< 2 शमुवेल 21 >
1 १ दावीदाच्या कारकिर्दीत एकदा दुष्काळ पडला. हा दुष्काळ तीन वर्षे टिकला तेव्हा दावीदाने परमेश्वराची प्रार्थना केली परमेश्वराने सांगितले, “शौल आणि त्याचे खुनी रक्तपिपासू घराणे यावेळच्या दुष्काळाला जबाबदार आहेत. शौलने गिबोन्यांना मारले म्हणून हा दुष्काळ पडला.”
In Davids Tagen war drei Jahre lang, Jahr für Jahr, eine Hungersnot. Da suchte David das Antlitz des Herrn. Der Herr aber sprach: "Auf Saul und seinem Haus ruht eine Blutschuld, weil er die Gibeoniten getötet hat."
2 २ गिबोनी म्हणजे इस्राएली नव्हेत ते अमोरी होत इस्राएलींनी त्यांना दुखापत न करण्याचे वचन दिले होते. तरी शौलाने गिबोन्यांच्या वधाचा प्रयत्न केला. इस्राएली आणि यहूदा लोकांविषयीच्या अति उत्साहामुळे त्याने तसे केले गिबोन्यांना एकत्र बोलावून राजा दावीदाने त्यांच्याशी बोलणे केले.
Da berief der König die Gibeoniten und sprach zu ihnen. (Die Gibeoniten aber gehörten nicht zu den Söhnen Israels, sondern zu dem Reste der Amoriter. Doch die Söhne Israels hatten sich ihnen eidlich verpflichtet. Saul aber suchte in seinem Eifer für die Söhne Israels und Juda sie auszurotten.)
3 ३ दावीद त्यांना म्हणाला, “तुमच्यासाठी मी काय करू? इस्राएलाचा कलंक पुसला जाईल आणि तुम्ही या परमेश्वराच्या प्रजेला आशीर्वाद द्याल यासाठी मी काय करू शकतो?”
Da sprach David zu den Gibeoniten: "Was soll ich für euch tun? Womit Sühne schaffen? Segnet doch des Herrn Eigentum!"
4 ४ तेव्हा गिबोनी दावीदाला म्हणाला, “शौलाच्या घराण्याने जे केले त्याची सोन्यारुप्याने भरपाई होऊ शकत नाही. पण त्यासाठी इस्राएलींना जिवे मारण्याचाही आम्हास हक्क नाही.” दावीद म्हणाला, “ठीक तर तुमच्यासाठी मी आता काय करावे?”
Da sprachen die Gibeoniten zu ihm: "Wir wollen kein Silber und Gold von Saul und seinem Hause. Auch im übrigen Israel gibt es keinen Mann, dessen Tod wir fordern." Da sprach er: "Was ihr sagt, tue ich für euch."
5 ५ ते राजाला म्हणाले, “ज्या मनुष्याने आमचा नाश केला व इस्राएली प्रदेशात राहणाऱ्या आमच्या सर्व लोकांचा नाश करण्याचे ज्याने योजिले होते
Da sprachen sie zum König: "Der Mann, der uns aufgerieben und auf unsere Vernichtung gesonnen, daß wir im ganzen Bereich Israels nicht mehr bestünden:
6 ६ त्या शौलाच्या वंशातले सात मुले आमच्या हवाली कर. शौलाला परमेश्वराने राजा म्हणून निवडले होते. म्हणून शौलाच्या गिबा डोंगरावर त्याच्या मुलांना आम्ही देवासमक्षच फाशी देऊ.” राजा दावीद म्हणाला, “मला हे मान्य आहे. त्यांना मी तुमच्या हवाली करतो.”
aus seinen Söhnen soll man uns sieben Männer geben, daß wir sie dem Herrn aussetzen zu Gibea Sauls, des vom Herrn Erwählten!" Da sprach der König: "Ich gebe Sie."
7 ७ पण योनाथानाचा मुलगा मफीबोशेथ याला राजाने अभय दिले. योनाथान हा शौलाचा मुलगा. पण दावीदाने त्यास त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचे परमेश्वरास स्मरून वचन दिले होते, म्हणून मफीबोशेथला राजाने इजा पोचू दिली नाही.
