< 2 राजे 2 >

1 आणि असे झाले की, एका वावटळीद्वारे परमेश्वर एलीयाला वर स्वर्गास घेणार होता, तेव्हा एलीया अलीशाबरोबर गिलगालहून निघाला.
主がつむじ風をもってエリヤを天に上らせようとされた時、エリヤはエリシャと共にギルガルを出て行った。
2 एलीया अलीशाला म्हणाला, “कृपाकरून तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला बेथेल येथे पाठवले आहे.” अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे, व तू जिवंत आहे, मी तुला सोडणार नाही.” मग ते खाली बेथेलास गेले.
エリヤはエリシャに言った、「どうぞ、ここにとどまってください。主はわたしをベテルにつかわされるのですから」。しかしエリシャは言った、「主は生きておられます。またあなたも生きておられます。わたしはあなたを離れません」。そして彼らはベテルへ下った。
3 तेव्हा बेथेल येथील संदेष्ट्यांचे पुत्र अलीशाकडे येऊन त्यास म्हणाले, “आज तुझ्या स्वामीला परमेश्वर तुझ्यापासून घेऊन जाणार आहे, हे तुला माहित आहे काय?” अलीशा म्हणाला, “होय, मला माहित आहे, पण या विषयी बोलू नका”
ベテルにいる預言者のともがらが、エリシャのもとに出てきて彼に言った、「主がきょう、あなたの師事する主人をあなたから取られるのを知っていますか」。彼は言った、「はい、知っています。あなたがたは黙っていてください」。
4 एलीया अलीशाला म्हणाला, “कृपाकरून तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यरीहो येथे पाठवले आहे.” पण अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे व तू जिवंत आहे, मी तुला सोडणार नाही.” मग ते यरीहोस आले.
エリヤは彼に言った、「エリシャよ、どうぞ、ここにとどまってください。主はわたしをエリコにつかわされるのですから」。しかしエリシャは言った、「主は生きておられます。またあなたも生きておられます。わたしはあなたを離れません」。そして彼らはエリコへ行った。
5 तेव्हा यरीहो मधील संदेष्ट्यांचा समूह अलीशाकडे येऊन म्हणाली, “परमेश्वर तुझ्या स्वामीला आज तुझ्यापासून घेऊन जाणार आहे हे तुला माहित आहे काय?” अलीशा म्हणाला, “होय मला माहित आहे, पण या विषयी बोलू नका.”
エリコにいた預言者のともがらが、エリシャのもとにきて彼に言った、「主がきょう、あなたの師事する主人をあなたから取られるのを知っていますか」。彼は言った、「はい、知っています。あなたがたは黙っていてください」。
6 नंतर एलीया अलीशाला म्हणाला, “तू कृपाकरून येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यार्देनेस पाठवले आहे.” अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे व तू जिवंत आहे; मी तुला सोडणार नाही.” तेव्हा ते दोघे पुढे निघाले.
エリヤはまた彼に言った、「どうぞ、ここにとどまってください。主はわたしをヨルダンにつかわされるのですから」。しかし彼は言った、「主は生きておられます。またあなたも生きておられます。わたしはあなたを離れません」。そしてふたりは進んで行った。
7 नंतर संदेष्ट्याच्या मुलांतले पन्नास त्यांच्या विरूद्ध दिशेने लांब उभे राहिले व ते दोघे यार्देन जवळ उभे राहिले.
預言者のともがら五十人も行って、彼らにむかって、はるかに離れて立っていた。彼らふたりは、ヨルダンのほとりに立ったが、
8 तेव्हा एलीयाने आपला झगा काढला व त्याची घडी केली, आणि तो पाण्यावर आपटला. तेव्हा पाणी दोन्ही दिशेने दुभागले व ते दोघे कोरडया भूमीवरुन चालत नदी पार करून गेले.
