< 2 राजे 21 >

1 मनश्शे राज्य करु लागला तेव्हा तो बारा वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर पंचावन्न वर्षे, राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेफसीबा.
マナセ十二歳にして王となり五十五年の間ヱルサレムにて世を治めたりその母の名はヘフジバといふ
2 परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले तेच त्याने केले. इतर राष्ट्रे करत तसे अमंगळ आचरण मनश्शेने केले (आणि इस्राएली आले त्यावेळी याच राष्ट्रांना परमेश्वराने तेथून हुसकून लावले होते.)
マナセはヱホバの目の前に惡をなしヱホバがイスラエルの子孫の前より逐はらひたまひし國々の人がなすところの憎むべき事に傚へり
3 हिज्कीयाने नष्ट केलेली उंचस्थानावरील पूजास्थळे मनश्शेने पुन्हा बांधली, तसेच त्याने बआलदेवतेसाठी वेदी बांधली आणि इस्राएलचा राजा अहाब याच्याप्रमाणे अशेरा देवीचे स्तंभ उभारले. मनश्शे नक्षत्रांची ही पूजा करत असे.
彼はその父ヒゼキヤが毀たる崇邱を改め築き又イスラエルの王アハブのなせしごとくバアルのために祭壇を築きアシラ像を作り天の衆群を拝みてこれに事へ
4 आणि ज्याविषयी परमेश्वराने सांगितले होते की, “मी आपले नाव यरूशलेमेत ठेवीन,” तेथे परमेश्वराच्या घरात मनश्शेने वेद्या बांधल्या.
またヱホバの家の中に數箇の祭壇を築けり是はヱホバがこれをさして我わが名をヱルサレムにおかんと言たまひし家なり
5 या खेरीज परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही चौकांत मनश्शेने आकाशातील नक्षत्रांसाठी वेद्या बांधल्या.
彼ヱホバの家の二の庭に祭壇を築き
6 आपल्या मुलाचाच बली देऊन मनश्शेने त्यास वेदीवर जाळले. जादूटोणा, मंत्रतंत्र, भूतवैद्य यांच्यामार्फत भविष्य जाणून घ्यायचा मनश्शेला नाद होता. परमेश्वराने जे जे गैर म्हणून सांगितले ते ते मनश्शे करत गेला. त्याने परमेश्वराचा कोप झाला.
またその子に火の中を通らしめ卜占をなし魔術をおこなひ口寄者と卜筮師を取もちひヱホバの目の前に衆多の惡を爲てその震怒を惹おこせり
7 मनश्शेने अशेराचा कोरीव पुतळा करून तो मंदिरात ठेवला. या मंदिराविषयी दावीद आणि दाविदाचा मुलगा शलमोन यांना परमेश्वर म्हणाला होता, “इस्राएलमधील सर्व वंशातून, या नगरांमधून मी यरूशलेमची निवड केली आहे. यरूशलेममधील मंदिरात मी माझे नाव कायमचे ठेवीन.
彼はその作りしアシラの銅像を殿にたてたりヱホバこの殿につきてダビデとその子ソロモンに言たまひしことあり云く我この家と我がイスラエルの諸の支派の中より選みたるヱルサレムとに吾名を永久におかん
8 इस्राएल लोकांस या भूमीतून बाहेर पडावे लागू नये याची मी दक्षता घेईल. माझ्या सर्व आज्ञा तसेच मोशेची शिकवण त्यांनी तंतोतंत पाळली, तर त्यांची इथेच या भूमीत वस्ती राहील.”
彼等もし我が凡てこれに命ぜし事わが僕モーセがこれに命ぜし一切の律法を謹みて行はば我これが足をしてわがその先祖等に與へし地より重てさまよひ出ることなからしむべしと
9 पण लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही. इस्राएल लोक इथे येण्यापूर्वी कनानमधील राष्ट्रांनी जी वाईट वर्तणूक केली त्यापेक्षाही मनश्शेचे वर्तन निंद्य होते. इस्राएल लोक या भूमीत आले तेव्हा त्या राष्ट्रांना परमेश्वराने नष्ट केले होते.
然るに彼等は聽ことをせざりきマナセが人々を誘ひて惡をなせしことはヱホバがイスラエルの子孫の前に滅したまひし國々の人よりも甚だしかりき
10 १० तेव्हा परमेश्वराने आपल्या सेवक संदेष्ट्यांना हे सांगायला सांगितले,
是においてヱホバその僕なる預言者等をもて語て言給はく
11 ११ “यहूद्यांचा राजा मनश्शे याने अत्यंत निंद्य कृत्ये केली आहेत. त्याच्या आधीच्या अमोऱ्यापेक्षाही याचे वागणे भयंकर आहे. त्याच्या त्या मूर्तीपुढे त्याने यहूदालाही पाप करायला लावले आहे.
