< २ करि. 6 >
1 १ म्हणून त्याच्याबरोबर काम करणारे आम्हीदेखील तुम्हास अशी विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका.
Als Mitarbeiter aber bitten wir auch, daß ihr die Gnade Gottes nicht umsonst empfangen sein lasset -
2 २ कारण तो म्हणतो, ‘मी अनुकूल समयी तुझे ऐकले, आणि तारणाच्या दिवशी तुझे सहाय्य केले.’ पाहा, आता अनुकूल समय आहे, पाहा, आता तारणाचा दिवस आहे.
denn es heißt: zur willkommenen Zeit habe ich dich erhört und am Tage des Heils habe ich dir geholfen; siehe, jetzt ist die hochwillkommene Zeit, siehe, jetzt ist der Tag des Heils -
3 ३ या सेवेला दोष लावला जाऊ नये म्हणून आम्ही, कशात कोणाला, अडखळण्यास कारण होत नाही.
und geben wir niemand irgend Anstoß, damit das Amt nicht zu Spott werde.
4 ४ उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून, आम्ही आमच्याविषयीची खातरी पटवून देतो; आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटात, आपत्तीत व दुःखात;
Vielmehr durch alles beweisen wir uns als Gehilfen Gottes: in vieler Geduld, in Drangsalen, in Nöten, in Aengsten,
5 ५ फटक्यांत, बंदिवासांत व दंगलीत; कष्टांत, जागरणांत व उपासांत;
unter Schlägen, im Gefängnis, in Unruhe, in Mühen, Wachen und Fasten,
6 ६ शुद्धतेने व ज्ञानाने, सहनशीलतेने व ममतेने, पवित्र आत्म्याने व निष्कपट प्रीतीने;
mit Reinheit, Erkenntnis, Langmut, Güte, heiligem Geist, lauterer Liebe,
7 ७ खरेपणाच्या वचनाने व देवाच्या सामर्थ्याने, उजव्या हातात व डाव्या हातात नीतिमत्त्वाची शस्त्रे बाळगून,
mit dem Worte der Wahrheit, mit Kraft Gottes, durch die Waffen der Gerechtigkeit zu Trutz und Schutz,
8 ८ गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो. आमच्याविषयी खातरी पटवतो. फसव्या आणि तरी खरे आहोत,
durch Ehre und Schande, durch böse und gute Nachrede: als die da trügen und doch wahr sind,
9 ९ अपरिचित आहोत आणि सुपरीचित आहोत, मरत आहोत आणि बघा, आम्ही जिवंत आहोत. जणू शिक्षा भोगीत होतो आणि तरी मरण पावलो नाही.
als die unbekannten und doch erkannten, als sterbende und siehe wir leben, als die da gezüchtigt werden und doch nicht getötet,
10 १० आम्ही दुःखीत, तरी सदोदित आनंद करणारे, आम्ही दरिद्री, तरी पुष्कळांना धनवान करणारे, आमच्याजवळ काही नसलेले आणि तरी सर्व असलेले असे आढळतो.
die da betrübt werden und doch sich allezeit freuen, als die armen, die viele reich machen, als die da nichts haben und alles besitzen.
11 ११ अहो करिंथकर बंधूंनो, तुमच्यासाठी आम्ही तोंड उघडले आहे आणि आमचे अंतःकरण मोठे झाले आहे.
Wir haben den Mund gegen euch aufgethan, ihr Männer von Korinth, das Herz ist uns weit geworden;
12 १२ आमच्यात तुम्ही संकुचित झाला नाही, पण तुम्ही स्वतःच्या कळवळ्याविषयी संकुचित झाला आहात.
in uns ist es für euch nicht enge, es ist nur enge in eurem eigenen Innern
13 १३ आता तुम्हीही असलीच फेड करून तुमचेही अंतःकरण मोठे करा. हे मी तुम्हास मुले म्हणून सांगतो.
So vergeltet gleiches mit gleichem - ich spreche zu euch als zu Kindern - und lasset es auch in euch selbst weit werden.
14 १४ विश्वास न ठेवणार्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीतिमान व अनाचार ह्यांची भागी कशी होणार? प्रकाश व अंधकार ह्यांचा मिलाप कसा होणार?
Gebet euch nicht dazu her am fremden Joch mit den Ungläubigen zu ziehen. Was haben Gerechtigkeit und Frevel für Teil an einander? oder was hat das Licht für Gemeinschaft mit der Finsternis?
15 १५ ख्रिस्ताची बलियालाशी एकवाक्यता कशी होणार? किंवा विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार?
Wie stimmt Christus mit Belial, oder was hat der Gläubige mit dem Ungläubigen zu teilen?
16 १६ आणि देवाच्या निवासस्थानाचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? कारण तुम्ही जिवंत देवाचे निवास्थान आहात कारण देवाने म्हणले आहे की, ‘मी त्यांच्यात राहीन आणि त्यांच्यात वावरेन; मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील.’
Wie verträgt sich Gottes Tempel mit den Götzen? Denn wir sind der Tempel des lebendigen Gottes, wie Gott gesagt hat:
17 १७ आणि म्हणून ‘प्रभू म्हणतो की, त्यांच्यामधून बाहेर या आणि वेगळे व्हा; अशुद्ध त्यास शिवू नका; म्हणजे मी तुम्हास स्वीकारीन.
Darum gehet aus von ihnen und scheidet aus, spricht der Herr, und rührt nicht an was unrein ist, so werde ich euch annehmen,
18 १८ आणि मी तुम्हास पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.’
und werde euer Vater sein und ihr werdet mir Söhne und Töchter sein, spricht der Herr der Allherrscher.