< २ करि. 9 >

1 तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हास लिहावे ह्याचे अगत्य नाही.
Concerning now for the service for the saints excessive for me it is to write to you;
2 कारण मदत करण्याबद्दलची तुमची उत्सुकता मला माहीत आहे आणि मी मासेदोनियातील लोकांस याविषयी अभिमानाने सांगत होतो की, गेल्या वर्षापासून अखयातील तुम्ही लोक देण्यासाठी तयार आहात आणि तुमच्या उत्साहामुळे पुष्कळजण कृति करण्यास आवेशाने पुढे आले आहेत.
I know for the readiness of you which concerning you I boast of to Macedonians, that Achaia has prepared itself from a year ago, and (*N(k)O*) (from *k*) your zeal has been provoking the greater number.
3 तरी या बाबतीत तुमच्याविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी या बंधूंना पाठवत आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपली तयारी केलेली असावी.
I have sent however the brothers, that not the boasting of us which [is] about you may be made void in matter this, that even as I was saying having prepared yourselves you may be,
4 नाही तर कदाचित, मासेदोनियाचे लोक जर माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयारीत नसलेले आढळला, तर या खातरीमुळे आमची आम्ही म्हणत नाही की, तुमची फजिती होईल.
lest perhaps maybe shall come with me myself Macedonians and shall find you unprepared, shall be put to shame we ourselves — that not (I may say *N(k)O*) you yourselves — in confidence this (of boasting. *K*)
5 म्हणून मला हे आवश्यक वाटते की, ह्यांनी तुमच्याकडे आधी जावे अशी या बंधूंना विनंती करावी आणि तुम्ही देऊ केलेली देणगी त्यांनी आधीच तयार करावी; म्हणजे लोभाने घेऊन नाही पण देणगी म्हणून ती तयार राहील.
Necessary therefore I esteemed [it] to exhort the brothers that they may go before (into *NK(o)*) you and may complete beforehand the (having pre-promised *N(K)O*) blessing of you this ready to be thus as a blessing and not (as *N(k)O*) covetousness.
6 हे लक्षात ठेवा जो हात राखून पेरतो तो त्याच प्रमाणात कापणी करील आणि जो उदार हाताने पेरील तो त्याच प्रमाणात कापणी करील.
This now: The [one] sowing sparingly sparingly also will reap, and the [one] sowing upon blessings upon blessings also will reap.
7 प्रत्येक मनुष्याने आपल्या मनात जे ठरवले असेल त्याप्रमाणे त्याने द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ आवडतो.
each even as (he himself has purposed *N(k)O*) in the heart, not out of regret or of necessity; a cheerful for giver loves God.
8 तुमच्याजवळ सर्व गोष्टींत सदा, सर्व पुरवठा रहावा आणि प्रत्येक चांगल्या कामात तुम्ही संपन्न व्हावे म्हणून देव तुम्हास सर्व प्रकारची कृपा पुरवण्यास समर्थ आहे.
(is able *N(k)O*) now God all grace to make abound to you, so that in every [way] always all sufficiency having you may abound in every work good
9 असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे; “तो गरीबांना उदारहस्ते देतो, त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहते.” (aiōn g165)
Even as it has been written: He has scattered abroad, He has given to the poor, the righteousness of Him abides to the age. (aiōn g165)
10 १० आता जो पेरणार्‍याला बीज व खाण्यासाठी भाकर पुरवतो तो तुमच्यासाठी बीज पुरवील आणि बहुगुणित करील व तुमच्या नीतिमत्त्वाचे फळ वाढवील.
The [One] now supplying (seed *N(k)O*) to him sowing and bread for food (will supply *N(k)O*) and (will multiply *N(k)O*) the seed for sowing of you and (will increase *N(k)O*) the (fruits *N(k)O*) of the righteousness of you.
11 ११ म्हणजे तुम्ही सर्व उदारतेसाठी प्रत्येक गोष्टीत संपन्न व्हाल व ती उदारता आमच्याद्वारे देवाचे उपकारस्मरण अधिक होण्यास कारणीभूत होईल.
in every [way] enriching you to all generosity, which produces through us thanksgiving to God,
12 १२ कारण या सेवेचे काम केवळ पवित्रजनांच्या गरजा पुरवणे एवढेच नाही पण देवाच्या पुष्कळ उपकारस्मरणात ते सेवाकार्य बहुगुणित होते.
For the ministry of the service this not only is completely filling up the needs of the saints but also is overflowing through many thanksgivings to God;
13 १३ या सेवेच्या कसोटीमध्ये, ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाच्या अंगिकाराबाबत तुमच्या आज्ञांकितपणामुळे आणि त्यांच्यासाठी व इतरांसाठी तुम्ही उदारपणे दिलेल्या दानामुळे ते देवाचे गौरव करतात;
through the proof of the service this [they] glorifying God at the submission of the of confession of you to the gospel of Christ and to [the] generosity of the participation toward them and toward all,
14 १४ आणखी ते तुम्हाकरिता प्रार्थना करीत असता तुम्हावर देवाने जी विपुल कृपा केली आहे त्यामुळे तुमची भेट व्हावी अशी उत्कंठा ते धरतात.
and by their supplication for you a longing for you on account of the surpassing grace of God upon you.
15 १५ देवाचे अवर्णनीय दान जे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याबद्दल त्याची स्तुती असो!
Thanks [be] (now *k*) to God for the indescribable of Him gift!

< २ करि. 9 >