< 2 शमुवेल 9 >

1 दावीदाने विचारले, “शौलाच्या घराण्यातील कोणी व्यक्ती अजून राहिली आहे का?” योनाथानासाठी मला तिच्यावर दया दाखवली पाहिजे.
روزی داوود به این فکر افتاد که ببیند آیا کسی از خانوادهٔ شائول باقی مانده است؟ چون او می‌خواست به خاطر یوناتان به او خوبی کند.
2 सीबा नावाचा एक चाकर शौलाच्या घराण्यातला होता. दावीदाच्या सेवकांनी त्यास दावीदासमोर पाचारण केले. दावीदाने त्यास विचारले, “तूच सीबा काय? सीबा म्हणाला,” “होय, मीच तुमचा दास सीबा.”
به او خبر دادند که یکی از نوکران شائول به نام صیبا هنوز زنده است. پس او را احضار کرده، از وی پرسید: «آیا تو صیبا هستی؟» او گفت: «بله قربان، من صیبا هستم.»
3 तेव्हा राजा म्हणाला, शौलाच्या घराण्यातील कोणी आहे काय? देवाच्या कृपेचा लाभ त्यास मिळाला पाहिजे. सीबा राजाला म्हणाला, योनाथानाचा मुलगा आहे. तो दोन्ही पायांनी पांगळा झाला आहे.
آنگاه پادشاه پرسید: «آیا کسی از خانوادهٔ شائول باقی مانده است؟ چون می‌خواهم طبق قولی که به خدا داده‌ام به او خوبی کنم.» صیبا جواب داد: «پسر لنگ یوناتان هنوز زنده است.»
4 तेव्हा दावीदाने सीबाला त्याचा ठावठिकाणा विचारला. सीबाने सांगितले, तो लो-दबार येथे अम्मीएलचा मुलगा माखीर याच्या घरी आहे.
پادشاه پرسید: «او کجاست؟» صیبا به او گفت: «در لودبار در خانهٔ ماخیر (پسر عَمیئیل) است.»
5 तेव्हा राजा दावीदने मनुष्य पाठवून त्यास लो-दबाराहून अम्मीएलचा मुलगा माखीर ह्याच्या घरून बोलावून आणले.
پس داوود پادشاه فرستاد تا مفیبوشت را که پسر یوناتان و نوهٔ شائول بود، از خانهٔ ماخیر به نزدش بیاورند. مفیبوشت در برابر پادشاه تعظیم کرده به پایش افتاد.
6 शौलाचा पुत्र योनाथान, याचा पुत्र मफीबोशेथ आला आणि राजापुढे नतमस्तक होऊन उभा राहिला. मफीबोशेथ? राजाने विचारले, मफीबोशेथ म्हणाला, होय, मीच तुमचा सेवक मफीबोशेथ.
7 त्यास दावीद म्हणाला, भिऊ नको; तुझे वडील योनाथान यासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन. तुझ्या वडीलासाठी मी एवढे करीन, तुझे आजोबा शौल यांची सर्व जमीन मी तुला परत देईन आणि तू नेहमी माझ्या पंक्तीला भोजन करावे.
اما داوود گفت: «نترس! برای این تو را احضار کرده‌ام تا به خاطر پدرت یوناتان به تو خوبی کنم. تمام زمینهای پدر بزرگت شائول را به تو پس می‌دهم و تو بعد از این در قصر من با من سر یک سفره خواهی نشست!»
8 मफीबोशेथने पुन्हा दंडवत घातले. तो म्हणाला, आपण अशा माझ्यासारख्या मरण पावलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे?
مفیبوشت در حضور پادشاه به خاک افتاد و گفت: «آیا پادشاه می‌خواهد به سگ مرده‌ای چون من خوبی کند؟»
9 दावीदाने मग शौलाचा सेवक सीबा याला बोलवले. त्यास तो म्हणाला, शौलाच्या मालकीचे जे जे काही आहे, ते मी या तुझ्या मालकांच्या नातवाला, मफीबोशेथला दिले आहे.
پادشاه، صیبا نوکر شائول را خواست و به او گفت: «هر چه مال ارباب تو شائول و خانوادهٔ او بود، به نوه‌اش پس داده‌ام.
10 १० त्याची जमीन तू कसायची. तुझी मुले आणि सेवक यांनी एवढे केले पाहिजे, तुम्ही शेतात पीक काढा, म्हणजे तुझ्या मालकाचा नातू मफीबोशेथ याचा त्यावर निर्वाह होईल. पण तो नेहमी माझ्या पंक्तीला जेवेल. सीबाला पंधरा पुत्र आणि वीस नोकर होते.
تو و پسرانت و نوکرانت باید زمین را برای او کشت و زرع کنید و خوراک خانواده‌اش را تأمین نمایید، اما خود مفیبوشت پیش من زندگی خواهد کرد.» صیبا که پانزده پسر و بیست نوکر داشت، جواب داد: «قربان، هر چه امر فرمودید انجام خواهم داد.» از آن پس، مفیبوشت بر سر سفرهٔ داوود پادشاه می‌نشست و مثل یکی از پسرانش با او غذا می‌خورد.
11 ११ सीबा दावीदाला म्हणाला, मी तुमचा दास आहे. माझ्या धन्याच्या राजाच्या हुकुमाप्रमाणेच मी वागेन. तेव्हा मफीबोशेथ दावीदाच्या मुलांप्रमाणेच दावीदाच्या पंक्तीला बसून जेवू लागला.
12 १२ मफीबोशेथला मीखा नावाचा लहान मुलगा होता. सीबाच्या परिवारातील सर्व लोक मफीबोशेथचे चाकर झाले.
مفیبوشت پسر کوچکی داشت به نام میکا. تمام اعضای خانوادهٔ صیبا خدمتگزاران مفیبوشت شدند.
13 १३ मफीबोशेथ दोन्ही पायांनी पांगळा होता. यरूशलेम येथे त्याचे वास्तव्य होते. तो नित्य राजाच्या पक्तींस भोजन करीत असे.
پس مفیبوشت که از هر دو پا لنگ بود، در اورشلیم در قصر پادشاه زندگی می‌کرد و همیشه با پادشاه بر سر یک سفره می‌نشست.

< 2 शमुवेल 9 >