< 2 इतिहास 35 >
1 १ राजा, योशीयाने यरूशलेमात परमेश्वराप्रीत्यर्थ वल्हांडणाचा उत्सव केला. पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू कापला गेला.
And Josias kept a phase to the Lord in Jerusalem, and it was sacrificed on the fourteenth day of the first month.
2 २ परमेश्वराच्या मंदिराची कामे पार पाडण्यासाठी योशीयाने याजक नेमले आणि त्यांच्या कार्यात त्यांना प्रोत्साहन दिले.
And he set the priests in their offices, and exhorted them to minister in the house of the Lord.
3 ३ इस्राएली लोकांस शिक्षण देणाऱ्या आणि परमेश्वराच्या सेवेसाठी पवित्र होणाऱ्या लेव्यांना योशीया म्हणाला, “दावीद पुत्र शलमोनाने बांधलेल्या या मंदिरात पवित्र करार कोश ठेवा. दावीद इस्राएलचा राजा होता. यापुढे पवित्र करारकोश वारंवार खांद्यावरुन वाहू नका. परमेश्वर देवाची सेवा करा. देवाची प्रजा म्हणजे इस्राएलचे लोक त्यांची सेवा करा.
And he spoke to the Levites, by whose instruction all Israel was sanctified to the Lord, saying: Put the ark in the sanctuary of the temple, which Solomon the son of David king of Israel built: for you shall carry it no more: but minister now to the Lord your God, and to his people Israel.
4 ४ आपआपल्या घराण्यांप्रमाणे तुमचा जो क्रम ठरला आहे त्यानुसार मंदिरातील सेवेसाठी सिध्द व्हा. इस्राएलाचा राजा दावीद आणि त्याचा पुत्र राजा शलमोन यांनी आखून दिल्याप्रमाणे आपआपली कर्तव्ये पार पाडा.
And prepare yourselves by your houses, and families according to your courses, as David king of Israel commanded, and Solomon his son hath written.
5 ५ आपआपल्या घराण्यांच्या वर्गवारीप्रमाणे, भाऊबंदांबरोबर पवित्र स्थानी उभे राहा. म्हणजे तुम्हास आपापसात सहकार्य करता येईल.
And serve ye in the sanctuary by the families and companies of Levi.
6 ६ वल्हांडणाचे यज्ञपशू कापा, परमेश्वरासाठी स्वत: चे पवित्रीकरण करा. इस्राएल बांधवांसाठी यज्ञपशू तयार ठेवा. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही पार पाडा. या आज्ञा परमेश्वराने आपल्याला मोशेद्वारे दिल्या आहेत.”
And being sanctified kill the phase, and prepare your brethren, that they may do according to the words which the Lord spoke by the hand of Moses.
7 ७ वल्हांडणासाठी योशीयाने तीस हजार शेरडेमेंढरे जे तेथे उपस्थित होते त्यांना यज्ञपशू म्हणून इस्राएल लोकांस दिली; याखेरीज तीन हजार दिले. हे पशुधन त्याच्या खाजगी मालमत्तेतील होते.
And Josias gave to all the people that were found there in the solemnity of the phase, of lambs and of kids of the flocks, and of other small cattle thirty thousand, and of oxen three thousand, all these were of the king’s substance.
8 ८ या उत्सवा निमित्त योशीयाच्या सरदारांनीदेखील लोकांस, लेवींना आणि याजकांना पशूंचे आणि वस्तूंचे मुक्त वाटप केले. मुख्य याजक हिल्कीया, जखऱ्या आणि यहीएल हे देवाच्या मंदिराचे प्रमुख कारभारी होते. त्यांनी दोन हजार सहाशे शेरडेमेंढरे आणि तीनशे बैल एवढे पशू वल्हांडणाचे बली म्हणून याजकांना दिले.
And his princes willingly offered what they had vowed, both to the people and to the priests and the Levites. Moreover Helcias, and Zacharias, and Jahiel rulers of the house of the Lord, gave to the priests to keep the phase two thousand six hundred small cattle, and three hundred oxen.
