगणे आहे की, आम्हासाठी प्रार्थना करीत जा की, जशी तुमच्यामध्ये झाली त्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची लवकर प्रगती व्हावी व त्याचे गौरव व्हावे;
I øvrigt, Brødre! beder for os, at Herrens Ord maa have Løb og forherliges ligesom hos eder,
2 २ आणि हेकेखोर व दुष्ट मनुष्यांपासून आमचे संरक्षण व्हावे; कारण सर्वाच्या ठायी विश्वास आहे असे नाही.
og at vi maa fries fra de vanartige og onde Mennesker; thi Troen er ikke alles.
3 ३ परंतू प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हास स्थिर करील व त्या दुष्टापासून राखील.
Men trofast er Herren, som skal styrke eder og bevare eder fra det onde;
4 ४ तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा विश्वास आहे की, आम्ही तुम्हास जे सांगतो ते तुम्ही करीत असता व पुढेही करीत जाल.
og vi have den Tillid til eder i Herren, at I baade gøre og ville gøre, hvad vi byde.
5 ५ प्रभूही तुमची मने देवावरच्या प्रीतीकडे व ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो.
Men Herren styre eders Hjerter til Guds Kærlighed og til Kristi Udholdenhed!
6 ६ बंधूनो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की, अव्यवस्थितपणे वागणाऱ्या व चालणाऱ्या संप्रदायाप्रमाणे प्रत्येक बंधुपासून तुम्ही दूर व्हावे.
Men vi byde eder, Brødre! i vor Herres Jesu Kristi Navn, at I holde eder borte fra enhver Broder, som vandrer uskikkeligt og ikke efter den Overlevering, som de modtoge af os.
7 ७ आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे; कारण आम्ही तुम्हामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही;
I vide jo selv, hvorledes I bør efterfølge os. Thi vi have ikke levet uskikkeligt iblandt eder,
8 ८ आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही; परंतु तुम्हापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले.
ikke heller spiste vi nogens Brød for intet, men arbejdede med Møje og Anstrengelse, Nat og Dag, for ikke at være nogen af eder til Byrde.
9 ९ तसा आम्हास अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हास उदाहरण घालू द्यावे म्हणून असे केले.
Ikke fordi vi ikke have Ret dertil; men vi vilde give eder et Forbillede i os selv, for at I skulde efterfølge os.
10 १० कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हास अशी आज्ञा केली होती की, कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये.
Ogsaa da vi vare hos eder, bøde vi eder jo dette, at dersom nogen ikke vil arbejde, saa skal han heller ikke have Føden!
11 ११ तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काहीएक काम न करता लुडबुड करतात, असे आम्ही ऐकतो.
Vi høre nemlig, at nogle vandre uskikkeligt iblandt eder, idet de ikke arbejde, men tage sig uvedkommende Ting for.
12 १२ अशा लोकांस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व उत्तेजन देतो की, त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वतःचेच अन्न खावे.
Saadanne byde og formane vi i den Herre Jesus Kristus, at de skulle arbejde i Stilhed og saaledes spise deres eget Brød.
13 १३ तुम्ही तर बंधूंनो, बरे करतांना खचू नका.
Men I, Brødre! bliver ikke trætte af at gøre det gode!
14 १४ या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानीत नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्यास लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका;
Men dersom nogen ikke lyder vort Ord her i Brevet, da mærker eder ham; haver intet Samkvem med ham, for at han maa skamme sig!
15 १५ तरी त्यास शत्रू समजू नका, तर त्यास बंधू समजून त्याची कानउघडणी करा.
Dog skulle I ikke agte ham for en Fjende, men paaminde ham som en Broder!
16 १६ शांतीचा प्रभू हा सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हास शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो.
Men han selv, Fredens Herre, give eder Freden altid, i alle Maader! Herren være med eder alle!
17 १७ मी, पौलाने, स्वहस्ते लिहिलेला नमस्कार; ही प्रत्येक पत्रांत खूण आहे. मी अशा रीतीने लिहीत असतो.
Hilsenen med min, Paulus's, egen Haand, hvilket er et Mærke i hvert Brev. Saaledes skriver jeg.
18 १८ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.
Vor Herres Jesu Kristi Naade være med eder alle!