< 2 शमुवेल 12 >
1 १ परमेश्वराने नाथानाला दावीदाकडे पाठवले. तेव्हा नाथान दावीदाकडे आला. नाथान म्हणाला, एका नगरात दोन माणसे होती एक श्रीमंत होता आणि एक गरीब.
१तब यहोवा ने दाऊद के पास नातान को भेजा, और वह उसके पास जाकर कहने लगा, “एक नगर में दो मनुष्य रहते थे, जिनमें से एक धनी और एक निर्धन था।
2 २ श्रीमंत मनुष्याकडे मेंढरे आणि गुरे भरपूर होती.
२धनी के पास तो बहुत सी भेड़-बकरियाँ और गाय बैल थे;
3 ३ पण गरीबाकडे त्याने विकत घेतलेल्या एका लहान मेंढी खेरीज काही नव्हते. त्याने मेंढीला खाऊपिऊ घातले. या गरीब मनुष्याच्या मुलाबाळांबरोबर ती वाढली त्याच्याच अन्नातला घास ती खाई त्याच्याच कपातले पाणी ती पिई त्याच्याच छातीवर डोके ठेवून झोपे त्या गरीबाला ती मेंढी मुलीसारखीच होती.
३परन्तु निर्धन के पास भेड़ की एक छोटी बच्ची को छोड़ और कुछ भी न था, और उसको उसने मोल लेकर जिलाया था। वह उसके यहाँ उसके बाल-बच्चों के साथ ही बढ़ी थी; वह उसके टुकड़े में से खाती, और उसके कटोरे में से पीती, और उसकी गोद में सोती थी, और वह उसकी बेटी के समान थी।
4 ४ एकदा एक पाहुणा त्या श्रीमंत मनुष्याकडे आला. त्या पाहुण्याला खाऊपिऊ घालायची श्रीमंत मनुष्याची इच्छा होती. पण आपल्या गुरामेंढरांमधून त्यास काही काढून घ्यायचे नव्हते, म्हणून त्याने त्या गरीब मनुष्याची मेंढी घेतली. तिला मारले आणि त्या पाहुण्यासाठी अन्न शिजवले.
४और धनी के पास एक यात्री आया, और उसने उस यात्री के लिये, जो उसके पास आया था, भोजन बनवाने को अपनी भेड़-बकरियों या गाय बैलों में से कुछ न लिया, परन्तु उस निर्धन मनुष्य की भेड़ की बच्ची लेकर उस जन के लिये, जो उसके पास आया था, भोजन बनवाया।”
5 ५ दावीदाला त्या श्रीमंत मनुष्याचा फारच राग आला. तो नाथानला म्हणाला, परमेश्वराची शपथ या मनुष्यास प्राणदंड मिळाला पाहिजे
५तब दाऊद का कोप उस मनुष्य पर बहुत भड़का; और उसने नातान से कहा, “यहोवा के जीवन की शपथ, जिस मनुष्य ने ऐसा काम किया वह प्राणदण्ड के योग्य है;
6 ६ त्या मेंढीच्या चौपट पैसे त्याने भरले पाहिजेत, कारण त्याचे हे भयंकर कृत्य करताना त्यास दया आली नाही.
६और उसको वह भेड़ की बच्ची का चौगुना भर देना होगा, क्योंकि उसने ऐसा काम किया, और कुछ दया नहीं की।”
7 ७ तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, तूच तो मनुष्य आहेस. इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला, तुला शौलापासून वाचवले.
७तब नातान ने दाऊद से कहा, “तू ही वह मनुष्य है। इस्राएल का परमेश्वर यहोवा यह कहता है, ‘मैंने तेरा अभिषेक करके तुझे इस्राएल का राजा ठहराया, और मैंने तुझे शाऊल के हाथ से बचाया;
8 ८ त्याचे घरदार आणि स्त्रिया तुझ्या स्वाधीन केल्या. इस्राएल आणि यहूदाचा तुला राजा केले. एवढे पुरेसे नव्हते म्हणून तुला आणखीही देत राहिलो.
