< 2 राजे 10 >
1 १ शोमरोनात अहाबाला सत्तर पुत्र होते. शोमरोनातील अधिकारी आणि वडिलधारी मंडळी यांना येहूने पत्रे पाठवली. व इज्रेलच्या अधिकाऱ्यांना तसेच ज्यांनी या अहाबाच्या मुलांना वाढवले त्यांनाही पाठवली. पत्रात त्याने लिहिले.
Akab hadde sytti sønner i Samaria; og Jehu skrev brever og sendte dem til Samaria, til de øverste i Jisre'el, de eldste, og til de formyndere som Akab hadde innsatt for sine sønner; i brevene stod det:
2 २ “हे पत्र मिळाल्यावर तुमच्या धन्याच्या मुलांपैकी जो सगळ्यात गुणी आणि लायक मुलगा असेल त्याची निवड करा. रथ, घोडे इत्यादी तुमच्याजवळ आहेच. तुमचे वास्तव्यही मजबूत शहरात आहे.
Når nu dette brev kommer til eder, I som har eders herres sønner hos eder, og som råder over vognene og hestene og en fast by og våbnene,
3 ३ तुमच्याकडे शस्त्रास्त्रे आहेत. तुम्ही ज्या मुलाची निवड कराल तो उत्तम व योग्य असेल त्यास त्याच्या वडिलाच्या सिंहासनावर बसवा. मग आपल्या धन्याच्या घराण्यासाठी लढा द्या.”
så utse eder den beste og mest skikkede blandt eders herres sønner og sett ham på hans fars trone og strid for eders herres hus!
4 ४ पण हे वाचून ती अधिकारी आणि वडिलधारी मंडळी फारच घाबरली. ते सर्व म्हणाले, “योराम आणि अहज्या हे दोन राजे सुद्धा येहूला रोखू शकले नाहीत, तेव्हा आम्ही काय त्यास अडवणार?”
Men de blev meget forferdet og sa: De to konger holdt ikke stand mot ham; hvorledes skulde da vi kunne det?
5 ५ मग, अहाबाच्या घराची देखभाल करणारा अधिकारी, नगराधिकारी, वडिलधारी मंडळी आणि त्या मुलांचे पालक यांनी येहूला खालील प्रमाणे संदेश पाठवला, “आम्ही तुझे सेवक आहोत. तू म्हणशील ते आम्ही करु. आम्ही कोणालाच राजा करत नाही. तुला योग्य वाटेल ते कर.”
Så sendte slottshøvdingen og høvdingen over byen og de eldste og formynderne bud til Jehu og lot si: Vi er dine tjenere, og alt hvad du sier til oss, vil vi gjøre; vi vil ikke gjøre nogen til konge; gjør du hvad du finner for godt!
6 ६ येहूने मग त्या अधिकाऱ्यांना आणखी एक पत्र पाठवले. त्यामध्ये त्याने लिहिले, “तुमचा मला पाठिंबा असेल आणि तुम्ही माझ्या आज्ञेत असाल तर अहाबाच्या मुलांचा शिरच्छेद करा. साधारण याच वेळेला इज्रेल येथे त्यांना माझ्याकडे आणा.” अहाब राजाची सत्तर मुले होती आणि नगरातील अधिकाऱ्यांकडे ती होती. त्या अधिकाऱ्यांनी त्यांना वाढवले होते.
Da skrev han atter et brev til dem, og i det stod det: Dersom I holder med mig og vil lyde mitt bud, så hugg hodet av eders herres sønner og kom til mig i Jisre'el imorgen ved denne tid! Men kongens sønner, sytti i tallet, bodde hos de store i byen, som opfostret dem.
7 ७ या अधिकाऱ्यांना हे पत्र मिळाले तेव्हा त्यांनी या राजाच्या सर्व सत्तर राजपुत्रांना एकत्र आणून ठार केले. मग त्यांची मस्तके टोपल्यांमध्ये भरली. या टोपल्या येहूकडे इज्रेल याठिकाणी पाठवल्या.
Da nu brevet kom til dem, tok de kongens sønner og drepte dem, sytti i tallet, og la deres hoder i kurver og sendte dem til ham i Jisre'el.
8 ८ निरोप्याने येऊन येहूला सांगितले, “या लोकांनी राजपुत्रांची मुंडकी आणली आहेत.” त्यास येहू म्हणाला, “नगराच्या वेशीजवळ त्या मुंडक्यांचे दोन ढीग करून सकाळपर्यंत तिथे ठेवा.”
