< 2 इतिहास 4 >
1 १ शलमोनाने पितळेची वेदी बनवली. तीची लांबी तीस हात, रूंदी तीस हात व उंची दहा हात होती.
Il fit aussi un autel d'airain de vingt coudées de long, de vingt coudées de large, et de dix coudées de haut.
2 २ त्याने ओतीव पितळेचे एक गंगाळदेखील केले. हे गोल असून त्याचा व्यास दहा हात होता. त्याची उंची पाच हात आणि त्याचा कडेचा परीघ तीस हात होता.
Il fit la mer de fonte de dix coudées d'un bord à l'autre, ronde tout autour, et haute de cinq coudées; et un cordon de trente coudées l'environnait tout autour.
3 ३ प्रत्येकी एक हाताच्या अंतरावर या गंगाळाच्या खालच्या कडेला सर्वत्र दहा दहा बैलांच्या चित्रकृती घडवलेल्या होत्या. गंगाळ घडवतानाच एकसंध तुकड्यातून ते बनवले होते.
Et des figures de bœufs l'entouraient en dessous, tout autour, dix par coudée, environnant la mer tout autour; il y avait deux rangées de bœufs fondus avec elle dans sa fonte.
4 ४ बारा घडीव बैलांनी हे प्रशस्त गंगाळ तोललेले होते. तीन पुर्वभीमुख होते, तीन उत्तराभिमुख तीन पश्चिमाभिमुख, तीन दक्षिणभिमुख व गंगाळ त्यांच्यावर होते सर्व बैलांचा पार्श्व भाग आतील बाजूकडे होता.
Elle était posée sur douze bœufs, dont trois tournés vers le nord, trois tournés vers l'occident, trois tournés vers le midi, et trois tournés vers l'orient; la mer était sur eux, et toutes leurs croupes étaient en dedans.
5 ५ या पितळी गंगाळाची जाडी हाता एवढी असून, त्याचे गोलाकार तोंड उमललेल्या कमलपुष्पासारखे होते. त्यामध्ये तीन हजार बुधले पाणी मावू शकत होते.
Son épaisseur était d'une palme; et son bord était comme le bord d'une coupe, en fleur de lis; elle contenait trois mille baths.
6 ६ याखेरीज शलमोनाने दहा तस्ते बनवली. ती त्याने या गंगाळाच्या उजव्या बाजूला पाच आणि डाव्या बाजूला पाच अशी बसवली. होमार्पणात द्यावयाच्या वस्तू धुवून घेण्यासाठी ही दहा तस्ते होती. पण मुख्य पितळी गंगाळ मात्र याजकांच्या वापरासाठी, होते.
Il fit aussi dix cuves, et en mit cinq à droite et cinq à gauche, pour y laver. On y lavait ce qui appartenait aux holocaustes, et la mer servait aux sacrificateurs pour s'y laver.
7 ७ शलमोनाने सोन्याचे दहा दिपस्तंभही त्यांच्या विधीनुसार बनविले, आणि मंदिरात डावीकडे पाच व उजवीकडे पाच असे ठेवले.
Il fit dix chandeliers d'or, selon la forme qu'ils devaient avoir, et les mit dans le temple, cinq à droite et cinq à gauche.
8 ८ तसेच दहा मेज बनवून पाच डावीकडे आणि पाच उजवीकडे अशा पद्धतीने ठेवले. शिवाय सोन्याचे शंभर वाडगे बनवले.
Il fit aussi dix tables, et il les mit dans le temple, cinq à droite, et cinq à gauche; et il fit cent coupes d'or.
9 ९ याखेरीज शलमोनाने याजकांसाठी एक दालन व एक प्रशस्त दालन आणि दरवाजे केले. दालनांत उघडणारे दरवाजे मढवण्यासाठी पितळ वापरले.
Il fit encore le parvis des sacrificateurs, et le grand parvis, et des portes pour ce parvis, et couvrit d'airain ces portes.
10 १० एवढे झाल्यावर आग्नेयला दिशेस मंदिराच्या उजवीकडे त्याने ते मोठे पितळी गंगाळ ठेवले.
Il mit la mer du côté droit, vers l'orient, en face du midi.
