< 2 इतिहास 9 >

1 शलमोनाची कीर्ती शबाच्या राणीच्या कानावर गेली तेव्हा त्याची कठीण परीक्षा घेण्यासाठी ती यरूशलेमास आली. तिच्याबरोबर मोठा लवाजमा होता. मसाल्याचे पदार्थ, सोनेनाणे, मौल्यवान रत्ने या गोष्टी उंटांवर लादून तिने सोबत आणल्या होत्या शलमोनाची भेट घेऊन ती त्याच्याशी मनातल्या गोष्टी बोलली. तिला शलमोनाला बरेच प्रश्न विचारायचे होते.
و چون ملکه سبا آوازه سلیمان را شنید باموکب بسیار عظیم و شترانی که به عطریات و طلای بسیار و سنگهای گرانبها بارشده بود به اورشلیم آمد، تا سلیمان را به مسائل امتحان کند. و چون نزد سلیمان رسید با وی ازهرچه در دلش بود گفتگو کرد.۱
2 शलमोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यास त्यातले काहीच अवघड वाटले नाही. त्याने उत्तर दिले नाही असा कोणताच प्रश्न उरला नाही.
و سلیمان تمامی مسائلش را برای وی بیان نمود و چیزی ازسلیمان مخفی نماند که برایش بیان نکرد.۲
3 शबाच्या राणीने त्याच्या सूज्ञपणाचा प्रत्यय घेतला, त्याचा महाल पाहिला.
وچون ملکه سبا حکمت سلیمان و خانه‌ای را که بناکرده بود،۳
4 त्याच्या मेजावरील अन्नपदार्थ तिने पाहिले, त्याच्या प्रमुख कारभाऱ्याची बैठक पाहिली. त्यांची कार्यपध्दती आणि त्यांचे पोशाख पाहिले. शलमोनाचे प्यालेबरदार आणि त्यांचे पोशाख, परमेश्वराच्या मंदिरातील शलमोनाने केलेली होमार्पणे हे सर्व तिने पाहिली आणि या दर्शनाने ती थक्क झाली.
و طعام سفره او و مجلس بندگانش ونظم و لباس خادمانش را و ساقیانش و لباس ایشان و زینه‌ای را که به آن به خانه خداوندبرمی آمد دید، روح دیگر در او نماند.۴
5 मग ती राजा शलमोनाला म्हणाली, “तुझ्या कामगिरीची आणि शहाणपणाची जी वर्णने मी माझ्या देशात ऐकली ती खरीच आहेत.
پس به پادشاه گفت: «آوازه‌ای را که درولایت خود درباره کارها و حکمت تو شنیدم راست بود.۵
6 इथे येऊन स्वतः अनुभव घेईपर्यंत मला या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. आता मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहीले आहे. खरे तर तुझ्या सूज्ञपणाची थोरवी निम्म्यानेही माझ्यापर्यंत पोचली नव्हती. तुझ्याबद्दल जे ऐकले त्यापेक्षाही तू महान आहेस.
اما تا نیامدم و به چشمان خود ندیدم اخبار آنها را باور نکردم، و همانا نصف عظمت حکمت تو به من اعلام نشده بود، و از خبری که شنیده بودم افزوده‌ای.۶
7 तुझे लोक व तुझ्या सेवेत सदैव तत्पर असलेले तुझे सेवक, तुझी माणसे आणि अधिकारी फार धन्य आहेत. तुझ्या सेवेत असतानाच त्यांना तुझ्या शहाणपणाचा लाभ होतो.
خوشابه‌حال مردان تو وخوشابه‌حال این خادمانت که به حضور تو همیشه می ایستند و حکمت تو را می‌شنوند.۷
8 तुझा देव परमेश्वर ह्याची स्तुती असो. तो तुझ्यावर प्रसन्न आहे आणि आपल्या वतीने त्याने तुला राजा म्हणून सिंहासनावर बसवले आहे. परमेश्वराचे इस्राएलावर प्रेम आहे आणि इस्राएलावर त्याचा कायमचा वरदहस्त आहे जे उचित आणि न्याय्य ते करण्यासाठी त्याने तुला राजा केले आहे.”
متبارک بادیهوه خدای تو که بر تو رغبت داشته، تو را برکرسی خود نشانید تا برای یهوه خدایت پادشاه بشوی. چونکه خدای تو اسرائیل را دوست می‌دارد تا ایشان را تا به ابد استوار نماید، از این جهت تو را بر پادشاهی‌ایشان نصب نموده است تا داوری و عدالت را بجا آوری.»۸
9 शबाच्या राणीने मग राजा शलमोन याला एकशेवीस किक्कार सोने, अनेक मसाल्यांचे पदार्थ आणि मौल्यवान रत्ने यांचा नजराणा दिला. तिने दिले तसे मसाल्यांचे पदार्थ व वस्तू शलमोनाला कधीच कोणाकडून मिळाले नव्हते.
