< 2 राजे 9 >

1 अलीशाने, एका तरुण संदेष्ट्याला बोलावले. अलीशा त्यास म्हणाला, “तयार हो आणि ही तेलाची कुपी बरोबर घे. रामोथ-गिलाद येथे जा.
那時,先知厄里叟叫一個先知弟子來,對他說:「你束上腰,手裏拿著這瓶油,往辣摩特基肋阿得去,
2 येथे पोचल्यावर निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याला शोधून काढ. मग आत जाऊन त्यास त्याच्या भावांमधून उठवून आतल्या खोलीत ने.
一到了那裏,就去求見尼默史的孫子約沙法特的兒子耶胡;得見後,叫他離開同僚,領踢進入一間內室,
3 त्यानंतर ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर तेल ओत. तेव्हा ‘परमेश्वर म्हणतो की इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला आहे,’ असे म्हण. एवढे झाले की धावत परत ये. तेथे थांबू नकोस!”
將這瓶油倒在他的頭上說:上主這樣說:我傅你為以色列王。然後,開門逃走,不要逗留。」
4 तेव्हा तो तरुण संदेष्टा रामोथ-गिलाद येथे आला
那青年人,即那青年先知就往辣摩特基肋阿得去了。
5 येथे पोचल्यावर त्यास सैन्यातील सरदार बसलेले आढळले. त्यांना तो म्हणाला, “तुमच्यासाठी एक निरोप आहे.” येहू म्हणाला, “आम्ही सर्वच इथे आहोत. निरोप नक्की कोणासाठी आहे?” तेव्हा तो तरुण म्हणाला, “हे सरदारा, तुझ्याशीच; माझे काम आहे.”
他到了那裏,看見眾將軍都在坐,青年人遂說:「將軍,我有話對你說。」耶胡問說:「我們中,你要對那一個說話﹖」他答說:「將軍,就是你。」
6 यावर येहू उठून घरात आला. त्या तरुण संदेष्ट्याने त्याच्या मस्तकावर तेलाचा अभिषेक केला. येहूला तो म्हणाला, इस्राएलचा परमेश्वर देव म्हणतो, “इस्राएलचा पुढचा राजा म्हणून मी तुला अभिषेक करत आहे.”
耶胡站起來,進了內室,那青年人就將油倒在他頭上,對他說:「上主以色列的天主這樣說:我傅你為上主的人民以色列的君王。
7 तुमचा राजा अहाब याच्या घराण्याचा तू संहार करावास. अशा तऱ्हेने मी माझे सेवक, संदेष्टे, परमेश्वराचे सर्व सेवक यांच्या वधाचा सूड घेऊन ईजबेलला शासन करणार आहे.
你要消滅你主上阿哈布的家,使我在依則貝耳身上,為我的僕人先知和上主的一切僕人報寫仇。
8 म्हणजे अहाबचे संपूर्ण घराणे नष्ट होईल. अहाबाच्या घराण्यात एकही मुलगा जिवंत राहणार नाही. मग ती इस्राएलमधील मुक्त व्यक्ती असो की गुलाम.
阿哈布的全家必要喪亡;我要消滅以色列凡屬於阿哈布的一切男人,無論是自由的,或不自由的。
9 नबाटचा मुलगा यराबाम तसेच अहीयाचा मुलगा बाशा यांच्या घराण्यासारखी अहाबाच्या घराण्याची मी गत करून टाकीन.
我要使阿哈布家像乃巴特的兒子雅洛貝罕家,又像阿希雅的兒子巴厄沙家一樣;
10 १० “ईजबेलला इज्रेल भागात कुत्री खातील. तिचे दफन होणार नाही. एवढे बोलून हा तरुण संदेष्टा दार उघडून पळून गेला.”
於依則貝耳,狗要在依次勒耳的田間吞食她,沒有人來埋怨。」那青年人說完,就開門逃走了。
11 ११ येहू पुन्हा राजाच्या सरदारांमध्ये आला. तेव्हा त्यांच्यातला एकजण म्हणाला, “येहू, सर्व कुशल आहे ना? तो वेडा तुझ्याकडे कशाला आला होता?” येहू त्यांना म्हणाला, “तो मनुष्य कोण आणि त्याचा संदेश तुम्हास माहित आहेच.”
