< 2 राजे 4 >
1 १ आता संदेष्ट्यांच्या मुलांच्या बायकांतली एक अलीशाकडे रडत आली, आणि म्हणाली, “तुझा सेवक माझा पती मरण पावला आहे, आणि तुला माहित आहे की, तुझा सेवक परमेश्वराचे भय राखत होता. पण आता सावकार माझ्या दोन मुलांना त्याचा गुलाम करून घ्यायला नेण्यासाठी आला आहे.”
Et une femme d'entre les épouses des fils des prophètes jeta son cri à Elisée en disant: Ton serviteur, mon mari, est mort; et tu sais que ton serviteur était craignant l'Éternel; or le créancier s'est présenté pour prendre mes deux enfants et les avoir comme ses esclaves.
2 २ तेव्हा अलीशा तिला म्हणाला, “मी तुला काय मदत करु शकतो? तुझ्या घरात काय आहे ते मला सांग.” तेव्हा ती स्त्री म्हणाली, “एका तेलाचा बुधला सोडला तर तुझ्या दासीच्या घरात काहीच नाही.”
Et Elisée lui dit: Que faut-il que je fasse pour toi? Dis-moi ce que tu as au logis! Et elle lui dit: Ta servante n'a rien au logis sinon une fiole d'huile.
3 ३ तेव्हा अलीशा म्हणाला, “आता जा आणि तुझ्या शेजाऱ्यांकडून रिकामी भांडी उसने मागून आण. जितके शक्य होतील तितके उसने आण.
Et il dit: Va et emprunte pour toi au dehors des vases à tous tes voisins, des vases vides, et pas en petit nombre.
4 ४ मग घराचे दार आतून लावून घे. फक्त तू आणि तुझी मुलेच घरात राहा. ते सगळे तेल या रिकाम्या भांड्यामध्ये ओत आणि ती सगळी भरलेली भांडी एकाबाजूला ठेव.”
Puis, rentrée, ferme la porte sur toi et tes fils et verse dans tous ces vases, et mets de côté ce qui sera plein.
5 ५ मग ती स्त्री अलीशाकडून निघून आपल्या घरी आली व तिने आपल्या मागून व आपल्या मुलांच्या मागून दार आतून लावून घेतले. त्यांनी तिच्याकडे भांडी आणली आणि ती त्यामध्ये तेल ओतत गेली.
Alors elle le quitta; et elle ferma la porte sur elle et sur ses fils; ceux-ci lui tendaient les vases, et elle versait;
6 ६ अशी अनेक भांडी भरली शेवटी ती आपल्या मुलाला म्हणाली, “आणखी एक भांडे घेऊन ये.” पण तो तिला म्हणाला, “आता एकही भांडे उरले नाही” त्यावेळी बुधल्यातले तेल संपले.
et lorsque les vases furent pleins, elle dit à son fils: Tends-moi encore un vase! Et il lui dit: Il n'y a plus de vases. Alors l'huile s'arrêta.
7 ७ मग ती अलीशाकडे आली आणि तिने त्या परमेश्वराच्या मनुष्यास हे सांगितले. अलीशा तिला म्हणाला, “आता हे तेल विक आणि कर्जफेड कर, आणि उरलेल्या पैशावर तू आपल्या मुलांचा निर्वाह कर.”
Et elle vint raconter à l'homme de Dieu, qui lui dit: Va, vends l'huile et paye ta dette, et toi et tes fils vivez du surplus.
8 ८ एकदा अलीशा शूनेम येथे गेला. तेथे एक प्रतिष्ठित स्त्री राहत होती. तिने अलीशाला आपल्या घरी येऊन जेवायचा आग्रह केला. त्यामुळे अलीशा जेव्हा तिकडून जाई तेव्हा त्या स्त्रीकडे जेवणासाठी थांबत असे.
Et il advint alors que Elisée passa à Sunem; et il y avait là une femme notable qui l'obligea à prendre son repas [chez elle]. Et toutes les fois qu'il passait, il entrait là pour prendre son repas.
