< 2 राजे 2 >
1 १ आणि असे झाले की, एका वावटळीद्वारे परमेश्वर एलीयाला वर स्वर्गास घेणार होता, तेव्हा एलीया अलीशाबरोबर गिलगालहून निघाला.
I stało się, gdy miał wziąć Pan Elijasza w wichrze do nieba, że wyszedł Elijasz z Elizeuszem z Galgal.
2 २ एलीया अलीशाला म्हणाला, “कृपाकरून तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला बेथेल येथे पाठवले आहे.” अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे, व तू जिवंत आहे, मी तुला सोडणार नाही.” मग ते खाली बेथेलास गेले.
I rzekł Elijasz do Elizeusza: Proszę siedź tu; bo mię Pan posłał aż do Betel. I rzekł Elizeusz: Jako żywy Pan, i jako żywa dusza twoja, że się ciebie nie puszczę. I przyszli do Betel.
3 ३ तेव्हा बेथेल येथील संदेष्ट्यांचे पुत्र अलीशाकडे येऊन त्यास म्हणाले, “आज तुझ्या स्वामीला परमेश्वर तुझ्यापासून घेऊन जाणार आहे, हे तुला माहित आहे काय?” अलीशा म्हणाला, “होय, मला माहित आहे, पण या विषयी बोलू नका”
Tedy wyszli synowie proroccy, którzy byli w Betel, do Elizeusza, i rzekli do niego: Wieszże, iż dziś Pan weźmie od ciebie pana twego? A on rzekł: Wiemci; milczcie tylko.
4 ४ एलीया अलीशाला म्हणाला, “कृपाकरून तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यरीहो येथे पाठवले आहे.” पण अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे व तू जिवंत आहे, मी तुला सोडणार नाही.” मग ते यरीहोस आले.
Znowu rzekł mu Elijasz: Elizeuszu, proszę siedź tu; bo mię Pan posłał do Jerycha. A on odpowiedział: Jako żywy Pan, i jako żywa dusza twoja, że się ciebie nie puszczę. A tak przyszli do Jerycha.
5 ५ तेव्हा यरीहो मधील संदेष्ट्यांचा समूह अलीशाकडे येऊन म्हणाली, “परमेश्वर तुझ्या स्वामीला आज तुझ्यापासून घेऊन जाणार आहे हे तुला माहित आहे काय?” अलीशा म्हणाला, “होय मला माहित आहे, पण या विषयी बोलू नका.”
Tedy przystąpiwszy synowie proroccy, którzy byli w Jerychu, do Elizeusza, rzekli do niego: Wieszże, że dziś Pan weźmie pana twego od ciebie? A on rzekł: Wiemci; milczcie.
6 ६ नंतर एलीया अलीशाला म्हणाला, “तू कृपाकरून येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यार्देनेस पाठवले आहे.” अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे व तू जिवंत आहे; मी तुला सोडणार नाही.” तेव्हा ते दोघे पुढे निघाले.
Jeszcze mu rzekł Elijasz: Proszę siedź tu; bo mię Pan posłał do Jordanu. Który odpowiedział: Jako żywy Pan, jako żywa i dusza twoja, że się ciebie nie puszczę.
7 ७ नंतर संदेष्ट्याच्या मुलांतले पन्नास त्यांच्या विरूद्ध दिशेने लांब उभे राहिले व ते दोघे यार्देन जवळ उभे राहिले.
I szli obadwaj. A pięćdziesiąt mężów synów prorockich szli, i stanęli naprzeciwko z daleko; ale oni obaj stanęli nad Jordanem.
8 ८ तेव्हा एलीयाने आपला झगा काढला व त्याची घडी केली, आणि तो पाण्यावर आपटला. तेव्हा पाणी दोन्ही दिशेने दुभागले व ते दोघे कोरडया भूमीवरुन चालत नदी पार करून गेले.
A wziąwszy Elijasz płaszcz swój, zwinął go, a uderzył nim wody, i rozdzieliły się tam i sam, tak iż przeszli obaj po suszy.
