< 2 इतिहास 7 >
1 १ शलमोनाची प्रार्थना संपल्याबरोबर स्वर्गातून अग्नी खाली उतरला आणि त्याने होमबली आणि यज्ञार्पणे भस्मसात केली. परमेश्वराच्या लखलखीत तेजाने मंदिर भरुन गेले.
[祝聖聖殿]撒羅滿祈禱完了,有火從天上降下,焚燒了全燔祭和其他的犧牲;上主的榮耀充滿了聖殿。
2 २ त्या तेजाने दिपलेल्या याजकांनाही परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना.
由於上主的榮耀充滿了上主的殿,司祭不能進入上主的殿。
3 ३ सरळ स्वर्गातून अग्नी खाली येणे आणि परमेश्वराचे तेज मंदिरावर पसरणे या गोष्टी इस्राएलाच्या समस्त लोकांनी पाहिल्या. तेव्हा त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमन केले, परमेश्वरास धन्यवाद दिले आणि ते म्हणाले, “परमेश्वर चांगला आहे त्याची कृपा सर्वकाळ राहते.”
所有的以色列子民看見有火降下,上主的榮耀充滿了聖殿,便俯伏在石鋪的地上,叩拜稱頌上主說:「因為他是聖善的,因為他的仁慈永遠常存。」
4 ४ शलमोनाने आणि सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वरापुढे यज्ञ केले.
君王和眾百姓在上主面前祭殺了犧牲。
5 ५ राजा शलमोनाने बावीस हजार बैल आणि एक लाख वीस हजार मेंढरे यांचा यज्ञ केला. अशा प्रकारे लोकांनी व राजाने देवाच्या घरा साठी समर्पण केले.
撒羅滿王那時祭殺了二萬二千頭牛,十二萬隻羊;這樣君王和全百姓為上主的聖殿行了奉獻禮。
6 ६ याजक आपल्या कामाला सिध्द झाले. परमेश्वराच्या भजनाची वाद्ये घेऊन लेवीही उभे राहिले. राजा दाविदाने ही वाद्ये परमेश्वराच्या स्तवनासाठी करून घेतली होती. “परमेश्वराचे स्तवन करा कारण त्याची कृपा सनातन आहे” असे याजक आणि लेवी गात होते. लेवीच्या समोर उभे राहून याजक कर्णे वाजवत होते. सर्व इस्राएल लोक तिथे उभे होते.
司祭各站在自己的岡位上,肋未人拿著達味王所製的上主的樂器,奏「因為他的仁慈永遠常存」稱頌上主的歌;這讚美歌是達味令他們唱的;司祭們面對著他們吹號筒,同時全以色列人都站立不動。
7 ७ परमेश्वराच्या मंदिरासमोरचे मधले दालन शलमोनाने पवित्र केले. या जागी त्याने होमार्पणे आणि शांत्यर्पणांची वपा वाहिली. होमार्पणे, अन्नार्पणे आणि वपा यांचे प्रमाण एवढे प्रचंड होते की पितळी वेदीवर ते सर्व मावेना म्हणून मधले दालन त्याने वापरले.
撒羅滿祝聖了上主殿前的內院,在那裏,獻了全燔祭與和平祭的脂油,因為他製造的銅壇容不下那麼多全燔祭、素祭和脂油。
8 ८ शलमोन आणि इस्राएल लोक यांनी सात दिवस हा सण साजरा केला. हमाथच्या वेशीपासून ते मिसरच्या झऱ्या पर्यंतच्या भागातले सगळे इस्राएल लोक इथे आल्यामुळे शलमोनबरोबरचा जमाव खूपच मोठा होता.
那時,撒羅滿舉行慶節七天之久,所有的哈瑪特渡口到埃及小河的以色列百姓,都與他在一起,實是一大集會。
9 ९ आठव्या दिवशी त्यांनी पवित्र सभा घेतली कारण त्या आधी सात दिवस त्यांनी सण साजरा केला होता व समर्पणे सात दिवस वेदीवर ठेवली होती, ती फक्त परमेश्वराच्या उपासनेसाठी वापरायची होती. सात दिवस त्यांनी सण साजरा केला.
第八天又舉行了盛大的集會,如此舉行獻壇七天,過節七天。
10 १० सातव्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी शलमोनाने लोकांस घरोघरी परतायला सांगितले. दावीद, शलमोन आणि इस्राएल लोक यांच्यावर परमेश्वराने कृपा केल्यामुळे लोक आनंदी झाले होते. त्यांची अंत: करणे आनंदाने भरुन गेली होती.
七月二十三日,君王遣散了民眾。他們因上主對達味、撒羅滿和他的百姓以色列所施的恩惠,都滿懷歡樂,回了自己的帳幕。[上主的俯允與警告]
11 ११ परमेश्वराचे मंदिर आणि राजगृह बांधण्याचे काम शलमोनाने पार पाडले. परमेश्वराचे मंदिर आणि आपले निवासस्थान यांच्याबाबतीत योजलेल्या सर्व गोष्टी त्याने यशस्वीपणे पूर्ण केल्या.