耶胡出來回到他主上的臣僕那裏,他們問他說:「一切都好嗎﹖那瘋子來見你有什麼事﹖」耶胡答說:「你們應認識這個人,也知道他說些什麼。」
12 १२ तेव्हा ते सर्व म्हणाले, “नाही, नाही खर काय झाले ते सांग. काय म्हणाला तो?” तेव्हा तो तरुण संदेष्टा काय म्हणाला ते येहूने सरदारांना सांगितले. येहू म्हणाला, “तो मला म्हणाला, ‘इस्राएलाचा राजा म्हणून परमेश्वराच्या सांगण्यावरुन मी तुला अभिषेक करत आहे.”
他們說:「定說些胡話! 請給我們說說! 」耶胡遂說:「他如此如此告訴我說:上主這樣說:我傅你為以色列王。」
13 १३ हे ऐकून मात्र त्यांनी ताबडतोब आपले अंगरखे उतरवले, येहूच्या समोरच्या पायऱ्यांवर ते ठेवले आणि शिंग फुंकून येहू राजा झाला असल्याची घोषणा केली.
他們一聽,急忙將自己的衣服舖在光台階他的腳下,吹角喊說:「耶胡作王了! 」
14 १४ निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याने योरामाविरुध्द कट रचला. यावेळी, अरामाचा राजा हजाएल याच्यापासून रामोथ-गिलादाचे संरक्षण करण्यासाठी योराम सर्व इस्राएलांसह झटत होता. येहू इज्रेल येथे जातो
尼默史的孫子約沙法特的兒子耶胡於是背叛了耶曷蘭。─那時,耶曷蘭曾率領全以色列人在辣摩特基肋阿得,對抗阿蘭君王哈匝耳。
15 १५ राजा योथामाने हजाएलशी झुंज घेतली होती. पण अरामी लोकांनी योरामाला जायबंदी केले होते तेव्हा जखमा भरुन येण्यासाठी तो इज्रेलला गेला होता. तेव्हा येहू त्या सगळ्या सरदारांना म्हणाला, “नवीन राजा म्हणून मला तुमची मान्यता असेल तर ही बातमी नगरातून इज्रेलमध्ये जाऊ देऊ नका.”
但耶曷蘭已回了依次勒耳,治療他與阿蘭王哈匝耳交戰時,被阿蘭人所射的創傷。─耶胡說:「如果這件事合你們的心意,那麼就不要讓任何人逃出城去,到依次勒耳報信。」
16 १६ योराम इज्रेलमध्ये आराम करत होता. येहू रथात बसून इज्रेलला गेला. यहूदाचा राजा अहज्या देखील तेव्हा योथामाला भेटावयाला इज्रेलला आला होता.
耶胡於是親自駕車去了依次勒耳,因為耶曷蘭正在那裏臥病未起;猶大王阿哈齊雅也下到那裏去探望他。
17 १७ इज्रेलमध्ये बुरूजावर एक पहारोकरी होता. त्याने येहूला मोठ्या जमावनिशी येताना पाहिले. तो म्हणाला, “मोठाच जमाव दिसतोय” योरामाने त्यास सांगितले, “कोणाला तरी घोड्यावरुन त्यांच्याकडे पाठव. ते शांतीने येत आहेत का ते त्या स्वाराला विचारायला सांग.”
站在依次勒耳堡壘上的守兵,見有耶胡的兵隊來到,就喊叫說:「我看見了一大隊人馬! 」耶曷蘭下令說:「叫一個騎兵來,派他去探問他們說:都平安嗎﹖」
18 १८ तेव्हा एक सेवक घोड्यावरुन येहूला सामोरा गेला. राजा योरामाच्या वतीने त्याने येहूला विचारले, “तुमचे येणे शांततेचे आहे ना?” येहू त्यास म्हणाला, “शांतीशी तुला कर्तव्य नाही. असा माझ्या मागेमाग ये.” पहारेकऱ्याने योथामाला सांगितले, “आपला तिकडे पाठवलेला मनुष्य अजून परत आलेला नाही.”
騎兵就去迎接耶胡說:「王問:都平安嗎﹖」耶胡答說:「平安不平安與你何干﹖轉到我後面去! 」守兵隨號報告說:「使者到了他們那裏,卻沒有回來。」
19 १९ तेव्हा योथामाने दुसऱ्या घोडेस्वाराला पाठवले, तो येहूकडे आला आणि राजा योरामाच्या वतीने सलोख्याचे अभिवादन केले. येहू म्हणाला, “तुला सलोख्याशी काय करायचे आहे? असा माझ्या मागोमाग ये?”
