< 2 शमुवेल 16 >
1 १ डोंगरमाथ्याच्या थोडे पुढे गेल्यावर, मफीबोशेथाचा सेवक सीबा दावीदाला भेटला. सीबाजवळ खोगीर घातलेली दोन गाढवे होती दोनशे भाकरी, किसमिसाचे शंभर घड, अंजिरांच्या शंभर ढेपा आणि द्राक्षरसाचा बुधला एवढे सामान गाढवांवर लादलेले होते.
And David he passed on a little from the top and there! Ziba [the] servant of Mephi-bosheth to meet him and a pair of donkeys [were] saddled and [were] on them two hundred bread[s] and one hundred bunches of raisins and one hundred summer fruit and a skin of wine.
2 २ राजा दावीदाने “हे सर्व कशासाठी? म्हणून सीबाला विचारले सीबा म्हणाला,” “राजाच्या कुटुंबियांना बसण्यासाठी म्हणून ही गाढवे आहेत, भाकरी आणि फळे नोकरांना खाण्यासाठी आणि वाळवंटात चालून थकलेल्यांसाठी हा द्राक्षरस आहे.”
And he said the king to Ziba what? [are] these [things] to you and he said Ziba the donkeys [are] for [the] household of the king to ride (and the bread *Q(K)*) and the summer fruit [are] to eat the young men and the wine [is] to drink the weary [person] in the wilderness.
3 ३ राजाने त्यास मफिबोशेथाचा ठावठिकाणा विचारला सीबाने सांगितले, मफिबोशेथ यरूशलेमेमध्येच आहे. कारण आता माझ्या आजोबांचे राज्य मला इस्राएली परत देतील असे त्यास वाटते.
And he said the king and where? [is] [the] son of master your and he said Ziba to the king there! [he is] dwelling in Jerusalem for he said this day they will restore to me [the] house of Israel [the] kingdom of father my.
4 ४ तेव्हा राजा सीबाला म्हणाला ठीक आहे, जे जे मफीबोशेथच्या मालकीचे होते ते मी आता तुला देत आहे. सीबा म्हणाला, मी आपल्याला नमन करतो. मी तुम्हास आनंद देण्यास समर्थ होईन अशी मी आशा करतो.
And he said the king to Ziba here! [belongs] to you all that [belonged] to Mephi-bosheth and he said Ziba I bow down may I find favor in view your O lord my the king.
5 ५ पुढे दावीद बहूरीमला आला. तेव्हा शौलाच्या घराण्यातील एकजण बाहेर आला. हा गेराचा मुलगा शिमी होता. तो दावीदाला शिव्याशाप देत चालला होता.
And he came the king David to Bahurim and there! from there a man [was] coming out from [the] clan of [the] house of Saul and name his [was] Shimei [the] son of Gera [he was] coming out continuously and cursing.
6 ६ त्याने दावीदावर आणि त्याच्या सेवकांवर दगडफेक करायला सुरवात केली. पण इतर लोकांनी आणि सैनिकांनी चहूकडून दावीदाला वेढा घातला.
And he stoned with stones David and all [the] servants of the king David and all the people and all the warriors [were] from right his and from left his.
7 ७ शिमी दाविदला शाप देतच होता, चालता हो इथून, तू दुष्ट आहेस तू खूनी आहेस!
And thus he said Shimei when cursed he get out get out O man of blood and O man of worthlessness.
8 ८ देव तुला शासन करीत आहे. कारण शौलाच्या घरातील लोकांस तू मारलेस. त्याचे राज्य बळकावलेस. पण ते राज्य परमेश्वराने तुझा मुलगा अबशालोम याच्या हवाली केले आहे. तुझे आता हाल होत आहेत कारण तू खुनी आहेस.
He has brought back on you Yahweh all - [the] blood of [the] house of Saul whom you have reigned (in place of him *Q(K)*) and he has given Yahweh the kingship in [the] hand of Absalom son your and here you [are] in calamity your for [are] a man of blood you.
9 ९ सरुवेचा मुलगा अबीशय राजाला म्हणाला, “या मरण पावलेल्या कुत्र्यासारख्या मनुष्याने तुम्हास शिव्याशाप द्यावेत म्हणजे काय? स्वामी, मला त्याचा शिरच्छेद करू द्या.
And he said Abishai [the] son of Zeruiah to the king why? will he curse the dog dead this lord my the king let me pass over please and let me remove head his.
10 १० पण राजा त्यास म्हणाला, सरुवेच्या पुत्रांनो मी काय करू? दाविदाला शिव्याशाप दे असे परमेश्वरानेच त्यास सांगितले असेल. मग त्यास असे कोण म्हणू शकेल की, तू राजाला का शाप देत आहेस?”
And he said the king what? [is] to me and to you O sons of Zeruiah (thus *Q(K)*) he is cursing (for *Q(K)*) Yahweh he has said to him curse David and who? will he say why? have you done thus.
