< 2 शमुवेल 14 >
1 १ अबशालोमच्या ओढीमुळे राजा बेचैन झालेला आहे हे सरुवेचा मुलगा यवाब याला कळले.
A Joav sin Serujin opazi da se srce carevo obratilo k Avesalomu.
2 २ तेव्हा तकोवा शहरात निरोप्याला पाठवून त्याने तेथील एका चतुर स्त्रीला बोलावणे पाठवले. तिला तो म्हणाला, तू खूप दु: खात असल्याचे ढोंग कर. त्यास शोभेसे कपडे कर. नटू सजू नको. अनेक दिवस मृताचा शोक करीत असलेल्या स्त्रीसारखी तू दिसली पाहिजेस.
I posla Joav u Tekuju te dozva otuda ženu lukavu, pa joj reèe: uèini se kao da si u žalosti, i obuci žalosne haljine, i nemoj se namazati uljem, nego budi kao žena koja odavna žali za mrtvijem.
3 ३ राजाकडे जा आणि मी सांगतो तसे त्याच्याशी बोल. यवाबाने मग तिला काय बोलायचे ते सांगितले.
I otidi k caru, i govori mu tako i tako. I nauèi je Joav šta æe govoriti.
4 ४ मग तकोवा येथील स्त्री राजाशी बोलली. तिने स्वत: ला जमिनीवर लवून व राजापुढे नतमस्तक होऊन ती म्हणाली, कृपाकरून मला मदत करा.
I kad otide žena Tekujanka k caru da govori, pade nièice na zemlju i pokloni se, i reèe: pomagaj, care!
5 ५ राजाने तिची विचारपूस करून तिची अडचण जाणून घेतली. ती म्हणाली, मी एक विधवा स्त्री आहे.
A car joj reèe: što ti je? A ona reèe: udovica sam, umro mi je muž.
6 ६ मला दोन पुत्र होते. एकदा शेतात त्यांचे भांडण लागले त्यांना थांबवायलाही कोणी नव्हते. तेव्हा एकाने दुसऱ्याचा जीव घेतला.
A imaše sluškinja tvoja dva sina, pa se svadiše u polju, a ne bješe nikoga da ih razvadi, te jedan udari drugoga i ubi ga.
7 ७ आता सगळे घर माझ्याविरूद्ध उठले आहे. सगळे मला म्हणतात, आपल्या भावाचा जीव घेणाऱ्या त्या मुलाला आमच्या स्वाधीन कर. त्यास आम्ही मारून टाकतो कारण त्याने आपल्या भावाला मारले. माझा पुत्र हा आगीतल्या शेवटच्या ठिणगी सारखा आहे. त्यांनी माझ्या पुत्राचा जीव घेतला. तर ती आग नष्ट होईल. आपल्या वडिलांच्या मालमत्तेचा तो एकुलता एक वारस आहे. तोही गेला तर माझ्या मृत पतीची मालमत्ता दुसरा कोणी हडप करील. आणि या भूमीवर नावनिशाणीही राहणार नाही.
I gle, sav dom usta na sluškinju tvoju govoreæi: daj toga što je ubio brata svojega da ga pogubimo za dušu brata njegova, kojega je ubio, i da istrijebimo našljednika; i tako hoæe da ugase iskru koja mi je ostala, da ne ostave imena mužu mojemu ni ostatka na zemlji.
8 ८ हे ऐकून राजा तिला म्हणाला, मी यामध्ये लक्ष घालतो तू घरी जा.
A car reèe ženi: idi kuæi svojoj, a ja æu narediti za te.
9 ९ तेव्हा ती तकोवा येथील स्त्री राजाला म्हणाली, माझे स्वामी या सगळ्याला मी जबाबदार आहे. मी दोषी आहे. तुम्ही आणि तुमचे आसन निर्दोष आहेत.
A žena Tekujanka reèe caru: care gospodaru! neka na me i na dom oca mojega padne krivica, a car i njegov prijesto neka je prav.
10 १० राजा दावीद म्हणाला, तुझ्याविरूद्ध कोणी काही बोलले तर त्यास माझ्याकडे आण. तुला पुन्हा कोणी त्रास देणार नाही.
A car reèe: ko uzgovori na te, dovedi ga k meni, i neæe te se više dotaæi.
11 ११ ती तकोवा येथील स्त्री पुन्हा राजाला म्हणाली, परमेश्वर देवाच्या नावाची शपथ वाहून सांगा की, या लोकांचा तुम्ही बंदोबस्त कराल. त्यांना भावाचा खून केल्याबद्दल माझ्या मुलाला शासन करायचे आहे. तेव्हा त्यास धक्का पोहचणार नाही याचे मला आश्वासन द्या. दावीद म्हणाला, परमेश्वर जिवंत असेपर्यंत कोणीही तुझ्या पुत्राला इजा करणार नाही. त्याच्या केसालाही धक्का पोचणार नाही.
A ona reèe: neka se opomene car Gospoda Boga svojega, da se ne umnože osvetnici koji ubijaju, i da ne ubiju sina mojega. A on reèe: tako živ bio Gospod, nijedna dlaka s tvojega sina neæe pasti na zemlju.
