< 2 शमुवेल 19 >

1 लोकांनी ही बातमी यवाबाला सांगितली. ते त्यास म्हणाले, राजा अबशालोमसाठी शोक करत आहे. तो फार दु: खात आहे.
And they brought Joab word, saying, Behold, the king weeps and mourns for Abessalom.
2 दावीदाच्या सैन्याने त्या दिवशीची लढाई जिंकली होती. पण लोकांसाठी मात्र तो दु: खाचा दिवस ठरला राजा आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे दु: खात आहे हे ऐकून लोक फार खिन्न झाले.
And the victory was turned that day into mourning to all the people, for the people heard say that day, The king grieves after his son.
3 ते शांतपणे नगरात परतले, युध्दात पराभूत होऊन तिथून पळ काढलेल्या लोकांप्रमाणे ते दिसत होते.
And the people stole away that day to go into the city, as people steal away when they are ashamed as they flee in the battle.
4 राजा आपला चेहरा झाकून घेऊन आपला मुलगा अबशालोम याच्या नावाने, माझ्या मुला अबशालोमा, असा मोठ्याने आक्रोश करत होता.
And the king hid his face: and the king cried with a loud voice, My son Abessalom! Abessalom my son!
5 यवाब राजाच्या निवासस्थानी आला आणि त्यास म्हणाला, आपल्या सेवकांना तुम्ही आज मान खाली घालायला लावली आहे. तुमच्या सेवकांनी तुमचा जीव वाचवला. तुमचे पुत्र, कन्या, पत्नी, पत्नी दासी यांचे प्राण वाचवले.
And Joab went in to the king, into the house, and said, You have this day shamed the faces of all your servants that have delivered you this day, and [have saved] the lives of your sons and of your daughters, and the lives of your wives, and of your concubines,
6 ज्यांनी तुमचा द्वेष केला त्यांच्यावर तुम्ही प्रेम दाखवता आहात, आणि ज्यांनी तुमच्यावर लोभ केला त्यांना तुम्ही दूर सारता आहात. तुमची माणसे, तुमचे सेवक यांना तुमच्या दृष्टीने काही किंमत नाही हे तुमच्या वागण्यावरून स्पष्ट झाले आहे. आज अबशालोम जगला असता आणि आम्ही सर्व मरण पावलो असतो तर तुम्हास फार आनंद झाला असता असे दिसते.
forasmuch as you love them that hate you, and hate them that love you; and you have this day declared, that your princes and your servants are nothing [in your sight]: for I know this day, that if Abessalom were alive, [and] all of us dead today, then it would have been right in your sight.
7 आता ऊठा आणि आपल्या सेवकांशी बोला. त्यांना प्रोत्साहन द्या. आताच उठून तुम्ही हे ताबडतोब केले नाही, तर आज रात्रीपर्यंत तुमच्या बाजूला एकही मनुष्य उरणार नाही याची मी परमेश्वरासमक्ष ग्वाही देतो. आणि हा तुमच्या बालपणापासूनच्या आयुष्यातला सर्वांत मोठा आघात असेल.
And now arise, and go forth, and speak comfortably to your servants; for I have sworn by the Lord, that unless you will go forth today, there shall not a man remain with you this night: and know for yourself, this thing [will] indeed [be] evil to you beyond all the evil that has come upon you from your youth until now.
8 तेव्हा राजा उठून वेशीपाशी गेला. राजा तेथे आल्याची खबर सर्वत्र पसरली. तेव्हा सर्व जण राजाच्या दर्शनाला जमले. अबशालोमला पाठिंबा देणारे सर्व इस्राएल लोक आपापल्या ठिकाणी पळून गेले होते.
Then the king arose, and sat in the gate: and all the people reported, saying, Behold, the king sits in the gate. And all the people went in before the king to the gate; for Israel had fled every man to his tent.
9 इस्राएलच्या सर्व घराण्यातील लोक आता बोलू लागले “पलिष्टी आणि आपले इतर शत्रू यांच्यापासून राजा दावीदाने आपल्याला संरक्षण दिले, पण तो अबशालोमपासून पळून गेला.”
And all the people disputed among all the tribes of Israel, saying, King David delivered us from all our enemies, and he rescued us from the hand of the Philistines: and now he has fled from the land, and from his kingdom, and from Abessalom.
10 १० म्हणून अबशालोमची आपण राज्य करण्यासाठी निवड केली. पण तो आता लढाईत मरण पावला आहे. तेव्हा आपण आता पुन्हा दावीदाला राजा करू.
And Abessalom, whom we anointed over us, is dead in battle: and now why are you silent about bringing back the king? And the word of all Israel came to the king.