८फिर मैंने तेरे स्वामी का भवन तुझे दिया, और तेरे स्वामी की पत्नियाँ तेरे भोग के लिये दीं; और मैंने इस्राएल और यहूदा का घराना तुझे दिया था; और यदि यह थोड़ा था, तो मैं तुझे और भी बहुत कुछ देनेवाला था।
9 ९ असे असताना तू परमेश्वराची आज्ञा का मोडलीस? त्याच्या दृष्टीने वाईट असे कृत्य का केलेस? उरीया हित्तीला तू तलवारीने मारलेस, आणि त्याच्या पत्नीचा स्वतःची पत्नी म्हणून स्विकार केलास. होय, अम्मोन्यांच्या तलवारीने तू त्याचा वध करवलास.
९तूने यहोवा की आज्ञा तुच्छ जानकर क्यों वह काम किया, जो उसकी दृष्टि में बुरा है? हित्ती ऊरिय्याह को तूने तलवार से घात किया, और उसकी पत्नी को अपनी कर लिया है, और ऊरिय्याह को अम्मोनियों की तलवार से मरवा डाला है।
10 १० तेव्हा आता ही तलवार तुझ्या कुटुंबाचा पिच्छा सोडणार नाही. तू उरीया हित्तीच्या पत्नीचे हरण केलेस. तुला माझी पर्वा नाही हेच यातून दिसते.
१०इसलिए अब तलवार तेरे घर से कभी दूर न होगी, क्योंकि तूने मुझे तुच्छ जानकर हित्ती ऊरिय्याह की पत्नी को अपनी पत्नी कर लिया है।’
11 ११ परमेश्वर म्हणतो, आता तुझ्यावर संकटे कोसळतील. अडचणींना सुरुवात तुझ्या घरातूनच होईल. तुझ्या स्त्रिया तुझ्यापासून मी हिरावून घेऊन. त्या तुझ्या एका आप्ताच्याच हवाली करीन. तो तुझ्या बायकां बरोबर झोपेल आणि ही गोष्ट सर्वांसमक्ष घडेल.
११यहोवा यह कहता है, ‘सुन, मैं तेरे घर में से विपत्ति उठाकर तुझ पर डालूँगा; और तेरी पत्नियों को तेरे सामने लेकर दूसरे को दूँगा, और वह दिन दुपहरी में तेरी पत्नियों से कुकर्म करेगा।
12 १२ बथशेबाचा उपभोग तू गुपचूप घेतलास, पण हे मात्र सूर्याच्या साक्षीने, सर्व इस्राएलादेखत होईल.
१२तूने तो वह काम छिपाकर किया; पर मैं यह काम सब इस्राएलियों के सामने दिन दुपहरी कराऊँगा।’”
13 १३ मग दावीद नाथानला म्हणाला, माझ्याहातून परमेश्वराचा मोठा अपराध घडला आहे. नाथान तेव्हा दावीदाला म्हणाला, परमेश्वराने हा तुझा अपराध दूर केला आहे. तू मरणार नाहीस.
१३तब दाऊद ने नातान से कहा, “मैंने यहोवा के विरुद्ध पाप किया है।” नातान ने दाऊद से कहा, “यहोवा ने तेरे पाप को दूर किया है; तू न मरेगा।
14 १४ पण परमेश्वराच्या शत्रूंना तू त्याचा उपहास करायला मोठे कारण दिलेस, म्हणून हा तुझा पुत्र मरेल.
१४तो भी तूने जो इस काम के द्वारा यहोवा के शत्रुओं को तिरस्कार करने का बड़ा अवसर दिया है, इस कारण तेरा जो बेटा उत्पन्न हुआ है वह अवश्य ही मरेगा।”
15 १५ यानंतर नाथान घरी परतला. उरीयाची पत्नी बथशेबा आणि दावीद यांना झालेला मुलगा परमेश्वराच्या कोपामुळे खूप आजारी पडला.
१५तब नातान अपने घर चला गया। जो बच्चा ऊरिय्याह की पत्नी से दाऊद के द्वारा उत्पन्न हुआ था, वह यहोवा का मारा बहुत रोगी हो गया।
16 १६ दावीदाने बाळासाठी देवाची प्रार्थना केली. दावीदाने अन्नपाण्याचा त्याग केला. घरात जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला.
