< २ करि. 6 >

1 म्हणून त्याच्याबरोबर काम करणारे आम्हीदेखील तुम्हास अशी विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका.
Споспешствующе же и молим, не вотще благодать Божию прияти вам.
2 कारण तो म्हणतो, ‘मी अनुकूल समयी तुझे ऐकले, आणि तारणाच्या दिवशी तुझे सहाय्य केले.’ पाहा, आता अनुकूल समय आहे, पाहा, आता तारणाचा दिवस आहे.
Глаголет бо: во время приятно послушах тебе, и в день спасения помогох ти. Се ныне время благоприятно, се ныне день спасения.
3 या सेवेला दोष लावला जाऊ नये म्हणून आम्ही, कशात कोणाला, अडखळण्यास कारण होत नाही.
Ни едино ни в чемже дающе претыкание, да служение безпорочно будет,
4 उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून, आम्ही आमच्याविषयीची खातरी पटवून देतो; आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटात, आपत्तीत व दुःखात;
но во всем представляюще себе якоже Божия слуги, в терпении мнозе, в скорбех, в бедах, в теснотах,
5 फटक्यांत, बंदिवासांत व दंगलीत; कष्टांत, जागरणांत व उपासांत;
в ранах, в темницах, в нестроениих, в трудех, во бдениих, в пощениих,
6 शुद्धतेने व ज्ञानाने, सहनशीलतेने व ममतेने, पवित्र आत्म्याने व निष्कपट प्रीतीने;
во очищении, в разуме, в долготерпении, в благости, в Дусе Святе, в любви нелицемерне,
7 खरेपणाच्या वचनाने व देवाच्या सामर्थ्याने, उजव्या हातात व डाव्या हातात नीतिमत्त्वाची शस्त्रे बाळगून,
в словеси истины, в силе Божией, оружии правды десными и шуими,
8 गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो. आमच्याविषयी खातरी पटवतो. फसव्या आणि तरी खरे आहोत,
славою и безчестием, гаждением и благохвалением: яко лестцы, и истинни:
9 अपरिचित आहोत आणि सुपरीचित आहोत, मरत आहोत आणि बघा, आम्ही जिवंत आहोत. जणू शिक्षा भोगीत होतो आणि तरी मरण पावलो नाही.
яко незнаеми, и познаваеми: яко умирающе, и се живи есмы: яко наказуеми, а не умерщвляеми:
10 १० आम्ही दुःखीत, तरी सदोदित आनंद करणारे, आम्ही दरिद्री, तरी पुष्कळांना धनवान करणारे, आमच्याजवळ काही नसलेले आणि तरी सर्व असलेले असे आढळतो.
яко скорбяще, присно же радующеся: яко нищи, а многи богатяще: яко ничтоже имуще, а вся содержаще.
11 ११ अहो करिंथकर बंधूंनो, तुमच्यासाठी आम्ही तोंड उघडले आहे आणि आमचे अंतःकरण मोठे झाले आहे.
Уста наша отверзошася к вам, Коринфяне, сердце наше распространися.
12 १२ आमच्यात तुम्ही संकुचित झाला नाही, पण तुम्ही स्वतःच्या कळवळ्याविषयी संकुचित झाला आहात.
Не тесно вмещаетеся в нас, утесняетеся же во утробах ваших.
13 १३ आता तुम्हीही असलीच फेड करून तुमचेही अंतःकरण मोठे करा. हे मी तुम्हास मुले म्हणून सांगतो.
Тожде же возмездие, якоже чадом глаголю, распространитеся и вы.
14 १४ विश्वास न ठेवणार्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीतिमान व अनाचार ह्यांची भागी कशी होणार? प्रकाश व अंधकार ह्यांचा मिलाप कसा होणार?
Не бывайте удобь преложни ко иному ярму, якоже невернии. Кое бо причастие правде к беззаконию? Или кое общение свету ко тьме?
15 १५ ख्रिस्ताची बलियालाशी एकवाक्यता कशी होणार? किंवा विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार?
Кое же согласие Христови с Велиаром? Или кая часть верну с неверным?
16 १६ आणि देवाच्या निवासस्थानाचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? कारण तुम्ही जिवंत देवाचे निवास्थान आहात कारण देवाने म्हणले आहे की, ‘मी त्यांच्यात राहीन आणि त्यांच्यात वावरेन; मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील.’
Или кое сложение церкви Божией со идолы? Вы бо есте церкви Бога жива, якоже рече Бог: яко вселюся в них и похожду, и буду им Бог, и тии будут Мне людие.
17 १७ आणि म्हणून ‘प्रभू म्हणतो की, त्यांच्यामधून बाहेर या आणि वेगळे व्हा; अशुद्ध त्यास शिवू नका; म्हणजे मी तुम्हास स्वीकारीन.
Темже изыдите от среды их и отлучитеся, глаголет Господь, и нечистоте не прикасайтеся, и Аз прииму вы:
18 १८ आणि मी तुम्हास पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.’
и буду вам во Отца, и вы будете Мне в сыны и дщери, глаголет Господь Вседержитель.

< २ करि. 6 >