< 2 राजे 17 >
1 १ यहूदाचा राजा आहाज याच्या बाराव्या वर्षी एलाचा मुलगा होशे शोमरोनांत इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने नऊ वर्षे राज्य केले.
El año 12 de Acaz, rey de Judá, comenzó a reinar Oseas, hijo de Ela, sobre Israel en Samaria, y reinó nueve años.
2 २ परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच तो करत असे, पण त्याच्या पूर्वीच्या इस्राएलांच्या राजांइतकी होशेची कारकीर्द वाईट नव्हती.
Hizo lo malo ante Yavé, aunque no como los reyes de Israel que reinaron antes de él.
3 ३ अश्शूरचा राजा शल्मनेसर होशेवर चाल करून आला. तेव्हा होशे त्याचा दास बनला आणि त्याने त्यास खंडणी भरून दिली.
Salmanasar, rey de Asiria, subió contra Oseas, quien se convirtió en su vasallo y le pagó tributo.
4 ४ पण होशेचे आपल्याविरुध्द कटकारस्थान चालू आहे हे अश्शूरच्या या राजाच्या लक्षात आले, कारण होशेने मिसरचा राजा सो याच्याकडे आपले दूत पाठवले होते. तसेच दरवर्षीप्रमाणे त्यावर्षी होशेने खंडणीही दिली नव्हती. तेव्हा अश्शूरच्या राजाने त्यास अटक करून कैदेत टाकले.
Pero el rey de Asiria descubrió que Oseas conspiraba, pues envió mensajeros a So, rey de Egipto, y porque no pagó el tributo al rey de Asiria, como lo hacía cada año. Por tanto el rey de Asiria lo detuvo y lo encerró en la cárcel.
5 ५ मग अश्शूरचा राजा सर्व देशावर चाल करून आला व शोमरोनावर चढून येऊन त्याने शोमरोनला तीन वर्षे वेढा घातला.
Entonces el rey de Asiria invadió toda la tierra, subió contra Samaria y la sitió durante tres años.
6 ६ होशेच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन हस्तगत केले आणि इस्राएल लोकांस त्याने कैद करून अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे तसेच गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि माद्य लोकांच्या नगरात ठेवले.
El año noveno de Oseas, el rey de Asiria tomó Samaria y llevó a Israel en cautiverio a Asiria, y decidió que habitaran en Halah y Habor, junto al río Gozán, y en las ciudades de los medos.
7 ७ परमेश्वर देवाच्या इच्छेविरुध्द इस्राएल लोकांनी पापे केली होती, म्हणून असे घडले. कारण इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वर त्यांचा देव ज्याने त्यांना मिसरचा राजा फारो याच्या जाचातून सोडवले होते, त्याच्याविरुध्द पाप केले आणि दुसऱ्या देवांचे भजन पूजन केले.
Esto sucedió porque los hijos de Israel pecaron contra Yavé su ʼElohim, Quien los sacó de la tierra de Egipto, del poder de Faraón, rey de Egipto. Reverenciaron a otros ʼelohim
8 ८ आणि जी राष्ट्रे परमेश्वराने इस्राएली लोकांपुढून हुसकावून लावली होती, त्यांच्या नियमांप्रमाणे आणि इस्राएलाच्या राजांनी जे नियम केले होतो त्याप्रमाणे ते चालत.
y practicaron las costumbres de las naciones que Yavé expulsó de delante de ellos y las [costumbres] que establecieron los reyes de Israel.
9 ९ इस्राएल लोकांनी ज्या गोष्टी चांगल्या नाहीत त्या त्यांनी परमेश्वर देवाविरुध्द चोरुन केल्या. पहारेकऱ्यांच्या बुरुजापासून तर तटबंदीच्या नगरापर्यंत सर्व ठिकाणी त्यांनी उंचस्थाने बांधली.
