< 2 राजे 11 >

1 अहज्याची आई अथल्या हिने आपला मुलगा मरण पावला हे पाहिल्यावर, ती उठली आणि सर्व राजसंतानाची हत्या केली.
וַֽעֲתַלְיָה֙ אֵ֣ם אֲחַזְיָ֔הוּ וּרָאֲתָה (רָאֲתָ֖ה) כִּ֣י מֵ֣ת בְּנָ֑הּ וַתָּ֙קָם֙ וַתְּאַבֵּ֔ד אֵ֖ת כָּל־זֶ֥רַע הַמַּמְלָכָֽה׃
2 पण यहोशेबा, ही राजा योरामाची मुलगी आणि अहज्याची बहीण. योवाश हा राजाच्या अनेक मुलांपैकी एक. इतर मुलांची हत्या होत असताना यहोशेबाने योवाशाला बाजूला घेतले आणि आपल्या झोपायच्या खोलीत लपवून ठेवले. तिने योवाश आणि त्याची दाई यांना लपवले. यहोशेबा आणि ती दाई यांनी योवाशाला अथल्याच्या तावडीतून सोडवले म्हणून तो मारला गेला नाही.
וַתִּקַּ֣ח יְהֹושֶׁ֣בַע בַּת־הַמֶּֽלֶךְ־יֹ֠ורָם אֲחֹ֨ות אֲחַזְיָ֜הוּ אֶת־יֹואָ֣שׁ בֶּן־אֲחַזְיָ֗ה וַתִּגְנֹ֤ב אֹתֹו֙ מִתֹּ֤וךְ בְּנֵֽי־הַמֶּ֙לֶךְ֙ הַמַּמֹותְתִים (הַמּ֣וּמָתִ֔ים) אֹתֹ֥ו וְאֶת־מֵינִקְתֹּ֖ו בַּחֲדַ֣ר הַמִּטֹּ֑ות וַיַּסְתִּ֧רוּ אֹתֹ֛ו מִפְּנֵ֥י עֲתַלְיָ֖הוּ וְלֹ֥א הוּמָֽת׃
3 योवाश आणि यहोशेबा परमेश्वराच्या मंदिरात सहा वर्षे लपून राहिले. आणि यहूदावर अथल्याचे राज्य होते.
וַיְהִ֤י אִתָּהּ֙ בֵּ֣ית יְהוָ֔ה מִתְחַבֵּ֖א שֵׁ֣שׁ שָׁנִ֑ים וַעֲתַלְיָ֖ה מֹלֶ֥כֶת עַל־הָאָֽרֶץ׃ פ
4 सातव्या वर्षी महायाजक यहोयादाने अधिकाऱ्यांना त्यांच्या हुजरे आणि पहारेकरी यांच्यासुद्धा बोलावून घेतले. आणि त्यांना आपल्याबरोबर परमेश्वराच्या मंदिरात नेले. यहोयादाने त्यांच्याशी शपथ व करार करून घेऊन, मग योवाश या राजपुत्राला त्यांच्यापुढे आणले.
וּבַשָּׁנָ֣ה הַ֠שְּׁבִיעִית שָׁלַ֨ח יְהֹויָדָ֜ע וַיִּקַּ֣ח ׀ אֶת־שָׂרֵ֣י הַמֵּאיֹות (הַמֵּאֹ֗ות) לַכָּרִי֙ וְלָ֣רָצִ֔ים וַיָּבֵ֥א אֹתָ֛ם אֵלָ֖יו בֵּ֣ית יְהוָ֑ה וַיִּכְרֹת֩ לָהֶ֨ם בְּרִ֜ית וַיַּשְׁבַּ֤ע אֹתָם֙ בְּבֵ֣ית יְהוָ֔ה וַיַּ֥רְא אֹתָ֖ם אֶת־בֶּן־הַמֶּֽלֶךְ׃
5 यहोयादाने त्यांना एक आज्ञा केली. तो म्हणाला, “तुम्हास आता मी सांगतो तसे करायचे आहे. प्रत्येक शब्बाथला तुमच्यापैकी एकतृतीयांश लोकांनी आत यायचे. राजाचे त्याच्या घरात तुम्ही संरक्षण करायचे.