Da budet kom og meldte ham at de var kommet med kongesønnenes hoder, sa han: Legg dem i to hauger foran inngangen til porten til imorgen!
9 ९ सकाळी येहू निघाला आणि लोकांपुढे उभा राहून त्यांना म्हणाला, “तुम्ही निरपराध आहात. मी माझ्या धन्याविरुध्द कट रचून त्यास ठार केले. पण अहाबाच्या या मुलांची हत्या कोणी केली? तुम्हीच त्यांना मारलेत.
Og om morgenen gikk han ut og trådte frem og sa til alt folket: I er uten skyld! Det er jeg som har fått i stand en sammensvergelse mot min herre og drept ham; men hvem har slått alle disse ihjel?
10 १० परमेश्वर बोलतो त्याप्रमाणेच सर्व घडते हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. अहाबाच्या कुटुंबाबद्दल परमेश्वराने एलीयाकडून वदविले होते. आता परमेश्वराने आपण ज्या गोष्टी करु म्हणून सांगितले होते त्या सर्व करून दाखवल्या आहेत.”
Nu ser I at ikke noget av det som Herren har talt mot Akabs hus, faller til jorden; men Herren har gjort det som han talte gjennem sin tjener Elias.
11 ११ आणि येहूने इज्रेलमधल्या अहाबाच्या सर्व कुटुंबियांना ठार केले. सर्व प्रतिष्ठित माणसे, जिवलग मित्र याजक यांची त्याने हत्या केली. अहाबाच्या नातलगांपैकी कोणीही जिवंत राहिले नाही.
Så slo Jehu ihjel alle som var tilbake av Akabs hus i Jisre'el, og alle hans stormenn og hans kjenninger og hans prester; han lot ikke nogen bli i live eller slippe unda.
12 १२ इज्रेल सोडून येहू शोमरोनला आला. वाटेत तो मेंढपाळांच्या तळावर थांबला. मेंढपाळ लोकर कातरतात त्या ठिकाणच्या एका घरात तो गेला.
Siden gjorde Jehu sig rede og drog avsted til Samaria. Og da han underveis kom til Bet-Eked-Haro'im,
13 १३ यहूदाचा राजा अहज्या याच्या नातेवाईकांना तो भेटला. येहूने त्यांची चौकशी केली, “तुम्ही कोण आहात?” ते म्हणाले, “आम्ही यहूदाचा राजा अहज्या याचे नातेवाईक. राजाची मुले आणि राजमातेची मुले यांची विचारपूस करायला आम्ही जात आहोत.”
møtte han Judas konge Akasjas brødre. Han spurte dem: Hvem er I? De svarte: Vi er brødre av Akasja og er på vei ned for å hilse på kongens barn og dronningens barn.
14 १४ तेव्हा येहू आपल्याबरोबरच्या लोकांस म्हणाला, “यांना जिवंत ताब्यात घ्या.” तेव्हा येहूच्या लोकांनी त्यांना ताब्यात घेतले. ते सगळे मिळून बेचाळीस होते. बेथ-एकेद जवळच्या विहिरीपाशी येहूने त्या सर्वांना ठार केले. येहूने कोणालाही जिवंत ठेवले नाही.
Da sa han: Grip dem levende! Så grep de dem levende og drepte dem ved brønnen i Bet-Eked, to og firti i tallet; han lot ikke en av dem bli i live.
15 १५ तिथून निघाल्यावर येहूला रेखाबाचा मुलगा योनादाब भेटला. तो येहूला भेटायलाच निघाला होता. येहूने त्याचे कुशल विचारुन म्हटले, “मी तुझा विश्वासू मित्र आहे, तसाच तूही आहेस ना?” यहोनादाब म्हणाला, “होय, मी तुझा विश्वासू मित्र आहे.” येहू म्हणाला, “तसे असेल तर मला तुझा हात दे.” आणि येहूने त्याचा हात धरुन त्यास आपल्या रथात घेतले.
Da han så drog derfra, traff han på Jonadab, Rekabs sønn, som kom ham i møte, og han hilste på ham og sa til ham: Mener du det like så opriktig med mig som jeg med dig? Jonadab svarte: Ja. Er det så sa Jehu, da gi mig din hånd! Da gav han ham hånden; og han lot ham stige op til sig i vognen.
16 १६ येहू योनादाबाला म्हणाला, “चल माझ्याबरोबर. परमेश्वराबद्दल मला किती उत्कंठा आहे ती बघ.” तेव्हा यहोनादाब येहूबरोबर त्याच्या रथातून निघाला.
Og han sa: Følg med mig og se hvor nidkjær jeg er for Herren! Så lot han ham kjøre på sin vogn.
