< २ करि. 2 >
1 १ कारण मी स्वतःशी ठरवले होते की, मी पुन्हा दुःख देण्यास तुमच्याकडे येऊ नये.
Size tekrar keder dolu bir ziyaret yapmamaya karar verdim.
2 २ कारण जर मी तुम्हास दुःख देतो, तर ज्याला माझ्यामुळे दुःख होते त्याच्यावाचून मला आनंदित करणारा कोण आहे?
Çünkü sizi kederlendirirsem, keder verdiğim sizlerden başka beni kim sevindirecek?
3 ३ आणि मी हेच लिहिले होते, म्हणजे मी आल्यावर ज्यांच्याविषयी मी आनंद करावा त्यांच्याकडून मला दुःख होऊ नये, मला तुम्हा सर्वांविषयी विश्वास आहे की, माझा आनंद तो तुम्हा सर्वांचादेखील आहे.
Bunu yazdım ki, geldiğimde beni sevindirmesi gerekenler beni kederlendirmesin. Sevincimin hepinizin sevinci olduğuna ilişkin hepinize güvenim var.
4 ४ कारण, मी दुःखाने, मनाच्या तळमळीने व अश्रू गाळीत तुम्हास लिहिले ते तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नाही पण तुमच्यावर जी माझी प्रीती आहे तिची खोली तुम्हास समजावी.
Kederlenesiniz diye değil, size beslediğim derin sevgiyi anlayasınız diye büyük bir sıkıntı ve yürek acısıyla gözyaşları içinde size yazdım.
5 ५ जर कोणी दुःख दिले असेल, तर त्याने केवळ मलाच दुःख दिले, असे नाही, तर काही प्रमाणात तुम्हा सर्वांना दिले आहे. त्यासंबंधी मी फार कठीण होऊ इच्छीत नाही.
Eğer biri bir başkasını kederlendirdiyse, beni değil –abartmadan söyleyeyim– bir dereceye kadar hepinizi kederlendirmiş olur.
6 ६ अशा मनुष्यास ही बहुमताने दिली ती शिक्षा पुरे.
Böyle birine çoğunluğun verdiği bu ceza yeterlidir.
7 ७ म्हणून, उलट त्यास क्षमा करून तुम्ही त्याचे सांत्वन करावे; यासाठी की अति दुःखाने तो दबून जाऊ नये.
Aşırı kedere boğulmasın diye o kişiyi daha fazla cezalandırmayıp bağışlamalı ve teselli etmelisiniz.
8 ८ म्हणून मी तुम्हास विनंती करतो की, त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खातरी करून द्या.
Bunun için ona duyduğunuz sevgiyi yenilemenizi rica ederim.
9 ९ कारण मी तुम्हास या हेतूने लिहिले आहे की, तुम्ही परीक्षेत टिकता की नाही व प्रत्येक बाबतीत तुम्ही आज्ञाधारक राहता की नाही हे पाहावे.
Sizi sınamak ve her durumda söz dinleyenler olup olmadığınızı anlamak için yazdım size.
10 १० ज्या कोणाला तुम्ही कशाची क्षमा करता त्यास मीही क्षमा करतो, कारण मी क्षमा केली असेल तर ज्या कशाची कोणाला मी क्षमा केली आहे, त्यास तुमच्याकरीता, मी ख्रिस्ताच्या समक्ष केली आहे.
Kimi bağışlarsanız, ben de onu bağışlarım. Eğer bir şeyi bağışladımsa, bunu sizin için Mesih'in önünde bağışladım.
11 ११ यासाठी सैतानाने आपल्याला ठकवू नये; कारण आपण त्याच्या दुष्ट योजना जाणत नाही असे नाही.
Öyle ki, Şeytan'ın oyununa gelmeyelim. Çünkü onun düzenlerini bilmez değiliz.
12 १२ आणि पुढे जेव्हा मी ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी त्रोवस शहरास आल्यावर आणि प्रभूकडून माझ्यासाठी एक द्वार उघडले गेले,
Mesih'in Müjdesi'ni yaymak amacıyla Troas'a geldiğimde Rab'bin işi için bana bir kapı açıldığı halde, kardeşim Titus'u orada bulamadığım için iç huzurum yoktu. Bu nedenle oradakilere veda ederek Makedonya'ya gittim.
13 १३ माझा बंधू तीत हा मला सापडला नाही म्हणून माझ्या जीवाला चैन पडेना. मग तेथल्या लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियास निघून गेलो.
14 १४ पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हास विजयाने नेतो आणि त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रत्येक ठिकाणी आमच्याद्वारे सगळीकडे पसरवितो.
Bizi her zaman Mesih'in zafer alayında yürüten, O'nu tanımanın güzel kokusunu aracılığımızla her yerde yayan Tanrı'ya şükürler olsun!
15 १५ कारण ज्यांचे तारण होत आहे अशा लोकात आणि ज्यांचा नाश होत आहे अशा लोकात आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुवास आहोत.
Çünkü biz hem kurtulanlar hem de mahvolanlar arasında Tanrı için Mesih'in güzel kokusuyuz.
16 १६ ज्या लोकांचा नाश होत आहे, मृत्युचा मरणसूचक वास आणि जे तारले गेले आहेत, जीवनाकडे नेणारा जीवनाचा वास आहोत आणि या गोष्टींसाठी कोण लायक आहे?
Mahvolanlar için ölüme götüren ölüm kokusu, kurtulanlar içinse yaşama götüren yaşam kokusuyuz. Böylesi bir işe kim yeterlidir?
17 १७ कारण दुसर्या कित्येकांसारखे देवाच्या वचनाची भेसळ करणारे आम्ही नाही पण आम्ही शुद्ध भावाने, देवाचे म्हणून देवाच्या दृष्टीपुढे ख्रिस्तात बोलतो.
Birçokları gibi, Tanrı'nın sözünü ticaret aracı yapanlar değiliz. Tanrı tarafından gönderilen ve Mesih'e ait olan kişiler olarak Tanrı'nın önünde içtenlikle konuşuyoruz.