וַיְצַוֵּ֣ם לֵאמֹ֔ר זֶ֥ה הַדָּבָ֖ר אֲשֶׁ֣ר תַּעֲשׂ֑וּן הַשְּׁלִשִׁ֤ית מִכֶּם֙ בָּאֵ֣י הַשַּׁבָּ֔ת וְשֹׁ֣מְרֵ֔י מִשְׁמֶ֖רֶת בֵּ֥ית הַמֶּֽלֶךְ׃
6 आणि दुसरे एकतृतीयांश लोकांच्या गटाने सूर वेशीवर थांबायचे आणि तिसऱ्या एकतृतीयांश गटाने पहारेकऱ्यांच्या मागे राहायचे.
וְהַשְּׁלִשִׁית֙ בְּשַׁ֣עַר ס֔וּר וְהַשְּׁלִשִׁ֥ית בַּשַּׁ֖עַר אַחַ֣ר הָרָצִ֑ים וּשְׁמַרְתֶּ֛ם אֶת־מִשְׁמֶ֥רֶת הַבַּ֖יִת מַסָּֽח׃
7 आणि शब्बाथ दिवसास जे सेवा करत नाही, असे दोन गट परमेश्वराच्या मंदिराचे रक्षण करतील आणि राजा योवाशाला संरक्षण देतील.
וּשְׁתֵּ֤י הַיָּדֹות֙ בָּכֶ֔ם כֹּ֖ל יֹצְאֵ֣י הַשַּׁבָּ֑ת וְשָֽׁמְר֛וּ אֶת־מִשְׁמֶ֥רֶת בֵּית־יְהוָ֖ה אֶל־הַמֶּֽלֶךְ׃
8 राजा योवाश बाहेर जाईल व आत येईल, तिथे सतत तुम्ही त्याच्याबरोबर राहिले पाहिजे. तुम्ही त्याच्याभोवती कडे करावे व प्रत्येक पहारेकऱ्याच्या हातात शस्त्र असेल आणि कोणीही आपल्या फार जवळ आल्यास तुम्ही त्यास मारुन टाकावे.”
וְהִקַּפְתֶּ֨ם עַל־הַמֶּ֜לֶךְ סָבִ֗יב אִ֚ישׁ וְכֵלָ֣יו בְּיָדֹ֔ו וְהַבָּ֥א אֶל־הַשְּׂדֵרֹ֖ות יוּמָ֑ת וִהְי֥וּ אֶת־הַמֶּ֖לֶךְ בְּצֵאתֹ֥ו וּבְבֹאֹֽו׃
9 याजक यहोयादाने ज्या ज्या आज्ञा दिल्या त्या सर्वांचे त्या शताधीपतींनी पालन केले. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या मनुष्यांना बरोबर घेतले. जी शब्बाथात आत येणारी होती आणि जी शब्बाथात बाहेर जाणारी होती हे सर्व लोक यहोयादाकडे गेले.
וַֽיַּעֲשׂ֞וּ שָׂרֵ֣י הַמֵּאיֹות (הַמֵּאֹ֗ות) כְּכֹ֣ל אֲשֶׁר־צִוָּה֮ יְהֹויָדָ֣ע הַכֹּהֵן֒ וַיִּקְחוּ֙ אִ֣ישׁ אֶת־אֲנָשָׁ֔יו בָּאֵ֣י הַשַּׁבָּ֔ת עִ֖ם יֹצְאֵ֣י הַשַּׁבָּ֑ת וַיָּבֹ֖אוּ אֶל־יְהֹויָדָ֥ע הַכֹּהֵֽן׃
10 १० याजक यहोयादाने शेकडो भाले आणि ढाली अधिकाऱ्यांच्या हवाली केल्या. दावीद राजाची परमेश्वराच्या मंदिरात ठेवलेली शस्त्रे ती हीच.
וַיִּתֵּ֨ן הַכֹּהֵ֜ן לְשָׂרֵ֣י הַמֵּאיֹות (הַמֵּאֹ֗ות) אֶֽת־הַחֲנִית֙ וְאֶת־הַשְּׁלָטִ֔ים אֲשֶׁ֖ר לַמֶּ֣לֶךְ דָּוִ֑ד אֲשֶׁ֖ר בְּבֵ֥ית יְהוָֽה׃
11 ११ मंदिराच्या डाव्या टोकापासून उजव्या टोकापर्यंत हे रखवालदार हातात आपापली शस्त्रे घेऊन उभे राहिले. ते वेदी आणि मंदिर यांच्याभोवती तसेच राजा मंदिरात येई तेव्हा त्याच्या भोवती उभे राहत.