17 १७ शोमरोनला पोहोचल्यावर येहूने अहाबचे जे कोणी कुटुंबिय अजून जिवंत होते त्या सर्वांना मारले. एलीयाला परमेश्वराने सांगितले होते ते सर्व येहूने केले.
Og da han kom til Samaria, slo han ihjel alle som var tilbake av Akabs hus i Samaria, til han hadde utryddet det, efter det ord som Herren hadde talt til Elias.
18 १८ येहूने मग सर्वांना एकत्र बोलावले. त्यांना तो म्हणाला, “अहाबाने बआलाची थोडी सेवा केली. पण येहू मात्र त्याची बरीच सेवा करणार आहे.
Siden samlet Jehu alt folket og sa til dem: Akab har dyrket Ba'al lite, Jehu vil dyrke ham meget.
19 १९ आता बआलाच्या सर्व संदेष्टयांना आणि याजकांना बोलावून घ्या. तसेच जे जे बआलाची पूजा करतात त्यांनाही बोलवा. यामध्ये कोणीही गैरहजर असता कामा नये. बआलसाठी मला मोठा यज्ञ करायचा आहे. इथे जो येणार नाही त्यास मी ठार करीन हे नक्की,” येहूची ही सर्व बतावणी होती. त्यास बआलाच्या पूजकांचा संहार करायचा होता.
Så kall nu alle Ba'als profeter, alle hans tjenere og alle hans prester hit til mig, ikke en må mangle! For jeg vil holde en stor slaktofferfest for Ba'al; hver den som ikke møter, skal late livet. Men dette gjorde Jehu med svik for å utrydde Ba'als tjenere.
20 २० येहू म्हणाला, “बआलसाठी पवित्र मेळ्याची तयारी करा.” तेव्हा याजकांनी त्याची घोषणा केली.
Så sa Jehu: Hold en hellig festforsamling for Ba'al! Da utropte de en sådan fest.
21 २१ येहूने मग इस्राएलभर संदेश पाठवला. बआलाचे समस्त पूजक जमले. एकही मागे राहिला नाही. बआलाच्या देवळात ते आल्यावर देऊळ भरुन गेले.
Og Jehu sendte bud omkring i hele Israel, og alle Ba'als tjenere kom; det var ikke nogen som lot være å komme. Og de gikk inn i Ba'als hus, og Ba'als hus blev fullt fra ende til annen.
22 २२ वस्त्र भांडार सांभाळणाऱ्याला येहू म्हणाला, “बआलाच्या या सर्व पूजकांसाठी वस्त्रे दे.” तेव्हा त्याने सर्वासाठी वस्त्रे दिली.
Så sa han til den som hadde tilsyn med klædekammeret: Hent frem klædninger for alle Ba'als tjenere! Og han hentet klædningene frem til dem.
23 २३ मग येहू आणि रेखाबाचा मुलगा योनादाब बआलाच्या देवळात शिरले. येहू तेथे जमलेल्या बआलाच्या सर्व पूजकांना म्हणाला, “तुमच्यात कोणी परमेश्वराचा सेवक नाही ना ते एकदा पाहून खात्री करून घ्या. बआलाच्या पूजा करणारेच सर्व इथे आहेत ना ते पाहा.”
Da nu Jehu sammen med Jonadab, Rekabs sønn, kom til Ba'als hus, sa han til Ba'als tjenere: Se nøie efter at det ikke er nogen av Herrens tjenere her iblandt eder, men bare Ba'als-tjenere!
24 २४ यज्ञ आणि होमार्पणे करण्यासाठी बआलाचे सर्व पूजक बालाच्या देवळात शिरले. बाहेर येहूने ऐंशीजणांना तयार ठेवले होते. त्यांना येहूने सांगितले होते, “कोणालाही आतून निसटू द्यायचे नाही. एखादा कोणी गेलाच तर त्यास जाऊ देणाऱ्याला आपला जीव गमवावा लागेल.”
Så gikk de inn for å ofre slaktoffer og brennoffer, og Jehu stilte åtti mann utenfor huset og sa: Hvis nogen slipper unda av de menn som jeg overgir i eders hender, skal det bøtes liv for liv.