12 १२ मग ती म्हणाली, माझे स्वामी, मला तुमच्याशी आणखी काही बोलायचे आहे, परवानगी असावी. राजा म्हणाला, बोल.
A žena reèe: da kaže sluškinja tvoja nešto caru gospodaru. A on reèe: govori.
13 १३ त्यावर ती म्हणाली, तुम्ही देवाच्या लोकांच्या विरूद्ध योजना का केली आहे? होय, तुम्ही असे म्हणालात तेव्हा तुम्ही स्वत: दोषी ठरता. कारण राजाने आपल्या घराबाहेर घालवलेल्या पुत्राला पुन्हा परत आणलेले नाही.
A žena reèe: a zašto si namislio taku stvar narodu Božijemu? jer car kao da je kriv govoreæi tako, jer neæe car da dozove natrag onoga koga je odagnao.
14 १४ आपण सर्वच कधीतरी मरण पावणार आहोत. जमिनीवर पडलेल्या पाण्यासारखी आपली स्थिती होणार आहे. सांडलेले पाणी पुन्हा भरता येत नाही. देव क्षमाशील आहे हे तुम्ही जाणता. स्वसंरक्षणासाठी पळालेल्याच्या बाबतीतही देवाची काही योजना असते. देव त्यास आपल्यापासून पळायला लावत नाही.
Jer æemo doista pomrijeti, i jesmo kao voda koja se prospe na zemlju i više se ne može skupiti; jer mu Bog nije uzeo života, nego je naumio da odagnani ne ostane odagnan od njega.
15 १५ स्वामी, हेच सांगायला मी येथपर्यंत आले. लोकांमुळे मी भयभीत झाले होते. मी मनाशी म्हणाले, राजाशी मी बोलेन कदाचित् तोच मला मदत करील.
I tako doðoh da kažem ovo caru gospodaru svojemu, jer me narod uplaši; zato reèe sluškinja tvoja: da govorim caru, može biti da æe uèiniti car što sluškinja njegova kaže.
16 १६ तो माझे ऐकून घेईल. मला आणि माझ्या मुलाला मारायला निघालेल्या मनुष्यापासून माझा बचाव करील. देवाने आपल्याला जो वारसा दिला त्यापासून हा मनुष्य आम्हास वंचित करू पाहत आहे.
Jer æe car uslišiti i izbaviti sluškinju svoju iz ruke onoga koji hoæe da istrijebi mene i sina mojega iz našljedstva Božijega.
17 १७ स्वामी, तुमच्या शब्दांनी मला दिलासा मिळेल हे मी जाणून होते. कारण तुम्ही देवदूतासारखेच आहात. बरे वाईट तुम्ही जाणता आणि देव परमेश्वराची तुम्हास साथ आहे.
I sluškinja tvoja reèe: rijeè cara gospodara mojega biæe mi utjeha, jer je car gospodar moj kao anðeo Božji, te sluša i dobro i zlo, i Gospod æe Bog tvoj biti s tobom.
18 १८ राजा दावीद त्या स्त्रीला म्हणाला, आता मी विचारतो त्याचे उत्तर दे. माझ्यापासून काही लपवून ठेवू नकोस. ती म्हणाली माझे स्वामी, विचारा.
A car odgovori i reèe ženi: nemoj tajiti od mene što æu te pitati. A žena reèe: neka govori car gospodar moj.
19 १९ राजा म्हणाला, तुला हे सर्व बोलायला यवाबाने सांगितले ना? ती म्हणाली, होय महाराज, तुमचे सेवक यवाब यांनीच मला हे सर्व बोलायला सांगितले.
Tada car reèe: da nije Joavov posao u svemu tome što èiniš? A žena odgovori i reèe: tako da je živa duša tvoja, care gospodaru, ne može se ni nadesno ni nalijevo od svega što kaza car gospodar moj; jer sluga tvoj Joav zapovijedio mi je i nauèio sluškinju tvoju sve ovo da govorim.
20 २० अलिप्तपणे सर्व गोष्टी न्याहाळता याव्यात म्हणूनच स्वरूप बदलून सांगायची युक्ती यवाबाने केली. स्वामी तुम्ही देवदूता सारखेच ज्ञानी आहात. तुम्हास या पृथ्वीवरील सर्व घटना समजतात.
Sluga je tvoj Joav uèinio, te sam ovako izvila besjedu svoju; ali je gospodar moj mudar kao anðeo Božji, te zna sve što biva na zemlji.
21 २१ राजा यवाबाला म्हणाला, माझे वचन मी खरे करीन. आता अबशालोमला परत आणा.
Tada reèe car Joavu: evo, ti si uèinio to, idi, dovedi natrag dijete Avesaloma.
22 २२ यवाबाने राजाला वाकून अभिवादन केले राजाचे अभीष्ट चिंतून तो म्हणाला, तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात हे मी जाणतो. माझी विनंती तुम्ही मान्य केलीत यावरुन मी हे ताडले.