וַיַּעַמְד֨וּ הָרָצִ֜ים אִ֣ישׁ ׀ וְכֵלָ֣יו בְּיָדֹ֗ו מִכֶּ֨תֶף הַבַּ֤יִת הַיְמָנִית֙ עַד־כֶּ֤תֶף הַבַּ֙יִת֙ הַשְּׂמָאלִ֔ית לַמִּזְבֵּ֖חַ וְלַבָּ֑יִת עַל־הַמֶּ֖לֶךְ סָבִֽיב׃
12 १२ मग यहोयादाने योवाशाला बाहेर काढले. त्यास त्यांनी मुकुट घातला आणि आज्ञापट दिला. मग त्यांनी त्यास राजा करून त्याचा अभिषेक केला व टाळ्या वाजवून त्यांनी “राजा चिरायू होवो” म्हणून जयघोष केला.
וַיֹּוצִ֣א אֶת־בֶּן־הַמֶּ֗לֶךְ וַיִּתֵּ֤ן עָלָיו֙ אֶת־הַנֵּ֙זֶר֙ וְאֶת־הָ֣עֵד֔וּת וַיַּמְלִ֥כוּ אֹתֹ֖ו וַיִּמְשָׁחֻ֑הוּ וַיַּכּוּ־כָ֔ף וַיֹּאמְר֖וּ יְחִ֥י הַמֶּֽלֶךְ׃ ס
13 १३ हुजऱ्यांचा आणि लोकांचा हा गलबला राणी अथल्याच्या कानावर गेला. तेव्हा ती परमेश्वराच्या मंदिरापाशी गेली.
וַתִּשְׁמַ֣ע עֲתַלְיָ֔ה אֶת־קֹ֥ול הָֽרָצִ֖ין הָעָ֑ם וַתָּבֹ֥א אֶל־הָעָ֖ם בֵּ֥ית יְהוָֽה׃
14 १४ राजाची रीतीप्रमाणे स्तंभाजवळ उभे रहायची जी जागा तिथे अथल्याने राजाला उभे असलेले पाहिले. नेते आणि लोक कर्णे वाजवीत आहेत हे ही तिने पाहिले. लोकांस खूप आनंद झालेला आहे हे तिच्या लक्षात आले. कर्ण्यांचा आवाज ऐकून तिने नाराजी प्रदर्शित करण्याकरता आपली वस्त्रे फाडली आणि ती “फितुरी! फितुरी!” म्हणून ओरडू लागली.
וַתֵּ֡רֶא וְהִנֵּ֣ה הַמֶּלֶךְ֩ עֹמֵ֨ד עַֽל־הָעַמּ֜וּד כַּמִּשְׁפָּ֗ט וְהַשָּׂרִ֤ים וְהַחֲצֹֽצְרֹות֙ אֶל־הַמֶּ֔לֶךְ וְכָל־עַ֤ם הָאָ֙רֶץ֙ שָׂמֵ֔חַ וְתֹקֵ֖עַ בַּחֲצֹֽצְרֹ֑ות וַתִּקְרַ֤ע עֲתַלְיָה֙ אֶת־בְּגָדֶ֔יהָ וַתִּקְרָ֖א קֶ֥שֶׁר קָֽשֶׁר׃ ס
15 १५ हुजऱ्यांवरील अधिकाऱ्यांना याजक यहोयादाने आज्ञा दिली, “अथल्याला मंदिराच्या आवाराबाहेर काढावे. तिच्या अनुयायांचा तलवारीने वध करावा. मात्र परमेश्वराच्या मंदिरात तो करु नये.”
וַיְצַו֩ יְהֹויָדָ֨ע הַכֹּהֵ֜ן אֶת־שָׂרֵ֥י הַמֵּיאֹות (הַמֵּאֹ֣ות ׀) פְּקֻדֵ֣י הַחַ֗יִל וַיֹּ֤אמֶר אֲלֵיהֶם֙ הֹוצִ֤יאוּ אֹתָהּ֙ אֶל־מִבֵּ֣ית לַשְּׂדֵרֹ֔ת וְהַבָּ֥א אַחֲרֶ֖יהָ הָמֵ֣ת בֶּחָ֑רֶב כִּ֚י אָמַ֣ר הַכֹּהֵ֔ן אַל־תּוּמַ֖ת בֵּ֥ית יְהוָֽה׃
16 १६ मग तिला जाण्यासाठी त्यांनी वाट केली व राज मंदीराकडे घोडे ज्या दारातून आत येत असत त्या दाराने तिला बाहेर काढून तिचा त्यांनी वध केला.
