< 2 राजे 21 >
1 १ मनश्शे राज्य करु लागला तेव्हा तो बारा वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर पंचावन्न वर्षे, राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेफसीबा.
Manasses was of twelue yeer, whanne he bigan to regne, and he regnyde fyue and fifti yeer in Jerusalem; the name of his modir was Asiba.
2 २ परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले तेच त्याने केले. इतर राष्ट्रे करत तसे अमंगळ आचरण मनश्शेने केले (आणि इस्राएली आले त्यावेळी याच राष्ट्रांना परमेश्वराने तेथून हुसकून लावले होते.)
And he dide yuel in the siyt of the Lord, bi the idols of hethene men, whiche hethene men the Lord dide awei fro the face of the sones of Israel.
3 ३ हिज्कीयाने नष्ट केलेली उंचस्थानावरील पूजास्थळे मनश्शेने पुन्हा बांधली, तसेच त्याने बआलदेवतेसाठी वेदी बांधली आणि इस्राएलचा राजा अहाब याच्याप्रमाणे अशेरा देवीचे स्तंभ उभारले. मनश्शे नक्षत्रांची ही पूजा करत असे.
And he was turned, and bildide hiye thingis, whiche Ezechie, his fadir, distriede; and he reiside auteris of Baal, and he made woodis, as Achab kyng of Israel hadde do; and he worschipide `with out forth al the knyythod of heuene, and worschipide it in herte.
4 ४ आणि ज्याविषयी परमेश्वराने सांगितले होते की, “मी आपले नाव यरूशलेमेत ठेवीन,” तेथे परमेश्वराच्या घरात मनश्शेने वेद्या बांधल्या.
And he bildide auteris in the hows of the Lord, of which the Lord seide, Y schal sette my name in Jerusalem.
5 ५ या खेरीज परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही चौकांत मनश्शेने आकाशातील नक्षत्रांसाठी वेद्या बांधल्या.
And he bildide auteris to al the knyythod of heuene in the twei large places of the temple of the Lord;
6 ६ आपल्या मुलाचाच बली देऊन मनश्शेने त्यास वेदीवर जाळले. जादूटोणा, मंत्रतंत्र, भूतवैद्य यांच्यामार्फत भविष्य जाणून घ्यायचा मनश्शेला नाद होता. परमेश्वराने जे जे गैर म्हणून सांगितले ते ते मनश्शे करत गेला. त्याने परमेश्वराचा कोप झाला.
and he `ledde ouer his sone thorouy the fier; and he vside false dyuynyngis in auteris, on whiche sacrifice was maad to feendis, and he kepte false dyuynyngis bi chiteryng of bryddis; and he made men to haue yuele spiritis spekynge in the wombe, and he multipliede false dyuynours in entraylis of beestis sacrified to feendis, that he schulde do yuel bifor the Lord, and terre hym to ire.
7 ७ मनश्शेने अशेराचा कोरीव पुतळा करून तो मंदिरात ठेवला. या मंदिराविषयी दावीद आणि दाविदाचा मुलगा शलमोन यांना परमेश्वर म्हणाला होता, “इस्राएलमधील सर्व वंशातून, या नगरांमधून मी यरूशलेमची निवड केली आहे. यरूशलेममधील मंदिरात मी माझे नाव कायमचे ठेवीन.
And he settide an ydol of wode, which he hadde maad, in the temple of the Lord, `of which temple the Lord spak to Dauid, and to Salomon, his sone, Y schal sette my name withouten ende in this temple, and in Jerusalem which Y chees of alle the lynagis of Israel.
8 ८ इस्राएल लोकांस या भूमीतून बाहेर पडावे लागू नये याची मी दक्षता घेईल. माझ्या सर्व आज्ञा तसेच मोशेची शिकवण त्यांनी तंतोतंत पाळली, तर त्यांची इथेच या भूमीत वस्ती राहील.”
And Y schal nomore make the foot of Israel to be moued fro the lond which Y yaf to the fadris of hem; so netheles if thei kepen in werk alle thingis whiche Y comaundide to hem, and al the lawe whiche Moises, my seruaunt, comaundide to hem.
9 ९ पण लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही. इस्राएल लोक इथे येण्यापूर्वी कनानमधील राष्ट्रांनी जी वाईट वर्तणूक केली त्यापेक्षाही मनश्शेचे वर्तन निंद्य होते. इस्राएल लोक या भूमीत आले तेव्हा त्या राष्ट्रांना परमेश्वराने नष्ट केले होते.
Sotheli thei herden not, but weren disseyued of Manasses, that thei diden yuel ouer hethene men, whiche the Lord al to-brak fro the face of the sones of Israel.
10 १० तेव्हा परमेश्वराने आपल्या सेवक संदेष्ट्यांना हे सांगायला सांगितले,
And the Lord spak in the hond of his seruauntis prophetis, and seide,
11 ११ “यहूद्यांचा राजा मनश्शे याने अत्यंत निंद्य कृत्ये केली आहेत. त्याच्या आधीच्या अमोऱ्यापेक्षाही याचे वागणे भयंकर आहे. त्याच्या त्या मूर्तीपुढे त्याने यहूदालाही पाप करायला लावले आहे.