Tada pade Joav licem na zemlju, i pokloni se i blagoslovi cara, i reèe Joav: danas vidi sluga tvoj da sam našao milost pred tobom, care gospodaru, kad je car uèinio što mu sluga njegov reèe.
23 २३ मग यवाब गशूर येथे गेला आणि अबशालोमला यरूशलेमेला घेऊन आला.
Potom se podiže Joav i otide u Gesur, i dovede natrag u Jerusalim Avesaloma.
24 २४ पण राजा दावीद म्हणाला, अबशालोमला त्याच्या घरी जाऊ दे त्यास मला भेटता मात्र येणार नाही. तेव्हा राजाचे तोंड न पाहताच अबशालोम आपल्या घरी परतला.
I car reèe: neka ide svojoj kuæi, a lica mojega da ne vidi. I otide Avesalom svojoj kuæi, i ne vidje lica careva.
25 २५ अबशालोमच्या देखणेपणाची लोक तोंड भरून प्रशंसा करत होते. इस्राएलमध्ये त्याचा रुपाला तोड नव्हती. त्याच्या पायाच्या तळव्यापासून तर डोक्यापर्यंत त्याच्यात कोणताही दोष नव्हता.
A ne bješe èovjeka tako lijepa kao Avesalom u svem Izrailju, da ga tako hvale; od pete do tjemena ne bješe na njemu mane.
26 २६ प्रत्येक वर्षाच्या अखेरीस अबशालोम आपल्या माथ्यावरील केस कापून त्याचे वजन करीत, केसांचे ओझे होत असल्यामुळे तो ते करीत असे, ते केस राजाच्या वजनाप्रमाणे दोनशे शेकेल भरत असत.
I kad bi strigao glavu a imaše obièaj svake godine striæi je, jer mu bijaše teško mjerio bi kosu s glave svoje, i bivaše je dvjesta sikala carskom mjerom.
27 २७ त्यास तीन पुत्र आणि एक कन्या होती, त्या कन्येचे नाव तामार होते. तामार दिसायला सुंदर होती.
I rodiše se Avesalomu tri sina i jedna kæi, kojoj bijaše ime Tamara, i ona bijaše lijepa.
28 २८ यरूशलेमेमध्ये अबशालोम पूर्ण दोन वर्षे राहिला. पण त्या कालावधीत दावीद राजाला मात्र तो एकदाही भेटू शकला नाही.
I Avesalom osta cijele dvije godine u Jerusalimu, a lica careva ne vidje.
29 २९ तेव्हा अबशालोमने यवाबाकडे आपल्या सेवकाला पाठवले. आपली राजाशी भेट घडवून आणावी असा निरोप दूतांकरवी यवाबाला दिला. पण यवाब अबशालोमकडे आला नाही. अबशालोमने त्यास पुन्हा बोलावणे पाठवले, तरीही तो येईना.
Tada posla Avesalom po Joava da ga pošlje k caru; ali on ne htje doæi k njemu; i posla opet drugi put, ali on ne htje doæi.
30 ३० तेव्हा मात्र अबशालोम आपल्या सेवकांना म्हणाला, माझ्या शेताला लागूनच यवाबाचे शेत आहे. त्यामध्ये जवाचे पीक आले आहे ते पेटवून द्या अबशालोमच्या सेवकांनी त्याप्रमाणे यवाबाच्या शेतात आग लावली.
Tada reèe slugama svojim: vidite li njivu Joavovu pored moje? na njoj je jeèam; idite i upalite je. I upališe sluge Avesalomove onu njivu.
31 ३१ तेव्हा यवाब उठून अबशालोमकडे आला, आणि त्यास म्हणाला “तुझ्या सेवकांनी माझ्या शेतात जाळपोळ का केली?”
Tada se podiže Joav, i doðe k Avesalomu u kuæu, i reèe mu: zašto sluge tvoje upališe moju njivu?
32 ३२ अबशालोम यवाबाला म्हणाला, “मी निरोप पाठवून तुला बोलावणे धाडले होते. तुला मी राजाकडे पाठवणार होतो. गशूरहून त्याने मला का बोलावले ते मी तुला त्यास विचारायला सांगणार होतो. मी त्याचे दर्शन घेऊ शकत नसेन तर गशूरहून मी इथे का आलो? तेव्हा मला त्यास भेटू दे. माझा काही अपराध असला तर त्याने मला मारून टाकावे.
Avesalom reèe Joavu: eto slao sam k tebi govoreæi: hodi ovamo da te pošljem k caru da mu kažeš: zašto sam došao iz Gesura? bolje bi bilo da sam još ondje. Zato da vidim lice carevo; ako li ima kaka krivica na meni, neka me pogubi.
33 ३३ तेव्हा यवाब राजाकडे आला आणि त्याने अबशालोमचे मनोगत राजाला सांगितले राजाने अबशालोमला बोलावले, अबशालोम आला त्याने राजाला वाकून अभिवादन केले, राजाने त्याचे चुंबन घेतले.”
I otide Joav k caru, i kaza mu. I dozva Avesaloma; a on došavši k caru pokloni se licem do zemlje pred carem, i car cjelova Avesaloma.