撒羅滿完成了上主的殿和王宮,凡撒羅滿心中要在上主的殿和自己的宮內所作的,都順利完成了。
12 १२ नंतर एकदा रात्री परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले. तो शलमोनाला म्हणाला, “शलमोना तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. हे स्थळ यज्ञगृह म्हणून मी निवडले आहे.
夜間上主顯示給撒羅滿,對他說:「我已聽了你的祈禱,我也為我揀選了這地方作為祭祀的大殿。
13 १३ कधी जर पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून मी आकाशमार्ग बंद केला, धान्य फस्त करायला टोळधाड पाठवली किंवा माझ्या लोकांमध्ये रोगाराईचा प्रसार केला
我如果使天閉塞不雨,使蝗蟲吞吃這地,或使瘟疫在我百姓中間流行,
14 १४ आणि अशावेळी लोकांनी नम्र होऊन माझा धावा करून माझ्या दर्शनाची इच्छा बाळगली, दुराचाराचा त्याग केला तर मी स्वर्गातून त्यांच्या हाकेला उत्तर देईन. त्यांना त्यांच्या पापाची क्षमा करेन आणि त्यांची भूमी संकटमुक्त करीन.
這稱為我名下的百姓,如果謙遜祈禱,尋求我的面,遠離自己的惡行,我必從天上俯聽,寬恕他們的罪過,使他們的土地生產。
15 १५ आता माझी दृष्टी याठिकाणी वळलेली आहे. इथे होणाऱ्या प्रार्थना ऐकायला माझे कान उत्सुक आहेत.
自今以後,我必睜眼垂顧,側耳諦聽在此處發出的祈禱。
16 १६ हे मंदिर मी माझे म्हणून निवडले आहे माझे नाव येथे सदासर्वकाळ रहावे म्हणून मी हे स्थान पवित्र केले आहे माझी दृष्टी आणि माझे चित्त नेहमी या मंदिराकडे लागलेले असेल.
現今我已選擇這殿,予以祝聖,使我的名永遠在這殿中;我的眼和我的心,也時時留在那裏。
17 १७ शलमोना, तुझे पिता दावीद यांच्या प्रमाणेच तू माझ्याशी वागलास, माझ्या आज्ञांचे पालन केलेस, माझे विधी आणि नियम पाळलेस,
至於你,如果你在我面前行走,像你父親達味那樣行走,遵行我吩咐你的一切,恪守我的法律和典章,
18 १८ तर मी तुला समर्थ राजा बनवील आणि तुझे राज्य महान होईल. तुझे पिता दावीद यांना मी तसे वचन दिले आहे. त्यांना मी म्हटले होते, ‘दावीद तुझ्या घराण्यातील पुरुषच इस्राएलाच्या राजपदावर आरुढ होईल.’
我必鞏固你的王位,一如我應許你父親達味所說:你的子孫中,決斷不了有人作以色列的統治者。
19 १९ पण जर माझ्या आज्ञा आणि नियम तू पाळले नाहीस. इतर दैवतांची उपासना व सेवा केलीस,
但是,如果你們遠離我,離棄我在你們前所頒布的法律和誡命,而去服侍敬拜別的神,
20 २० तर मात्र मी दिलेल्या या भूमीतून इस्राएल लोकांस मी हुसकावून लावीन. माझ्या नावाप्रीत्यर्थ असलेले हे पवित्र मंदिर मी सोडून जाईन. इतकेच नव्हे तर त्यांना मी देशामध्ये निंदेचा विषय करीन.
我必將你們從我賜予你們的地上根除,且要拋棄這座為我名而祝聖的殿,毫不顧惜,使它成為萬民的笑話和話柄。
21 २१ एकेकाळी पूज्य मानल्या गेलेल्या या मंदिरावरुन जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला आता आश्चर्य वाटेल. ते लोक म्हणतील, ‘हा प्रदेश आणि हे मंदिर यांची अशी अवस्था परमेश्वराने का केली बरे?’
這殿雖然宏大,凡經過的人必將驚愕說:上主為什麼這樣對待了這地方和這座殿﹖
22 २२ तेव्हा त्यांना इतर लोक सांगतील, ‘कारण आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचे या इस्राएल लोकांनी ऐकले नाही. या लोकांस या परमेश्वरानेच मिसरातून बाहेर आणले. तरी हे इतर दैवतांच्या भजनी लागले. त्यांनी त्यांची उपासना व सेवा केली. त्यांनी मूर्तीपूजा सुरु केली. म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराने हे अरिष्ट आणले.’”
人必回答說:是因為他們離棄了領他們出離埃及地的上主,他們祖先的天主,而歸依、崇拜、服侍了別的神;為此,上主使這一切災禍臨到他們身上。」