Los hijos de Israel hicieron secretamente cosas no rectas contra Yavé su ʼElohim. Además edificaron lugares altos en todas sus ciudades, desde torres de vigías hasta ciudades fortificadas.
10 १० प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्यागार झाडाखाली त्यांनी स्मृतीस्तंभ आणि अशेरा देवीचे खांब उभारले.
Levantaron columnas e imágenes de Asera en toda colina alta y debajo de todo árbol frondoso.
11 ११ आणि परमेश्वराने जी राष्ट्रे त्यांच्या समोरून घालवून दिली होती, त्यांच्यासारखेच त्यांनी उंचस्थानावर धूप जाळला आणि परमेश्वरास संताप येईल आशाप्रकारची वाईट कामे केली. त्या नीच कृत्यांनी परमेश्वराचा राग भडकला.
Allí quemaron incienso en todos los lugares altos, como los pueblos que Yavé desterró de delante de ellos. Hicieron cosas malas que provocaron la ira de Yavé,
12 १२ त्यांनी मूर्तीपूजा आरंभली. “त्यांची सेवा कधीही करु नये” म्हणून परमेश्वराने त्यांना बजावले होते.
porque sirvieron a los ídolos, con respecto a los cuales Yavé les dijo: No harán tal cosa.
13 १३ इस्राएल आणि यहूदा यांना समज देण्यासाठी परमेश्वराने सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांच्याद्वारे सांगितले होते की, “या वाईट मार्गातून फिरा आणि जे नियम तुमच्या पूर्वजांना मी आज्ञापिले होते व जे मी माझे सेवक आणि भविष्यवादी यांच्याकडून तुम्हास पाठवून दिले, त्या सर्वांप्रमाणे माझ्या आज्ञा व माझे नियम पाळा.”
Yavé amonestaba a Israel y a Judá por medio de todos los profetas y de todo vidente: Regresen de sus malos caminos y guarden mis Mandamientos y mis Preceptos, según toda la Ley que Yo prescribí a sus antepasados y les envié por medio de mis esclavos profetas.
14 १४ पण त्यांनी काही एकले नाही. उलट आपल्या पूर्वजांसारखाच, ज्यांचा परमेश्वर आपला देव याच्यावर विश्वास नव्हता हट्टीपणा केला.
Pero ellos no obedecieron, sino fueron indómitos, como sus antepasados, quienes no permanecieron fieles a Yavé su ʼElohim.
15 १५ परमेश्वराचा करार आणि त्याचा नियम जो त्याने त्यांच्या पूर्वजांशी केला होता व त्याच्या साक्षी ज्या त्याने त्यांना साक्ष देऊन दिलेल्या होत्या, त्यांचा त्यांनी अव्हेर केला. ते निरर्थक होऊन व्यर्थतेच्या मागे लागले. त्यांनी आपल्या भोवतालची राष्ट्रे ज्याच्याविषयी परमेश्वराने इस्राएल लोकांस आज्ञा केली होती की, त्यांच्यासारखे करू नका त्यांच्यामागे ते चालले होते.
Desecharon sus Preceptos, el Pacto que hizo con sus antepasados y las exhortaciones con las cuales les advirtió. Siguieron tras la vanidad y se volvieron vacíos. Fueron tras las naciones que estaban a su alrededor, con respecto a las cuales Yavé les ordenó que no hicieran como ellas.
16 १६ आणि त्यांनी परमेश्वर आपला देव याच्या सर्व आज्ञा सोडून, त्यांनी वासरांच्या दोन मूर्ती केल्या, अशेराचे खांब उभारले, आणि आकाशातील सर्व ताऱ्यांची आणि बआलदेवतेची त्यांनी पूजा केली.
Repugnaron todos los Mandamientos de Yavé su ʼElohim, e hicieron para ellos imágenes fundidas de dos becerros y una Asera. Se postraron ante todo el ejército del cielo y sirvieron a baal.
