< २ करि. 2 >

1 कारण मी स्वतःशी ठरवले होते की, मी पुन्हा दुःख देण्यास तुमच्याकडे येऊ नये.
อปรญฺจาหํ ปุน: โศกาย ยุษฺมตฺสนฺนิธึ น คมิษฺยามีติ มนสิ นิรไจษํฯ
2 कारण जर मी तुम्हास दुःख देतो, तर ज्याला माझ्यामुळे दुःख होते त्याच्यावाचून मला आनंदित करणारा कोण आहे?
ยสฺมาทฺ อหํ ยทิ ยุษฺมานฺ โศกยุกฺตานฺ กโรมิ ตรฺหิ มยา ย: โศกยุกฺตีกฺฤตสฺตํ วินา เกนาปเรณาหํ หรฺษยิเษฺย?
3 आणि मी हेच लिहिले होते, म्हणजे मी आल्यावर ज्यांच्याविषयी मी आनंद करावा त्यांच्याकडून मला दुःख होऊ नये, मला तुम्हा सर्वांविषयी विश्वास आहे की, माझा आनंद तो तुम्हा सर्वांचादेखील आहे.
มม โย หรฺษ: ส ยุษฺมากํ สรฺเวฺวษำ หรฺษ เอเวติ นิศฺจิตํ มยาโพธิ; อเตอว ไยรหํ หรฺษยิตวฺยไสฺต รฺมทุปสฺถิติสมเย ยนฺมม โศโก น ชาเยต ตทรฺถเมว ยุษฺมภฺยมฺ เอตาทฺฤศํ ปตฺรํ มยา ลิขิตํฯ
4 कारण, मी दुःखाने, मनाच्या तळमळीने व अश्रू गाळीत तुम्हास लिहिले ते तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नाही पण तुमच्यावर जी माझी प्रीती आहे तिची खोली तुम्हास समजावी.
วสฺตุตสฺตุ พหุเกฺลศสฺย มน: ปีฑายาศฺจ สมเย'หํ พหฺวศฺรุปาเตน ปตฺรเมกํ ลิขิตวานฺ ยุษฺมากํ โศการฺถํ ตนฺนหิ กินฺตุ ยุษฺมาสุ มทียเปฺรมพาหุลฺยสฺย ชฺญาปนารฺถํฯ
5 जर कोणी दुःख दिले असेल, तर त्याने केवळ मलाच दुःख दिले, असे नाही, तर काही प्रमाणात तुम्हा सर्वांना दिले आहे. त्यासंबंधी मी फार कठीण होऊ इच्छीत नाही.
เยนาหํ โศกยุกฺตีกฺฤตเสฺตน เกวลมหํ โศกยุกฺตีกฺฤตสฺตนฺนหิ กินฺตฺวํศโต ยูยํ สรฺเวฺว'ปิ ยโต'หมตฺร กสฺมึศฺจิทฺ โทษมาโรปยิตุํ เนจฺฉามิฯ
6 अशा मनुष्यास ही बहुमताने दिली ती शिक्षा पुरे.
พหูนำ ยตฺ ตรฺชฺชนํ เตน ชเนนาลมฺภิ ตตฺ ตทรฺถํ ปฺรจุรํฯ
7 म्हणून, उलट त्यास क्षमा करून तुम्ही त्याचे सांत्वन करावे; यासाठी की अति दुःखाने तो दबून जाऊ नये.
อต: ส ทุ: ขสาคเร ยนฺน นิมชฺชติ ตทรฺถํ ยุษฺมาภิ: ส กฺษนฺตวฺย: สานฺตฺวยิตวฺยศฺจฯ
8 म्हणून मी तुम्हास विनंती करतो की, त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खातरी करून द्या.
อิติ เหโต: ปฺรรฺถเย'หํ ยุษฺมาภิสฺตสฺมินฺ ทยา กฺริยตำฯ
9 कारण मी तुम्हास या हेतूने लिहिले आहे की, तुम्ही परीक्षेत टिकता की नाही व प्रत्येक बाबतीत तुम्ही आज्ञाधारक राहता की नाही हे पाहावे.
ยูยํ สรฺวฺวกรฺมฺมณิ มมาเทศํ คฺฤหฺลีถ น เวติ ปรีกฺษิตุมฺ อหํ ยุษฺมานฺ ปฺรติ ลิขิตวานฺฯ
10 १० ज्या कोणाला तुम्ही कशाची क्षमा करता त्यास मीही क्षमा करतो, कारण मी क्षमा केली असेल तर ज्या कशाची कोणाला मी क्षमा केली आहे, त्यास तुमच्याकरीता, मी ख्रिस्ताच्या समक्ष केली आहे.
