< 2 राजे 14 >

1 इस्राएलचा राजा, यहोआहाज याचा मुलगा योवाश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी, योवाशाचा मुलगा अमस्या यहूदावर राज्य करू लागला.
وَفِي السَّنَةِ الثَّانِيَةِ مِنْ حُكْمِ يُوآشَ بْنِ يُوأَحَازَ مَلِكِ إِسْرَائِيلَ، تَوَلَّى أَمَصْيَا بْنُ يُوآشَ الْمُلْكَ عَلَى يَهُوذَا١
2 अमस्या राज्य करु लागला तेव्हा, पंचवीस वर्षांचा होता; अमस्याने यरूशलेमामध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यहोअदान होते; ती यरूशलेमची होती.
وَكَانَ فِي الْخَامِسَةِ وَالْعِشْرِينَ حِينَ مَلَكَ، وَدَامَ حُكْمُهُ تِسْعاً وَعِشْرِينَ سَنَةً فِي أُورُشَلِيمَ. وَاسْمُ أُمِّهِ يَهُوعَدَّانُ مِنْ أُورُشَلِيمَ.٢
3 परमेश्वराच्या दृष्टीने जे उचित तेच अमस्याने केले, तरीही त्याचा बाप दावीद याच्या सारखे नाही. आपले वडिल योवाश यानी जे केले, तेच सर्व त्याने केले.
وَصَنَعَ كُلَّ مَا هُوَ صَالِحٌ فِي عَيْنَيِ الرَّبِّ، عَلَى غِرَارِ أَبِيهِ يُوآشَ، وَلَكِنَّهُ لَمْ يَبْلُغْ صَلاحَ جَدِّهِ الأَكْبَرِ دَاوُدَ.٣
4 तरी उंचवट्यावरील पूजास्थळे नष्ट केली नव्हती. लोक त्याठिकाणी अजूनही यज्ञ करीत व धूप जाळीत होते.
إِذْ لَمْ يَهْدِمِ الْمُرْتَفَعَاتِ، بَلْ ظَلَّ الشَّعْبُ يَذْبَحُونَ عَلَيْهَا وَيُوْقِدُونَ.٤
5 आणि असे झाले की, त्याचा बाप जो राजा होता त्या राज्यावर त्याची चांगली पकड असातानाच, आपल्या वडिलांचे मारेकरी असलेल्या अधिकाऱ्यांचा त्याने वध केला.
وَعِنْدَمَا اسْتَتَبَّ الْمُلْكُ فِي يَدِهِ قَتَلَ رِجَالَهُ الَّذِينَ اغْتَالُوا أَبَاهُ الْمَلِكَ.٥
6 परंतु त्या मारेकऱ्यांच्या मुलांना त्याने मारले नाही, त्याऐवजी त्याने मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे केले, परमेश्वराने जी आज्ञा केली की: “मुलांच्या गुन्ह्या करता आई-वडीलांना मृत्युदंड देता कामा नये. तसेच, आईवडीलांनी जे केले त्याबद्दल मुलांना मारले जाऊ नये. त्याऐवजी अपराधाचे शासन अपराध करणाऱ्यालाच व्हावे.”
وَلَكِنَّهُ لَمْ يَقْتَصَّ مِنْ أَبْنَائِهِمْ عَمَلاً بِمَا هُوَ وَارِدٌ فِي كِتَابِ شَرِيعَةِ مُوسَى، حَيْثُ أَمَرَ الرَّبُّ قَائِلاً: «لا يُقْتَلُ الآبَاءُ بِذَنْبِ الْبَنِينَ وَلا يُقْتَلُ الْبَنُونَ بِذَنْبِ الآبَاءِ، إِنَّمَا يُقْتَلُ كُلُّ إِنْسَانٍ بِمَا جَنَتْ يَدَاهُ».٦
7 त्याने मिठाच्या खोऱ्यात दहाहजार अदोम्यांना मारले, या व्यतिरिक्त या लढाईत सेला नगर त्याने घेतले आणि त्याचे नाव “यकथेल” ठेवले. अजूनही ते त्याच नावाने ओळखले जाते.