耶曷蘭又打發第二個騎兵去,這騎兵到了他們那裏說:「王問:都平安嗎﹖」耶胡答說:「平安不平安與你何干?轉到我後面去!」
20 २० पहारेकऱ्याने योथामाला सांगितले, “संदेश घेऊन गेलेला दुसरा मनुष्यही परत आलेला नाही. रथ चालवणारा तर वेड्यासारखा भरधाव रथ हाकतो आहे. निमशीचा मुलगा येहू याच्यासारखीच ती पध्दत आहे.
守兵隨後又報告說:「他到了他們你裏,也沒有回來;那駕車法很像尼默史的孫子耶胡的駕駛法,駕得很狂猛。」
21 २१ योथामाने मग स्वत: चा रथ तयार ठेवण्यास सांगितले.” तेव्हा सेवकाने योरामाचा रथ आणला. इस्राएलचा राजा योराम आणि यहूदाचा राजा अहज्या या दोघांनी आपापले रथ येहूच्या दिशेने पळवले. इज्रेलचा नाबोथ याच्या शेतात त्यांची यहूशी गाठ पडली.
耶曷蘭遂即吩咐說:「套車! 」人就套好他的車。以色列王耶曷蘭和猶大王阿哈齊雅出來,各自上車,去迎接耶胡,在依次勒耳人納波特的莊田那裏,迎上了他。
22 २२ येहूला पाहून योरामाने त्यास विचारले, “येहू तू शांततेसाठीच आला आहेस ना?” येहू म्हणाला, “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार आणि चेटके चालू असेपर्यंत कसली आली आहे शांतता?”
耶曷蘭一見耶胡就問說:「耶胡! 都平安嗎﹖」耶胡回答說:「你母親依則貝耳的淫行和妖術那樣多,還有什麼平安﹖」
23 २३ योरामाने ताबडतोब आपले घोडे वळवले आणि पळ काढण्याच्या तयारीत तो अहज्याला म्हणाला, “अहज्या, दगा आहे.”
耶曷蘭即刻轉車逃走,對阿哈齊雅說:「阿喝齊雅,他反了! 」
24 २४ पण येहूने सर्व शक्तीनिशी धनुष्य ओढून योरामाचा बरोबर दोन बाहूंच्यामध्ये वेध घेतला. बाण योरामाच्या हृदयातून आरपार गेला. योराम रथात मरुन पडला.
耶胡用手拉弓,射中了耶曷蘭兩臂之間,箭從心窩穿出,耶曷蘭就倒在車上。
25 २५ येहूने आपल्या रथाचा सारथी बिदकर याला सांगितले, “योरामाचा मृतदेह उचल आणि तो इज्रेलचा नाबोथ ह्याच्या शेतात फेकून दे आपण दोघे, योरामाचा बाप अहाब याच्याबरोबर बसून चाललो होतो तेव्हा हे असे घडणार असे परमेश्वराने सांगितले होते, ते आठवते ना?
耶胡吩咐自己的侍衛彼德卡說:「將他抬起,丟在依次肋耳人納波特的莊田裏! 你該記得:當我你二人一起駕車跟隨他父親阿哈布時,上主即向他宣布了這個神諭:「
26 २६ परमेश्वर म्हणाला होता, ‘नाबोथ आणि त्याची मुले यांचे रक्त काल मला दिसले तेव्हा त्या शेतात मी अहाबाला शिक्षा करीन.’ प्रत्यक्ष परमेश्वरच असे म्हणाला. तेव्हा उचल तो मृतदेह आणि परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे दे टाकून त्या शेतात!”
昨天我確實看見了納波特和他兒子們的血,上主的斷語;我必要在這塊田地裏面報復你,上主的斷語。所以現在,你要照上主的話,將他抬起,丟在這塊田地裏。」
27 २७ यहूदाचा राजा अहज्या याने ते पाहिले आणि तेथून पळ काढला. मळ्यातल्या एका घराच्या बाजूने तो गेला. येहूने त्याचा पाठलाग केला. येहू म्हणाला, “अहज्याचाही वध करा.” तेव्हा येहूच्या मनुष्यांनी अहज्याला इब्लाम जवळच्या गूरच्या रस्त्यावर जखमी केले. तेव्हा अहज्या मगिद्दोकडे पळाला पण तिथेच मरण पावला.
