< 2 शमुवेल 2 >
1 १ मग दावीदाने परमेश्वरास विचारले, “मी यहूदातील एखाद्या नगरात जाऊ का?” तेव्हा परमेश्वर म्हणाला, “हो खुशाल जा,” दावीदाने विचारले, कुठे जाऊ? देवाने सांगितले, “हेब्रोनला जा.”
這事以後,達味求問上主說:「我是否可以上猶大的一座城中去﹖」上主對他說:「可以。」達味又問說:「我上何處去﹖」答說:「往赫貝龍去。」
2 २ तेव्हा दावीद आपल्या दोन्ही पत्नींसह हेब्रोनला गेला. इज्रेलची अहीनवाम आणि कर्मेलच्या नाबालची विधवा अबीगईल या त्याच्या दोन स्त्रिया.
於是達味帶著他兩個妻子:依次勒耳人阿希諾罕和作過加爾默耳人納巴耳妻子的阿彼蓋耳,上那裏去了。
3 ३ दावीदाने आपल्याबरोबरच्या लोकांसही त्यांच्या त्यांच्या परिवारासकट सोबत घेतले. हेब्रोन येथे आणि आसपासच्या नगरांमध्ये या सर्वांनी वस्ती केली.
凡跟隨達味的人,他也叫他們各帶家眷一起上去,住在赫類龍城各區內。
4 ४ यहूदा येथील लोक मग हेब्रोनला आले आणि त्यांनी दावीदाला अभिषेक करून यहूदाचा राजा म्हणून घोषित केले. ते मग त्यास म्हणाले, “याबेश गिलाद देशाच्या लोकांनी शौलाला पुरले.”
以後,猶大人來,在那裏給達味傅油,立他作猶大家族的君王。有人告訴達味,基肋阿得雅貝士人埋葬了撒烏耳。
5 ५ तेव्हा दावीदाने याबेश गिलादाच्या लोकांकडे दूत पाठवून संदेश दिला, “आपला स्वामी शौल याचा दफनविधी करून तुम्ही जो दयाभाव दाखवला आहे त्याबद्दल परमेश्वर तुमचे भले करो.
達味就派遣使者到基肋阿得雅貝士人那裏,向他們說:「願上主祝福你們! 因為你們對你們的主上撒烏耳行了這件善事,將他埋葬了。
6 ६ आता परमेश्वर तुमच्याशी प्रामाणिक राहील, तुमच्यावर प्रेमाची पाखर घालील. मीही तुमच्याशी दयाळूपणाने वागेन. कारण तुम्ही हे काम केलेले आहे.
願上主對你們顯示他的慈愛和忠信! 因為你們作了這事,我也要恩待你們。
7 ७ आता खंबीर राहा आणि धैर्याने वागा. आपला स्वामी शौल मरण पावला असला तरी यहूदा वंशातील लोकांनी माझा राज्याभिषेक केला आहे.”
現在你們要加強自己的力量,作勇敢的人,因為你們的主上撒烏耳已經陣亡,但猶大家族已給我傅油,立我做了他們的君王。」
8 ८ नेरचा मुलगा अबनेर हा शौलाचा सेनापती होता. इकडे तो शौलाचा मुलगा इश-बोशेथ याला घेऊन महनाईम याठिकाणी आला.
那時,撒烏耳的軍長,乃爾的兒子阿貝乃爾,已帶領撒烏耳的兒子依市巴耳過河,到了瑪哈納殷,
9 ९ आणि त्याने ईश-बोशेथला गिलाद, अशेर, इज्रेल, एफ्राईम, बन्यामीन आणि सर्व इस्राएल यांच्यावर राजा म्हणून नेमले.
立他為基肋阿得、革叔爾、依次勒耳、厄弗辣因、本雅明,全以色列的君王。
10 १० हा शौलाचा पुत्र ईश-बोशेथ इस्राएलवर राज्य करू लागला तेव्हा चाळीस वर्षाचा होता. त्याने दोन वर्षे कारभार पाहिला. पण यहूदा वंशाचा पाठिंबा दावीदाला होता.
撒烏耳的兒子依市巴耳為以色列王時,已四十歲,為王兩年。此時隨從達味的,只有猶大家族。
11 ११ दावीद हेब्रोनमध्ये राज्य करत होता. त्याने यहूदाच्या घराण्यावर साडेसात वर्षे राज्य केले.