9 ९ तेव्हा ती स्त्री आपल्या नवऱ्याला म्हणाली, “पाहा, मला आता कळाले आहे की, आपल्या येथे नेहमी येतो तो अलीशा, परमेश्वराचा पवित्र मनुष्य आहे.
Et elle dit à son mari: Vois-tu! eh bien! je sens que c'est un saint homme de Dieu qui passe chez nous constamment;
10 १० तेव्हा त्याच्यासाठी वर एक लहानशी खोली बांधू या, त्यामध्ये एक पलंग, मेज व बैठक आणि दिव्याची सोय पण करु. म्हणजे तो जेव्हा येईल तेव्हा त्यास थांबायला ही खोली होईल.”
faisons-lui donc à l'étage une petite chambre en maçonnerie, et plaçons-y pour lui un lit et une table et un siège et un flambeau pour qu'il y loge quand il viendra chez nous.
11 ११ मग एके दिवशी अलीशा त्या घरी आला तेव्हा त्याने त्या खोलीत आराम केला.
Et il arriva alors qu'étant venu là il logea dans la chambre de l'étage et y coucha.
12 १२ तेव्हा अलीशाने आपला सेवक गेहजी याला, “त्या शूनेमच्या स्त्रीला बोलावून आणायला सांगितले.” त्याप्रमाणे गेहजीने त्या स्त्रीला बोलावले, ती येऊन अलीशा पुढे उभी राहिली.
Et il dit à Gehazi, son valet: Appelle cette Sunamite. Et il l'appela et elle se présenta à lui.
13 १३ अलीशा त्यास म्हणाला, तिला सांग की, “तू आमची चांगली काळजी घेतली आहेस. तेव्हा मी तुझ्यासाठी काय करु? तुझ्यासाठी राजाशी किंवा सेनापतीशी बोलू का?” ती म्हणाली, “मी माझ्या लोकांमध्ये राहते.”
Et il lui dit: Eh bien! dis-lui: Voici, tu t'es agitée pour nous de toute cette sollicitude: que puis-je faire pour toi? Y-a-t-il à parler pour toi au roi ou au général de l'armée? Et elle dit: Je reste au milieu de ma Tribu!
14 १४ तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “मग आपण तिच्यासाठी काय करु शकतो?” गेहजी म्हणाला, “तिला खरोखर मूलबाळ नाही आणि तिचा पती वृध्द आहे.”
Et il dit: Que puis-je donc faire pour elle? Et Gehazi dit: Mais! elle n'a pas de fils et son mari est vieux. Et il dit: Appelle-la.
15 १५ मग अलीशा म्हणाला, “तिला बोलाव” गेहजीने पुन्हा तिला बोलावले, तेव्हा ती येऊन दाराशी उभी राहिली.
Et il l'appela, et elle se présenta à la porte.
16 १६ अलीशा तिला म्हणाला, “पुढील वसंत ऋतुत याच सुमारास तू आपल्या मुलाला उराशी धरशील.” ती म्हणाली, “नाही, माझ्या स्वामी, तुम्ही परमेश्वराचे मनुष्य आहात, माझ्याशी खोटे बोलू नका.”
Et il dit: A cette époque l'année prochaine tu embrasseras un fils. Et elle dit: Oh! non! mon Seigneur! Homme de Dieu! Ne trompe pas ta servante!
17 १७ पण ती स्त्री गरोदर राहिली आणि अलीशा म्हणाला त्याप्रमाणेच वसंत ऋतूच्या वेळी तिने मुलाला जन्म दिला.
Et cette femme devint enceinte et elle enfanta un fils à la même époque, l'année révolue, comme lui avait dit Elisée.
18 १८ मुलगा मोठा झाल्यावर, एके दिवशी तो आपल्या बापाजवळ जो कापणी करणाऱ्यां लोकांस सोबत होता तेथे गेला.
