< 2 राजे 5 >
1 १ नामान हा अरामाच्या राजाचा सेनापती होता. तो राजासाठी फार महत्वाचा मनुष्य होता कारण त्याच्या मार्फतच परमेश्वर अरामाच्या राजाला विजय मिळवून देत असे. नामान चांगला शूर वीर होता खरा, पण त्यास कोड होते.
スリア王の軍勢の長ナアマンはその主君のまへにありて大なる者にしてまた貴き者なりき是はヱホバ曾て彼をもてスリアに拯救をほどこしたまひしが故なり彼は大勇士なりしが癩病をわづらひ居る
2 २ अरामी सैन्याच्या बऱ्याच फौजा इस्राएलामध्ये लढाईवर गेल्या होत्या, तेथून त्या सैनिकांनी बरेच लोक गुलाम म्हणून धरुन आणले होते. एकदा त्यांनी इस्राएलामधून एक लहान मुलगीही आणली. ती पुढे नामानाच्या पत्नीची दासी झाली.
昔にスリア人隊を組ていでたりし時にイスラエルの地より一人の小女を執へゆけり彼ナアマンの妻に事たりしが
3 ३ ती आपल्या धनीणीला म्हणाली, “आपल्या मालकांनी शोमरोनातील संदेष्ट्याला भेटावे. तो त्यांचे कोड बरे करेल.”
その女主にむかひわが主サマリヤに居る預言者の前にいまさば善らん者をかれその癩病を痊すならんと言たれば
4 ४ कोणी तरी आपल्या धन्याला सांगितले की ती इस्राएली मुलगी असे म्हणत आहे.
ナアマン入りてその主君に告てイスラエルの地よりきたれる女子斯々語りたりと言ふに
5 ५ त्यावर अरामाचा राजा म्हणाला, “आत्ताच जा. इस्राएलाच्या राजासाठी मी पत्र देतो.” तेव्हा नामान इस्राएलाला निघाला. आपल्याबरोबर त्याने दहा किक्कार चांदी, सोन्याची सहा हजार नाणी आणि दहा पोशाखाचे जोड घेतले.
スリヤ王いひけるは往よ往よ我イスラエルの王に書をおくるべしと是において彼いでゆき銀十タラントと金六千および衣服十襲をたづさヘ
6 ६ आपल्या राजाकडून त्याने इस्राएलाच्या राजासाठी पत्रही घेतले. त्यामध्ये लिहिले होते. की माझ्या सेवेतील नामान याला तुमच्याकडे पाठवत आहे. त्याचे कोड बरे करावे.
イスラエルの王にその書をもちゆけりその文に曰くこの書汝にいたらば視よ我わが臣ナアマンをなんぢに遣はせるなりこは汝にその癩病を痊されんがためなり
7 ७ इस्राएलाच्या राजाने हे पत्र वाचले तेव्हा त्याने आपले कपडे फाडले. तो म्हणाला, “मी देव आहे काय, जीवन आणि मृत्यू यावर माझी सत्ता नाही. त्याने कोड असलेल्या मनुष्यास उपचारासाठी माझ्याकडे का बरे पाठवावे? हा माझ्याशी भांडण करण्याचे कारण काढत आहे.”
イスラエルの王その書を讀み衣を裂ていふ我神ならんや爭か殺すことをなし生すことをなしえん然るに此人なんぞ癩病の人を我に遣はしてこれを痊さしめんとするや然ば請ふ汝等彼が如何に我に爭を求むるかを見て知れと
8 ८ राजाने कपडे फाडले हे देवाचा मनुष्य अलीशा याने ऐकले. त्याने मग राजाला निरोप पाठवला, “तू आपले कपडे का फाडलेस? त्यास माझ्याकडे येऊ दे म्हणजे इस्राएलामध्ये संदेष्टा असल्याचे त्यास कळेल.”
茲に神の人エリシヤ、イスラエルの王がその衣を裂たることをきき王に言遣しけるは汝何とて汝の衣をさきしや彼をわがもとにいたらしめよ然ば彼イスラエルに預言者のあることを知にいたるべし
9 ९ तेव्हा नामान आपले रथ, घोडे यांसह अलीशाच्या घराच्या दाराबाहेर जाऊन उभा राहिला.