エリヤは外套を取り、それを巻いて水を打つと、水が左右に分れたので、ふたりはかわいた土の上を渡ることができた。
9 आणि असे झाले की, नदी ओलांडल्यावर एलीया अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने मला येथून घेऊन जायच्या अगोदर मी तुझ्यासाठी काय करावे ते माग.” अलीशा म्हणाला, “कृपाकरून तुमच्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.”
彼らが渡ったとき、エリヤはエリシャに言った、「わたしが取られて、あなたを離れる前に、あなたのしてほしい事を求めなさい」。エリシャは言った、「どうぞ、あなたの霊の二つの分をわたしに継がせてください」。
10 १० एलीयाने उत्तर दिले, “ही तर फारच कठिण गोष्ट तू मागितलीस. तरीसुद्धा, तुझ्या जवळून मी घेतला जात असता, जर तुला मी दिसलो तर हे शक्य आहे. पण जर नाही, तर असे होणार नाही.”
エリヤは言った、「あなたはむずかしい事を求める。あなたがもし、わたしが取られて、あなたを離れるのを見るならば、そのようになるであろう。しかし見ないならば、そのようにはならない」。
11 ११ एलीया आणि अलीशा बोलत पुढे चालले होते, तेवढयात अग्नीचा रथ व अग्नीचे घोडे तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी त्या दोघांना एकमेकांपासून दूर केले, आणि एका वावटळीमधून एलीया वर स्वर्गात गेला.
彼らが進みながら語っていた時、火の車と火の馬があらわれて、ふたりを隔てた。そしてエリヤはつむじ風に乗って天にのぼった。
12 १२ अलीशा हे पाहून मोठ्याने ओरडला, “माझ्या बापा! माझ्या बापा! इस्राएलचा रथ आणि त्याचे घोडेस्वार!” त्याने एलीयाला पुन्हा पाहिले नाही. त्याने आपली वस्रे धरुन फाडली व त्याचे दोन तुकडे केले.
エリシャはこれを見て「わが父よ、わが父よ、イスラエルの戦車よ、その騎兵よ」と叫んだが、再び彼を見なかった。そこでエリシャは自分の着物をつかんで、それを二つに裂き、
13 १३ त्याने एलीयाचा अंगरखा जो जमिनीवर पडला होता, उचलला, आणि परत यार्देनकाठी जाऊन उभा राहिला.
またエリヤの身から落ちた外套を取り上げ、帰ってきてヨルダンの岸に立った。
14 १४ त्याने एलीयाचा झगा जो खाली पडला होता, तो घेऊन पाण्यावर मारला आणि म्हटले, “परमेश्वर, एलीयाचा देव कोठे आहे?” त्याने जेव्हा पाण्यावर मारले, तेव्हा पाणी दोन्ही बाजूस दुभंगले आणि अलीशा पार गेला.
そしてエリヤの身から落ちたその外套を取って水を打ち、「エリヤの神、主はどこにおられますか」と言い、彼が水を打つと、水は左右に分れたので、エリシャは渡った。
15 १५ तेव्हा यरीहो येथील संदेष्ट्यांचे पुत्र जे समोर होते ते त्यास पाहून म्हणाले, “एलीयाचा आत्मा अलीशावर आला आहे.” आणि ते त्यास भेटायला आले. त्यांनी त्यास जमिनीपर्यंत लवून नमन केले.
エリコにいる預言者のともがらは彼の近づいて来るのを見て、「エリヤの霊がエリシャの上にとどまっている」と言った。そして彼らは来て彼を迎え、その前に地に伏して、
16 १६ ते त्यास म्हणाले, “आता पाहा, तुझ्या दासाकडे कडे पन्नास धष्टपुष्ट माणसे आहेत. त्यांना जाऊन तुझ्या स्वामीचा शोध घेऊ दे. कदाचित् परमेश्वराच्या आत्म्याने एलीयाला वर नेऊन कोठेतरी डोंगर किंवा दरीमध्ये टाकले असेल.” अलीशा म्हणाला, “नाही, त्यांना पाठवू नका.”