25 २५ स्वत: यज्ञात होमबली अर्पण केल्यावर लगेच हुजऱ्यांना आणि सरदारांना येहूने सांगितले, “आता, आत जा आणि बालाची पूजा करणाऱ्यांना ठार करा. कोणालाही देवळातून जिवंत बाहेर येऊ देऊ नका.” तेव्हा सरदारांनी धारदार तलवारींनी सर्व पूजकांना ठार केले. त्यांनी आणि हुजऱ्यांनी बाल देवतेच्या पूजकांचे मृतदेह बाहेर टाकले ते बआलाच्या देवळाच्या गर्भगृहात गेले
Da de var ferdig med å ofre brennofferet, sa Jehu til drabantene og livvakten: Gå inn, slå dem ihjel, la ikke en slippe ut! Så slo de dem med sverdets egg, og drabantene og livvakten kastet dem ut og gikk til Ba'als-husets by.
26 २६ स्मृतीस्तंभ त्यांनी उखडून टाकले आणि बआलाची देऊळ जाळले.
Og de bar ut støttene i Ba'als hus og brente dem op,
27 २७ बआलाच्या स्मृतीस्तंभाचा त्यांनी चुराडा केला. बआलाच्या देवळाचाही विध्वंस केला. त्या देवळाचे त्यांनी प्रसाधनगृह करून टाकले. अजूनही लोक त्याचा तसाच वापर करतात.
og Ba'als egen støtte rev de ned; og Ba'als hus rev de ned og gjorde det til vannhuser, som er der den dag idag.
28 २८ अशा प्रकारे इस्राएलमधली बआलाची पूजा येहूने मोडून काढली.
Således utryddet Jehu Ba'al av Israel.
29 २९ पण नबाटचा मुलगा यराबाम याने जी पापे इस्राएलाला करायला लावली त्यापासून येहू पूर्णपणे परावृत्त झाला नाही. बेथेल आणि दान इथली सोन्याची वासरे त्याने उध्वस्त केली नाहीत.
Men fra Jeroboams, Nebats sønns synder, som han hadde fått Israel til å gjøre, vek Jehu ikke - fra gullkalvene i Betel og Dan.
30 ३० परमेश्वर येहूला म्हणाला, “तू चांगली कामगिरी केलीस. माझ्या मते जे उचित तसेच तू वागलास. अहाबाच्या कुटुंबाचा मला हव्या त्या पध्दतीने तू विध्वंस केलास. तेव्हा आता तुझ्या पुढच्या चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील.
Herren sa til Jehu: Fordi du har gjort til gagns hvad rett var i mine øine, og gjort mot Akabs hus alt det jeg vilde, så skal dine sønner til fjerde ledd sitte på Israels trone.
31 ३१ पण परमेश्वराच्या नियमांना अनुसरुन मन: पूर्वक वर्तन ठेवणे येहूला जमले नाही. यराबामाच्या ज्या दुष्कृत्यांमुळे इस्राएल पापाच्या गर्तेत गेला ते करण्यापासून तो स्वत: ला थोपवू शकला नाही.”
Men Jehu gav ikke akt på å vandre i Herrens, Israels Guds lov av alt sitt hjerte; han vek ikke fra Jeroboams synder, som han hadde fått Israel til å gjøre.
32 ३२ याचवेळी परमेश्वराने इस्राएल प्रदेशाचे लचके तोडायला सुरुवात केली. अरामाचा राजा हजाएल याने इस्राएलच्या सर्व सीमांवर पराभव केला.
Ved denne tid begynte Herren å løsrive stykker av Israel; Hasael slo dem på hele Israels grense
33 ३३ यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेश त्याने जिंकला गाद, रऊबेन आणि मनश्शे यांच्या कुटुंबांच्या ताब्यातील प्रदेशासकट सगळा गिलाद त्यामध्ये आला. तसेच आर्णोन खोऱ्यातील अरोएर पासून गिलाद आणि बाशानपर्यंतचा प्रदेश हजाएलने जिंकला.
og tok på østsiden av Jordan hele Gileads land, gadittene og rubenittene og manassittene, like fra Aroer ved Arnon-åen, både Gilead og Basan.
34 ३४ “इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात येहूच्या इतर पराक्रमांची नोंद आहे.
Hvad som ellers er å fortelle om Jehu, om alt det han gjorde og alle hans store gjerninger, det er opskrevet i Israels kongers krønike.
35 ३५ येहू मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दफन शोमरोनात केले. येहूचा मुलगा यहोआहाज त्यानंतर इस्राएलचा राजा झाला.
Og Jehu la sig til hvile hos sine fedre, og han blev begravet i Samaria; og hans sønn Joakas blev konge i hans sted.
36 ३६ येहूने शोमरोन मधून इस्राएलवर अठ्ठावीस वर्षे राज्य केले.
Den tid Jehu var konge over Israel i Samaria, var åtte og tyve år.