17 १७ त्यांनी आपल्या मुला व मुलींना ही अग्नीत होम करून अर्पिली. भविष्याचे कुतूहल शमवण्यासाठी जादूटोणा आणि ज्योतिषी यांचा अवलंब केला. परमेश्वराने ज्या कृत्यांचा धिक्कार केला तेच करण्यापायी स्वत: लाही विकले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतला.
Pasaron a sus hijos y a sus hijas por el fuego, practicaron los encantamientos y las adivinaciones, y se dedicaron a hacer lo malo ante Yavé para provocarlo a ira.
18 १८ म्हणून परमेश्वर इस्राएलवर फार संतापला आणि त्याने त्यांना आपल्यासमोरून घालवले, फक्त यहूदा वंश सोडून कोणी उरले नाही.
Por lo cual Yavé se airó muchísimo contra Israel. Los apartó de su presencia, y no quedó sino solo la tribu de Judá.
19 १९ यहूदाने देखील परमेश्वर आपला देव याच्या आज्ञा पाळल्या नाहीत. याउलट इस्राएलांनी जे नियम केले त्याचे त्यांनी अनुसरण केले.
Judá tampoco guardó los Mandamientos de Yavé su ʼElohim, sino anduvieron en las costumbres que Israel estableció.
20 २० त्यामुळे परमेश्वराने सर्व इस्राएल वंशजांचा त्याग केला व त्यांना आपणासमोरून हाकलून दृष्टीआड करेपर्यंत, त्याने त्यांना पीडा देऊन लुटारुंच्या हाती दिले.
Entonces Yavé desechó a toda la descendencia de Israel. Los afligió y los entregó en mano de saqueadores, hasta echarlos de su Presencia.
21 २१ त्याने दाविदाच्या घराण्यापासून इस्राएल फाडून काढला, तेव्हा त्यांनी नबाटचा मुलगा यराबाम याला राजा केले. यराबामाने इस्राएलाला परमेश्वराच्या मागे चालण्यापासून परावृत्त केले आणि त्यांना मोठे पाप करायला लावले.
Cuando Él separó a Israel de la casa de David, ellos proclamaron rey a Jeroboam, hijo de Nabat. Jeroboam apartó a Israel de seguir a Yavé, y los llevó a cometer un gran pecado.
22 २२ यराबामाने जी पापे केली त्याचे अनुकरण इस्राएल लोकांनी केले. त्यांनी ते सोडले नाही.
Los hijos de Israel anduvieron en todos los pecados que Jeroboam cometió. No se apartaron de ellos,
23 २३ अखेर परमेश्वराने आपले सर्व सेवक जे भविष्यवादी होते त्यांच्या द्वारे सांगितल्याप्रमाणे इस्राएलास आपल्या समोरून घालवले. त्यांना त्यांच्या प्रदेशातून काढून अश्शूरमध्ये नेण्यात आले. आजपर्यंत ते तेथे आहेत.
hasta cuando Yavé apartó a Israel de su Presencia, tal como dijo por medio de todos sus esclavos profetas. Entonces Israel fue llevado cautivo de su tierra a Asiria hasta hoy.
24 २४ अश्शूरच्या राजाने बाबेल, कूथा, अव्वा, हमाथ आणि सफरवाईम येथून लोक आणून शोमरोनात इस्राएली लोकांच्या ठिकाणी वसवले. या लोकांनी शोमरोनचा ताबा घेऊन त्यातील नगरात ते राहू लागले.
El rey de Asiria trajo gente de Babilonia, Cuta, Ava, Hamat y Sefarvaim, y los estableció en las ciudades de Samaria en lugar de los hijos de Israel. Así ocuparon Samaria y vivieron en sus ciudades.
25 २५ आणि असे झाले की ते तेथे वस्ती करून राहू लागले, तेव्हा ते परमेश्वराचा मान राखत नव्हते. म्हणून परमेश्वराने त्यांच्यामध्ये सिंह सोडले. त्यांनी त्यांच्यातील कित्येकांचा बळी घेतला.