Der König aber verschonte Mephiboset, den Sohn des Saulssohnes Jonatan, wegen des Herrnschwures, der zwischen David und Sauls Sohn Jonatan bestand.
8 ८ अरमोनी आणि मफीबोशेथ हे शौलाला अय्याची कन्या रिस्पा या पत्नीपासून झालेली अपत्य शौलला मीखल नावाची कन्याही होती. अद्रीएलशी तिचे लग्न झाले होते. महोलाथी येथील बर्जिल्ल्याचा हा पुत्र. या दांपत्याची पाच मुलेही दावीदाने ताब्यात घेतली.
So nahm der König der Rispa, Ajas Tochter, beide Söhne, die sie Saul geboren hatte, Armoni und Mephiboset, sowie der Merab, Sauls Tochter, fünf Söhne, die sie dem Mecholatiter Adriel, Barzillais Sohn, geboren hatte.
9 ९ या सात जणांना त्याने गिबोन्यांच्या स्वाधीन केले. गिबोन्यांनी त्यांना गिबा डोंगरावर परमेश्वरासमोर फाशी दिली. ते सातजण एकदमच प्राणाला मुकले त्यांना ठार केले गेले ते दिवस हंगामाच्या सुरुवातीचे होते. जवाच्या पिकाच्या सुरुवातीचा तो वसंतातील काळ होता.
Diese gab er den Gibeoniten. Und sie setzten sie auf dem Berge vor dem Herrn aus. So kamen die Sieben zusammen um. Und zwar starben sie in den Tagen der Gerstenernte, in den ersten Tagen, zu Beginn der Gerstenernte.
10 १० अय्याची कन्या रिस्पा हिने शोकाकुल होऊन एक मोठे कापड त्या गिबाच्या खडकावर अंथरले. तेव्हापासून पावसास सुरुवात होईपर्यंत ते तसेच राहू दिले. रिस्पाने रात्रंदिवस त्या मृत देहांची निगराणी केली. दिवसा पक्ष्यांनी आणि रात्री जंगली जनावरांनी त्याचे लचके तोडू नयेत म्हणून राखण केली.
Da nahm Ajas Tochter Rispa das Trauergewand und breitete es sich auf den Felsen, vom Beginn der Gerstenernte, bis Wasser vom Himmel auf sie floß. So hatte sie es verhütet, daß des Himmels Vögel bei Tag und des Feldes Tiere bei Nacht über sie herfielen.
11 ११ शौलाची उपपत्नी व अय्याची कन्या रिस्पा काय करत आहे ते लोकांनी दावीदाच्या कानावर घातले.
Da ward David gemeldet, was Rispa, Ajas Tochter und Sauls Nebenweib, getan.
12 १२ तेव्हा दावीदाने याबेश गिलाद मधील लोकांकडून शौल आणि योनाथान यांच्या अस्थी आणवल्या शौल आणि योनाथान यांचा गिलबोवा येथे वध झाल्यावर याबोश गिलादाच्या लोकांनी त्या नेल्या होत्या. बेथ-शान मधील भिंतीवर पलिष्ट्यांनी या दोघांचे देह टांगले होते. पण बेथशानच्या लोकांनी येऊन भरवस्तीतील ती प्रेते चोरून नेली.
Da ging David hin und holte die Gebeine Sauls und die seines Sohnes Jonatan von den Bürgern in Jabes Gilead. Sie hatten sie vom Marktplatz in Betsean entführt, wo sie die Philister aufgehängt hatten an jenem Tage, als sie Saul am Gilboa schlugen.
13 १३ याबेश-गिलाद मधून शौल आणि त्याचा पुत्र योनाथान या दोघांच्या अस्थी दावीदाने आणल्या. तसेच त्या फाशी दिल्या गेलेल्या सात जणांचे मृतदेहही आणले.