11 ११ सादोक आणि अब्याथार या याजकांना राजा दावीदाने निरोप पाठवला, यहूदातील वडीलधाऱ्यांशी बोला. त्यांना सांगा, राजा दावीदाला गादीवर आणायला तुम्ही शेवटचे घराणे का आहा? राजाने पुन्हा परतण्याविषयी सर्वच इस्राएल लोकांची बोलणी चाललेली आहेत.
And king David sent to Sadoc and Abiathar the priests, saying, Speak to the elders of Israel, saying, Why are you the last to bring back the king to his house? whereas the word of all Israel is come to the king to his house.
12 १२ तुम्ही माझे बांधव, माझ्या कुटुंबातीलच आहात. मग राजाला परत आणणारे तुम्ही शेवटचे घराणे का आहात?
You [are] my brethren, you [are] my bones and my flesh: why are you the last to bring back the king to his house?
13 १३ आणि अमासास सांगा, तुम्ही माझ्या कुटुंबाचाच भाग आहात. यवाबाच्या जागी सेनापती म्हणून मी तुमची नेमणूक केली नाही, तर देव मला शासन करो.
And you shall say to Amessai, [Are] you not my bone and my flesh? and now God do so to me, and more also, if you shall not be commander of the host before me continually in the room of Joab.
14 १४ दावीदाने यहूदातील सर्व लोकांच्या हृदयाला हात घातला. त्यामुळे ते सर्व एकदिलाने राजी झाले. यहूदी लोकांनी राजाला संदेश पाठवला की, तुम्ही आणि तुमचे अधिकारी, सेवक यांनी माघारे यावे.
And he bowed the heart of all the men of Juda as that of one man; and they sent to the king, saying, Return you, and all your servants.
15 १५ मग राजा दावीद यार्देन नदीपाशी आला. यहूदातील लोक त्यास भेटायला गिलगाल येथे आले. राजाला यार्देन नदी पार करून आणण्याचा त्यांचा हेतू होता.
And the king returned, and came as far as Jordan. And the men of Juda came to Galgala on their way to meet the king, to cause the king to pass over Jordan.
16 १६ गेराचा पुत्र शिमी हा बन्यामिनी होता तो बहूरीम येथे राहत असे. यहूदातील लोकांसह राजाची भेट घ्यायला तो लगबगीने आला.
And Semei the son of Gera, the Benjamite, of Baurim, hasted and went down with the men of Juda to meet king David.
17 १७ बन्यामीनच्या वंशातील हजार माणसेही त्याच्याबरोबर आली. शौलाच्या घराण्यातील सेवक सीबा हा ही आला. आपले पंधरा पुत्र आणि वीस नोकर यांनाही त्याने बरोबर आणले. राजा दावीदाला भेटायला हे सर्व यार्देन नदीजवळ तात्काळ पोहोचले.
And a thousand men of Benjamin [were] with him, and Siba the servant of the house of Saul, and his fifteen sons with him, and his twenty servants with him: and they went directly down to Jordan before the king,
18 १८ राजाच्या कुटुंबियांना उतरून घ्यायला ते यार्देनच्या पलीकडे गेले. राजाला हवे ते करायला ते तयार होते. राजा नदी ओलांडत असताना गेराचा मुलगा शिमी त्याच्या भेटीला आला. शिमीने राजाला जमिनीपर्यंत लवून अभिवादन केले.
and they performed the service of bringing the king over; and there went over a ferry-boat to remove the household of the king, and to do that which was right in his eyes. And Semei the son of Gera fell on his face before the king, as he went over Jordan;
19 १९ तो राजाला म्हणाला, स्वामी, माझ्या हातून घडलेल्या अपराधांचा विचार करू नका. महाराज, तुम्ही यरूशलेम सोडून गेलात तेव्हाची माझी कृत्ये विसरून जा.
and said to the king, Let not my lord now impute iniquity, and remember not all the iniquity of your servant in the day in which my lord went out from Jerusalem, so that the king should mind it.
20 २० आपल्या दासाने अपराध केला आहे हे आपला दास जाणून आहे; म्हणून पाहा, आज माझ्या स्वामीराजांच्या भेटीस्तव अवघ्या योसेफ घराण्यातून मीच पहिला आलो आहे.
For your servant knows that I have sinned: and, behold, I am come today before all Israel and the house of Joseph, to go down and meet my lord the king.
21 २१ पण सरुवेचा मुलगा अबीशय म्हणाला, परमेश्वराने निवडलेल्या राजाविषयी शिमीने शिव्याशाप दिले तेव्हा त्यास ठारच करायला हवे.
And Abessai the son of Saruia answered and said, Shall not Semei therefore be put to death, because he cursed the Lord's anointed?
