< 2 शमुवेल 4 >

1 हेब्रोन येथे अबनेर मरण पावल्याचे शौलाचा मुलगा ईश-बोशेथ याला कळले. तेव्हा तो आणि इतर सर्व इस्राएली लोक भयभीत झाले.
Avner'in Hevron'da öldürüldüğünü duyan Saul oğlu İş-Boşet korkuya kapıldı. Bütün İsrail halkı da dehşet içindeydi.
2 शौलाच्या पुत्राजवळ दोन माणसे सेनानायक होती; रेखाब आणि बाना ही त्यांची नावे होती. हे रिम्मोनचे पुत्र. रिम्मोन हा बैरोथचा, बैरोथ नगर बन्यामीन वंशाचे, म्हणून हे ही बन्यामिनी होत.
Saul oğlu İş-Boşet'in iki akıncı önderi vardı; bunlar Benyamin oymağından Beerotlu Rimmon'un oğullarıydı. Birinin adı Baana, öbürününki Rekav'dı. –Beerot Benyamin oymağından sayılırdı.
3 पण बैरोथ येथील सर्व लोक गित्तईम येथे पळून गेले. अजूनही ते तिथेच आहे.
Beerotlular Gittayim'e kaçmışlardı. Yabancı olan bu halk bugün de orada gurbette yaşıyor.–
4 शौलाचा मुलगा योनाथान याला मफीबोशेथ नावाचा मुलगा होता. इज्रेलहून शौल आणि योनाथान यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा हा मफीबोशेथ पाच वर्षांचा होता. शत्रूच्या भीतीने त्याची दाई त्यास घेऊन पळाली. पळापळीत तिच्या हातून तो खाली पडला आणि दोन्ही पायांनी अधू झाला.
Saul oğlu Yonatan'ın Mefiboşet adında bir oğlu vardı; iki ayağı da topaldı. Saul'la Yonatan'ın ölüm haberi Yizreel'den ulaştığında, Mefiboşet beş yaşındaydı. Dadısı onu alıp kaçmıştı. Ne var ki, aceleyle kaçmaya çalışırken çocuk düşüp sakatlanmıştı.
5 बैरोथच्या रिम्मोनची मुले रेखाब आणि बाना ही दुपारच्या वेळी ईश-बोशेथच्या घरी गेली. ऊन असल्यामुळे ईश-बोशेथ तेव्हा आराम करत होता.
Beerotlu Rimmon'un oğulları Rekav'la Baana yola koyuldular. Öğle sıcağında İş-Boşet'in evine vardıklarında İş-Boşet uzanmış dinlenmekteydi.
6 गहू घेण्याच्या आमिषाने रेखाब आणि बाना घरात घूसले त्यांनी त्याच्या पोटावर वार केला; मग ते दोघेही निसटून गेले.
Buğday alacakmış gibi yaparak eve girdiler. O sırada İş-Boşet yatak odasında yatağında uzanıyordu. Adamlar İş-Boşet'in karnını deşip öldürdüler. Başını gövdesinden ayırıp yanlarına aldılar. Rekav'la kardeşi Baana kaçıp bütün gece Arava yolundan ilerlediler.
7 ते घूसले तेव्हा आपल्या शयनगृहात ईश-बोशेथ झोपला होता. त्याच्यावर हल्ला करून या दोघांनी त्यास ठार मारले. त्याचे शीर धडावेगळे करून ते बरोबर घेतले. मग यार्देनच्या खोऱ्यातून रात्रभर वाटचाल करत.
8 ते हेब्रोन येथे पोहोचले आणि दावीदाला त्यांनी ईश-बोशेथचे मस्तक अर्पण केले. रेखाब आणि बाना दावीद राजाला म्हणाले, “शौल पुत्र ईश-बोशेथ या आपल्या शत्रूचे हे मस्तक. त्याने तुमच्या वधाचा प्रयत्न केला. त्याबद्दल आज परमेश्वरानेच शौलाला आणि त्याच्या कुटुंबियांना तुमच्यासाठी शासन केले.”
İş-Boşet'in başını Hevron'da Kral Davut'a getirip, “İşte seni öldürmek isteyen düşmanın Saul'un oğlu İş-Boşet'in başı!” dediler, “RAB bugün Saul'dan ve onun soyundan efendimiz kralın öcünü aldı.”
9 पण दावीद बैरोथच्या रिम्मोनची मुले रेखाब आणि बाना यांना म्हणाला, “देवाची शपथ परमेश्वरानेच मला आजपर्यंत सर्व संकटातून सोडवले आहे.
Ama Davut Beerotlu Rimmon'un oğulları Rekav'la kardeşi Baana'ya şöyle karşılık verdi: “Beni her türlü sıkıntıdan kurtaran yaşayan RAB adıyla derim ki, iyi haber getirdiğini sanarak bana Saul'un öldüğünü bildiren adamı yakalayıp Ziklak'ta yaşamına son verdim. Getirdiği iyi haber için verdiğim ödül buydu!
10 १० यापूर्वीही एकदा आपण चांगली बातमी आणली आहे असे वाटून एकाने मला सांगितले, पाहा शौल मेला त्यास वाटले या बातमीबद्दल मी त्यास बक्षीस देईन पण मी त्यास धरून सिकलाग येथे ठार केले.
11 ११ तुम्हासही आता ठार करून या भूमीवरून नष्ट केले पाहिजे. कारण, आपल्या घरात, आपल्या बिछान्यावर झोपलेल्या एका चांगल्या मनुष्यास तुम्ही दुष्टाव्याने ठार केलेत.”
Doğru birini evinde, yatağında öldüren kötü kişilerin ölümü çok daha kesindir! Şimdi sizi yeryüzünden yok ederek onun öcünü sizden almayacak mıyım?”
12 १२ असे म्हणून दावीदाने आपल्या तरुण सैनिकांना रेखाब आणि बाना यांना ठार करायची आज्ञा दिली. तेव्हा या तरुणांनी त्यांचे हात पाय तोडून त्यांना हेब्रोन येथील तळ्यापाशी टांगले. मग हेब्रोन येथे अबनेरच्या कबरीजवळच त्यांनी ईश-बोशेथच्या मस्तकाचे दफन केले.
Sonra adamlarına buyruk verdi. İki kardeşi öldürüp ellerini, ayaklarını kestiler ve Hevron'daki havuzun yanına astılar. İş-Boşet'in başını ise götürüp Hevron'da Avner'in mezarına gömdüler.

< 2 शमुवेल 4 >