ยสฺย โย โทโษ ยุษฺมาภิ: กฺษมฺยเต ตสฺย ส โทโษ มยาปิ กฺษมฺยเต ยศฺจ โทโษ มยา กฺษมฺยเต ส ยุษฺมากํ กฺฤเต ขฺรีษฺฏสฺย สากฺษาตฺ กฺษมฺยเตฯ
11 ११ यासाठी सैतानाने आपल्याला ठकवू नये; कारण आपण त्याच्या दुष्ट योजना जाणत नाही असे नाही.
ศยตาน: กลฺปนาสฺมาภิรชฺญาตา นหิ, อโต วยํ ยตฺ เตน น วญฺจฺยามเห ตทรฺถมฺ อสฺมาภิ: สาวธาไน รฺภวิตวฺยํฯ
12 १२ आणि पुढे जेव्हा मी ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी त्रोवस शहरास आल्यावर आणि प्रभूकडून माझ्यासाठी एक द्वार उघडले गेले,
อปรญฺจ ขฺรีษฺฏสฺย สุสํวาทโฆษณารฺถํ มยิ โตฺรยานครมาคเต ปฺรโภ: กรฺมฺมเณ จ มทรฺถํ ทฺวาเร มุกฺเต
13 १३ माझा बंधू तीत हा मला सापडला नाही म्हणून माझ्या जीवाला चैन पडेना. मग तेथल्या लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियास निघून गेलो.
สตฺยปิ สฺวภฺราตุสฺตีตสฺยาวิทฺยมานตฺวาตฺ มทียาตฺมน: กาปิ ศานฺติ รฺน พภูว, ตสฺมาทฺ อหํ ตานฺ วิสรฺชฺชนํ ยาจิตฺวา มากิทนิยาเทศํ คนฺตุํ ปฺรสฺถานมฺ อกรวํฯ
14 १४ पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हास विजयाने नेतो आणि त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रत्येक ठिकाणी आमच्याद्वारे सगळीकडे पसरवितो.
ย อีศฺวร: สรฺวฺวทา ขฺรีษฺเฏนาสฺมานฺ ชยิน: กโรติ สรฺวฺวตฺร จาสฺมาภิสฺตทียชฺญานสฺย คนฺธํ ปฺรกาศยติ ส ธนฺย: ฯ
15 १५ कारण ज्यांचे तारण होत आहे अशा लोकात आणि ज्यांचा नाश होत आहे अशा लोकात आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुवास आहोत.
ยสฺมาทฺ เย ตฺราณํ ลปฺสฺยนฺเต เย จ วินาศํ คมิษฺยนฺติ ตานฺ ปฺรติ วยมฺ อีศฺวเรณ ขฺรีษฺฏสฺย เสาคนฺธฺยํ ภวาม: ฯ
16 १६ ज्या लोकांचा नाश होत आहे, मृत्युचा मरणसूचक वास आणि जे तारले गेले आहेत, जीवनाकडे नेणारा जीवनाचा वास आहोत आणि या गोष्टींसाठी कोण लायक आहे?
วยมฺ เอเกษำ มฺฤตฺยเว มฺฤตฺยุคนฺธา อปเรษาญฺจ ชีวนาย ชีวนคนฺธา ภวาม: , กินฺเตฺวตาทฺฤศกรฺมฺมสาธเน ก: สมรฺโถ'สฺติ?
17 १७ कारण दुसर्‍या कित्येकांसारखे देवाच्या वचनाची भेसळ करणारे आम्ही नाही पण आम्ही शुद्ध भावाने, देवाचे म्हणून देवाच्या दृष्टीपुढे ख्रिस्तात बोलतो.
อเนฺย พหโว โลกา ยทฺวทฺ อีศฺวรสฺย วากฺยํ มฺฤษาศิกฺษยา มิศฺรยนฺติ วยํ ตทฺวตฺ ตนฺน มิศฺรยนฺต: สรลภาเวเนศฺวรสฺย สากฺษาทฺ อีศฺวรสฺยาเทศาตฺ ขฺรีษฺเฏน กถำ ภาษามเหฯ

< २ करि. 2 >