< 2 राजे 15 >

1 इस्राएलचा राजा यराबाम याच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदाचा राजा अमस्या याचा मुलगा अजऱ्या राज्य करू लागला.
La vingt-septième année de Jéroboam, roi d'Israël, Azaria, fils d'Amatsia, roi de Juda, devint roi.
2 अजऱ्या राज्य करू लागला तेव्हा तो सोळा वर्षांचा होता. आणि त्याने यरूशलेमामध्ये बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखल्या असून ती यरूशलेमेतील होती.
Il avait seize ans à son avènement, et il régna cinquante-deux ans à Jérusalem. Or, le nom de sa mère était Jecholia de Jérusalem.
3 अजऱ्याचे वर्तन आपल्या वडिलांप्रमाणेच परमेश्वराने सांगितले तसे उचित होते. आपले वडिल अमस्या जसे वागले तसाच हाही वागला.
Et il fit ce qui est droit aux yeux de l'Éternel tout comme avait fait Amatsia, son père.
4 उंचस्थानावरील पूजास्थळे त्याने नष्ट केली नाहीत, त्याठिकाणी लोक यज्ञ करीत तसेच धूप जाळीत.
Seulement les tertres ne disparurent pas, le peuple offrait encore des victimes et de l'encens sur les tertres.
5 परमेश्वराने राजाला दु: ख दिले आणि अजऱ्याला कुष्ठरोग होऊन त्याच्या मरणाच्या दिवसापर्यंत तो वेगळा घरी राहिला. राजाचा मुलगा योथाम त्याच्या घरावर अधिकारी होऊन तोच देशातील लोकांचा न्यायनिवाडा करु लागला.
Et l'Éternel infligea une plaie au roi, qui fut lépreux jusqu'au jour de sa mort et demeura dans une infirmerie. Cependant Jotham, fils du roi, était préposé sur la Maison, rendant la justice au peuple du pays.
6 अजऱ्याच्या राहिलेल्या गोष्टी, आणि त्याने जे केले, ते सर्व यहूदाच्या राजांचा इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेले नाही काय?
Le reste des actes d'Azaria et toutes ses entreprises sont d'ailleurs consignés dans le livre des annales des rois de Juda.
7 आणि अजऱ्या आपल्या पूर्वजांबरोबर निजला. त्यांनी त्यास दाविदाच्या नगरात त्याच्या पूर्वजांसोबत पूरले. त्याचा मुलगा योथाम हा त्यानंतर राजा झाला.
Et Azaria reposa avec ses pères et on lui donna la sépulture avec ses pères dans la ville de David, et Jotham, son fils, devint roi en sa place.
8 यहूदाचा राजा अजऱ्या याच्या अडतिसाव्या वर्षी यराबामाचा मुलगा जखऱ्या याने इस्राएलवर शोमरोनात सहा महिने राज्य केले.
Là trente-huitième année d'Azaria, roi de Juda, Zacharie, fils de Jéroboam, devint roi d'Israël à Samarie pour six mois.
9 जखऱ्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच केले. याबाबतीत तो आपल्या पूर्वजांप्रमाणेच वागला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलाला जी पापे करायला लावली तीच याने केली.
Et il fit ce qui est mal aux yeux de l'Éternel comme avaient fait ses pères; il ne se départit point des péchés de Jéroboam, fils de Nebat, qui avait entraîné Israël à pécher.
10 १० मग याबेशाचा मुलगा शल्लूम याने जखऱ्याविरुध्द कट करून त्यास लोकांच्या समोर मारून ठार केले. आणि तो त्याच्या जागेवर राजा झाला.
Et Sallum, fils de Jabès, conspira contre lui et fit main basse sur lui publiquement, et le tua et devint roi en sa place.
11 ११ जखऱ्याने ज्या काही इतर गोष्टी केल्या त्या इस्राएलच्या राजांचा इतिहास, या पुस्तकात लिहिलेल्या आहेत.
Le reste des actes de Zacharie est d'ailleurs consigné dans le livre des annales des rois d'Israël.
12 १२ अशा रीतीने परमेश्वराचे जे वचन त्याने येहूला सांगितले होते ते असे की, “तुझे वंशज चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील,” आणि तसेच झाले.
C'est la parole de l'Éternel qu'il avait dite à Jéhu en ces termes: Tu auras des fils de la quatrième génération assis au trône d'Israël, et il en fut ainsi.
13 १३ याबेशाचा मुलगा शल्लूम इस्राएलचा राजा झाला तेव्हा, यहूदाचा राजा उज्जीया याचे एकोणचाळीसावे वर्ष चालू होते. शल्लूमने शोमरोनात एक महिना राज्य केले.
Sallum, fils de Jabès, devint roi la trente-neuvième année d'Hozias, roi de Juda, et régna un mois de temps à Samarie.
