< 2 इतिहास 8 >
1 १ परमेश्वराचे मंदिर आणि आपले घर बांधायला शलमोनाला वीस वर्षे लागली.
A kad proðe dvadeset godina, u koje sazida Solomun dom Gospodnji i dom svoj,
2 २ मग हिरामाने दिलेली नगरे शलमोनाने वसविली त्या नगरांमध्ये काही इस्राएल लोकांस वस्ती करण्यास मुभा दिली.
Pogradi Solomun gradove, koje mu dade Hiram, i naseli onuda sinove Izrailjeve.
3 ३ पुढे शलमोनाने, हमाथ-सोबा हे नगर जिंकून घेतले.
Potom otide Solomun na Emat Sovski, i osvoji ga.
4 ४ वाळवंटातील तदमोर, हे नगरही त्याने वसवले कोठारांसाठी म्हणून त्याने हमाथामधली नगरे बांधली.
I sazida Tadmor u pustinji i sve gradove za žitnice sazida u Ematu.
5 ५ वरचे बेथ-होरोन आणि खालचे बेथ होरोन यांचीही उभारणीही शलमोनाने केली ती त्याने भक्कम तटबंदीची नगरे केली त्यांना मजबूत कोट, वेशी आणि अडसर करून,
Sazida i Vet-Oron gornji i Vet-Oron donji, tvrde gradove, sa zidovima, vratima i prijevornicama,
6 ६ बालाथ नगर व अन्य कोठारे असलेली गावे यांची शलमोनाने पुनर्रचना केली. रथ ठेवण्यासाठी तसेच घोडेस्वारांच्या वस्तीसाठीही त्याने गावे वसवली. यरूशलेम, लबानोन व आपल्या आधिपत्याखालील सर्व प्रदेशात शलमोनाने आपल्या गरजेनुसार बांधकामे केली.
I Valat i sve gradove u kojima Solomun imaše žitnice, i gradove u kojima mu bijahu kola, i gradove u kojima bijahu konjici, i što god Solomunu bi volja zidati u Jerusalimu i na Livanu i u svoj zemlji carstva svojega.
7 ७ इस्राएल लोक राहत असलेल्या प्रदेशात अनेक परके लोकही होते. ते म्हणजे हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी त्यांना शलमोनाने वेठबिगार केले.
I sav narod što bješe ostao od Heteja i od Amoreja i od Ferezeja i od Jeveja i od Jevuseja, koji ne bijahu od Izrailja,
8 ८ हे लोक मूळचे इस्राएल नव्हते या प्रदेशात राहून गेलेल्या लोकांचे ते वंशज होते आणि इस्राएल लोकांनी त्यांना अजून नष्ट केले नव्हते. ते अजूनही आहेत.
Od sinova njihovijeh koji bjehu ostali iza njih u zemlji, kojih ne potrše sinovi Izrailjevi, njih nagna Solomun da plaæaju danak do današnjega dana.
9 ९ इस्राएल लोकांपैकी कोणालाही शलमोनाने वेठबिगारीसाठी सक्ती केली नाही. ते त्याचे योध्दे होते. ते सैन्याधिकारी, रथाधिपती, स्वारांचे अधिकारी असे होते.
A od sinova Izrailjevijeh, kojih ne uèini Solomun robovima za svoj posao, nego bijahu vojnici i poglavari nad vojvodama njegovijem, i zapovjednici nad kolima i konjicima njegovijem,
10 १० काही इस्राएली लोक तर शलमोनाच्या अधिकाऱ्यांवर अंमल गाजवणारे होते. असे प्रमुख अधिकारी अडीचशे होते.
Od njih bijaše glavnijeh nastojnika, koje imaše car Solomun, dvjesta i pedeset, koji upravljahu narodom.
11 ११ शलमोनाने फारोच्या कन्येला, तिच्यासाठी बांधलेल्या महालात दावीद नगराहून आणले. शलमोन म्हणाला, “ज्या ज्याठिकाणी परमेश्वराचा करार कोश ठेवण्यात आला, ती सर्व स्थाने पवित्र आहेत, तेव्हा माझ्या पत्नीने इस्राएलचा दावीद याच्या नगरात राहू नेये.”