So brachte er Sauls und seines Sohnes Jonatan Gebeine von dort weg. Dann sammelte man die Gebeine der Ausgesetzten
14 १४ शौल आणि योनाथानाच्या अस्थी त्यांनी बन्यामीन प्रदेशातील सेला येथे पुरल्या. शौलाचे वडील कीश यांच्या कबरीत त्या पुरल्या राजाच्या आज्ञे बरहुकूम लोकांनी हे सर्व केले. तेव्हा देवाने लोकांची प्रार्थना ऐकली आणि तिला त्याने प्रतिसाद दिला.
und begrub sie mit Sauls und seines Sohnes Jonatan Gebeinen im Lande Benjamin zu Sela im Grabe seines Vaters Kis. So tat man alles, was der König befohlen hatte, und Gott ward danach dem Lande hold gestimmt. -
15 १५ पलिष्ट्यांनी पुन्हा इस्राएलीशी युध्द पुकारले तेव्हा दावीद आपल्या लोकांबरोबर पलिष्ट्यांशी युध्द करायला निघाला. पण यावेळी दावीद फार थकून गेला.
Da war wieder Krieg zwischen den Philistern und Israel. David zog mit seinen Dienern hinab, und sie kämpften mit den Philistern. David aber ward müde.
16 १६ त्यावेळी तेथे रेफाई वंशातला इशबी-बनोब हा एक बलाढ्य मनुष्य होता. त्याच्या भाल्याचे वजनच तिनशे शेकेल पितळ होते. त्याच्याजवळ नवी कोरी तलवार होती. दावीदाला मारायचा त्याने प्रयत्न केला.
Da nahm ihn Benob gefangen. Dieser gehörte zu den Kindern des Akis, und sein Speer wog 300 Sekel Erz; er hatte erst jüngst den Gurt angelegt. Und schon dachte er daran, David zu erschlagen.
17 १७ पण सरुवेचा मुलगा अबीशय याने या पलिष्ट्याला मारले आणि दावीदाचे प्राण वाचवले. तेव्हा दावीदाबरोबरच्या लोकांनी दावीदाला शपथ घालून सांगितले, “तुम्ही आता लढाईवर येऊ नये. नाहीतर इस्राएल एका मोठ्या नेत्याला मुकेल.”
Da kam ihm Serujas Sohn Abisai zu Hilfe. Und er schlug den Philister tot. Damals beschworen Davids Leute ihn: "Du darfst nicht mehr mit uns in den Kampf ziehen, daß du nicht Israels Leuchte verlöschest!"
18 १८ यानंतर गोब येथे पलिष्ट्यांशी आणखी एकदा लढाई झाली. तेव्हा हूशाथी सिब्बखय याने रेफाई वंशातील सफ याचा वध केला.
Hernach war wieder Krieg zu Gob mit den Philistern. Damals schlug der Chusatiter Sibkai den Saph von den Kindern des Akis.
19 १९ गोब येथेच पुन्हा पलिष्ट्यांशी युध्द झाले. तेव्हा बेथलहेमचा यारे ओरगीम याचा मुलगा एलहानान याने गथचा गल्याथ याला ठार केले. विणकराच्या तुरीएवढा त्याचा भाला होता.
Nochmals war ein Kampf mit den Philistern zu Gob. Da schlug Jairs Sohn Elchanan, ein Weber aus Bethlehem, den Gatiter Goliat, dessen Speerschaft einem Weberbaume glich.
20 २० गथ येथे आणखी एक युध्द झाले. तेथे एक धिप्पाड पुरुष होता. त्याच्या हातापायांना सहा सहा, म्हणजे एकंदर चोवीस बोटे होती. हा ही रेफाई वंशातला होता.
Nochmals war ein Kampf bei Gat. Da war ein Kriegsmann, der je sechs Finger an den Händen und je sechs Zehen an den Füßen hatte, zusammen vierundzwanzig, und der ebenfalls von Akis stammte.
21 २१ त्याने इस्राएलाला आव्हान दिले पण योनाथानाने या मनुष्याचे प्राण घेतले. हा योनाथान म्हणजे दावीदाचा भाऊ शिमी याचा मुलगा.
Er höhnte Israel. Da schlug ihn Jonatan, der Sohn Simis, des Bruders Davids.
22 २२ ही माणसे गथ येथील रेफाई वंशातील होती. दावीद आणि त्याचे लोक यांनी त्यांना ठार केले.
Diese Vier stammten von Akis zu Gat ab, und sie fielen durch Davids und seiner Diener Hand.