是においてナアマンその馬と車とをしたがへ來りてエリシヤの家の門に立けるに
10 १० अलीशाने निरोप पाठवला, “तू जाऊन यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुध्द होशील.”
エリシヤ使をこれに遣して言ふ汝ゆきて身をヨルダンに七たび洗へ然ば汝の肉本にかへりて汝は清く爲べしと
11 ११ नामान हे ऐकून खूप रागावला आणि निघून गेला. तो म्हणाला, “पहा, मला वाटले, तो बाहेर येईल, उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाव घेऊन आपला हात माझ्या अंगावरुन फिरवून माझे कोड बरे करील.
ナアマン怒りて去り言けるは我は彼かならず我もとにいできたりて立ちその神ヱホバの名を呼てその所の上に手を動して癩病を痊すならんと思へり
12 १२ अबाना आणि परपर या दिमिष्कातील नद्या इस्राएलामधील नद्यापेंक्षा निश्चितच चांगल्या आहेत. मग त्यामध्येच स्नान करून मी शुध्द होणार नाही काय?” एवढे बोलून संतापाने नामान तोंड फिरवून निघून गेला.
ダマスコの河アバナとパルパルはイスラエルのすべての河水にまさるにあらずや我これらに身を洗ふて清まることを得ざらんやと乃ち身をめぐらし怒りて去る
13 १३ मग नामानाचे सेवक त्याच्याकडे येऊन त्यास म्हणाले, “माझ्या पित्या, संदेष्ट्याने तुम्हास एखादी अवघड गोष्ट करायला सांगितली असती तर तुम्ही ती केली असती, नाही का? ‘स्नान करून शुध्द हो,’ एवढेच त्याने आपल्याला सांगितले. ते आपण का करू नये?”
時にその僕等近よりてこれにいひけるは我父よ預言者なんぢに大なる事をなせと命ずるとも汝はそれを爲ざらんや况て彼なんぢに身を洗ひて清くなれといふをやと
14 १४ तेव्हा त्याने देवाचा मनुष्याच्या सूचनेप्रमाणे यार्देन नदीत सात वेळा बुडी मारली. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुध्द झाला.
是においてナアマン下りゆきて神の人の言のごとくに七たびヨルダンに身を洗ひしにその肉本にかへり嬰兒の肉の如くになりて清くなりぬ
15 १५ नामान व त्याच्याबरोबरचे लोक देवाच्या मनुष्याकडे परत जाऊन त्याच्यासमोर उभे राहिले. तो म्हणाला, “पहा, सर्व पृथ्वीवर इस्राएलाबाहेर देव नाही हे आता मला कळाले आहे. माझ्याकडून कृपया, ही भेट घ्यावी.”
かれすなはちその從者とともに神の人の許にかへりきたりてその前に立ていふ我いまイスラエルのほかは全地に神なしと知る然ば請ふ僕より禮物をうけよ
16 १६ पण अलीशाने त्यांना उत्तर दिले, “ज्याच्यापुढे मी उभा राहतो त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ घेऊन सांगतो, मी काहीही घेणार नाही.” त्याने अलीशाला पुष्कळ आग्रह केला, पण त्याने नकार दिला.
エリシヤいひけるはわが事へまつるヱホバは活く肯て禮物をうけじとかれ強て之を受しめんとしたれども遂にこれを辭したり
17 १७ तेव्हा नामान म्हणाला, माझ्यासाठी एवढे करावे. माझ्या दोन खेचरावर लादून नेता येईल इतकी माती नेण्याची मला मुभा द्यावी. म्हणजे मी यापुढे परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही दैवतांना होमबली किंवा यज्ञ अर्पण करणार नाही.
ナアマンいひけるは然ば請ふ騾馬に二駄の土を僕にとらせよ僕は今よりのち他の神には燔祭をも祭品をもささげずして只ヱホバにのみ献げんとす
18 १८ परमेश्वराने मला एकागोष्टींची क्षमा करावी. अरामाचा राजा माझा स्वामी, रिम्मोनच्या दैवतांच्या पूजेला जातो तेव्हा मी त्यास नमन करीन तेव्हा परमेश्वराने आपल्या दासास क्षमा करावी.
