< 2 राजे 11 >
1 १ अहज्याची आई अथल्या हिने आपला मुलगा मरण पावला हे पाहिल्यावर, ती उठली आणि सर्व राजसंतानाची हत्या केली.
茲にアハジアの母アタリヤその子の死たるを見て起て王の種を盡く滅したりしが
2 २ पण यहोशेबा, ही राजा योरामाची मुलगी आणि अहज्याची बहीण. योवाश हा राजाच्या अनेक मुलांपैकी एक. इतर मुलांची हत्या होत असताना यहोशेबाने योवाशाला बाजूला घेतले आणि आपल्या झोपायच्या खोलीत लपवून ठेवले. तिने योवाश आणि त्याची दाई यांना लपवले. यहोशेबा आणि ती दाई यांनी योवाशाला अथल्याच्या तावडीतून सोडवले म्हणून तो मारला गेला नाही.
ヨラム王の女にしてアハジアの姉妹なるヱホシバといふ者アハジアの子ヨアシを王の子等の殺さるる者の中より竊みとり彼とその乳母を夜着の室にいれて彼をアタリヤに匿したれば終にころされざりき
3 ३ योवाश आणि यहोशेबा परमेश्वराच्या मंदिरात सहा वर्षे लपून राहिले. आणि यहूदावर अथल्याचे राज्य होते.
ヨアシは彼とともに六年ヱホバの家に隱れてをりアタリヤ國を治めたり
4 ४ सातव्या वर्षी महायाजक यहोयादाने अधिकाऱ्यांना त्यांच्या हुजरे आणि पहारेकरी यांच्यासुद्धा बोलावून घेतले. आणि त्यांना आपल्याबरोबर परमेश्वराच्या मंदिरात नेले. यहोयादाने त्यांच्याशी शपथ व करार करून घेऊन, मग योवाश या राजपुत्राला त्यांच्यापुढे आणले.
第七年にいたりヱホヤダ人を遣して近衛兵の大將等を招きよせヱホバの家にきたりて己に就しめ彼等と契約を結び彼らにヱホバの家にて誓をなさしめて王の子を見し
5 ५ यहोयादाने त्यांना एक आज्ञा केली. तो म्हणाला, “तुम्हास आता मी सांगतो तसे करायचे आहे. प्रत्येक शब्बाथला तुमच्यापैकी एकतृतीयांश लोकांनी आत यायचे. राजाचे त्याच्या घरात तुम्ही संरक्षण करायचे.
かれらに命じて言ふ汝等がなすべき事は是なり汝等安息日に入きたる者は三分の一は王の家をまもり
6 ६ आणि दुसरे एकतृतीयांश लोकांच्या गटाने सूर वेशीवर थांबायचे आणि तिसऱ्या एकतृतीयांश गटाने पहारेकऱ्यांच्या मागे राहायचे.
三分の一はスル門にをり三分の一は近衛兵の後の門にをるべし斯なんぢら宮殿をまもりて人をいるべからず
7 ७ आणि शब्बाथ दिवसास जे सेवा करत नाही, असे दोन गट परमेश्वराच्या मंदिराचे रक्षण करतील आणि राजा योवाशाला संरक्षण देतील.
また凡て汝等安息日に出ゆく者はその二手ともにヱホバの家において王をまもるべし
8 ८ राजा योवाश बाहेर जाईल व आत येईल, तिथे सतत तुम्ही त्याच्याबरोबर राहिले पाहिजे. तुम्ही त्याच्याभोवती कडे करावे व प्रत्येक पहारेकऱ्याच्या हातात शस्त्र असेल आणि कोणीही आपल्या फार जवळ आल्यास तुम्ही त्यास मारुन टाकावे.”
すなはち汝らおのおの武器を手にとりて王を環て立べし凡てその列を侵す者をば殺すべし汝等又王の出る時にも入る時にも王とともにをるべし
9 ९ याजक यहोयादाने ज्या ज्या आज्ञा दिल्या त्या सर्वांचे त्या शताधीपतींनी पालन केले. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या मनुष्यांना बरोबर घेतले. जी शब्बाथात आत येणारी होती आणि जी शब्बाथात बाहेर जाणारी होती हे सर्व लोक यहोयादाकडे गेले.
是においてその將官等祭司ヱホヤダが凡て命ぜしごとくにおこなへり即ちかれらおのおの其手の人の安息日に入くべき者と安息日に出ゆくべき者とを率て祭司ヱホヤダに至りしかば
10 १० याजक यहोयादाने शेकडो भाले आणि ढाली अधिकाऱ्यांच्या हवाली केल्या. दावीद राजाची परमेश्वराच्या मंदिरात ठेवलेली शस्त्रे ती हीच.
祭司はヱホバの殿にあるダビデ王の槍と楯を大將等にわたせり
11 ११ मंदिराच्या डाव्या टोकापासून उजव्या टोकापर्यंत हे रखवालदार हातात आपापली शस्त्रे घेऊन उभे राहिले. ते वेदी आणि मंदिर यांच्याभोवती तसेच राजा मंदिरात येई तेव्हा त्याच्या भोवती उभे राहत.