१६अतः दाऊद उस लड़के के लिये परमेश्वर से विनती करने लगा; और उपवास किया, और भीतर जाकर रात भर भूमि पर पड़ा रहा।
17 १७ घरातील वडीलधाऱ्या मनुष्यांनी येऊन दावीदाला जमिनीवरून उठवायचा खूप प्रयत्न केला. पण काही केल्या दावीद तेथून हलेना. त्यांच्याबरोबर खायला प्यायलाही त्याने नकार दिला.
१७तब उसके घराने के पुरनिये उठकर उसे भूमि पर से उठाने के लिये उसके पास गए; परन्तु उसने न चाहा, और उनके संग रोटी न खाई।
18 १८ सातव्या दिवशी ते मूल मरण पावले. मुलाच्या मृत्यूची बातमी दावीदाला द्यायला त्याचे नोकर कचरु लागले. ते म्हणाले, मुलगा जिवंत असतानाही आम्ही दावीदाशी बोलायला गेलो तरी तो ऐकत नसे, मग आता तर मूल मरण पावले असे आम्ही सांगितले तर तो आपल्या जिवाचे काही बरेवाईट करून घेईल.
१८सातवें दिन बच्चा मर गया, और दाऊद के कर्मचारी उसको बच्चे के मरने का समाचार देने से डरे; उन्होंने कहा था, “जब तक बच्चा जीवित रहा, तब तक उसने हमारे समझाने पर मन न लगाया; यदि हम उसको बच्चे के मर जाने का हाल सुनाएँ तो वह बहुत ही अधिक दुःखी होगा।”
19 १९ पण आपल्या नोकरांची कुजबूज दावीदाने ऐकली त्यावरून मूल गेल्याचे तो मनोमन उमजला. त्याने नोकरांना विचारले, मूल गेले का? नोकरांनी होय म्हणून उत्तर दिले.
१९अपने कर्मचारियों को आपस में फुसफुसाते देखकर दाऊद ने जान लिया कि बच्चा मर गया; तो दाऊद ने अपने कर्मचारियों से पूछा, “क्या बच्चा मर गया?” उन्होंने कहा, “हाँ, मर गया है।”
20 २० तेव्हा दावीद जमिनीवरून उठला त्यांने आंघोळ केली, कपडे बदलून तयार झाला. मग आराधना करण्यासाठी परमेश्वराच्या मंदिरात गेला. त्यानंतर घरी जाऊन त्याने खायला मागितले. सेवकांनी त्यास वाढले आणि तो जेवला.
२०तब दाऊद भूमि पर से उठा, और नहाकर तेल लगाया, और वस्त्र बदला; तब यहोवा के भवन में जाकर दण्डवत् की; फिर अपने भवन में आया; और उसकी आज्ञा पर रोटी उसको परोसी गई, और उसने भोजन किया।
21 २१ दावीदाचे सेवक त्यास म्हणाले, तुम्ही असे का वागलात? मूल जिवंत असताना तुम्ही अन्नत्याग केलात, शोक केलात. पण मुलगा वारल्यावर मात्र तुम्ही उठलात आणि खाल्लेत.
२१तब उसके कर्मचारियों ने उससे पूछा, “तूने यह क्या काम किया है? जब तक बच्चा जीवित रहा, तब तक तू उपवास करता हुआ रोता रहा; परन्तु जैसे ही बच्चा मर गया, वैसे ही तू उठकर भोजन करने लगा।”
22 २२ दावीदाने सांगितले, मूल जिवंत होते तेव्हा मी अन्न वर्ज्य केले आणि शोक केला, कारण मला वाटले न जाणो परमेश्वरास माझी दया येईल आणि बाळ जगेल.
२२उसने उत्तर दिया, “जब तक बच्चा जीवित रहा तब तक तो मैं यह सोचकर उपवास करता और रोता रहा, कि क्या जाने यहोवा मुझ पर ऐसा अनुग्रह करे कि बच्चा जीवित रहे।
23 २३ पण आता ते गेलेच. तेव्हा आता मी कशासाठी उपास करू? मुलाचे तर प्राण मी परत आणू शकत नाही. ते गेलेच. एक दिवस मीच त्याच्या भेटीला जाईन पण तो आता परत येणे नाही.