9 ९ कोनन्या आणि त्याचे भाऊ शमाया व नथनेल यांनी तसेच हशब्या, ईयेल व योजाबाद यांनी लेवींना पाच हजार शेरडेमेंढरे व पाचशे बैल वल्हांडणाचे यज्ञपशू म्हणून दिले, कोनन्या इत्यादी मंडळी लेव्याची प्रमुख होती.
And Chonenias, and Semeias and Nathanael, his brethren, and Hasabias, and Jehiel, and Jozabad princes of the Levites, gave to the rest of the Levites to celebrate the phase five thousand small cattle, and five hundred oxen.
10 १० वल्हांडणाच्या उपासनेची सर्व सिध्दता झाल्यावर याजक आणि लेवी आपापल्या जागी स्थानापन्न झाले. तशी राजाज्ञाच होती.
And the ministry was prepared, and the priests stood in their office: the Levites also in their companies, according to the king’s commandment.
11 ११ वल्हांडणाचे कोकरे मारली गेली. त्या पशूंची कातडी काढून रक्त याजकांना दिले. लेवींकडून मिळालेले हे रक्त याजकांनी वेदीवर शिंपडले.
And the phase was immolated: and the priests sprinkled the blood with their hand, and the Levites flayed the holocausts:
12 १२ त्यांनी मग हे बैल परमेश्वरास होमार्पण करण्यासाठी वेगवेगळ्या घराण्याच्या लोकांकडे स्वाधीन केले. हा अर्पणाचा विधी मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे करायचा होता.
And they separated them to give them by the houses and families of every one, and to be offered to the Lord, as it is written in the book of Moses, and with the oxen they did in like manner.
13 १३ लेवींनी वल्हांडणाच्या यज्ञपशूंचे मांस विधिवत भाजले. पातेल्यात, हंड्यांत आणि कढई मध्ये त्यांनीही पवित्रार्पणे शिजवली आणि तत्परतेने लोकांस ती नेऊन दिली.
And they roasted the phase with fire, according to that which is written in the law: but the victims of peace offerings they boiled in caldrons, and kettles, and pots, and they distributed them speedily among all the people.
14 १४ हे काम उरकल्यावर लेवींना स्वत: साठी आणि अहरोनाचे वंशज असलेल्या याजकांसाठी मांस मिळाले. कारण हे याजक होमबली आणि चरबी अर्पण करण्यात रात्र पडेपर्यंत गुंतले होते.
And afterwards they made ready for themselves, and for the priests: for the priests were busied in offering of holocausts and the fat until night: wherefore the Levites prepared for themselves, and for the priests the sons of Aaron last.
15 १५ आसाफच्या घराण्यातील लेवी गायक राजा दाविदाने नेमून दिलेल्या आपापल्या जागांवर उभे होते. आसाफ, हेमान आणि राजाचा संदेष्टा यदूथून हे ते होत. प्रत्येक प्रवेशद्वारावरील द्वारपालांना आपले काम सोडायची गरज नव्हती कारण त्यांच्या लेवी बांधवांनी वल्हांडणाच्या सणाची त्यांच्यासाठी करायची सगळी तयारी केली होती.
And the singers the sons of Asaph stood in their order, according to the commandment of David, and Asaph, and Heman, and Idithun the prophets of the king: and the porters kept guard at every gate, so as not to depart one moment from their service: and therefore their brethren the Levites prepared meats for them.
16 १६ तेव्हा राजा योशीयाच्या आज्ञेनुसार परमेश्वराच्या उपासनेची सर्व तयारी त्या दिवशी पूर्ण झाली. वल्हांडणाचा उत्सव झाला आणि परमेश्वराच्या वेदीवर होमबली अर्पण करण्यात आले.
So all the service of the Lord was duly accomplished that day, both in keeping the phase, and offering holocausts upon the altar of the Lord, according to the commandment of king Josias.
17 १७ सर्व उपस्थित इस्राएल लोकांनी वल्हांडणाचा आणि बेखमीर भाकरीचा सण सात दिवस साजरा केला.
And the children of Israel that were found there, kept the phase at that time, and the feast of unleavened bread seven days.
18 १८ शमुवेल संदेष्ट्यांच्या काळापासून हा सण एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता. इस्राएलच्या कुठल्याच राजाच्या कारकीर्दींत हे झाले नव्हते. राजा योशीया, याजक, लेवी, यहूदा आणि इस्राएलातून आलेले लोक आणि यरूशलेमची प्रजा यांनी वल्हांडणाचा उत्सव थाटामाटाने केला.