達味在赫貝龍作猶大家族君王的年數,共七年零六個月。
12 १२ नेराचा मुलगा अबनेर आणि शौलपुत्र ईश-बोशेथचे सेवक महनाईम सोडून गिबोन येथे आले.
乃爾的兒子阿貝乃爾和撒烏耳的兒子依市巴耳的臣僕,從瑪哈納殷來到基貝紅。
13 १३ सरुवा हिचा मुलगा यवाब आणि दावीदचे सेवकही बाहेर पडून गिबोनला आले. गिबोनच्या तलावाशी या दोन गटांची गाठ पडली. तलावाच्या दोन बाजूला दोन्ही सैन्ये उतरली.
責魯雅的兒子約阿布和達味的臣僕,也從赫貝龍出發,彼此在基貝紅池旁相遇,雙方就都停下,各立在水池一邊。
14 १४ अबनेर यवाबाला म्हणाला, “आपल्यातील तरुण सैनिकांनी उठून समोरासमोर येऊन दोन हात करावे,” यवाब म्हणाला, “ठीक आहे होऊन जाऊ दे.”
阿貝乃爾對約阿布說:「讓青年人出來,在我們面前比比武! 」約阿布答說:「好,叫他們出來! 」
15 १५ तेव्हा दोन्ही बाजूचे तरुण सैनिक उठले. त्यांनी आपापली संख्या पाहिली. शौलपुत्र ईश-बोशेथ याच्या बाजूने लढायला त्यांनी बन्यामीनच्या वंशातील बाराजण निवडले आणि दावीदाच्या सैन्यातील बाराजणांना घेतले.
他們就出來,點了人數,十二個本雅明人在撒烏耳的兒子依市巴耳一面,由達味的僕味的僕從中,也出來十二個人。
16 १६ प्रत्येकाने आपल्या प्रतिस्पर्ध्याचे मस्तक धरून त्याच्या कुशीत तलवार खुपसली. तेव्हा सर्व एकदम पडले. म्हणून त्या जागेचे नाव “हेलकथहसूरीम” असे पडले हे स्थळ गिबोनामध्ये आहे.
每人抓住對方的頭,用力猛刺對方的腰,雙方都同時倒下;因此那地方叫作匝得平原,離基貝紅不遠。
17 १७ त्या दिवशी तेथे तुंबळ युध्द झाले. दावीदाच्या सैन्याने त्या दिवशी अबनेर आणि इस्राएल लोक यांचा पराभव केला.
那天也發生了很激烈的戰鬥,阿貝乃爾和以色列人,竟為達味的臣僕打敗。
18 १८ यवाब, अबीशय आणि असाएल हे सरुवेचे तीन पुत्र. त्यापैकी असाएल हा वेगवान धावपटू होता. अगदी रानातल्या हरीणासारखा चपळ होता.
責魯雅的三個兒子約阿布、阿彼瑟與阿撒耳,那時都在場,阿撒耳的腿快捷像野羚羊。
19 १९ त्याने अबनेरचा पाठलाग सुरु केला. अबनेरचा पाठलाग करताना त्याने उजवीडावीकडे वळून देखील पाहिले नाही.
阿撒耳便去追趕阿貝乃爾,不左不右,直追阿貝乃爾。
20 २० अबनेरने मागे वळून विचारले, “तू असाएल ना?”
阿貝乃爾轉過身來問說:「你是阿撒耳嗎﹖」他答說:「我是。」
21 २१ असाएलला इजा होऊ नये असे अबनेरला वाटत होते. म्हणून तो असाएलला म्हणाला, “माझा पाठलाग थांबव एखाद्या तरुण सैनिकाला धर. त्याचे चिलखत स्वतःसाठी घे.” पण असाएलने त्याचे न ऐकता अबनेरचा पाठलाग चालूच ठेवला.
阿貝乃爾對他說:「你轉左或轉右,捉住一個青年,奪取他的裝備罷! 」但阿撒耳卻不肯放鬆他。
22 २२ पुन्हा अबनेर त्यास म्हणाला, “हा पाठलाग थांबव नाहीतर मला तुला मारावे लागेल आणि तसे झाले तर तुझा भाऊ यवाब याला मी तोंड दाखवू शकणार नाही.”