I kæer faraonovu preseli Solomun iz grada Davidova u dom koji joj sazida, jer reèe: neæe sjedjeti žena moja u domu Davida cara Izrailjeva, jer je svet što je došao u nj kovèeg Gospodnji.
12 १२ मग शलमोनाने वेदीवर परमेश्वरास होमार्पणे केली. मंदिराच्या प्रवेशमंडपासमोरच शलमोनाने ती वेदी बांधली होती.
Tada prinošaše Solomun žrtve paljenice Gospodu na oltaru Gospodnjem koji naèini pred trijemom,
13 १३ मोशेच्या आज्ञेप्रमाणे शलमोन रोज होमार्पणे करी शब्बाथाच्या दिवशी, नवचंद्र दर्शनीला, वर्षभरातल्या तीन सणांना होमार्पणे करायची असत. बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण, आणि मंडपाचा सण हे तीन वार्षिक सण होत.
Što trebaše od dana na dan prinositi po zapovijesti Mojsijevoj, u subote i na mladine i na praznike, tri puta u godini, na praznik prijesnijeh hljebova i na praznik sedmica i na praznik sjenica.
14 १४ आपल्या पित्याच्या सूचना शलमोनाने तंतोतंत पाळल्या परमेश्वराच्या सेवेसाठी त्याने याजकवर्गाच्या नेमणुका केल्या लेवींना त्यांची कामे पार पाडायला नेमले. स्तुतिगीते म्हणणे आणि मंदिराच्या चाकरीतील रोजची सेवाकार्ये बजावण्यात याजकांना मदत करणे ही लेवीची कामे होती. याखेरीज शलमोनाने प्रत्येक प्रवेशद्वाराशी द्वारपालांच्या गटांच्या नेमणुका केल्या. परमेश्वरास मानणाऱ्या दाविदाने अशाच सूचना दिल्या होत्या.
I postavi po naredbi Davida oca svojega redove sveštenièke prema službi njihovoj, i Levitske prema dužnosti njihovoj, da hvale Boga i služe pred sveštenicima kako treba svaki dan, i vratare po redovima njihovijem nad svakim vratima; jer taka bijaše zapovijest Davida èovjeka Božijega.
15 १५ याजक आणि लेवी यांना शलमोनाने ज्या सूचना दिल्या त्यामध्ये इस्राएल लोकांनी बदल केला नाही की आज्ञाभंग केला नाही. मौल्यवान वस्तू जतन करण्याविषयीच्या आज्ञांचाही त्यांनी बदल केला नाही.
I ne otstupiše od zapovijesti careve za sveštenike i Levite ni u èem, ni za riznice.
16 १६ शलमोनाची सगळी कामे सिध्दीस गेली. मंदिराच्या कामाला सुरुवात केल्यापासून ते संपेपर्यंत त्यांचे व्यवस्थित नियोजन केले होते. अशा रीतीने परमेश्वराच्या मंदिराचे काम पूर्ण झाले, व ते उपयोगात आणले जाऊ लागले.
Tako se svrši sve djelo Solomunovo od onoga dana kad bi osnovan dom Gospodnji pa dokle ga ne dovrši, i gotov bi dom Gospodnji.
17 १७ यानंतर शलमोन लाल समुद्रानजीकच्या अदोम देशातील एसयोन-गेबेर आणि एलोथ या नगरांत गेला.
Tada otide Solomun u Esion-Gaver i u Elot na brijegu morskom u zemlji Edomskoj.
18 १८ हिरामाने त्याच्याकडे आपली गलबते पाठवली. समुद्रपर्यटनात तरबेज अशा हिरामाच्या सेवकांनीच ती नेली. शलमोनाच्या चाकरीतील लोकांबरोबर, हे सेवक ओफिर येथे गेले, आणि तेथून चारशे पन्नास किक्कार सोने आणून, त्यांनी ते शलमोनाला दिले.
A Hiram posla mu po svojim slugama laðe i sluge vješte moru, i otidoše sa slugama Solomunovijem u Ofir i uzeše odande èetiri stotine i pedeset talanata zlata i donesoše caru Solomunu.