ユダの王マナセこれらの憎むべき事を行ひその前にありしアモリ人の凡て爲しところにも踰たる惡をなし亦ユダをしてその偶像をもて罪を犯させたれば
12 १२ तेव्हा इस्राएलाचा परमेश्वर म्हणतो, ‘यरूशलेम आणि यहूदा यांना मी आता अशा संकटाच्या खाईत लोटीन की ते ऐकूनच लोकांस धक्का बसेल.
イスラエルの神ヱホバかく言ふ視よ我ヱルサレムとユダに災害をくだす是を聞く者はその耳ふたつながら鳴ん
13 १३ शोमरोनचे मापनसूत्र आणि अहाबाच्या घराण्याचा ओळंबा मी यरूशलेमेवर धरीन. थाळी घासूनपुसून पालथी करून ठेवावी तशी मी यरूशलेमची गत करीन.
我サマリヤを量りし繩とアハブの家にもちひし準縄をヱルサレムにほどこし人が皿を拭ひこれを拭ひて反覆がごとくにヱルサレムを拭ひさらん
14 १४ मी आपल्या वतनांतल्या राहिलेल्यांचा त्याग करून त्यांना त्यांच्या शत्रूच्या ताब्यात देईन. ते त्यांना युध्दातील लुटीप्रमाणे व भक्ष्य असे होतील.
我わが產業の民の殘餘を棄てこれをその敵の手に付さん彼等はその諸の敵の擄掠にあひ掠奪にあふべし
15 १५ मी जे जे करु नका म्हणून बजावले ते ते त्यांनी केले त्याचे हे फळ होय. यांचे पूर्वज मिसरमधून बाहेर पडले, त्या दिवसापासूनच यांनी मला संताप आणला आहे.
是は彼等その先祖等がエジプトより出し日より今日にいたるまで吾目の前に惡をおこなひて我を怒らするが故なり
16 १६ शिवाय मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. संपूर्ण यरूशलेम त्याने रक्तलांछित केले. यहूद्यांना त्याने जी पापे करायला लावली ती वेगळीच. परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते मनश्शेने यहूदाला करायला लावले.”
マナセはヱホバの目の前に惡をおこなひてユダに罪を犯させたる上にまた無辜者の血を多く流してヱルサレムのこの極よりかの極にまで盈せり
17 १७ मनश्शेची पापे आणि इतर कृत्ये यहूदाच्या राजांचा इतिहास, या पुस्तकात लिहिलेली आहेत.
マナセのその餘の行爲とその凡て爲たる事およびその犯したる罪はユダの王の歴代志の書にしるさるるにあらすや
18 १८ मनश्शे मरण पावला आणि त्याचे आपल्या पूर्वजांच्या शेजारी दफन झाले. आपल्या घराच्या बगीच्यात त्यास पुरले. या बागेचे नाव “उज्जाची बाग” त्याच्या जागी त्याचा मुलगा आमोन राज्य करु लागला.
マナセその先祖等とともに寝りてその家の園すなはちウザの園に葬られその子アモンこれに代りて王となれり
19 १९ आमोन राज्य करु लागला तेव्हा बावीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर दोन वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव मशुल्लेमेथ ही यटबा येथील हारुस याची मुलगी.
アモンは王となれる時二十二歳にしてヱルサレムにおいて二年世を治めたりその母はヨテバのハルツの女にしてその名をメシユレメテと云ふ
20 २० आपले वडिल मनश्शे यांच्याप्रमाणेच आमोननेही परमेश्वराच्या दृष्टीने गैर कृत्ये केली.
アモンはその父マナセのなせしごとくヱホバの目の前に惡をなせり
21 २१ तो आपल्या वडिलांसारखाच होता. वडिलांनी ज्या देवतांची पूजाअर्चा केली त्यांचीच पूजा आमोननेही आरंभली.
すなはち彼は凡てその父のあゆみし道にあゆみその父の事へし偶像に事へてこれを拝み
22 २२ आपल्या पूर्वजांचा परमेश्वर देव याचा मार्ग त्याने सोडला आणि परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागला.
その先祖等の神ヱホバを棄てヱホバの道にあゆまざりき
23 २३ आमोनच्या सेवकांनी त्याच्याविरुध्द कट करून त्याच्या घरातच राजाला ठार केले.
茲にアモンの臣僕等黨をむすびて王をその家に弑したりしが
24 २४ आणि ज्यांनी आमोनशी फितुरी केली, त्या सेवकांना देशातील लोकांनी जिवे मारले. मग आमोनचा मुलगा योशीया याला लोकांनी राजा केले.
國の民そのアモン王に敵して黨をむすびし者をことごとく撃ころせり而して國の民アモンの子ヨシアを王となしてそれに代らしむ
25 २५ आमोनने जी इतर कृत्ये केली ती सर्व “यहूदाच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात लिहून ठेवलेली आहेत.
アモンのなしたるその餘の行爲はユダの王の歴代志の書にしるさるるにあらずや
26 २६ उज्जाच्या बागेत आमोनचे दफन करण्यात आले. आमोनचा मुलगा योशीया राजा झाला.
アモンはウザの園にてその墓に葬られその子ヨシアこれに代りて王となれり

< 2 राजे 21 >