וַיָּשִׂ֤מוּ לָהּ֙ יָדַ֔יִם וַתָּבֹ֛וא דֶּֽרֶךְ־מְבֹ֥וא הַסּוּסִ֖ים בֵּ֣ית הַמֶּ֑לֶךְ וַתּוּמַ֖ת שָֽׁם׃ ס
17 १७ यहोयादाने नंतर परमेश्वर, राजा आणि लोक यांच्यात करार केला. राजा आणि लोक या दोघांवरही परमेश्वराची सत्ता आहे, असे त्या करारात होते. यहोयादाने या खेरीज राजा आणि लोक यांच्यातही एक करार केला. राजाची लोकांबाबत असलेली कर्तव्ये त्यामध्ये होती. तसेच लोकांनी राजाचे आज्ञापालन आणि अनुयायित्व करावे असे त्यामध्ये म्हटले होते.
וַיִּכְרֹ֨ת יְהֹויָדָ֜ע אֶֽת־הַבְּרִ֗ית בֵּ֤ין יְהוָה֙ וּבֵ֤ין הַמֶּ֙לֶךְ֙ וּבֵ֣ין הָעָ֔ם לִהְיֹ֥ות לְעָ֖ם לַֽיהוָ֑ה וּבֵ֥ין הַמֶּ֖לֶךְ וּבֵ֥ין הָעָֽם׃
18 १८ यानंतर लोक बाल या देवतेच्या देवळात गेले. त्यांनी बआलाच्या मूर्तीची तसेच तेथील वेद्यांची नासधूस, मोडतोड केली. त्यांचे तुकडे तुकडे केले बालाचा याजक मत्तान याला वेद्यांसमोरच लोकांनी ठार केले. याजक यहोयाद याने परमेश्वराच्या मंदिरावर पहारेकरी नेमले.
וַיָּבֹ֣אוּ כָל־עַם֩ הָאָ֨רֶץ בֵּית־הַבַּ֜עַל וַֽיִּתְּצֻ֗הוּ אֶת־מִזְבְּחֹתֹו (מִזְבְּחֹתָ֤יו) וְאֶת־צְלָמָיו֙ שִׁבְּר֣וּ הֵיטֵ֔ב וְאֵ֗ת מַתָּן֙ כֹּהֵ֣ן הַבַּ֔עַל הָרְג֖וּ לִפְנֵ֣י הַֽמִּזְבְּחֹ֑ות וַיָּ֧שֶׂם הַכֹּהֵ֛ן פְּקֻדֹּ֖ות עַל־בֵּ֥ית יְהוָֽה׃
19 १९ सर्व लोकांस घेऊन तो परमेश्वराच्या मंदिराकडून राजाच्या निवासस्थानी गेला. राजाचे विशेष हुजरे, सुरक्षा सैनिक आणि अधिकारी राजाबरोबर होते. त्यांच्यापाठोपाठ बाकीचे लोक गेले. राजमहालाच्या प्रवेशद्वारापर्यंत ते गेले. राजा योवाश मग सिंहासनावर बसला.
וַיִּקַּ֣ח אֶת־שָׂרֵ֣י הַ֠מֵּאֹות וְאֶת־הַכָּרִ֨י וְאֶת־הָרָצִ֜ים וְאֵ֣ת ׀ כָּל־עַ֣ם הָאָ֗רֶץ וַיֹּרִ֤ידוּ אֶת־הַמֶּ֙לֶךְ֙ מִבֵּ֣ית יְהוָ֔ה וַיָּבֹ֛ואוּ דֶּֽרֶך־שַׁ֥עַר הָרָצִ֖ים בֵּ֣ית הַמֶּ֑לֶךְ וַיֵּ֖שֶׁב עַל־כִּסֵּ֥א הַמְּלָכִֽים׃
20 २० लोक आनंदात होते आणि नगरात शांतता नांदत होती. राणी अथल्याला राजाच्या महालात तलवारीने मारले.
וַיִּשְׂמַ֥ח כָּל־עַם־הָאָ֖רֶץ וְהָעִ֣יר שָׁקָ֑טָה וְאֶת־עֲתַלְיָ֛הוּ הֵמִ֥יתוּ בַחֶ֖רֶב בֵּ֥ית מֶלֶךְ (הַמֶּֽלֶךְ)׃ ס
21 २१ योवाश राजा झाला तेव्हा सात वर्षांचा होता.
בֶּן־שֶׁ֥בַע שָׁנִ֖ים יְהֹואָ֥שׁ בְּמָלְכֹֽו׃ פ

< 2 राजे 11 >