Et l'enfant ayant grandi, il arriva alors qu'il sortit pour joindre son père auprès des moissonneurs.
19 १९ तो वडिलांना म्हणाला, “माझे डोके, माझे डोके.” यावर त्याचे वडिल आपल्या नोकराला म्हणाले, “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.”
Là il dit à son père: Ma tête! Ma tête! Et celui-ci dit au valet: Porte-le à sa mère. Et il le porta et l'amena à sa mère.
20 २० नोकराने मुलाला त्याच्या आईकडे पोचवले. दुपारपर्यंत हा मुलगा आईच्या मांडीवर बसला होता नंतर तो मेला.
Et l'enfant resta sur ses genoux jusqu'à midi, puis il mourut.
21 २१ तेव्हा त्या स्त्रीने आपल्या मुलाला परमेश्वराच्या मनुष्याच्या पलंगावर ठेवले व खोलीचे दार लावून ती बाहेर गेली.
Et elle monta et le déposa sur le lit de l'homme de Dieu, puis ferma sur lui et sortit.
22 २२ तिने नवऱ्याला हाक मारुन म्हटले, “कृपाकरून एक नोकर आणि एक गाढव माझ्याकडे पाठव, म्हणजे मी ताबडतोब जाऊन परमेश्वराच्या मनुष्यास भेटून येते.”
Et s'adressant à son mari elle dit: Envoie-moi donc un des valets et une des ânesses, et je vais courir chez l'homme de Dieu, puis revenir.
23 २३ त्या स्त्रीचा पती तिला म्हणाला, “आजच त्याच्याकडे का जातेस? आज चंद्रदर्शन नाही, की शब्बाथही नाही.” ती म्हणाली, “सगळे ठीक होईल.”
Et il dit: Pourquoi vas-tu chez lui aujourd'hui? ce n'est ni lune nouvelle, ni sabbat. Et elle dit: Laisse-moi faire!
24 २४ मग गाढवावर खोगीर चढवून ती नोकराला म्हणाली, “आता पटकन चल आणि मी सांगितल्या शिवाय माझ्यासाठी वेग कमी करु नको!”
Et elle sella l'ânesse et dit à son valet: Mène et va sans m'arrêter dans la course, que je ne te le dise!
25 २५ मग ती निघून कर्मेल डोंगरास परमेश्वराच्या मनुष्याकडे आली. अलीशाने तिला दुरुनच येताना पाहिले, तेव्हा त्याने गेहजी या आपल्या नोकराला म्हटले, “बघ, ती शूनेमची स्त्री येत आहे.
Et étant partie elle arriva chez l'homme de Dieu au mont Carmel. Et lorsque l'homme de Dieu la vit de loin, il dit à Gehazi, son valet: Voici cette Sunamite!
26 २६ कृपाकरून तिला भेटायला धावत जा आणि तिला विचार, तू व तुझा पती, तुझा मुलगा, हे सर्व ठीक आहेत ना?” ती म्हणाली, सर्वकाही ठीक आहे.
Maintenant cours donc à sa rencontre et lui dis: Tout va-t-il bien pour toi, bien pour ton mari, bien pour l'enfant? Et elle dit: Bien.
27 २७ आणि तिने डोंगरावर देवाच्या मनुष्याजवळ जाऊन त्याचे पाय धरले. तेव्हा तिला ढकलण्यास गेहजी जवळ आला, पण परमेश्वराच्या मनुष्याने म्हटले, “तिला एकटे सोड, ती काळजीत आहे. परमेश्वराने हिची समस्या माझ्यापासून लपवली आहे, मला काहिच कळवले नाही.”
Et elle arriva chez l'homme de Dieu à la montagne, et elle embrassa ses pieds. Alors Gehazi s'approcha pour la repousser, mais l'homme de Dieu dit: Laisse-la faire! car elle a dans l'âme une amère douleur; et l'Éternel m'en a fait un secret et ne m'a point mis au fait.