彼に言った、「しもべらの所に力の強い者が五十人います。どうぞ彼らをつかわして、あなたの主人を尋ねさせてください。主の霊が彼を引きあげて、彼を山か谷に投げたのかも知れません」。エリシャは「つかわしてはならない」と言ったが、
17 १७ पण अलीशाला लाज वाटेपर्यंत संदेष्ट्यांनी आग्रह धरला, तो म्हणाला, “त्यांना पाठवा.” मग त्यांनी पन्नास जणांना पाठवले, आणि त्यांनी एलीयाचा तीन दिवस शोध घेतला, पण ते त्यास शोधू शकले नाही.
彼の恥じるまで、しいたので、彼は「つかわしなさい」と言った。それで彼らは五十人の者をつかわし、三日の間尋ねたが、彼を見いださなかった。
18 १८ आणि अलीशा यरीहोत राहत असता, ते त्याच्याकडे परत आले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जाऊ नका, असे मी तुम्हास सांगितले नव्हते काय?”
エリシャのなおエリコにとどまっている時、彼らが帰ってきたので、エリシャは彼らに言った、「わたしは、あなたがたに、行ってはならないと告げたではないか」。
19 १९ त्या नगरातील माणसे अलीशाला म्हणाली, “पाहा, आम्ही तुला विनंती करतो, या नगराची परिस्थिती आनंददायी आहे, माझ्या स्वामी हे तुम्ही पाहताच आहात, पण इथले पाणी खराब व जमीन नापीक आहे.”
町の人々はエリシャに言った、「見られるとおり、この町の場所は良いが水が悪いので、この地は流産を起すのです」。
20 २० अलीशा त्यांना म्हणाला, “एक नवीन पात्र घेऊन या आणि त्यामध्ये मीठ घाला.” तेव्हा त्यांनी ते त्याच्याकडे आणले.
エリシャは言った、「新しい皿に塩を盛って、わたしに持ってきなさい」。彼らは持ってきた。
21 २१ अलीशा ते घेऊन त्या झऱ्याच्या उगमापाशी गेला आणि त्यामध्ये ते मीठ टाकून म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ‘आता हे पाणी मी बरे केले आहे. आता यापुढे आणखी मृत्यू किंवा नापिकी आणखी होणार नाही.”
エリシャは水の源へ出て行って、塩をそこに投げ入れて言った、「主はこう仰せられる、『わたしはこの水を良い水にした。もはやここには死も流産も起らないであろう』」。
22 २२ अलीशा बोललेल्या वचनाप्रमाणे ते पाणी चांगले झाले व आजपर्यंत ते चांगले आहे.
こうしてその水はエリシャの言ったとおりに良い水になって今日に至っている。
23 २३ नंतर अलीशा तेथून वर बेथेलास गेला. तो वाटेने वर चालत असता, लहान मुलांनी गावातून निघून त्याची टिंगल करायला सुरुवात केली. ती म्हणाली, “अरे टकल्या वर जा, ए टकल्या, वर जा.”
彼はそこからベテルへ上ったが、上って行く途中、小さい子供らが町から出てきて彼をあざけり、彼にむかって「はげ頭よ、のぼれ。はげ頭よ、のぼれ」と言ったので、
24 २४ अलीशाने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले आणि परमेश्वराच्या नावाने त्यांना शाप दिला. त्यानंतर दोन अस्वलींनी वनातून बाहेर येऊन त्यांच्यातली बेचाळीस मुले फाडून टाकली.
彼はふり返って彼らを見、主の名をもって彼らをのろった。すると林の中から二頭の雌ぐまが出てきて、その子供らのうち四十二人を裂いた。
25 २५ नंतर अलीशा तेथून कर्मेल डोंगराकडे गेला, आणि तिथून तो परत शोमरोनास आला.
彼はそこからカルメル山へ行き、そこからサマリヤに帰った。

< 2 राजे 2 >