وَهُوَ الَّذِي قَتَلَ عَشَرَةَ آلافٍ مِنَ الأَدُومِيِّينَ فِي وَادِي الْمِلْحِ، وَاسْتَوْلَى عَلَى سَالِعَ بِالْحَرْبِ، وَدَعَا اسْمَهَا يَقْتَئِيلَ إِلَى هَذَا الْيَوْمِ.٧
8 त्यानंतर येहूचा मुलगा यहोआहाज याचा मुलगा, इस्राएलाचा राजा योवाश याच्याकडे अमस्याने संदेश पाठवला. त्यामध्ये असे म्हटले होते, “ऊठ, समोरासमोर एकमेकांना भिडून आपण लढू.”
وَبَعَثَ أَمَصْيَا رُسُلاً إِلَى يَهُوآشَ بْنِ يَهُوأَحَازَ بْنِ يَاهُو مَلِكِ إِسْرَائِيلَ قَائِلاً: «تَعَالَ نَتَوَاجَهْ لِلْقِتَالِ».٨
9 तेव्हा इस्राएलाचा राजा योवाशाने यहूदाचा राजा अमस्या याला निरोप पाठवून म्हटले की, “लबानोनातल्या काटेरी झुडुपाने लबानोनातल्या गंधसरुच्या वृक्षाला निरोप पाठवला की, तुझी मुलगी माझ्या मुलाला पत्नी करून दे.” पण लबानोनातल्या एका वन्यपशूने वाटेने जाताना त्या काटेरी झुडुपाला तुडवून टाकले.
فَأَجَابَهُ يَهُوآشُ: «أَرْسَلَ الْعَوْسَجُ النَّابِتُ فِي لُبْنَانَ إِلَى الأَرْزِ فِي لُبْنَانَ يَقُولُ: زَوِّجِ ابْنَتَكَ مِنِ ابْنِي. فَمَرَّ حَيَوَانٌ بَرِّيٌّ كَانَ هُنَاكَ، فَوَطِئَ الْعَوْسَجَ!٩
10 १० “तू अदोमचा पराभव केलास हे खरे, म्हणून तुझ्या मनाने तुला उंचावले आहे. तू त्याविषयी गौरव करीत घरी राहा, तू पडशील आणि तुझ्याबरोबर यहूदाचाही पाडाव होईल असा तू अरिष्टांशी झगडा का करावा?”
لَقَدْ هَزَمْتَ الأَدُومِيِّينَ فَانْتَابَكَ الْغُرُورُ، وَلَكِنْ خَيْرٌ لَكَ أَنْ تَمْكُثَ فِي قَصْرِكَ وَتَتَمَتَّعَ بِمَجْدِ انْتِصَارِكَ. فَلِمَاذَا تَسْعَى إِلَى الشَّرِّ فَتَجْلِبَ الدَّمَارَ عَلَيْكَ وَعَلَى يَهُوذَا؟»١٠
11 ११ परंतू अमस्याने काही ऐकले नाही. म्हणून इस्राएलचा राजा योवाश याने हल्ला केला, तो व यहूदाचा राजा अमस्या हे यहूदाच्या बेथ-शेमेश येथे एकमेकांसमोर भेटले.
فَلَمْ يُصْغِ أَمَصْيَا لَهُ، فَحَشَدَ يَهُوآشُ مَلِكُ إِسْرَائِيلَ جُيُوشَهُ وَتَوَاجَهَ مَعَ أَمَصْيَا مَلِكِ يَهُوذَا فِي بَيْتِ شَمْسٍ التَّابِعَةِ لِمَمْلَكَةِ يَهُوذَا.١١
12 १२ इस्राएलने यहूदाचा पराभव केला. आणि प्रत्येक मनुष्य आपापल्या घरी पळाले.