Pero como no temían a Yavé, sucedió que, cuando comenzaron a vivir allí, Yavé envió leones contra ellos los cuales los mataban.
26 २६ मग ते अश्शूरच्या राजाला म्हणाले, “जी राष्ट्रे तू नेऊन शोमरोनमधल्या नगरात वसवले, त्यांना या देशातील परमेश्वराचे नियम माहित नाहीत. म्हणून परमेश्वराने त्यांच्यावर सिंह सोडले. आणि पाहा, सिंह त्या लोकांस मारून टाकत आहे, कारण त्यांना त्या देशाच्या परमेश्वराचा नियम माहित नाही.”
Entonces ellos enviaron a decir al rey de Asiria: Las gentes que trasladaste y colocaste en las ciudades de Samaria no conocen la costumbre del ʼElohim de la tierra, el cual envió leones contra ellas. Ciertamente las matan, porque no conocen la costumbre del ʼElohim de la tierra.
27 २७ तेव्हा अश्शूरच्या राजाने आज्ञा दिली, “जे याजक तुम्ही तेथून आणले आहेत, त्यातील कोणाएकाला तिथे घेऊन जा. आणि त्यास तिथे राहू द्यावे व त्यांनी त्यांना त्या देशाच्या परमेश्वराचा नियम शिकवावा.
Y el rey de Asiria mandó a decir: Lleven allá a alguno de los sacerdotes que trajeron cautivos de allá, que vaya y viva allí, y les enseñe la costumbre del ʼElohim de la tierra.
28 २८ तेव्हा, शोमरोनमधून जे याजक त्यांनी नेले होते, त्यापैकी एकजण बेथेल येथे राहिला. आणि त्याने लोकांस परमेश्वराचा मान कसा राखावा ते शिकवले.”
Llegó uno de los sacerdotes que deportaron de Samaria. Vivió en Bet-ʼEl y les enseñó cómo debían reverenciar a Yavé.
29 २९ परंतू प्रत्येक राष्ट्राने स्वत: चे देव केले, आणि त्यांना शोमरोन मधील लोकांनी बांधलेल्या उंचस्थानावरील पूजास्थळामध्ये ठेवले. प्रत्येक राष्ट्राने स्वत: च्या राहण्याच्या नगरात असेच केले.
Pero cada pueblo hacía sus propios ʼelohim y los ponía en los santuarios de los lugares altos que los de Samaria hacían. Cada pueblo hacía esto en la ciudad donde vivía.
30 ३० बाबेल लोकांनी सुक्कोथ-बनोथ ही दैवते केली; कूथातील लोकांनी नेरगल केला; हमाथमधील लोकांनी अशीमा केली,
De esta manera los hombres de Babilonia rendían culto a Sucot-benot, los hombres de Cuta a Nergal y los hombres de Hamat a Asima.
31 ३१ अव्वी यांनी निभज आणि तर्ताक केले. सफरवाईम यांनी आपले दैवत अद्रम्मेलेक आणि अनम्मेलेक यांच्यासाठी आपल्या मुलांचा अग्नीत बली दिला.
Los aveos hicieron una imagen de Nibhaz y de Tartac. Los sefarveos quemaban a sus hijos en el fuego para adorar a Adramelec y Anamelec, ʼelohim de Sefarvaim.
32 ३२ ते परमेश्वराविषयी आदर बाळगत तरी, उंचस्थानातील पूजास्थळांसाठी त्यांनी आपल्यातूनच याजक निवडले. तिथे हे याजक यज्ञ करीत.
Aunque reverenciaban a Yavé, designaron sacerdotes de entre ellos para los lugares altos, quienes ofrecían sacrificios a favor de ellos en los santuarios de dichos lugares.
