< 2 शमुवेल 7 >
1 १ राजा दावीद आपल्या नवीन घरात राहू लागला आणि परमेश्वराने त्यास भोवतालच्या सर्व शत्रूंपासून विसावा दिला.
By now the king was comfortable in his palace and the Lord had given him peace from all the enemy nations around him.
2 २ एकदा नाथान या संदेष्ट्यास दावीद म्हणाला, “इथे मी गंधसरुच्या लाकडापासून केलेल्या डौलदार घरात राहतोय आणि देवाचा कोश मात्र अजूनही राहुटीतच आहे. त्या पवित्र कोशासाठी आता चांगला निवारा बांधायाला हवा.”
So he said to Nathan the prophet, “Look at me—I live in a palace made of cedar, but the Ark of God is still in a tent.”
3 ३ नाथान राजाला म्हणाला, “आपल्या मनात आहे तसे करा. परमेश्वराची तुम्हास साथ आहे.”
“Go ahead, do whatever you want, for the Lord is with you,” Nathan told the king.
4 ४ पण त्याच दिवशी रात्री नाथानला परमेश्वराचे वचन ऐकू आले. परमेश्वर म्हणाला,
But that night the Lord spoke to Nathan and told him,
5 ५ “दावीद या माझ्या सेवकाला जाऊन सांग, ‘परमेश्वराचा निरोप असा आहे: माझ्यासाठी निवासस्थान बांधणारा तू नव्हेस.
“Go and tell my servant David, This is what the Lord says: Should you be the one to build a house for me to live in?
6 ६ मी इस्राएल लोकांस मिसरमधून बाहेर काढले त्यावेळी कुठल्या ही घरात राहत नव्हतो, मी राहुटीतूनच फिरलो. तेच माझे घर.
For I have never lived in a house, from the time I led the Israelites out of Egypt up till now. I have always moved from place to place, living in a tent and a Tabernacle.
7 ७ इस्राएल लोकांबरोबर मी जेथे जेथे गेलो, त्या त्या ठिकाणी, माझ्या इस्राएल लोकांचे मेंढपाळ व्हा म्हणून ज्यांना मी सांगितले त्या इस्राएल वंशातील कोणात्याही अधिकाऱ्याला “कधीही माझ्यासाठी तू गंधसरूचे, घर का बांधले नाहीस?” असे विचारले नाही.
But in all those travels with all of Israel did I ever ask any Israelite leader I'd ordered to take care of my people, ‘Why haven't you built a cedar house for me?’
8 ८ शिवाय दावीदाला हे ही सांग सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो, “तू कुरणात मेंढरांमागे फिरत होतास तेव्हाच मी तुला निवडले. तेथून तुला काढून मी तुला इस्राएल लोकांचा राजा केले.
So then, tell my servant David this is what the Lord Almighty says. It was me who took you from the fields, from looking after sheep, to become a leader of my people Israel.
9 ९ तू जेथे जेथे गेलास तेथे तेथे मी तुला साथ दिली. तुझ्या शत्रूंचा तुझ्यासाठी पाडाव केला. पृथ्वीवरील इतर महान लोकांप्रमाणे मी तुला सुप्रसिद्ध करीन.
I have been with you wherever you've gone. I have destroyed all your enemies right in front of you, and I will make your reputation as great as the most famous people on earth.
10 १० माझ्या इस्राएल लोकांसाठी मी जागेची निवड केली. त्यांना राहायला हक्काची जागा दिली, त्यांना रुजवले त्यांना जागोजागी भटकंती करायला लागू नये म्हणून मी हे केले.
I will choose a place for my people Israel. I will settle them there and they won't be disturbed anymore. Evil people won't persecute them as they used to,
11 ११ इस्राएल लोकांवर मी, परमेश्वर, शास्ते नेमिले होते तेव्हापासून दुर्जनांनी त्यांना त्रास दिला तसे आता घडणार नाही. तुझ्या सर्व शंत्रूपासून मी तुला शांती देतो. मी तुला असे अभिवचन देतो की, तुझे घराणे कायमचे राजघराणे होईल.
from the time I placed judges in charge of my people. I will defeat all of your enemies. Also I want to make it clear that I the Lord will build a house for you.
12 १२ तुझे जीवन संपुष्टात आले, म्हणजे तुझ्या मृत्यूनंतर तुझ्या पूर्वजांशेजारी तुझे दफन होईल. पण मी तुझ्या पुत्रापैकीच एकाला राजा करीन.
For when you come to the end of your life and join your ancestors in death, I will bring to power one of your descendants, one of your sons, and make sure his kingdom is successful.
13 १३ तो माझ्या नावाप्रीत्यर्थ मंदिर बांधील. त्याचे राज्य मी नेहमीसाठी मजबूत करीन.
He will be the one to build me a house, and I will make sure his kingdom lasts forever.
14 १४ मी त्याचा पिता आणि तो माझा पुत्र असेल. त्याच्या हातून पाप घडले तर मी त्यास मनुष्याच्या काठीने आणि मनुष्यांच्या पुत्रांच्या चाबकांनी शासन घडवीन.
I will be a father to him, and he will be a son to me. If he does wrong, I will discipline him with the rod like people do, like a parent punishing a child.
15 १५ पण माझे त्याच्यावरचे प्रेम खंडित होणार नाही. त्याच्यावर माझी कृपादृष्टी राहील. शौलावरील माझा लोभ आणि प्रेम संपुष्टात आले. मी तुझ्याकडे वळलो, तेव्हा तुझ्यासमोर मी त्यास दूर ढकलले. पण तुझ्या घराण्याच्या बाबतीत मी असे करणार नाही.
