< २ करि. 3 >

1 आम्ही पुन्हा आमची स्वतःची प्रशंसा करू लागलो आहोत काय? किंवा आम्हास, दुसर्‍यांप्रमाणे, तुमच्याकरिता किंवा तुमच्याकडून शिफारसपत्रांची गरज आहे काय?
Začínáme opět sami sebe chváliti? Zdaliž potřebujeme, jako někteří, schvalujících listů k vám, neb od vás k jiným?
2 तुम्ही स्वतःच आमची शिफारसपत्रे आहात; आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, प्रत्येकाने वाचलेले व प्रत्येकाला माहीत असलेले.
List náš vy jste, napsaný v srdcích našich, kterýž znají a čtou všickni lidé.
3 शाईने नव्हे, तर जिवंत देवाच्या आत्म्याने कोरलेले दगडी पाट्यांवर नव्हे, तर मानवी मांसमय हृदयाच्या पाट्यांवर कोरलेले, आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र आहात, असे तुम्ही दाखवून देता.
Nebo to zjevné jest, že jste list Kristův způsobený skrze přisluhování naše, napsaný ne černidlem, ale Duchem Boha živého, ne na dskách kamenných, ale na dskách srdce masitých.
4 आणि ख्रिस्तामुळे देवाच्या ठायी आमचा असा विश्वास आहे.
Doufání pak takové máme skrze Krista k Bohu,
5 आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरविण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे.
Ne že bychom dostateční byli mysliti něco sami z sebe, jakožto sami z sebe, ale dostatečnost naše z Boha jest.
6 त्याने आम्हास नव्या कराराचे सेवक होण्यास पात्र केले. तो लेखाद्वारे केलेला नाही, पण पवित्र आत्म्याद्वारे केलेला आहे कारण लेख मारून टाकतो पण पवित्र आत्मा जिवंत करतो.
Kterýž i hodné nás učinil služebníky Nového Zákona, ne litery, ale Ducha. Nebo litera zabijí, ale Duch obživuje.
7 पण दगडावर कोरलेल्या अक्षरात लिहिलेली मरणाची सेवा इतकी गौरवी झाली की, इस्राएल लोक मोशेच्या तोंडावरील तेज, जे नाहीसे होत चालले होते, त्या तेजामुळे त्याच्या तोंडाकडे दृष्टी लाववत नव्हती.
Jestližeť pak přisluhování smrti, literami vyryté na dskách kamenných, bylo slavné, tak že nemohli patřiti synové Izraelští v tvář Mojžíšovu, pro slávu oblíčeje jeho, kteráž pominouti měla,
8 तर तिच्यापेक्षा पवित्र आत्म्याची सेवा अधिक गौरवयुक्त कशी होणार नाही?
I kterakž by ovšem přisluhování Ducha nemělo býti slavné?
9 कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती तिच्यापेक्षा किती विशेषकरून अधिक तेजोमय असणार.
Nebo jestližeť přisluhování pomsty slavné bylo, mnohemť se více přisluhování spravedlnosti rozhojňuje v slávě.
10 १० इतकेच नव्हे, तर “जे तेजस्वी होते ते” या तुलनेने हीनदीन ठरले.
Nebo to, což oslaveno bylo, aniž oslaveno bylo v té částce, u přirovnání této předůstojné slávy.
11 ११ कारण जे नाहीसे होणार होते ते जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार.
Nebo jestližeť to pomíjející bylo slavné, mnohemť více to, což zůstává, jestiť slavné.
12 १२ तर मग आम्हास अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो.
Protož majíce takovou naději, mnohé svobody v mluvení užíváme,
13 १३ आम्ही मोशेप्रमाणे करीत नाही; त्याने तोंडावर आच्छादन घातले ते ह्यासाठी की, जे नाहीसे होत चालले होते ते इस्राएल लोकांस शेवटपर्यंत बघता येऊ नये.
A ne jako Mojžíš kladl zástěru na tvář svou, aby nepatřili synové Izraelští k cíli té věci pomíjející.
14 १४ पण त्यांची मने कठीण केली गेली कारण आजवर ते आच्छादन, तसेच जुन्या कराराच्या वाचनात, न काढलेले राहिले आहे; ते ख्रिस्तात नाहीसे झाले आहे.
Pročež ztupeni jsou smyslové jejich. Nebo až do dnes ta zástěra v čítání Starého Zákona zůstává neodkrytá; nebo skrze Krista se odnímá.
15 १५ पण आजपर्यंत ते आच्छादन, ते मोशेचे ग्रंथ वाचन करीत असता, त्यांच्या मनावर घातलेले असते.
Protož až do dnes, když čten bývá Mojžíš, zástěra jest položena na jejich srdci.
16 १६ पण ते जेव्हा प्रभूकडे वळेल तेव्हा ते आच्छादन काढले जाईल.
Než jakž by se obrátilo ku Pánu, odňata bude ta zástěra.
17 १७ आणि प्रभू आत्मा आहे व जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे.
Nebo Pán jest Duch ten, a kdež jest ten Duch Páně, tu i svoboda.
18 १८ पण आपल्या तोंडावर आच्छादन नसून आपण सर्वजण, जणू आरशात पाहिल्याप्रमाणे, प्रभूच्या तेजाकडे पाहत असता, कलेकलेने त्याच्या प्रतिरूपात आपले रूपांतर होत आहे. हे प्रभूच्या आत्म्याकडून होत आहे.
My pak všickni odkrytou tváří slávu Páně jako v zrcadle spatřujíce, v týž obraz proměněni býváme od slávy v slávu, jakožto od Ducha Páně.

< २ करि. 3 >