28 २८ तेव्हा ती म्हणाली, “माझ्या स्वामी, मी तुझ्याजवळ मुलगा मागितला होता काय? ‘मला फसवू नको’ असे मी म्हटले नव्हते काय?”
Et elle dit: Est-ce que j'ai demandé un fils à mon Seigneur? N'ai-je pas dit: Ne me trompe pas?
29 २९ तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “निघायची तयारी कर व तुझ्या हातात माझी काठी घे, आणि तिच्या घरी जा. जर तुला कोणी भेटला तर त्यास सलाम करू नको, आणि कोणी तुला सलाम केला तर त्यास उत्तर देऊ नको. आणि माझी काठी त्या मुलाच्या तोंडावर ठेव.”
Et il dit à Gehazi: Ceins tes reins et prends mon bâton dans ta main et pars! Si tu rencontres quelqu'un, ne le salue point, et si quelqu'un te salue, ne lui réponds point, et tu mettras mon bâton sur la figure de l'enfant.
30 ३० पण मुलाच्या आईने म्हटले, “परमेश्वराची आणि तुमची शपथ मी तुम्हास सोडणार नाही!” तेव्हा अलीशा उठला आणि तिच्या मागून निघाला.
Et la mère de l'enfant dit: Par la vie de l'Éternel et par ta propre vie, je ne te quitte pas! Alors il se leva et la suivit.
31 ३१ गेहजी त्यांच्या आधी घरी जाऊन पोहचला व त्याने त्या मुलाच्या तोंडावर काठी ठेवली पण ते मूल काही बोलले नाही किंवा कोणतीच हालचाल केली नाही. तेव्हा गेहजी परत अलीशाकडे गेला व त्यास म्हणाला, “मूल काही जागे झाले नाही.”
Or Gehazi les avait devancés et avait posé le bâton sur la figure de l'enfant; mais pas un son, pas un signe d'attention. Et il rebroussa à leur rencontre, et il l'informa et dit: L'enfant ne s'est pas réveillé.
32 ३२ जेव्हा अलीशा घरात आला ते मूल मरण पावलेले व त्याच्या अंथरुणावर निपचीत पडले होते.
Et lorsque Elisée entra dans la maison, voilà que l'enfant était mort, gisant sur son lit.
33 ३३ अलीशाने खोलीत शिरुन दार लावून घेतले. आता खोलीत ते मूल आणि अलीशा अशी दोघेच होती. अलीशाने मग परमेश्वराची प्रार्थना केली.
Alors il entra et ferma la porte sur eux deux, et il invoqua l'Éternel.
34 ३४ अलीशा त्या मुलाच्या अंगावर पालथा पडला. त्याने आपले तोंड मुलाच्या तोंडावर आणि डोळे मुलाच्या डोळ्यावर, आपले हात त्याच्या हातावर ठेवले. अशा प्रकारे अलीशाने त्या मुलावर पाखर घातल्यावर त्या मुलाच्या अंगात ऊब निर्माण झाली.
Et étant monté il se coucha sur l'enfant et appliqua sa bouche sur sa bouche, et ses yeux sur ses yeux et ses mains sur ses mains, et il s'étendit sur lui de manière à réchauffer le corps de l'enfant.
35 ३५ मग अलीशा उठला आणि घरात इकडेतिकडे फिरला. मग पुन्हा वर येऊन मुलावर पाखर घातली. मुलाला एका पाठोपाठ सात शिंका आल्या आणि त्याने डोळे उघडले.
Et il se releva, et marcha dans la maison une fois d'un côté, une fois de l'autre; puis étant remonté il s'étendit sur lui.
36 ३६ अलीशाने गेहजीला हाक मारुन त्या शूनेमकरिणीला बोलवण्यास सांगितले. त्याने तिला बोलविल्यावर ती खोलीत आल्यावर, अलीशा तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला उचलून घे.”
Alors l'enfant éternua sept fois, et l'enfant ouvrit les yeux. Et il appela Gehazi et dit: Appelle cette Sunamite! Et il l'appela et elle vint à lui et il dit: Reprends ton fils!