14 १४ गादीचा मुलगा मनहेम तिरसाहून वर शोमरोनास गेला आणि त्याने याबेशाचा मुलगा शल्लूम याला मारून ठार केले आणि स्वत: त्याच्या जागेवर राजा झाला.
Et Menahem, fils de Gadi, s'avança de Thirtsa, et entra dans Samarie, et fit main basse sur Sallum, fils de Jabès, dans Samarie, et lui donna la mort et devint roi en sa place.
15 १५ आणि शल्लूमच्या राहिलेल्या गोष्टी, त्याने केलेला कट, हे सर्व इस्राएल राजाच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेले आहे.
Le reste des actes de Sallum, et sa conjuration qu'il avait formée, sont d'ailleurs consignés dans le livre des annales des rois d'Israël.
16 १६ मनहेमने तिफसाह तसेच त्यातले सर्वजण, तसेच तिरसापासून त्याच्या सीमेमधले सर्वजण जीवे मारले, कारण लोकांनी त्यास नगराची वेस उघडून दिली नाही, म्हणून त्यांने त्यांना मारले. त्याने त्या नगरातल्या सर्व गर्भवती स्त्रियांनाही कापून टाकले.
C'est alors que Menahem fit main basse sur Thiphsach et sur tous ceux qui y étaient, et sur tout son territoire à partir de Thirtsa; ce fut parce qu'on ne lui ouvrit pas qu'il porta ce coup; il y éventra toutes les femmes enceintes.
17 १७ यहूदाचा राजा अजऱ्या याच्या शासनाच्या एकोणचाळिसाव्या वर्षात गादीचा मुलगा मनहेम इस्राएलवर राज्य करु लागला. मनहेमने शोमरोनात दहा वर्षे राज्य केले.
La trente-neuvième année d'Azaria, roi de Juda, Menahem, fils de Gadi, devint roi d'Israël, pour dix ans à Samarie.
18 १८ मनहेमने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचा अध: पात झाला तीच पापे मनहेमने आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात केली, त्यापासून तो फिरला नाही.
Et il fit ce qui est mal aux yeux de l'Éternel; il ne se départit point des péchés de Jéroboam, fils de Nebat, auxquels celui-ci avait entraîné Israël, toute sa vie durant.
19 १९ अश्शूरचा राजा पूल देशावर आला. तेव्हा पूलने आपल्याला पाठिंबा द्यावा आणि आपले राज्य बळकट करावे, या इराद्याने मनहेमने पूलला हजार किक्कार चांदी दिली.
Phul, roi d'Assyrie, fit invasion dans le pays, et Ménahem donna à Phul mille talents d'argent afin qu'il lui prêtât la main pour assurer la royauté dans sa propre main.
20 २० हा पैसा उभा करायला मनहेमने इस्राएलातील श्रीमंत लोकांवर कर बसवला. त्याने प्रत्येकाला पन्नास शेकेल चांदी कर द्यायला लावला. मग ही रक्कम त्याने अश्शूरच्या राजाला दिली. तेव्हा अश्शूरचा राजा परत फिरला. इस्राएलमध्ये तो राहिला नाही.
Et Menahem tira cette somme à payer au roi d'Assyrie, sur les Israélites, tous les gens à moyens, à raison de cinquante sicles d'argent par individu. Puis le roi d'Assyrie rebroussa sans séjourner alors dans le pays.
21 २१ मनहेमच्या पराक्रमांची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात नाही काय?
Le reste des actes de Menahem et toutes ses entreprises sont d'ailleurs consignés dans le livre des annales des rois d'Israël.
22 २२ मनहेम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांसोबत झोपी गेला. त्यानंतर त्याचा मुलगा पेकह्या नवीन राजा झाला.
Et Menahem reposa avec ses pères, et Pekachia, son fils, devint roi à sa place.
23 २३ अजऱ्याच्या यहूदावरील राज्याच्या पन्नासाव्या वर्षी मनहेमचा मुलगा पेकह्या शोमरोन मधून इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने दोन वर्षे राज्य केले.
La cinquantième année d'Azaria roi de Juda, Pekachia, fils de Menahem, devint roi d'Israël à Samarie, pour deux ans.
24 २४ परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच पेकह्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचे अध: पतन झाले तीच पापे पेकह्याने केली.
Et il fit ce qui est mal aux yeux de l'Éternel; il ne se départit point des péchés de Jéroboam, fils de Nebat, auxquels celui-ci avait entraîné Israël.
25 २५ रमाल्याचा मुलगा पेकह हा त्याचा सरदार होता. त्याने अर्गोब व अरये आणि गिलादी लोकांतले पन्नास माणसे आपल्यासोबत घेतली, आणि त्याच्याविरुध्द कट करून त्यास शोमरोन मध्ये राजाच्या घरांतल्या महालात मारून ठार केले आणि त्याच्या जागी पेकह राज्य करू लागला.