But I will never take away my kindness and love from him, as I did in the case of Saul who I removed before you.
16 १६ राजसत्ता तुझ्याच वंशात चालू राहील याचा विश्वास बाळग. तुझे राज्य अबाधित राहील. तुझे राजासन टिकून राहील.”
Your house and your kingdom will last forever; your dynasty will be secure forever.”
17 १७ नाथानाने दावीदाला हा दृष्टांत आणि देवाचे सर्व बोलणे ऐकवले.
This is what Nathan explained to David—everything he was told in this divine revelation.
18 १८ यानंतर दावीद आत जाऊन परमेश्वरासमोर बसला आणि म्हणाला, “हे प्रभू, परमेश्वरा, मला एवढी किंमत तू का देतोस? माझे घराणे तुला महत्वाचे का वाटते? तू मला एवढे मोठे का केलेस?
Then King David went and sat down in the presence of the Lord. He prayed, “Who am I, Lord God, and what is significant about my family, that you have brought me to this place?
19 १९ हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे; तू आपल्या सेवकाच्या घराण्यासंबंधाने पुढील बर्याच काळाचे सांगून ठेवले आहेस; प्रभू परमेश्वरा, हे सर्व तू मानवी व्यवहारासारखे केले आहेस.
God, you talk as if this was a small thing in your eyes, and you also have spoken about the future of my house, my family dynasty. Is this your usual way of dealing with human beings, Lord God?
20 २० मी आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या सेवकाला जाणतोसच.
What more can I, David, tell you? You know exactly what your servant is like, Lord God.
21 २१ तू करणार म्हणालास, आणि तुला तसे करायची इच्छा आहे; तेव्हा या अदभुत गोष्टी खरोखरच घडतील. मला, तुझ्या सेवकाला, तू त्याची पूर्णकल्पनाही द्यायचे ठरवलेस.
You're doing all this for me and you have explained it to me, your servant, and because of your promise and because it's what you want to do.
22 २२ ह्यास्तव हे माझ्या प्रभू, परमेश्वरा, तू खरोखरच महान आहेस. जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे, त्यावरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही. तुझ्याखेरीज अन्य कोणी देव नाही.
How great you are, Lord God! There really is no-one like you; there is no other God, only you. We have never heard about anyone else.
23 २३ पृथ्वीच्या पाठीवर इस्राएलसारखे राष्ट्र नाही. इस्राएलाची प्रजा ही खास प्रजा आहे. ती गुलाम होती, तिला तू मिसरमधून सोडवलेस आणि मुक्त केलेस. तिला आपली प्रजा बनवलेस. इस्राएलांसाठी तू महान आणि अद्भूत चमत्कार केलेस.
Who else is as fortunate as your people Israel? Who else on earth did God go and redeem to make his own people? You gained a wonderful reputation for yourself by all the tremendous, amazing things you did in driving out other nations and their gods before your people as you redeemed them from Egypt.
24 २४ तू निरंतर इस्राएलाला स्वतःच्या कवेत घेतलेस. हे परमेश्वरा तू त्यांचा देव झालास.
You made your people Israel your own forever, and you, Lord, have become their God.
25 २५ आता तर परमेश्वर देवा, तू या तुझ्या सेवकासाठी काही गोष्टी सिध्दीस नेणार आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे कृपा करून तसेच होऊ दे. माझा वंश सतत राज्य करू दे.
So now, Lord God, please ensure that what you have said about me and my house happens, and is confirmed forever. Please do as you have promised,
26 २६ मग तुझ्या नावाचा महिमा वाढेल. लोक म्हणतील, सर्वशक्तिमान परमेश्वर देवाची इस्राएलवर सत्ता आहे. तुझी सेवा करायला तुझा सेवक दावीद याच्या घराण्याला बळ मिळू दे.
and may your true nature be honored forever, with people declaring, ‘The Lord Almighty is Israel's God!’ May the house of your servant David continue to be there in your presence.
27 २७ सर्वशक्तिमान परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तूच हे मला दाखवले आहेस तू म्हणालास, मी तुझ्यासाठी घर बांधीन, म्हणून मी तुझा सेवक तुझ्यापुढे ही प्रार्थना करण्याचे साहस करत आहे.
Lord Almighty, God of Israel, you have revealed this to me, your servant, telling me, ‘I will build a house for you.’ That's why your servant has had the courage to pray this prayer to you.
28 २८ प्रभू परमेश्वरा, तूच आमचा देव आहेस. तुझ्या सांगण्यावर माझा पूर्ण भरंवसा आहे. या सर्व चांगल्या गोष्टी माझ्याबाबतीत, तुझ्या या सेवकाच्या बाबतीत घडणार आहेत असे तू म्हणालास.
Lord Almighty, you are God! Your words are truth, and you are the one who has promised these good things to your servant.
29 २९ आता माझ्या घराण्याला आशीर्वाद दे. माझा वंश सातत्याने चालू दे. हे प्रभू परमेश्वरा, तूच तसे म्हणाला आहेस आमच्यावर तुझ्या आशीर्वादाचे छत्र कायमचे राहील असा तुझा आशीर्वाद आहे.”
So now, please bless your servant's house that it may continue in your presence forever. For you have spoken, Lord God, and with your blessing the house of your servant will be blessed forever.”