فَانْهَزَمَ يَهُوذَا أَمَامَ جَيْشِ إِسْرَائِيلَ وَهَرَبُوا إِلَى مَنَازِلِهِمْ،١٢
13 १३ इस्राएलचा राजा योवाश याने अहज्याचा मुलगा यहोआश याचा मुलगा अमस्या, यहूदाचा राजा, याला बेथ-शेमेश येथे पकडून त्यास यरूशलेमेस नेले. यरूशलेमेत आल्यावर त्याने यरूशलेमेच्या तटबंदीला एफ्राईमाच्या दरवाज्यापासून कोपऱ्यातील दरवाजापर्यंत जवळ-जवळ चारशे फुटांची भींत पाडून टाकली.
وَوَقَعَ أَمَصْيَا فِي أَسْرِ يَهُوآشَ فِي بَيْتِ شَمْسٍ. وَتَوَجَّهَ بِجَيْشِهِ نَحْوَ أُورُشَلِيمَ وَهَدَمَ سُورَهَا مِنْ بَابِ أَفْرَايِمَ إِلَى بَابِ الزَّاوِيَةِ عَلَى امْتِدَادِ أَرْبَعِ مِئَةِ ذِرَاعٍ (نَحْوَ مِئَتَيْ مِتْرٍ)١٣
14 १४ त्याने परमेश्वराच्या मंदिरातील आणि राजवाड्याच्या खजिन्यातील सोने, चांदी आणि सर्व पात्रे योवाशाने लुटली. आणि ओलीस ठेवण्याकरीता माणसे घेऊन मग तो शोमरोनास परतला.
وَاسْتَوْلَى عَلَى كُلِّ الذَّهَبِ وَالْفِضَّةِ، وَجَمِيعِ الآنِيَةِ الْمَوْجُودَةِ فِي هَيْكَلِ الرَّبِّ وَفِي قَصْرِ الْمَلِكِ، وَأَخَذَ رَهَائِنَ ثُمَّ عَادَ إِلَى السَّامِرَةِ.١٤
15 १५ यहूदाचा राजा अमस्या याच्याशी झालेल्या या लढाईतील पराक्रमाबरोबरच योवाशाने केलेल्या इतर महान कृत्यांचीही नोंद “इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात केलेली आहे.
أَمَّا بَقِيَّةُ أَخْبَارِ يَهُوآشَ وَمَا قَامَ بِهِ مِنْ أَعْمَالٍ وَكَيْفَ حَارَبَ أَمَصْيَا مَلِكَ يَهُوذَا أَلَيْسَتْ هِيَ مُدَوَّنَةً فِي كِتَابِ أَخْبَارِ أَيَّامِ مُلُوكِ إِسْرَائِيلَ؟١٥
16 १६ नंतर योहोआश आपल्या पूर्वजांबरोबर झोपी गेला आणि शोमरोनात इस्राएलांच्या राजांबरोबर त्यास पुरण्यात आले. योवाशानंतर त्याचा मुलगा यराबाम त्याच्याजागी गादीवर आला.
ثُمَّ مَاتَ يَهُوآشُ وَدُفِنَ فِي السَّامِرَةِ مَعَ مُلُوكِ إِسْرَائِيلَ، وَخَلَفَهُ ابْنُهُ يَرُبْعَامُ.١٦
17 १७ यहोआहाज याचा मुलगा योवाश, इस्राएलचा राजा याच्या मृत्यूनंतर, योवाशाचा मुलगा अमस्या, यहूदाचा राजा पंधरा वर्षे जगला.