Et Pékach, fils de Remalia, son aide-de-camp, conspira contre lui et lui porta le coup dans Samarie au donjon du palais royal, en même temps qu'à Argob et à Ariè; or il se trouvait avec lui cinquante hommes d'entre les fils des Galaadites; c'est ainsi qu'il lui donna la mort et devint roi en sa place.
26 २६ पेकह्याच्या सर्व पराक्रमांची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.
Le reste des actes de Pekachia et toutes ses entreprises sont d'ailleurs consignés dans le livre des annales des rois d'Israël.
27 २७ रमाल्याचा मुलगा पेकह शोमरोनात इस्राएलवर राज्य करु लागला तेव्हा यहूदाचा राजा अजऱ्या याचे बावन्नावे वर्ष होते. पेकहाने वीस वर्षे राज्य केले.
La cinquante-deuxième année d'Azaria roi de Juda, Pékach, fils de Remalia, devint roi d'Israël à Samarie pour vingt ans.
28 २८ परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच त्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या पापांनी इस्राएलचा अध: पात झाला, त्या पापांपासून तो फिरला नाही.
Et il fit ce qui est mal aux yeux de l'Éternel; il ne se départit point des péchés de Jéroboam, fils de Nebat, auxquels celui-ci avait entraîné Israël.
29 २९ पेकह इस्राएलचा राजा असताना, अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर हा इस्राएलवर चाल करून आला. तिग्लथ-पिलेसरने इयोन, आबेल-बेथ-माका यानोह, केदेश, हासोर, गिलाद, गालील आणि सर्व नफताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकांस कैद करून अश्शूरला नेले.
Au temps de Pékach, roi d'Israël, Thiglath-Piléser, roi d'Assyrie, vint et prit Ijon et Abel-Beth-Maacha et Janoha et Kédès et Hatsor et Galaad et la Galilée, tout le territoire de Nephthali, et il les emmena captifs en Assyrie.
30 ३० उज्जीयाचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करीत असल्याच्या विसाव्या वर्षी, एला याचा मुलगा होशे याने रमाल्याचा मुलगा पेकह याच्याविरुध्द कट केला. होशेने पेकहला ठार केले. पेकह नंतर मग होशे राजा झाला.
Et Hosée, fils d'Éla, forma une conspiration contre Pékach, fils de Remalia, et fit main basse sur lui et lui donna la mort et devint roi en sa place la vingtième année de Jotham, fils d'Hozias.
31 ३१ पेकहने जे पराक्रम केले त्याची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.
Le reste des actes de Pékach et toutes ses entreprises, sont d'ailleurs consignés dans le livre des annales des rois d'Israël.
32 ३२ रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलमध्ये राज्यावर आल्यावर त्याच्या दुसऱ्या वर्षी, यहूदाचा राजा उज्जीया याचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करु लागला.
La seconde année de Pékach, fils de Remalia, roi d'Israël, Jotham, fils d'Hozias, roi de Juda, devint roi.
33 ३३ योथाम तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये सोळा वर्षे राज्य केले. सादोकाची मुलगी यरुशा ही त्याची आई.
Il avait vingt-cinq ans à son avènement et il régna seize ans à Jérusalem. Or le nom de sa mère était Jérusa, fille de Tsadoc.
34 ३४ आपले वडिल उज्जीया यांच्या प्रमाणेच योथामही परमेश्वराच्या दृष्टीने योग्य अशी कृत्ये करत होता.
Et il fit ce qui est droit aux yeux de l'Éternel; il agit en tout comme avait agi Hozias, son père.
35 ३५ पण त्यानेही उंचस्थानावरील पूजास्थळे नष्ट केली नाहीत. लोक तेथे यज्ञ करत, धूप जाळत. परमेश्वराच्या मंदिराला योथामाने एक वरचा दरवाजा बांधला.
Seulement les tertres ne disparurent pas; le peuple offrait encore des victimes et de l'encens sur les tertres. Il construisit la porte supérieure du temple de l'Éternel.
36 ३६ यहूदाच्या राजाचा इतिहास, या पुस्तकात योथामाने केलेल्या पराक्रमांची नोंद आहे.
Le reste des actes, de Jotham et toutes ses entreprises sont d'ailleurs consignés dans le livre des annales des rois de Juda.
37 ३७ अरामाचा राजा रसीन आणि रमाल्याचा मुलगा पेकह यांना यावेळी परमेश्वराने यहूदावर चालून जायला उद्युक्त केले.
Dans ce même temps l'Éternel commença à envoyer contre Juda, Retsin, roi de Syrie, et Pékach, fils de Remalia.
38 ३८ योथाम मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. दावीद नगर या आपल्या पूर्वजांच्या नगरात त्यास पुरले. त्यानंतर त्याचा मुलगा आहाज नवा राजा झाला.
Et Jotham reposa avec ses pères et reçut la sépulture avec ses pères dans la ville de David, son père, et Achaz, son fils, devint roi en sa place.

< 2 राजे 15 >