For Manasses, kyng of Juda, dide these worste abhomynaciouns ouer alle thingis which Ammorreis diden bifor hym, and maden also the puple of Juda to do synne in hise vnclennessis;
12 १२ तेव्हा इस्राएलाचा परमेश्वर म्हणतो, ‘यरूशलेम आणि यहूदा यांना मी आता अशा संकटाच्या खाईत लोटीन की ते ऐकूनच लोकांस धक्का बसेल.
therfor the Lord God of Israel seith these thingis, Lo! Y schal brynge in yuelis on Jerusalem and Juda, that who euer herith, bothe hise eeris tyngle;
13 १३ शोमरोनचे मापनसूत्र आणि अहाबाच्या घराण्याचा ओळंबा मी यरूशलेमेवर धरीन. थाळी घासूनपुसून पालथी करून ठेवावी तशी मी यरूशलेमची गत करीन.
and Y schal holde forth on Jerusalem the corde of Samarie, and the birthun of the hows of Achab, and Y schal do awei Jerusalem, as tablis ben wont to be doon awei; and Y schal do awey and turne it, and Y schal lede ful ofte the poyntel on the face therof.
14 १४ मी आपल्या वतनांतल्या राहिलेल्यांचा त्याग करून त्यांना त्यांच्या शत्रूच्या ताब्यात देईन. ते त्यांना युध्दातील लुटीप्रमाणे व भक्ष्य असे होतील.
Forsothe Y schal leeue relikis of myn eritage, and Y schal bitake hem in to the hond of enemyes therof; and thei schulen be in distriynge, and in raueyn to alle her aduersaries;
15 १५ मी जे जे करु नका म्हणून बजावले ते ते त्यांनी केले त्याचे हे फळ होय. यांचे पूर्वज मिसरमधून बाहेर पडले, त्या दिवसापासूनच यांनी मला संताप आणला आहे.
for thei diden yuel bifor me, and thei continueden terrynge me to ire, fro the dai in which her fadris yeden out of the lond of Egipt `til to this day.
16 १६ शिवाय मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. संपूर्ण यरूशलेम त्याने रक्तलांछित केले. यहूद्यांना त्याने जी पापे करायला लावली ती वेगळीच. परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते मनश्शेने यहूदाला करायला लावले.”
Ferthermore also Manasses schedde ful myche ynnocent blood, til he fillide Jerusalem `til to the mouth, with outen hise synnes bi whiche he made Juda to do synne, to do yuel bifor the Lord.
17 १७ मनश्शेची पापे आणि इतर कृत्ये यहूदाच्या राजांचा इतिहास, या पुस्तकात लिहिलेली आहेत.
Forsothe the residue of the wordis of Manasses, and alle thingis whiche he dide, and his synne whiche he synnede, whether these ben not writun in the book of wordis of daies of the kyngis of Juda?
18 १८ मनश्शे मरण पावला आणि त्याचे आपल्या पूर्वजांच्या शेजारी दफन झाले. आपल्या घराच्या बगीच्यात त्यास पुरले. या बागेचे नाव “उज्जाची बाग” त्याच्या जागी त्याचा मुलगा आमोन राज्य करु लागला.
And Manasses slepte with hise fadris, and was biried in the gardyn of his hows, in the gardyn of Azam; and Amon, his sone, regnyde for hym.
19 १९ आमोन राज्य करु लागला तेव्हा बावीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर दोन वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव मशुल्लेमेथ ही यटबा येथील हारुस याची मुलगी.
He was of two and twenti yeer, whanne he bigan to regne; and he regnede twei yeer in Jerusalem; the name of his modir was Mesalamech, the douyter of Arus of Gethela.
20 २० आपले वडिल मनश्शे यांच्याप्रमाणेच आमोननेही परमेश्वराच्या दृष्टीने गैर कृत्ये केली.
And he dide yuel in the siyt of the Lord, as Manasses, his fader, hadde do.
21 २१ तो आपल्या वडिलांसारखाच होता. वडिलांनी ज्या देवतांची पूजाअर्चा केली त्यांचीच पूजा आमोननेही आरंभली.
And he yede in al the weie, bi which his fader hadde go, and he seruide to vnclennessis, to whiche his fadir hadde seruyd, and he worschipide tho; and he forsook the Lord God of hise fadris,
22 २२ आपल्या पूर्वजांचा परमेश्वर देव याचा मार्ग त्याने सोडला आणि परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागला.
and he yede not in the weye of the Lord.
23 २३ आमोनच्या सेवकांनी त्याच्याविरुध्द कट करून त्याच्या घरातच राजाला ठार केले.
And hise seruauntis settiden tresouns to hym, and killiden the kyng in hise hows.
24 २४ आणि ज्यांनी आमोनशी फितुरी केली, त्या सेवकांना देशातील लोकांनी जिवे मारले. मग आमोनचा मुलगा योशीया याला लोकांनी राजा केले.
Sothely the puple of the Lord smoot alle men, that hadden conspirid ayens kyng Amon, and thei ordeyneden to hem a kyng, Josias, `his sone, for hym.
25 २५ आमोनने जी इतर कृत्ये केली ती सर्व “यहूदाच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात लिहून ठेवलेली आहेत.
Forsothe the residue of wordis of Amon, whiche he dide, whether these ben not writun in the book of wordis of daies of the kyngis of Juda?
26 २६ उज्जाच्या बागेत आमोनचे दफन करण्यात आले. आमोनचा मुलगा योशीया राजा झाला.
And he slepte with hise fadris, and thei birieden hym in his sepulcre in the gardyn of Azam; and Josias, his sone, regnede for him.