37 ३७ मग तिने जमिनीपर्यंत पालथे पडून त्यास नमन केले व मुलाला उचलून घेऊन बाहेर आली.
Alors elle vint tomber à ses pieds et s'inclina jusqu'à terre et emmena son fils et s'en alla.
38 ३८ अलीशा गिलगाल येथे परत आला. तेव्हा त्या देशात दुष्काळ पडला होता. संदेष्ट्यांचे शिष्य त्याच्यासमोर बसले होते. तो आपल्या सेवकाला म्हणाला, “एक मोठे पातेले अग्नीवर ठेव आणि या संदेष्ट्यांसाठी शाकभाजी कर.”
Cependant Elisée revint à Guilgal et la famine régnait dans le pays, et les fils des prophètes demeuraient devant lui. Et il dit à son valet: Mets en place la grande marmite et fais cuire un légume pour les fils des prophètes.
39 ३९ त्यातील एकजण रानात शाकभाजी गोळा करून आणावयास गेला. तेव्हा त्यास एक रानवेल दिसला व त्याची फळे तोडून आपल्या ओटीत भरून, त्याने ती फळे कापून भांड्यात टाकली. परंतु ती कडू होती हे त्यांना माहित नव्हते.
Alors l'un d'eux sortit dans les champs pour cueillir de la verdure, et il trouva une sorte de vigne sauvage et il y cueillit des concombres sauvages plein son habit; et étant rentré il les coupa en morceaux dans la marmite aux légumes, car on ne savait pas ce que c'était.
40 ४० मग ही शाकभाजी सर्वांना खाण्यासाठी वाढली. ती खाताच सर्वजण ओरडून म्हणाले. “देवाच्या मनुष्या, या भांड्यात तर मरण आहे.” त्यांना ते खाता येईना.
Et ils les en sortirent pour le repas des hommes; mais lorsqu'ils goûtèrent du légume, ils se récrièrent et dirent: La mort est dans la marmite, homme de Dieu! et ils ne pouvaient manger.
41 ४१ तेव्हा अलीशा म्हणाला, “थोडे पीठ आणा.” पीठ आणून दिल्यावर त्याने ते मोठ्या भांड्यात घातले. मग अलीशा म्हणाला, “आता हे सगळ्यांना वाढा.” आता त्यामध्ये काही अपायकारक राहिले नाही.
Alors il dit: Mais! prenez donc de la farine! Et il en jeta dans la marmite et dit: Sers-en à ce monde! et ils en mangèrent. Et il n'y avait plus rien de nuisible dans la marmite.
42 ४२ बआल-शालीश येथून एकदा एक मनुष्य आपल्या नव्या पिकातील जवाच्या वीस भाकरी देवाच्या मनुष्यासाठी घेऊन आला. तसेच कोवळी कणसे पोत्यातून घेऊन आला. तो म्हणाला, “हे सर्व या लोकांस खायला दे.”
Or il vint un homme de Baal-Salisa et il apportait à l'homme de Dieu du pain de prémices, vingt pains d'orge et des gruaux dans sa valise. Et il dit: Donnes-en à manger à ce monde!
43 ४३ त्याचा सेवक म्हणाला, “शंभर मनुष्यांना हे कसे पुरणार?” पण अलीशा म्हणाला, “तू ते सर्वांना वाटून दे. परमेश्वर म्हणतो, त्यांनी खाल्ल्यावर त्यातून काही उरेल.”
Et son domestique dit: Comment pourrais-je en servir à cent personnes? Et il dit: Sers-leur-en pour qu'ils en mangent; car ainsi parle l'Éternel: On en mangera et on en laissera.
44 ४४ मग त्याच्या सेवकाने त्यांच्यासमोर ते अन्न ठेवले. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यांनी ते खाल्यावरही काही उरलेच.
Alors il leur en servit et ils mangèrent, et en laissèrent selon la parole de l'Éternel.