11 ११ अबीशयला आणि इतर सर्व सेवकांना राजा पुढे म्हणाला, माझा पोटचा मुलगा अबशालोमच माझ्या जिवावर उठला आहे, तर हा बन्यामिनी हे असे करत आहे तर त्यामध्ये नवल काय. त्यास हवे ते म्हणू द्या, कारण परमेश्वरानेच त्यास सांगितले असेल.
And he said David to Abishai and to all servants his here! son my who he went out from inward parts my [is] seeking life my and indeed? for now [the] Ben-jaminite leave alone him so he may curse for he has spoken to him Yahweh.
12 १२ माझ्याबाबतीत घडणारे हे अन्याय कदाचित् परमेश्वर पाहील, आणि शिमीच्या या शिव्याशापाच्या बदल्यात उद्या तो माझे भलेच करील.
Perhaps he will look Yahweh (on sin my *Q(K)*) and he will repay Yahweh to me good in place of curse his the day this.
13 १३ दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक मग आपल्या वाटेने तसेच पुढे गेले. शिमी त्यांच्या मागोमाग जात राहिला. डोंगराच्या कडेने तो दुसऱ्या बाजूने जात होता. तो दाविदाबद्दल खूप वाईट गोष्टी बोलत होता. दावीदावर तो दगड आणि मातीही फेकत होता.
And he went David and men his on the road. And Shimei [was] going on [the] side of the mountain parallel with him he went and he cursed and he stoned [them] with stones parallel with him and he dusted [them] with dust.
14 १४ राजा दावीद आणि बरोबरचे सर्व लोक यार्देन नदीजवळ आले. दमल्यामुळे ते तेथे विश्रांतीला थांबले. त्यांनी विसावा घेतला व ते ताजेतवाने झाले.
And he came the king and all the people which [was] with him exhausted and he refreshed himself there.
15 १५ अबशालोम, अहिथोफेल आणि इस्राएलचे सर्व लोक यरूशलेम येथे आले.
And Absalom and all the people [the] man of Israel they came Jerusalem and Ahithophel [was] with him.
16 १६ दावीदाचा मित्र अर्की हूशय अबशालोमकडे आला आणि त्याने अबशालोमची स्तुती केली. तो म्हणाला, राजा चिरायु होवो, राजा चिरायु होवो.
And it was just when came Hushai the Arkite [the] friend of David to Absalom and he said Hushai to Absalom may he live the king may he live the king.
17 १७ अबशालोम त्यास म्हणाला, हीच का तुझ्या मित्रावरील तुझी प्रीती? तू ही त्याच्याबरोबर यरूशलेम का सोडले नाहीस?
And he said Absalom to Hushai [is] this loyalty your with friend your why? not did you go with friend your.
18 १८ हूशय अबशालोमाला म्हणाला, परमेश्वर ज्याची निवड करेल त्यास माझा पाठिंबा आहे. परमेश्वराने आणि इस्राएल लोकांनी आपली निवड केली आहे. म्हणून मी तुमच्या बाजूचा आहे.
And he said Hushai to Absalom In-deed [the one] whom he has chosen Yahweh and the people this and every man of Israel (to him *Q(K)*) I will belong and with him I will remain.
19 १९ पूर्वी मी तुमच्या वडीलांच्या सेवेत होतो, आता तशीच तुमची सेवा करणार.
And the second [thing] whom? I will I serve ¿ not before son his just as I served before father your so I will be (before you. *LAB(h)*)
20 २० अबशालोमने अहिथोफेलला विचारले आम्ही काय करावे ते सांग.
And he said Absalom to Ahithophel give for yourselves counsel what? will we do.
21 २१ अहिथोफेल त्यास म्हणाला, मंदीराची राखण करायला तुझ्या वडीलांनी त्यांच्या उपपत्नी येथेच ठेवल्या आहेत. त्यांच्याशी तू संबंध ठेव मग तुझ्या वडीलांना तुझा तिरस्कार वाटेल व ही गोष्ट सर्व इस्राएलांमध्ये पसरेल. त्यामुळे त्या सर्वांचा तुला पाठिंबा मिळेल.
And he said Ahithophel to Absalom go into [the] concubines of father your whom he left to keep the house and it will hear all Israel that you have made yourself odious with father your and they will be strong [the] hands of all who [are] with you.
22 २२ मग सर्वांनी राजवाड्याच्या धाब्यावर अबशालोमसाठी राहुटी ठोकली. अबशालोमने आपल्या वडीलांच्या उपपत्नीशी लैंगिक सबंध ठेवले. ही गोष्ट सर्व इस्राएलांनी पाहिली.
And they pitched for Absalom the tent on the roof and he went Absalom into [the] concubines of father his to [the] eyes of all Israel.
23 २३ अहिथोफेलचा सल्ला दावीद आणि अबशालोम या दोघांनाही उपयोगी पडला. लोकांस त्याचे म्हणणे देवाच्या शब्दा इतके महत्वाचे वाटत.
And [the] counsel of Ahithophel which he counseled in the days those [was] just as (he enquires anyone *Q(K)*) by [the] word of God [was] so all [the] counsel of Ahithophel both to David as well as to Absalom.