阿貝乃爾就再對阿撒耳說:「你不要再追趕我了,為什麼逼我將你擊倒在地,叫我日後怎有臉再見你的兄弟約阿布﹖
23 २३ तरीही असाएल ऐकेना. तेव्हा अबनेरने आपल्या भाल्याचे मागचे टोक असाएलच्या पोटात खुपसले. भाला सरळ त्याच्या पोटात घूसून पाठीतून निघाला. असाएलला तिथे तात्काळ मृत्यू आला असाएलचा मृतदेह तिथेच जमिनीवर पडलेला होता. लोकांनी ते पाहिले आणि ते तिथेच थांबले.
阿撒耳仍不肯罷休。阿貝乃爾就調過槍來,擊中了他的腹部,槍由背後穿出,他就倒在那裏,當下死了。凡來到阿撒耳倒斃的地方的人,都站住了。
24 २४ पण यवाब आणि अबीशय यांनी अबनेरचा पाठलाग चालू ठेवला. ते अम्मा टेकडीपाशी पोहोंचले तेव्हा सूर्य नुकताच मावळत होता. ही टेकडी गिबोन वाळवंटाच्या रस्त्यावरील गिहा गावासमोर आहे.
約阿布和阿彼瑟仍在追趕阿貝乃爾,當他們來到往革巴曠野去的路上,基亞前的阿瑪山崗時,太陽就快要西落。
25 २५ बन्यामीनच्या घराण्यातील लोक अबनेरकडे आले आणि या डोंगराच्या शिखरावर उभे राहिले.
本雅明人集結成隊,跟在阿貝乃爾後邊,站在一座小山頭上。
26 २६ तेव्हा यवाबाला हाक मारून अबनेरने त्यास विचारले, “आपापसातील या प्राणघातक लढाया अशाच चालू ठेवायच्या आहेत का? याचे परीणाम दुःखच होणार आहे हे तू जाणतोसच. आपल्याच भाऊबंदांचा पाठलाग थांबवायला तुझ्या लोकांस सांग.”
阿貝乃爾向約阿布喊說:「刀劍豈能永遠擊殺﹖你豈不知結局更為不幸﹖幾時你纔命眾人轉身,不再追趕自己的兄弟﹖」
27 २७ तेव्हा यवाब म्हणाला, तू हे सुचवलेस ते चांगले झाले नाहीतर, देवाच्या जीविताची शपथ, हे लोक सकाळच्या वेळी आपल्याच बांधवांचा पाठलाग करत राहिले असते.
約阿布答說:「上主永在! 若你不發言,眾人直到早晨,連一個也不會停止追趕自己的兄弟! 」
28 २८ आणि यवाबाने रणशिंग फुंकले. त्याच्या बाजूच्या लोकांनी इस्राएल लोकांचा पाठलाग थांबवला. एवढेच नव्हे तर त्यांनी पुढे इस्राएलाशी युध्दही केले नाही.
約阿布遂吹號,眾人就停下,不再追趕以色列人,不再進攻。
29 २९ अबनेर आणि त्याच्या बरोबरची माणसे यांनी रातोरात यार्देन खोऱ्यातून कूच केली. नदी पार करून महनाईमला पोहोचेपर्यंत ते वाटचाल करत होते.
阿貝乃爾同他的人,那一整夜走過了阿辣巴平原,過了約但河,以後,又走了一上午,終于到了瑪哈納殷。
30 ३० यवाबाने अबनेरचा पाठलाग थांबवला आणि तो परतला. आपल्या लोकांस त्याने एकत्र केले तेव्हा असाएल धरून दावीदाच्या सेवकांपैकी एकोणीस जण बेपत्ता असल्याचे त्यास आढळून आले.
約阿布追趕阿貝乃爾回來,召集了自己的人,達味僕人中,除阿撒耳外,少了十九人。
31 ३१ पण दावीदाच्या लोकांनी बन्यामीनच्या कुळातील अबनेरची तीनशे साठ माणसे मारली होती.
但阿貝乃爾所帶的本雅明人中,有三百六十人,為達味的臣僕殺死。
32 ३२ दावीदाच्या लोकांनी असाएलचे दफन बेथलहेम येथे त्याच्या वडीलांच्या थडग्यातच केले यवाब आणि त्याची माणसे रात्रभर प्रवास करून उजाडता हेब्रोन येथे पोहोचली.
遂將阿撒耳的屍體帶回,埋在白冷他父親的墳墓內。約阿布同他的人走了一夜,天亮時已到赫貝龍。