ねがはくは主この事につきて僕をゆるしたまへ即ちわが主君リンモンの宮にいりそこにて崇拝をなしてわが手に倚ることありまた我リンモンの宮にありて身をかがむることあらんわがリンモンの宮において身をかがむる時に願くはヱホバその事につきて僕をゆるしたまへと
19 १९ तेव्हा अलीशा त्यास म्हणाला, शांतीने जा. मग नामान निघून गेला.
エリシヤ彼になんぢ安じて去れといひければ彼エリシヤをはなれて少しく進みゆきけるに
20 २० तो थोडी वाट चालून गेल्यावर अलीशा याचा नोकर गेहजी याने विचार केला, “पाहा, माझ्या धन्याने या अरामी नामानाकडून भेट न स्विकारता त्यावर दया केली. परमेश्वराच्या जीविताची शपथ मीच त्यामागे धावत जाऊन त्याजपासून काहीतरी घेतो.”
神の人エリシヤの僕ゲハジいいひけるは吾が主人は此スリア人ナアマンをいたはりて彼が手に携へきたれるものを受ざりしがヱホバは活くわれ彼のあとを追かけて彼より少く物をとらんと
21 २१ मग गेहजी नामानाच्या मागे निघाला. जेव्हा नामानाने आपल्या मागून कोणाला तरी पळत येताना पाहिले, तेव्हा त्यास भेटायला तो रथातून खाली उतरला व म्हणाला, “सगळे ठीक आहे ना?”
ゲハジすなはちナアマンのあとをおひ行くにナアマンはおのれのあとに走り來る者あるを見て車より下りこれを迎へて皆平安やと言ふに
22 २२ गेहजी म्हणाला, “हो, सगळे ठीक आहे. माझ्या धन्याने मला पाठवले आहे. त्यांनी सांगितले आहे, ‘एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातून संदेष्ट्यांचे दोन शिष्य माझ्याकडे आले आहेत. त्यांच्यासाठी एक किक्कार चांदी आणि दोन पोशाख द्या.”
彼言けるは皆平安しわが主我を遣していはしむ只今エフライムの山より預言者の徒なる二人の少者わが許に來れり請ふ汝かれらに銀一タラントと衣二襲をあたへよと
23 २३ नामानाने उत्तर दिले, “मला तुला दोन किक्कार देण्यास आनंद होत आहे.” नामानाने गेहजीला आग्रह करून दोन किक्कार चांदीच्या दोन थैल्या बांधून दोन पोषाखासह आपल्या दोन सेवकांच्या खांद्यावर दिल्या.
ナアマンいひけるは望むらくは二タラントを取れとてかれを強ひ銀二タラントを二の袋にいれ衣二襲を添て二人の僕に負せたれば彼等これをゲハジの前に負きたりしが
24 २४ डोंगराशी आल्यावर गेहजीने नोकरांकडून ते सर्व घेतले आणि त्यांना परत पाठवले. नोकर माघारी आले. मग गेहजीने हा ऐवज आपल्या घरात लपवला.
彼岡に至りしとき之をかれらの手より取て室のうちにをさめかれらを放ちて去しめ
25 २५ गेहजी आला आणि आपले स्वामी अलीशा यांच्यासमोर उभा राहिला अलीशाने गेहजीला विचारले, “तू कोठे गेला होतास?” गेहजी म्हणाला, “मी कोठेच गेलो नव्हतो.”
而して入てその主人のまへに立つにエリシヤこれにいひけるはゲハジよ何處より來りしや答へていふ僕は何處にもゆかず
26 २६ अलीशा त्यास म्हणाला, “नामान तुला भेटायला आपल्या रथातून उतरला तेव्हा माझे लक्ष तुझ्याकडेच होते. चांदी, कपडे, जैतूनाचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे, दासदासी घेण्याची ही वेळ आहे काय?”
エリシヤいひけるはその人が車をはなれ來りてなんぢを迎へし時にわが心其處にあらざりしや今は金をうけ衣をうけ橄欖園葡萄園羊牛僕婢をうくべき時ならんや
27 २७ नामानचा कोड तुला आणि तुझ्या मुलांना सर्वकाळ लागून राहिल. अलीशाकडून गेहजी निघाला तेव्हा त्याची त्वचा बर्फासारखी पांढरी शुभ्र झाली होती. गेहजीला कोड उठले होते.
然ばナアマンの癩病はなんぢにつき汝の子孫におよびて限なからんと彼その前より退ぞくに癩病發して雪のごとくになりぬ