9 ९ आणि असे झाले की, नदी ओलांडल्यावर एलीया अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने मला येथून घेऊन जायच्या अगोदर मी तुझ्यासाठी काय करावे ते माग.” अलीशा म्हणाला, “कृपाकरून तुमच्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.”
A gdy przeszli, rzekł Elijasz do Elizeusza: Żądaj, czego chcesz, abym ci uczynił pierwej niż będę wzięty od ciebie. Tedy rzekł Elizeusz: Proszę niech będzie dwójnasobny duch twój we mnie;
10 १० एलीयाने उत्तर दिले, “ही तर फारच कठिण गोष्ट तू मागितलीस. तरीसुद्धा, तुझ्या जवळून मी घेतला जात असता, जर तुला मी दिसलो तर हे शक्य आहे. पण जर नाही, तर असे होणार नाही.”
Ale mu on odpowiedział: Trudnejś rzeczy pożądał; wszakże ujrzyszli mię, gdy będę wzięty od ciebie, tak ci się stanie; ale jeźli nie ujrzysz, nie stanieć się.
11 ११ एलीया आणि अलीशा बोलत पुढे चालले होते, तेवढयात अग्नीचा रथ व अग्नीचे घोडे तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी त्या दोघांना एकमेकांपासून दूर केले, आणि एका वावटळीमधून एलीया वर स्वर्गात गेला.
I stało się, gdy oni przecię szli rozmawiając, oto wóz ognisty, i konie ogniste rozłączyły obydwóch. I wstąpił Elijasz w wichrze do nieba.
12 १२ अलीशा हे पाहून मोठ्याने ओरडला, “माझ्या बापा! माझ्या बापा! इस्राएलचा रथ आणि त्याचे घोडेस्वार!” त्याने एलीयाला पुन्हा पाहिले नाही. त्याने आपली वस्रे धरुन फाडली व त्याचे दोन तुकडे केले.
Co Elizeusz widząc, wołał: Ojcze mój, ojcze mój! Wozie Izraelski i jazdo jego. I nie widział go więcej. A pochwyciwszy szaty swe rozdarł je na dwie części.
13 १३ त्याने एलीयाचा अंगरखा जो जमिनीवर पडला होता, उचलला, आणि परत यार्देनकाठी जाऊन उभा राहिला.
I podniósł płaszcz Elijaszowy, który był spadł z niego, a wróciwszy się, stanął nad brzegiem Jordanu. A tak wziąwszy płaszcz Elijaszowy, który był spadł z niego, uderzył nim wody, mówiąc: Gdzież jest Pan, Bóg Elijaszowy?
14 १४ त्याने एलीयाचा झगा जो खाली पडला होता, तो घेऊन पाण्यावर मारला आणि म्हटले, “परमेश्वर, एलीयाचा देव कोठे आहे?” त्याने जेव्हा पाण्यावर मारले, तेव्हा पाणी दोन्ही बाजूस दुभंगले आणि अलीशा पार गेला.
A tak i on uderzył nim wody, a rozdzieliły się tam i sam, i przeszedł Elizeusz.
15 १५ तेव्हा यरीहो येथील संदेष्ट्यांचे पुत्र जे समोर होते ते त्यास पाहून म्हणाले, “एलीयाचा आत्मा अलीशावर आला आहे.” आणि ते त्यास भेटायला आले. त्यांनी त्यास जमिनीपर्यंत लवून नमन केले.
Co widząc synowie proroccy, którzy byli w Jerycho, stojąc na przeciwko, rzekli: Odpoczął duch Elijaszowy nad Elizeuszem; a wyszedłszy przeciwko niemu pokłonili mu się aż do ziemi.
16 १६ ते त्यास म्हणाले, “आता पाहा, तुझ्या दासाकडे कडे पन्नास धष्टपुष्ट माणसे आहेत. त्यांना जाऊन तुझ्या स्वामीचा शोध घेऊ दे. कदाचित् परमेश्वराच्या आत्म्याने एलीयाला वर नेऊन कोठेतरी डोंगर किंवा दरीमध्ये टाकले असेल.” अलीशा म्हणाला, “नाही, त्यांना पाठवू नका.”