22 २२ दावीद म्हणाला, सरुवेच्या मुलानो मी तुमच्या बरोबर कसे वागावे? तुमचे हे बोलणे आज माझ्या विरूद्ध आहे. इस्राएलमध्ये कोणालाही ठार केले जाणार नाही कारण आज मी इस्राएलचा राजा आहे.
And David said, What have I to do with you, you sons of Saruia, that you as it were lie in wait against me this day? today no man in Israel shall be put to death, for I know not if I this day reign over Israel.
23 २३ मग राजा शिमीला म्हणाला, तू मरणार नाहीस. आपण शिमीचा वध करणार नाही, असे राजाने शिमीला वचन दिले.
And the king said to Semei, You shall not die: and the king swore to him.
24 २४ शौलाचा नातू मफीबोशेथ राजा दावीदाला भेटायला आला. राजा यरूशलेम सोडून गेला तेव्हा पासून तो सुखरुप परतेपर्यंत मफीबोशेथने स्वत: कडे फार दुर्लक्ष केले होते. त्याने दाढी केली नाही, पायांची निगा राखली नाही की कपडे धुतले नाहीत.
And Memphibosthe the son of Saul's son went down to meet the king, and had not dressed his feet, nor pared his nails, nor shaved himself, neither had he washed his garments, from the day that the king departed, until the day when he arrived in peace.
25 २५ मफीबोशेथ यरूशलेमेहून आला तेव्हा राजा त्यास म्हणाला, मी तेथून निघालो तेव्हा तू ही माझ्याबरोबर का बाहेर पडला नाहीस?
And it came to pass when he went into Jerusalem to meet the king, that the king said to him, Why did you not go with me, Memphibosthe?
26 २६ मफीबोशेथने सांगितले, महाराज, माझ्या नोकराने, सीबाने, मला फसवले, त्यास मी म्हणालो, मी पांगळा आहे, तेव्हा गाढवावर खोगीर चढव म्हणजे त्यावर बसून मी राजाबरोबर जाईन.
And Memphibosthe said to him, My lord, O king, my servant deceived me; for your servant said to him, Saddle me the ass, and I will ride upon it, and go with the king; for your servant [is] lame.
27 २७ पण त्याने माझ्याशी लबाडी केली. माझ्याविरूद्ध तुमचे कान फुंकले. पण स्वामी, तुम्ही देवदूतासारखे आहात. आपल्याला योग्य वाटेल ते करा.
And he has dealt deceitfully with your servant to my lord the king: but my lord the king [is] as an angel of God, and do you that which is good in your eyes.
28 २८ माझ्या बापाचे सर्व घराणे स्वामीराजासमोर मृतवत होते; तरी आपण आपल्या दासाची आपल्या पंक्तीस बसणार्‍यांमध्ये नेमणूक केली; महाराजांजवळ आणखी दाद मागायचा मला काय हक्क आहे?
For all the house of my father were but as dead men before my lord the king; yet you have set your servant among them that eat at your table: and what right have I any longer even to cry to the king?
29 २९ तेव्हा राजा मफीबोशेथला म्हणाला, आता आपल्या अडचणीविषयी आणखी काही सांगू नकोस. आता माझा निर्णय ऐक तू आणि सीबा जमीन विभागून घ्या.
And the king said to him, Why speak you any longer of your matters? I have said, You and Siba shall divide the land.
30 ३० मफीबोशेथ राजाला म्हणाला महाराज ती सगळी जमीन खुशाल सीबाला घेऊ द्या. माझे धनी सुखरुप परत आला यामध्ये सगळे आले.
And Memphibosthe said to the king, Yes, let him take all, since my lord the king has come in peace to his house.
31 ३१ गिलादाचा बर्जिल्ल्य रोगलीमहून आला. दावीदाला तो यार्देन नदीच्या पलीकडे पोचवायला आला.
And Berzelli the Galaadite came down from Rogellim, and crossed over Jordan with the king, that he might conduct the king over Jordan.
32 ३२ बर्जिल्ल्यचे वय झाले होते तो ऐंशी वर्षांचा होता. राजा दावीदाचा मुक्काम महनाईम येथे असताना त्याने दावीदाला अन्नधान्य आणि इतर गोष्टी पुरवल्या होत्या. श्रीमंत असल्यामुळे तो एवढे करू शकला.
And Berzelli was a very old man, eighty years old; and he had maintained the king when he lived in Manaim; for he was a very great man.
33 ३३ दावीद त्यास म्हणाला, नदी उतरून माझ्याबरोबर चल. तू यरूशलेमेमध्ये माझ्याबरोबर राहिलास तर मी तुझा सांभाळ करीन.
And the king said to Berzelli, You shall go over with me, and I will nourish your old age with me in Jerusalem.
34 ३४ पण बर्जिल्ल्य राजाला म्हणाला, तुम्हास माझे वय माहीत आहे ना? यरूशलेमपर्यंत मी तुमच्याबरोबर येऊ शकेन असे तुम्हास वाटते का?