There was no phase like to this in Israel, from the days of Samuel the prophet: neither did any of all the kings of Israel keep such a phase as Josias kept, with the priests, and the Levites, and all Juda, and Israel that were found, and the inhabitants of Jerusalem.
19 १९ योशीयाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी हा वल्हांडणाचा उत्सव झाला.
In the eighteenth year of the reign of Josias was this phase celebrated.
20 २० योशीयाने मंदिरासाठी सर्व चांगल्या गोष्टी केल्या. पुढे मिसरचा राजा नखो, फरात नदीजवळच्या कर्कमीश नगराविरुध्द लढावयास सैन्यासह चालून आला. योशीया त्यास लढाईसाठी सामोरा गेला.
After that Josias had repaired the temple, Nechao king of Egypt came up to fight in Charcamis by the Euphrates: and Josias went out to meet him.
21 २१ पण नखोने आपल्या वकीलांमार्फत त्यास कळवले की, यहूदाच्या राजा योशीया, मला तुझ्याशी कर्तव्य नाही. मी तुझ्याशी लढायला आलेलो नाही. माझ्या शत्रूंवर चालून आलो आहे. देवानेच मला त्वरा करायला सांगितले. परमेश्वराची मला साथ आहे तेव्हा तू त्रास घेऊ नकोस. तू मला विरोध केलास तर देव तुझा नाश करील.
But he sent messengers to him, saying: What have I to do with thee, O king of Juda? I come not against thee this day, but I fight against another house, to which God hath commanded me to go in haste: forbear to do against God, who is with me, lest he kill thee.
22 २२ पण योशीया मागे हटला नाही. त्याने नखोला तोंड द्यायचे ठरवले. आणि वेष पालटून तो लढाईत उतरला. देवाच्या आज्ञेविषयी नखोने जे सांगितले ते योशीयाने ऐकले नाही. तो मगिद्दोच्या खोऱ्यात युध्दासाठी सज्ज झाला.
Josias would not return, but prepared to fight against him, and hearkened not to the words of Nechao from the mouth of God, I but went to fight in the field of Mageddo.
23 २३ या लढाईत योशीयावर बाणांचा वर्षाव झाला. तो आपल्या सेवकांना म्हणाला, मी घायाळ झालो आहे, मला इथून घेऊन जा.
And there he was wounded by the archers, and he said to his servants: Carry me out of the battle, for I am grievously wounded.
24 २४ तेव्हा सेवकांनी योशीयाला त्याच्या रथातून उतरवून त्याने तिथे आणलेल्या दुसऱ्या रथात बसवले आणि योशीयाला त्यांनी यरूशलेमेला नेले. यरूशलेमेमध्ये योशीयाला मरण आले. त्याच्या पूर्वजांना पुरले तेथेच योशीयाला पुरण्यात आले. योशीयाच्या मृत्यूने यहूदा आणि यरूशलेमेच्या लोकांस फार दु: ख झाले.
And they removed him from the chariot into another, that followed him after the manner of kings, and they carried him away to Jerusalem, and he died, and was buried in the monument of his fathers, and all Juda and Jerusalem mourned for him,
25 २५ यिर्मयाने योशीया प्रीत्यर्थ शोकगीते लिहिली आणि गायिली. ती विलापगीते आजही इस्राएलचे स्त्रीपुरुष गातात. योशीयाची ही गीते निरंतर गाण्याचा त्यांनी ठरावच केला. विलापगीताच्या पुस्तकात ही लिहिलेली आहेत.
Particularly Jeremias: whose lamentations for Josias all the singing men and singing women repeat unto this day, and it became like a law in Israel: Behold it is found written in the Lamentations.
26 २६ योशीयाची बाकीची कृत्ये आणि परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमानेची चांगली कृत्ये
Now the rest of the acts of Josias and of his mercies, according to what was commanded by the law of the Lord:
27 २७ म्हणजे त्याची सर्व इतर कृत्ये इस्राएल व यहूदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत.
And his works first and last, are written in the book of the kings of Juda and Israel.