२३परन्तु अब वह मर गया, फिर मैं उपवास क्यों करूँ? क्या मैं उसे लौटा ला सकता हूँ? मैं तो उसके पास जाऊँगा, परन्तु वह मेरे पास लौटकर नहीं आएगा।”
24 २४ दावीदाने मग आपली पत्नी बथशेबा हिचे सांत्वन केले. तिच्याशी त्याने शरीरसंबंध केला. बथशेबा पुन्हा गरोदर राहिली. तिला दुसरा मुलगा झाला. दावीदाने त्याचे नाव शलमोन ठेवले. शलमोनावर परमेश्वराची प्रीती होती.
२४तब दाऊद ने अपनी पत्नी बतशेबा को शान्ति दी, और वह उसके पास गया; और उसके एक पुत्र उत्पन्न हुआ, और उसने उसका नाम सुलैमान रखा। और वह यहोवा का प्रिय हुआ।
25 २५ त्याने नाथान या संदेष्ट्यामार्फत दावीदाला निरोप पाठविला. नाथानने त्याचे नाव यदीद्या, म्हणजेच देवाला प्रिय असे ठेवले. परमेश्वराच्या वतीने नाथानने हे केले.
२५और उसने नातान भविष्यद्वक्ता के द्वारा सन्देश भेज दिया; और उसने यहोवा के कारण उसका नाम यदिद्याह रखा।
26 २६ अम्मोन्यांच्या राब्बावर हल्ला करून यवाबाने हे राजधानीचे नगर काबीज केले.
२६इस बीच योआब ने अम्मोनियों के रब्बाह नगर से लड़कर राजनगर को ले लिया।
27 २७ यवाबाने निरोप्यामार्फत दावीदाला निरोप पाठवला राब्बाशी लढाई देऊन मी हे जलनगर हस्तगत केले आहे.
२७तब योआब ने दूतों से दाऊद के पास यह कहला भेजा, “मैं रब्बाह से लड़ा और जलवाले नगर को ले लिया है।
28 २८ आता इतर लोकांस एकत्र आणून या शहराचा ताबा घ्या मी घेण्यापूर्वी हे करा. मी जर आधी ताबा घेतला तर ते नगर माझ्या नावाने ओळखले जाईल.
२८इसलिए अब रहे हुए लोगों को इकट्ठा करके नगर के विरुद्ध छावनी डालकर उसे भी ले ले; ऐसा न हो कि मैं उसे ले लूँ, और वह मेरे नाम पर कहलाए।”
29 २९ मग दावीद सर्व लोकांस घेऊन राब्बाकडे गेला. राब्बा येथे लढाई करून त्याने त्याचा ताबा घेतला.
२९तब दाऊद सब लोगों को इकट्ठा करके रब्बाह को गया, और उससे युद्ध करके उसे ले लिया।
30 ३० त्यांच्या राजाच्या मस्तकावरचा मुकुट दावीदाने काढला. हा मुकुट सोन्याचा असून त्याचे वजन सुमारे एक किक्कार होते. त्यामध्ये मौल्यवान रत्ने जडवलेली होती, तो मुकुट लोकांनी दावीदाच्या मस्तकावर ठेवला. दावीदाने बऱ्याच किंमती वस्तू आपल्याबरोबर आणल्या.
३०तब उसने उनके राजा का मुकुट, जो तौल में किक्कार भर सोने का था, और उसमें मणि जड़े थे, उसको उसके सिर पर से उतारा, और वह दाऊद के सिर पर रखा गया। फिर उसने उस नगर की बहुत ही लूट पाई।
31 ३१ राब्बा नगरातील लोकांसही त्याने बाहेर नेले त्यांना कुऱ्हाडी, करवती, लोखंडी दाताळी यांनी काम करायला ठेवले. त्यांच्याकडून जबरदस्तीने वीट कामही करून घेतले. सर्व अम्मोनी नगरांमध्ये दावीदाने असेच केले. नंतर दावीद आपल्या सैन्यासह यरूशलेमेला परतला.
३१उसने उसके रहनेवालों को निकालकर आरी से दो-दो टुकड़े कराया, और लोहे के हेंगे उन पर फिरवाए, और लोहे की कुल्हाड़ियों से उन्हें कटवाया, और ईंट के पजावे में से चलवाया; और अम्मोनियों के सब नगरों से भी उसने ऐसा ही किया। तब दाऊद समस्त लोगों समेत यरूशलेम को लौट गया।