And Berzelli said to the king, How many [are] the days of the years of my life, that I should go up with the king to Jerusalem?
35 ३५ मी ऐंशी वर्षांचा आहे. वार्धाक्यामुळे मी आता बऱ्यावाईटाची पारख करू शकत नाही. खातोपितो त्याची चव सांगू शकत नाही. गाणाऱ्या स्त्री पुरुषांच्या आवाजाला दाद देऊ शकत नाही. राजा, माझ्या राजा तुमच्या मागे लोढणे कशाला लावून देऊ?
I am this day eighty years old: can I then distinguish between good and evil? Can your servant taste any longer what I eat or drink? can I any longer hear the voice of singing men or singing women? and therefore shall your servant any longer be a burden to my lord the king?
36 ३६ आता मला तुमच्याकडून अनुग्रहाची अपेक्षा नाही. मी तुझा सेवक यार्देन नदी उतरून तुमच्याबरोबर येतो. राजाने अशाप्रकारे या बक्षिसाने परतफेड का करावी?
Your servant will go a little way over Jordan with the king: and why does the king return me this recompense?
37 ३७ पण मला पुन्हा परत घरी जाऊ द्या. म्हणजे माझ्या गावात मी देह ठेवीन आणि माझ्या आईवडीलांच्या कबरेतच माझे दफन होईल. पण किम्हानला आपला चाकर म्हणून बरोबर घेऊन जाऊ शकता. महाराज आपल्या मर्जीप्रमाणे त्यास वागवा.
Let, I pray you, your servant remain, and I will die in my city, by the tomb of my father and of my mother. And, behold, your servant Chamaam shall go over with my lord the king; and do you to him as it seems good in your eyes.
38 ३८ तेव्हा राजा म्हणाला, “तर किम्हाम माझ्याबरोबर येईल.” तुला स्मरून मी त्याचे भले करीन. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.
And the king said, Let Chamaam go over with me, and I will do to him what is good in my sight; and whatever you shall choose at my hand, I will do for you.
39 ३९ राजाने बर्जिल्ल्यचे चुंबन घेऊन त्यास आशीर्वाद दिले. बर्जिल्ल्य आपल्या घरी परतला. राजा इतर लोकांबरोबर नदी ओलांडून पलीकडे गेला.
And all the people went over Jordan, and the king went over; and the king kissed Berzelli, and blessed him; and he returned to his place.
40 ४० नदी ओलांडून राजा गिलगाल येथे आला. किम्हाम त्याच्याबरोबर होता. यहूदाचे सर्व लोक आणि निम्मे इस्राएल लोक राजाला नदी ओलांडून पोहचवायला आले.
And the king went over to Galgala, and Chamaam went over with him: and all the men of Juda went over with the king, and also half the people of Israel.
41 ४१ सर्व इस्राएल लोक राजाकडे आले. ते म्हणाले, “आमचे बांधव यहूदी यांनी तुमचा ताबा घेऊन तुम्हास आणि तुमच्या कुटुंबियांना यार्देन पार करून आणले असे का?”
And behold, all the men of Israel came to the king, and said to the king, Why have our brethren the men of Juda stolen you away, and caused the king and all his house to pass over Jordan, and all the men of David with him?
42 ४२ तेव्हा सर्व यहूदी लोकांनी त्या इस्राएल लोकांस सांगितले. “कारण राजा आमचा जवळचा आप्त आहे. तुम्हास एवढा राग का यावा? आम्ही राजाचे अन्न खाल्ले काय? ज्यासाठी आम्हास काही द्यावे लागेल? किंवा त्याने आम्हास काही बक्षीस दिले काय?”
And all the men of Juda answered the men of Israel, and said, Because the king is near of kin to us: and why were you thus angry concerning this matter? have we indeed eaten of the king's food? or has he given us a gift, or has he sent us a portion?
43 ४३ इस्राएल लोक म्हणाले, “आमच्याकडे दावीदाचे दहा हिस्से आहेत. तेव्हा तुमच्यापेक्षा आमचा त्याच्यावर जास्त हक्क आहे. असे असून तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष केलेत.” असे का? आम्हास तुच्छ लेखले व राजाला परत माघारी आणण्यापूर्वी आमचा सल्ला घेतला नाही? इस्राएलीं पेक्षाही यहूदींची भाषा कठोर होती.
And the men of Israel answered the men of Juda, and said, We have ten parts in the king, and we are older than you, we have also an interest in David above you: and why have you thus insulted us, and why was not our advice taken before that of Juda, to bring back our king? And the speech of the men of Juda was sharper than the speech of the men of Israel.

< 2 शमुवेल 19 >