وَعَاشَ أَمَصْيَا بْنُ يُوآشَ مَلِكُ يَهُوذَا خَمْسَ عَشْرَةَ سَنَةً بَعْدَ وَفَاةِ يَهُوآشَ بْنِ يَهُوأَحَازَ مَلِكِ إِسْرَائِيلَ.١٧
18 १८ अमस्याने केलेल्या सर्व थोर कृत्यांची नोंद “यहूदाच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात केलेली आहे.
أَمَّا بَقِيَّةُ أَخْبَارِ أَمَصْيَا أَلَيْسَتْ هِيَ مُدَوَّنَةً فِي كِتَابِ أَخْبَارِ أَيَّامِ مُلُوكِ يَهُوذَا؟١٨
19 १९ त्यांनी यरूशलेमामध्ये अमस्याविरुध्द कट केला, तेव्हा तो लाखीश येथे पळाला. पण त्यांनी त्यांच्यामागे लाखीशास माणसे पाठवून तेथे त्यास जिवे मारले.
وَثَارَتْ عَلَيْهِ فِتْنَةٌ فِي أُورُشَلِيمَ، فَلَجَأَ إِلَى لَخِيشَ، وَلَكِنَّهُمْ أَرْسَلُوا مَنْ تَعَقَّبُوهُ إِلَى هُنَاكَ وَاغْتَالُوهُ،١٩
20 २० त्यांनी त्यास घोड्यावर लादून आणले, आणि यरूशलेमेत दाविदाच्या नगरात त्यास त्याच्या पूर्वजांच्या सोबत पुरले.
ثُمَّ نَقَلُوهُ عَلَى الْخَيْلِ إِلَى أُورُشَلِيمَ حَيْثُ دُفِنَ مَعَ آبَائِهِ فِي مَدِينَةِ دَاوُدَ.٢٠
21 २१ यहूदाच्या सर्व लोकांनी त्याचा बाप अमस्या ह्याच्या जागी अजऱ्याला राजा केले. अजऱ्या तेव्हा सोळा वर्षांचा होता.
وَنَصَّبَ كُلُّ شَعْبِ يَهُوذَا ابْنَهُ عَزَرْيَا مَلِكاً، وَلَهُ مِنَ الْعُمْرِ سِتَّ عَشْرَةَ سَنَةً، فَخَلَفَ أَبَاهُ أَمَصْيَا عَلَى الْعَرْشِ.٢١
22 २२ राजा अमस्याच्या त्याच्या पूर्वजांबरोबर निजल्यानंतर. अजऱ्याने एलाथची पुन्हा उभारणी केली आणि एलाथ यहूदाच्या स्वाधीन केले.
وَهُوَ الَّذِي اسْتَرَدَّ أَيْلَةَ لِيَهُوذَا وَرَمَّمَهَا عَقِبَ وَفَاةِ وَالِدِهِ الْمَلِكِ أَمَصْيَا.٢٢
23 २३ यहूदाचा राजा, योवाशाचा मुलगा अमस्या याच्या पंधराव्या वर्षापासून इस्राएलाचा राजा योवाश याचा मुलगा यराबाम शोमरोनांत राज्य करू लागला. त्याने एक्केचाळीस वर्षे राज्य केले.
وَفِي السَّنَةِ الْخَامِسَةِ عَشْرَةَ مِنْ حُكْمِ أَمَصْيَا بْنِ يُوآشَ مَلِكِ يَهُوذَا، تَوَلَّى يَرُبْعَامُ بْنُ يُوآشَ عَرْشَ إِسْرَائِيلَ فِي السَّامِرَةِ إِحْدَى وَأَرْبَعِينَ سَنَةً.٢٣
24 २४ त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. नबाटचा मुलगा यराबाम याची पापे, जी त्याने इस्राएलाला करायला लावली त्यातील कोणत्याही पापापासून तो फिरला नाही.