猶大王阿哈齊雅見了這事,就向貝特干逃去,耶胡追趕他,吩咐說:「也將他射殺在車上! 」果然,在離依貝肋罕不遠的古爾山坡上,把他射傷;他逃到默基多,就死在那裏。
28 २८ अहज्याच्या चाकरांनी त्याचा मृतदेह रथातून यरूशलेम येथे आणला. त्याचे त्यांनी दावीद नगरात त्याच्या पूर्वजांशेजारी दफन केले.
他的臣僕用車把他送到耶路撒冷,與祖先葬在達味城,他自己的墳墓裏。
29 २९ अहाबाचा पुत्र योरामाचे इस्राएलचा राजा म्हणून अकरावे वर्षे चालू असताना अहज्या यहूदाचा राजा झाला होता.
阿哈齊雅登極為猶大王,是在阿哈布的兒子耶曷蘭在位第十一年。
30 ३० येहू इज्रेलला आला ते ईजबेलने ऐकले. तिने चांगले प्रसाधन केले, केशभूषा केली आणि खिडकीत बसून बाहेर बघू लागली.
當耶胡來到依次勒耳時,依則貝耳就聽說了,遂畫眉梳頭,從窗戶往外眺望,
31 ३१ येहूने नगरात प्रवेश केला. ईजबेल म्हणाली, ते शांतीने येत आहेत काय? “काय रे जिम्री? त्याच्या सारखेच तू ही आपल्या स्वामीला मारलेस?”
見耶胡進城門的時候,她便問說:「弒殺主上的齊默黎,你平安嗎﹖」
32 ३२ येहूने वर खिडकीकडे पाहत म्हटले, “माझ्या बाजूने कोण आहे? बोला!” तेव्हा खिडकीतून दोन तीन खोजांनी त्याच्याकडे पाहिले.
耶胡舉目看見那窗戶說:「誰擁護我﹖誰﹖」有兩三個太監從窗戶裏往下看他。
33 ३३ येहू त्यांना म्हणाला, “त्या ईजबेलला खाली फेका.” तेव्हा त्या खोजांनी ईजबेलला खाली फेकून दिले. भिंतीवर आणि घोड्यांवर तिचे रक्त उडाले. घोडे तिच्यावरून चालून गेले.
耶胡說:「把她推下來! 」他們便把她推下來,她的血濺在牆上和馬身上;馬在她身上踏過。
34 ३४ येहू घरात शिरला आणि त्याने फराळाच्या पदार्थांचा समाचार घेतला. मग तो म्हणाला, “आता त्या शापित स्त्रीला घ्या व तिचे दफन करा कारण ती राजकन्या होती.”
耶胡進去,吃喝完了,吩咐說:「你們去料理那可詛咒的女人,將她埋怨,因為她究竟是君王的女兒。」
35 ३५ लोक तिला पुरायला पुढे झाले पण त्यांना तिच्या देहाचा पत्ता लागला नाही. फक्त तिचे शिर, पाय आणि हाताचे तळवे सापडले.
但是,當他們去埋葬她時,只找到了她的頭蓋、腳和手掌,
36 ३६ तेव्हा त्या लोकांनी येऊन येहूला हे सांगितले. येहू त्यांना म्हणाला, “आपला सेवक एलीया तिश्बी याच्या मार्फत परमेश्वराने हेच सांगितले होते. एलीया म्हणाला होता, ‘इज्रेलच्या परिसरात ईजबेलचा देह कुत्री खातील.’
遂回來告訴耶胡。耶胡說:「這正應驗了上主藉自己的僕人提市貝人厄里亞所說的話:在依次勒耳的莊田裏,狗要吞食依則貝耳的肉;
37 ३७ शेणखतासारखा ईजबेलचा देह इज्रेलच्या भूमीवर पडेल. लोकांस तिचे प्रेत ओळखू येणार नाही.”
依則貝耳的屍首要成為依次勒耳田地裏的糞土,以致人不能說:這是依則貝耳。」

< 2 राजे 9 >