11 ११ हिराम या कारागिराने हंडे, फावडी व शिंपडण्यासाठी वाडगे बनवले. देवाच्या मंदीराचे जे काम त्यास शलमोनासाठी करायचे होते ते त्याने पूर्ण केले.
Et Huram fit les pots, les pelles et les coupes; et il acheva de faire l'œuvre qu'il faisait pour le roi Salomon dans la maison de Dieu:
12 १२ दोन स्तंभ, स्तंभावरचे कळस, त्यावरील जाळ्यांची दोन सुशोभने हे काम हिरामने केले होते.
Deux colonnes, les renflements et les deux chapiteaux, sur le sommet des colonnes; les deux réseaux pour couvrir les deux renflements des chapiteaux, sur le sommet des colonnes;
13 १३ त्या जाळीदार आच्छादनांवरील चारशे शोभिवंत डाळिंबे हिरामनेच केली होती. प्रत्येक जाळीवर डाळिंबाच्या दोन ओळी होत्या. स्तंभावरचे कळस या जाळ्यांनी आच्छादलेले होते.
Et les quatre cents grenades pour les deux réseaux, deux rangs de grenades à chaque réseau, pour couvrir les deux renflements des chapiteaux, sur le sommet des colonnes.
14 १४ तिवया आणि तिवयांवरची गंगाळी त्याने घडवली होती.
Il fit aussi les socles, et il fit les cuves sur les socles;
15 १५ मोठे पितळी गंगाळ आणि त्यास आधार देणारे बारा बैल हिरामनेच केले.
Une mer et les douze bœufs sous elle;
16 १६ शलमोनासाठी हिरामाने हंडे, फावडी, मांस खाण्यासाठी काटे इत्यादी परमेश्वराच्या मंदिरातली उपकरणे केली त्यासाठी लखलखीत, उजळ पितळ वापरलेले होते.
Les pots, les pelles et les fourchettes et tous les ustensiles qui en dépendaient, Huram-Abi les fit au roi Salomon, pour la maison de l'Éternel, en airain poli.
17 १७ या सर्व गोष्टीसाठी शलमोनाने आधी चिकणमातीचे साचे बनविले. त्यासाठी सुक्कोथ आणि सरेदा यांच्यामधली, यार्देन खोऱ्यातली माती वापरली.
Le roi les fit fondre dans la plaine du Jourdain, dans une terre grasse, entre Succoth et Tséréda.
18 १८ शलमोनाने मोठ्या प्रमाणात ही भांडी बनवीली. त्यासाठी लागलेल्या पितळाचे वजन कोणालाच समजले नाही.
Et Salomon fit tous ces ustensiles en grand nombre, car on ne pouvait estimer le poids de l'airain.
19 १९ याखेरीज आणखी काही गोष्टी शलमोनाने देवाच्या मंदिरासाठी केल्या. सोन्याची वेदी, व समर्पित भाकर ठेवण्याची मेजे ही केली.
Salomon fit encore tous ces ustensiles qui appartenaient à la maison de Dieu: l'autel d'or, et les tables sur lesquelles on mettait le pain de proposition;
20 २० सोन्याचे दीपवृक्ष आणि दिवे करवून घेतले. आतल्या सर्वांत पवित्र गाभाऱ्याच्या समोर योजना केल्याप्रमाणे लावण्यासाठी हे दिवे होते.
Les chandeliers et leurs lampes d'or fin, qu'on devait allumer devant le sanctuaire, selon l'ordonnance;
21 २१ याव्यतिरिक्त फुले, दिवे आणि निखारे उचलण्याचे चिमटे शुद्ध सोन्याचे होते.
Les fleurs, les lampes, et les mouchettes d'or, d'un or parfaitement pur;
22 २२ कातऱ्या, वाडगी, कटोरे, चमचे, धुप जाळावयाची पात्रे शलमोनाने शुद्ध सोन्याची बनवीली त्याचप्रमाणे मंदिराची दरवाजे, अत्यंत पवित्र अशा गाभाऱ्यातली दरवाजे, आणि मुख्य दालनाचे दरवाजे हे ही सोन्याचे होते.
Et les serpes, les bassins, les tasses et les encensoirs d'or fin. Et quant à l'entrée de la maison, les portes intérieures conduisant au lieu très-saint, et les portes de la maison, pour entrer au temple, étaient d'or.