I rzekli do niego: Oto teraz jest przy sługach twych pięćdziesiąt mężów mocnych. Proszę niech idą, a niech szukają Pana twego; by go snać nie zaniósł Duch Pański, a nie porzucił go na której górze, albo w której dolinie. Ale im on rzekł: Nie posyłajcie.
17 १७ पण अलीशाला लाज वाटेपर्यंत संदेष्ट्यांनी आग्रह धरला, तो म्हणाला, “त्यांना पाठवा.” मग त्यांनी पन्नास जणांना पाठवले, आणि त्यांनी एलीयाचा तीन दिवस शोध घेतला, पण ते त्यास शोधू शकले नाही.
A gdy nań nalegali aż do uprzykrzenia, rzekł: Poślijcież. A tak posłali onych pięćdziesiąt mężów, którzy szukając przez trzy dni nie znaleźli go.
18 १८ आणि अलीशा यरीहोत राहत असता, ते त्याच्याकडे परत आले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जाऊ नका, असे मी तुम्हास सांगितले नव्हते काय?”
A gdy się wrócili do niego, (a on mieszkał w Jerycho, ) rzekł do nich: Azażem wam nie mówił: Nie chodźcie?
19 १९ त्या नगरातील माणसे अलीशाला म्हणाली, “पाहा, आम्ही तुला विनंती करतो, या नगराची परिस्थिती आनंददायी आहे, माझ्या स्वामी हे तुम्ही पाहताच आहात, पण इथले पाणी खराब व जमीन नापीक आहे.”
Rzekli też mężowie onego miasta do Elizeusza: Wej, oto mieszkanie miasta tego jest dobre, jako panie mój widzisz; ale wody złe i ziemia niepłodna.
20 २० अलीशा त्यांना म्हणाला, “एक नवीन पात्र घेऊन या आणि त्यामध्ये मीठ घाला.” तेव्हा त्यांनी ते त्याच्याकडे आणले.
Tedy rzekł: Przynieście mi bańkę nową, a włóżcie w nię soli. I przynieśli mu.
21 २१ अलीशा ते घेऊन त्या झऱ्याच्या उगमापाशी गेला आणि त्यामध्ये ते मीठ टाकून म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ‘आता हे पाणी मी बरे केले आहे. आता यापुढे आणखी मृत्यू किंवा नापिकी आणखी होणार नाही.”
A poszedłszy do źródła wód, wrzucił tam soli, i rzekł: Tak mówi Pan: Uzdrowiłem te wody; nie będzie więcej stamtąd śmierci, ani niepłodności.
22 २२ अलीशा बोललेल्या वचनाप्रमाणे ते पाणी चांगले झाले व आजपर्यंत ते चांगले आहे.
A tak uzdrowione są one wody aż do dnia tego, według słowa Elizeuszowego, które był powiedział.
23 २३ नंतर अलीशा तेथून वर बेथेलास गेला. तो वाटेने वर चालत असता, लहान मुलांनी गावातून निघून त्याची टिंगल करायला सुरुवात केली. ती म्हणाली, “अरे टकल्या वर जा, ए टकल्या, वर जा.”
Potem szedł stamtąd do Betel. A gdy szedł drogą, dzieci małe wyszły z miasta, i naśmiewały się z niego, i mówiły mu: Idźże łysy, idźże łysy!
24 २४ अलीशाने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले आणि परमेश्वराच्या नावाने त्यांना शाप दिला. त्यानंतर दोन अस्वलींनी वनातून बाहेर येऊन त्यांच्यातली बेचाळीस मुले फाडून टाकली.
Który obejrzawszy się, ujrzał je, i złorzeczył im w imieniu Pańskiem. Przetoż wyszedłszy dwie niedźwiedzice z lasu, rozdrapały z nich czterdzieści i dwoje dzieci.
25 २५ नंतर अलीशा तेथून कर्मेल डोंगराकडे गेला, आणि तिथून तो परत शोमरोनास आला.
I szedł stamtąd na górę Karmel, a z onąd zasię wrócił się do Samaryi.