وَارْتَكَبَ الشَّرَّ فِي عَيْنَيِ الرَّبِّ، وَلَمْ يَعْدِلْ عَنْ أَيٍّ مِنْ خَطَايَا يَرُبْعَامَ بْنِ نَبَاطَ الَّتِي اسْتَغْوَى بِها الإِسْرَائِيلِيِّينَ فَأَخْطَأُوا.٢٤
25 २५ त्याने इस्रएलाच्या लेबो-हमाथपासून अराबाच्या समुद्रापर्यंत भूमी परत घेतली. गथ-हेफेर मधला संदेष्टा अमित्तयाचा मुलगा योना याला इस्राएलच्या परमेश्वराने सांगितले त्याप्रमाणेच हे घडले.
وَهُوَ الَّذِي اسْتَرْجَعَ لإِسْرَائِيلَ أَرَاضِيهَا الْمُمْتَدَّةَ مِنْ حَمَاةَ إِلَى الْبَحْرِ الْمَيِّتِ، تَحْقِيقاً لِكَلامِ الرَّبِّ الَّذِي نَطَقَ بِهِ عَلَى لِسَانِ عَبْدِهِ يُونَانَ بْنِ أَمَتَّايَ النَّبِيِّ مِنْ أَهْلِ جَتَّ حَافِرَ،٢٥
26 २६ इस्राएलचे दु: ख फार कडू आहे. दास काय व स्वतंत्र काय, सर्वच अडचणीत आलेले आहेत, आणि इस्राएलाला साहाय्य करणारा कोणीच नाही असे परमेश्वराने पाहिले.
لأَنَّ الرَّبَّ رَأَى مَا يُعَانِيهِ الإِسْرَائِيلِيُّونَ مِنْ عَبِيدٍ وَأَحْرَارٍ مِنْ ضِيقٍ أَلِيمٍ مَرِيرٍ. وَلَمْ يَكُنْ لَهُمْ مِنْ مُعِينٍ.٢٦
27 २७ आणि इस्राएलचे नाव आकाशाखालून पुसून टाकू असे परमेश्वर म्हणाला नाही. त्याऐवजी परमेश्वराने योवाशाचा मुलगा यराबाम याच्यामार्फत इस्राएलाला तारले.
وَإِذْ لَمْ يَكُنِ الرَّبُّ قَدْ قَضَى بِمَحْوِ اسْمِ إِسْرَائِيلَ مِنْ تَحْتِ السَّمَاءِ، أَنْقَذَهُمْ عَلَى يَدِ يَرُبْعَامَ بْنِ يُوآشَ.٢٧
28 २८ “इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात यराबामाच्या पराक्रमांची नोंद आहे. त्याचा पराक्रम, तो कसा लढला आणि दिमिष्क आणि हमाथ त्याने इस्राएलच्या भूमीला कशी घेतले. ही नगरे यहूदाच्या ताब्यात होती.
أَمَّا بَقِيَّةُ أَخْبَارِ يَرُبْعَامَ وَكُلُّ مُنْجَزَاتِهِ وَأَعْمَالِهِ وَكَيْفَ حَارَبَ وَاسْتَرْجَعَ لإِسْرَائِيلَ كُلًا مِنْ دِمَشْقَ وَحَمَاةَ الَّتِي اسْتَوْلَى عَلَيْهَا يَهُوذَا أَلَيْسَتْ هِيَ مُدَوَّنَةً فِي كِتَابِ أَخْبَارِ أَيَّامِ مُلُوكِ إِسْرَائِيلَ؟٢٨
29 २९ यराबाम आपल्या पूर्वज इस्राएलचे राजे यांच्याबरोबर निजला, आणि यराबामाचा मुलगा जखऱ्या राजा म्हणून गादीवर आला.
ثُمَّ مَاتَ يَرُبْعَامُ وَدُفِنَ مَعَ آبَائِهِ مُلُوكِ إِسْرَائِيلَ، وَخَلَفَهُ ابْنُهُ زَكَرِيَّا عَلَى الْمُلْكِ.٢٩

< 2 राजे 14 >