33 ३३ ते परमेश्वराविषयी आदर बाळगत असत आणि आपापल्या दैवतांचीही पूजा करीत. आपल्या पूर्वीच्या राष्ट्रा प्रमाणे जेथून त्यांना आणले होते त्यांच्या रीतीप्रमाणे ते करीत गेले.
De modo que reverenciaban a Yavé, pero también servían a sus propios ʼelohim, según la costumbre de las naciones de donde fueron deportados.
34 ३४ आजही ते लोक त्यांच्या पूर्वीच्या चालीरीतीला चिटकून आहेत. ते परमेश्वराचा आदर बाळगत नसत व ज्याचे नाव इस्राएल ठेवले, त्या याकोबाच्या वंशजास त्याने दिलेल्या आज्ञा, नियम, न्याय व नियमशास्त्र यांप्रमाणे ते आचरण करीत नाही.
Hasta hoy obran según las costumbres antiguas: No reverencian a Yavé, ni actúan según sus Preceptos, a sus Ordenanzas, a la Ley y al Mandamiento que Yavé prescribió a los hijos de Jacob, al cual llamó Israel.
35 ३५ परमेश्वराने इस्राएल लोकांशी करार करून त्यांना आज्ञा केली होती की, “इतर दैवतांचे भय तुम्ही धरू नका, आणि त्यांच्या पाया ही पडू नका व त्यांची सेवाही करू नका व त्यांना यज्ञ करू नका.
Yavé hizo un Pacto con ellos y les ordenó: No teman a otros ʼelohim, ni se inclinen ante ellos, ni les sirvan, ni les ofrezcan sacrificios,
36 ३६ फक्त परमेश्वर देवालाच मानले पाहिजे त्यानेच तुम्हास मिसरमधून बाहेर काढले तुमच्या रक्षणासाठी परमेश्वराने आपले सामर्थ्य पणाला लावले. तेव्हा परमेश्वराची उपासना करा आणि त्याच्यासाठी यज्ञ करा.
sino solo a Yavé, Quien los sacó de la tierra de Egipto con gran poder y brazo extendido. A Él temerán, ante Él se inclinarán y ofrecerán sacrificios.
37 ३७ त्याने तुम्हास ज्या आज्ञा, नियम, करार, शिकवण लिहून दिली ती तुम्ही पाळलीच पाहिजे. त्या सर्वांचे तुम्ही सर्व वेळ पालन केले पाहिजे इतर देवीदेवतांचे भय धरता कामा नये.
Tendrán cuidado de practicar todos los días los Preceptos, las Ordenanzas, la Ley y los Mandamientos que escribí para ustedes. No teman a otros ʼelohim,
38 ३८ मी तुमच्याशी केलेल्या कराराचा विसर पडू देऊ नका. इतर दैवतांच्या भजनी लागू नका.
ni olviden el Pacto que hice con ustedes. No teman a otros ʼelohim,
39 ३९ फक्त परमेश्वर देवालाच भजा. तरच तो तुम्हास सर्व संकटातून सोडवील.”
sino teman a Yavé su ʼElohim, y Él los librará de la mano de todos sus enemigos.
40 ४० पण इस्राएल लोकांनी हे ऐकले नाही. ते पूर्वीप्रमाणेच वागत राहिले.
Pero ellos no escucharon, sino hicieron según su antigua costumbre.
41 ४१ आता ती इतर राष्ट्रे परमेश्वराचा आदर ठेवतात पण स्वत: च्या देवतांच्या मूर्तीचीही पूजा करतात. त्यांची मुलेबाळे, नातवंडे आपल्या पूर्वजांचेच अनुकरण करत राहिली. ती आजतागायत तशीच वागत आहेत.
Así pues, aquellas gentes reverenciaban a Yavé, pero al mismo tiempo rendían culto a sus imágenes. Sus hijos y sus nietos practicaron hasta hoy lo mismo que sus antepasados.