و به پادشاه صد و بیست وزنه طلا و عطریات از حد زیاده، وسنگهای گرانبها داد و مثل این عطریات که ملکه سبا به سلیمان پادشاه داد هرگز دیده نشد.۹
10 १० हिराम आणि शलमोन यांच्या सेवकांनी ओफिर येथून सोने आणले. रक्तचंदनाचे लाकूड आणि मौल्यवान रत्नेही त्यांनी आणली.
و نیز بندگان حورام و بندگان سلیمان که طلا از اوفیر می‌آوردند چوب صندل و سنگهای گرانبها آوردند.۱۰
11 ११ परमेश्वराच्या मंदिराच्या आणि राजमहालाच्या पायऱ्या तसेच गायकांच्या वीणा व सतारी यासाठी शलमोनाने हे रक्तचंदन वापरले. रक्तचंदनाचा वापर करून बनवलेल्या इतक्या सुंदर वस्तू यापूर्वी यहूदात कधी कोणी पाहिल्या नव्हत्या.
و پادشاه از این چوب صندل زینه‌ها به جهت خانه خداوند و خانه پادشاه وعودها و بربطها برای مغنیان ساخت، و مثل آنهاقبل از آن در زمین یهودا دیده نشده بود.۱۱
12 १२ शबाच्या राणीला जे हवे ते राजा शलमोनाने देऊ केले. त्याने जे देऊ केले ते तिने आणलेल्या नजराण्यापेक्षा जास्तच होते मग शबाची राणी आपल्या लव्याजम्यासाहित आपल्या देशात परतली.
و سلیمان پادشاه به ملکه سبا تمامی آرزوی او را که خواسته بود داد، سوای آنچه که او برای پادشاه آورده بود، پس با بندگانش به ولایت خود توجه نموده، برفت.۱۲
13 १३ शलमोनाला वर्षभरात जेवढे सोने मिळे त्याचे वजन सहाशे सहासष्ट किक्कार एवढे असे.
و وزن طلایی که در یک سال به سلیمان رسید ششصد و شصت و شش وزنه طلا بود.۱۳
14 १४ याखेरीज, फिरस्ते व्यापारी आणि विक्रेते खूप सोने आणत. अरबस्तानचे राजे आणि वेगवेगळ्या प्रदेशांचे सुभेदार सोने चांदी आणत, ते वेगळेच
سوای آنچه تاجران و بازرگانان آوردند وجمیع پادشاهان عرب و حاکمان کشورها طلا ونقره برای سلیمان می‌آوردند.۱۴
15 १५ सोन्याचे पत्रे ठोकून दोनशे मोठ्या ढाली राजा शलमोनाने केल्या. अशा प्रत्येक ढालीला सहाशे शेकेल वजनाचा सोन्याचा पत्रा लागला.
و سلیمان پادشاه دویست سپر طلای چکشی ساخت که برای هر سپر ششصد مثقال طلا بکار برده شد.۱۵
16 १६ याखेरीज अशा घडीव सोन्याच्या तीनशे ढाली त्याने केल्या. त्यांना प्रत्येकी तिनशे शेकले सोने लागले. या सोन्याच्या ढाली त्याने लबानोनाच्या अरण्यमहालात ठेवल्या.
و سیصد سپر کوچک طلای چکشی ساخت که برای هر سپر سیصد مثقال طلا بکار برده شد، وپادشاه آنها را در خانه جنگل لبنان گذاشت.۱۶
17 १७ राजा शलमोनाने हस्तिदंताचे मोठे सिंहासन बनवले व सिंहासनाच्या वरचा भाग मागे गोलाकार होता. ते शुद्ध सोन्याने मढवले.
وپادشاه تخت بزرگی از عاج ساخت و آن را به زرخالص پوشانید.۱۷
18 १८ या सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या. बैठकीच्या दोन्ही बाजूला हात टेकवता येतील अशी सिंहासनाला सोय होती. आणि त्यास लागून प्रत्येकी एक सिंहाचा पुतळा होता.
و تخت را شش پله وپایندازی زرین بود که به تخت پیوسته بود و به این طرف و آن طرف نزد جای کرسیش دستها بود، ودو شیر به پهلوی دستها ایستاده بودند.۱۸
19 १९ सहा पायऱ्यांपैकी प्रत्येक पायरीच्या दोन्ही बाजूला एकेक असे एकंदर बारा सिंह होते. दुसऱ्या कोणत्याही राज्यात असे सिंहासन नव्हते.
ودوازده شیر از این طرف و آن طرف، بر آن شش پله ایستاده بودند که در هیچ مملکت مثل این ساخته نشده بود.۱۹
20 २० राजाची सर्व पेयपात्रे सोन्याची होती लबानोनाच्या अरण्यमहालातील सर्व घरगुती वापरायच्या वस्तू शुद्ध सोन्याने घडवलेल्या होत्या. शलमोनाच्या काळात चांदी फारशी मौल्यवान मानली जात नसे.