近衛兵はおのおの手に武器をとりて王の四周にをり殿の右の端より左の端におよびて壇と殿にそひて立つ
12 १२ मग यहोयादाने योवाशाला बाहेर काढले. त्यास त्यांनी मुकुट घातला आणि आज्ञापट दिला. मग त्यांनी त्यास राजा करून त्याचा अभिषेक केला व टाळ्या वाजवून त्यांनी “राजा चिरायू होवो” म्हणून जयघोष केला.
ヱホヤダすなはち王子を進ませて之に冠冕をいただかせ律法をわたし之を王となして之に膏をそそぎければ人衆手を拍て王長壽かれと言り
13 १३ हुजऱ्यांचा आणि लोकांचा हा गलबला राणी अथल्याच्या कानावर गेला. तेव्हा ती परमेश्वराच्या मंदिरापाशी गेली.
茲にアタリヤ近衛兵と民の聲を聞きヱホバの殿にいりて民の所にいたり
14 १४ राजाची रीतीप्रमाणे स्तंभाजवळ उभे रहायची जी जागा तिथे अथल्याने राजाला उभे असलेले पाहिले. नेते आणि लोक कर्णे वाजवीत आहेत हे ही तिने पाहिले. लोकांस खूप आनंद झालेला आहे हे तिच्या लक्षात आले. कर्ण्यांचा आवाज ऐकून तिने नाराजी प्रदर्शित करण्याकरता आपली वस्त्रे फाडली आणि ती “फितुरी! फितुरी!” म्हणून ओरडू लागली.
見るに王は常例のごとくに高座の上に立ち其傍に大將等と喇叭手立をり又國の民みな喜びて喇叭を吹をりしかばアタリヤ其衣を裂て反逆なり反逆なりと叫べり
15 १५ हुजऱ्यांवरील अधिकाऱ्यांना याजक यहोयादाने आज्ञा दिली, “अथल्याला मंदिराच्या आवाराबाहेर काढावे. तिच्या अनुयायांचा तलवारीने वध करावा. मात्र परमेश्वराच्या मंदिरात तो करु नये.”
時に祭司ヱホヤダ大將等と軍勢の士官等に命じてこれに言ふ彼をして列の間をとほりて出しめよ彼に從がふ者をば劍をもて殺せと前にも祭司は彼をヱホバの家に殺すべからずと言おけり
16 १६ मग तिला जाण्यासाठी त्यांनी वाट केली व राज मंदीराकडे घोडे ज्या दारातून आत येत असत त्या दाराने तिला बाहेर काढून तिचा त्यांनी वध केला.
是をもて彼のために路をひらきければ彼王の家の馬道をとほりゆきしが遂に其處に殺されぬ
17 १७ यहोयादाने नंतर परमेश्वर, राजा आणि लोक यांच्यात करार केला. राजा आणि लोक या दोघांवरही परमेश्वराची सत्ता आहे, असे त्या करारात होते. यहोयादाने या खेरीज राजा आणि लोक यांच्यातही एक करार केला. राजाची लोकांबाबत असलेली कर्तव्ये त्यामध्ये होती. तसेच लोकांनी राजाचे आज्ञापालन आणि अनुयायित्व करावे असे त्यामध्ये म्हटले होते.
斯てヱホヤダはヱホと王と民の間にその皆ヱホバの民とならんといふ契約を立しめたり亦王と民の間にもこれを立しめたり
18 १८ यानंतर लोक बाल या देवतेच्या देवळात गेले. त्यांनी बआलाच्या मूर्तीची तसेच तेथील वेद्यांची नासधूस, मोडतोड केली. त्यांचे तुकडे तुकडे केले बालाचा याजक मत्तान याला वेद्यांसमोरच लोकांनी ठार केले. याजक यहोयाद याने परमेश्वराच्या मंदिरावर पहारेकरी नेमले.
是をもて國の民みなバアルの家にいりてこれを毀ちその壇とその像を全く打碎きバアルの祭司マツタンをその壇の前に殺せり而して祭司ヱホバの家に監督者を設けたり
19 १९ सर्व लोकांस घेऊन तो परमेश्वराच्या मंदिराकडून राजाच्या निवासस्थानी गेला. राजाचे विशेष हुजरे, सुरक्षा सैनिक आणि अधिकारी राजाबरोबर होते. त्यांच्यापाठोपाठ बाकीचे लोक गेले. राजमहालाच्या प्रवेशद्वारापर्यंत ते गेले. राजा योवाश मग सिंहासनावर बसला.
ヱホヤダすなはち大將等と近衛兵と國の諸の民を率てヱホバの家より王をみちびき下り近衛兵の門の途よりして王の家にいたり王の位に坐せしめたり
20 २० लोक आनंदात होते आणि नगरात शांतता नांदत होती. राणी अथल्याला राजाच्या महालात तलवारीने मारले.
斯有しかば國の民はみな喜びて邑は平穩なりきアタリヤは王の家に殺されぬ
21 २१ योवाश राजा झाला तेव्हा सात वर्षांचा होता.
ヨアシは位に即し時七歳なりき