و تمامی ظروف نوشیدنی سلیمان پادشاه از طلا و تمامی ظروف خانه جنگل لبنان از زر خالص بود، و نقره در ایام سلیمان هیچ به حساب نمی آمد۲۰
21 २१ राजाकडे समुद्रांवर गलबतांचा ताफा हिरामाच्या ताफ्यासोबत होता. तीन वर्षातून एकदा हा ताफा सोने, चांदी व हस्तीदंत ह्याप्रमाणे मोर व वानरे आणत.
زیرا که پادشاه را کشتیها بود که با بندگان حورام به ترشیش می‌رفت، و کشتیهای ترشیشی هر سه سال یک مرتبه می‌آمد، و طلا و نقره و عاج و میمونها وطاوسها می‌آورد.۲۱
22 २२ वैभव आणि ज्ञान याबाबतीत पृथ्वीच्या पाठीवरील कोणत्याही राजापेक्षा शलमोन महान झाला.
پس سلیمان پادشاه در دولت و حکمت ازجمیع پادشاهان کشورها بزرگتر شد.۲۲
23 २३ त्याच्या सल्लामसलतीचा लाभ घ्यायला सर्व ठिकाणचे राजे शलमोनाकडे येऊ लागले. परमेश्वरानेच शलमोनाला जो सूज्ञपणा दिला होता तो पहावयास ते येत असत.
و تمامی پادشاهان کشورها حضور سلیمان را می‌طلبیدندتا حکمتی را که خدا در دلش نهاده بود بشنوند.۲۳
24 २४ हे राजे दरवर्षी येताना शलमोनासाठी नजराणे घेऊन येत. त्यामध्ये सोन्यारुप्याच्या वस्तू, कपडे, चिलखते, मसाले, घोडे आणि खेचरे ह्यांचा समावेश असे.
و هریکی از ایشان هدیه خود را از آلات نقره وآلات طلا و رخوت و اسلحه و عطریات و اسبهاو قاطرها یعنی قسمت هر سال را در سالش می‌آوردند.۲۴
25 २५ घोडे आणि रथ यांच्यासाठी शलमोनाकडे चार हजार बस्थाने होती. त्याच्यापदरी बारा हजार स्वार होते. त्यांची सोय त्याने मुद्दाम वसवलेल्या नगरात आणि स्वत: ला लागतील तेवढ्याची यरूशलेमामध्ये केली होती.
و سلیمان چهار هزار آخور به جهت اسبان و ارابه‌ها و دوازده هزار سوار داشت. و آنها را در شهرهای ارابه‌ها و نزد پادشاه دراورشلیم گذاشت.۲۵
26 २६ फरात नदीपासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत आणि मिसरची सीमा येथपर्यंतच्या सर्व राजावर शलमोनाचा अधिकार होता.
و بر جمیع پادشاهان از نهر(فرات ) تا زمین فلسطینیان و سرحد مصرحکمرانی می‌کرد.۲۶
27 २७ यरूशलेमचा राजा शलमोनाकडे चांदी ही दगडधोंडे असावे इतकी आणि गंधसरूची झाडे, खोऱ्यातल्या उंबराच्या झाडांइतकी विपुल होती.
و پادشاه نقره را در اورشلیم مثل سنگها و چوب سرو آزاد را مثل چوب افراغ که در صحراست فراوان ساخت.۲۷
28 २८ मिसर आणि इतर देशामधून लोक शलमोनासाठी घोडे आणत.
و اسبها برای سلیمان از مصر و از جمیع ممالک می‌آوردند.۲۸
29 २९ शलमोनाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्या सर्व गोष्टी केल्या त्या नाथान या संदेष्ट्याच्या इतिहासात तसेच, अहीया शिलोनी याच्या संदेशलेखात आणि इद्दो या भविष्यावादयाच्या इद्दोची दर्शने यामध्ये नोंदवलेल्या आहेत. नबाटाचा पुत्र यराबाम याविषयीही इद्दोने लिहिलेले आहे.
و اما بقیه وقایع سلیمان از اول تا آخر آیاآنها در تواریخ ناتان نبی و در نبوت اخیای شیلونی و در رویای یعدوی رایی درباره یربعام بن نباط مکتوب نیست؟۲۹
30 ३० शलमोनाने यरूशलेमेत इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले.
پس سلیمان چهل سال در اورشلیم بر تمامی اسرائیل سلطنت کرد.۳۰
31 ३१ मग तो आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दावीद नगरात दफन केले. शलमोनाचा पुत्र रहबाम हा पुढे शलमोनाच्या जागी राज्य करु लागला.
و سلیمان با پدران خود خوابید و او را در شهرپدرش داود دفن کردند و پسرش رحبعام در جای او پادشاه شد.۳۱

< 2 इतिहास 9 >